नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन !

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 12:07 pm

नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक !

नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात.

इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की.

सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे.

सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Jan 2017 - 12:11 pm | पैसा

+१०० अगदी मनातलं लिहिलंत बघा! अजून थोडी कामे आहेत. पण सदस्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा असतील हे नक्की!

किसन शिंदे's picture

10 Jan 2017 - 12:32 pm | किसन शिंदे

नवी रचना आवडली मिपाची, सोबतच रंगसंगतीही. तेच ते रूप, तीच ती रचना किती दिवस ठेवणार!? काळाच्या ओघात थोडे तरी बदलायला हवेच.

हतोळकरांचा प्रसाद's picture

10 Jan 2017 - 1:02 pm | हतोळकरांचा प्रसाद

अनुमोदन! सुरुवातीला काही वैशिष्ट्ये गायब होती पण ती परत आल्यापासून छान वाटतेय!

नीलकांतच्या संयमी सहनशीलतेचं कौतुक.

मी या बदलाच्या प्रोसेसमधे असंख्य मुद्द्यांवर खडूस टीका केली. (प्रा.डाँ.नीही केली पण ते वयोवृद्ध असल्याने त्यांना खडूस कसं म्हणणार?) ... पण नीलकांतने न वैतागता ते ते बदलून पॉझिटिव्ह बदल घडवत नेले. अजूनही प्रक्रिया चालूच आहे.

थँक्स आणि अभिनंदन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2017 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नवी थीम युजर फ्रेंडली नाही. मिपा मिपा आणि मिपाला सूट होणारी नाही. मला या विषयावर आता काही मतं नाहीत. मला काही बोलायचंही नाही. माझ्यासाठी नवीन मिपा थीम संबंधीत विषय संपला.

संक्षिसेठ, लैच खुश झाले आहात नवी थीम पाहून, कौतुकही तब्येतीने करत आहात, काय विशेष ? निलकांत आणि प्रशांत यांच्याशी खास सलगी दाखवायचा प्रयत्न आहे का ? ;)

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2017 - 4:51 pm | संजय क्षीरसागर

नीलकांत आणि प्रशांतला मी बघितलेलं नाही आणि बघण्याची शक्यताही नाही. इथले २/३ सदस्य सोडता (कारण त्यांच्या केसेस माझ्याकडे आहेत, पण ते सुद्धा मला अजून प्रत्यक्ष भेटलेले नाहीत ! ) माझी कुणाशी वैयक्तिक ओळख नाही. आणि होण्याची शक्यताही दुर्मिळ. सकाळी लॉग इन झालो की आयडी चालू आहे हे कळतं आणि तितपतच आयडीचा मोह आहे.

सो धिस इज जस्ट काँप्लीमेंट फॉर अ नाईस फोरम. अँड अ फ्री फॅसिलीटी, विदाऊट मेकींग अस फील दॅट वे एनी टाईम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2017 - 8:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सकाळी लॉग इन झालो की आयडी चालू आहे हे कळतं आणि तितपतच आयडीचा मोह आहे.

=)) हहपुवा. झाली. कोणाचं काय तर कोणाचं काय.

बाकी, असंच चावलो हो, कुठला राग कुठे तरी काढला. सॉरी.
बाय द वे, नवं काय लिहिताय.

ये प्यार मोहब्बत की राहें होती बडी मुश्किल
म मंझिल, ना हमसफर मिले, न कुछ हासिल.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2017 - 9:36 pm | संजय क्षीरसागर

ये जो हल्का हल्का सुरूर है,
ये तेरी नज़रका कुसूर है,
तुने जाम नज़रसे पीला दिया,
मुझे एक शराबी बना दिया |

टवाळ कार्टा's picture

10 Jan 2017 - 1:11 pm | टवाळ कार्टा

+१११११११११११११११११११

कैवल्यसिंह's picture

10 Jan 2017 - 1:25 pm | कैवल्यसिंह

+११११११११११
मस्त थीमेय मला खुपच आवडली... मोबाईल फ्रेंडली थीमेय...

ठराविक लोकांच्या मोबायल्यावर सूट होणारी थीम दिलीय की काय!

स्रुजा's picture

10 Jan 2017 - 1:40 pm | स्रुजा

+१११११११ .. थीम छान ! मोबाईल वर तर अप्रतिम दिसते आहे..

संक्षी सरांशी सपशेल सहमत. लै भारी काम केले आहे...!!!

नक्कीच! नवीन थीम मस्त आहे. खरंच मनापासून अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2017 - 3:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

संक्षीशी बेशर्त सहमती ! :)

नीलकांत आणि प्रशांत पडद्यामागे राहून मिपासाठी जे काम करत असतात ते फार कमी लोकांना कळून येते. एक खुले मराठी संस्थळ, तेही पदराला खार लाऊन, चालवणे आणि अद्ययावत करत राहणे यातून ते मराठी भाषा आणि मराठी भाषकांबद्दल जे ममत्व दाखवत आहेत त्याला तोड नाही !

मोदक's picture

10 Jan 2017 - 5:27 pm | मोदक

नीलकांत आणि प्रशांत पडद्यामागे राहून मिपासाठी जे काम करत असतात ते फार कमी लोकांना कळून येते. एक खुले मराठी संस्थळ, तेही पदराला खार लाऊन, चालवणे आणि अद्ययावत करत राहणे यातून ते मराठी भाषा आणि मराठी भाषकांबद्दल जे ममत्व दाखवत आहेत त्याला तोड नाही !

बेशर्त सहमत. __/\__

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Jan 2017 - 8:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१

-दिलीप बिरुटे

पुंबा's picture

10 Jan 2017 - 5:33 pm | पुंबा

++१११

गामा पैलवान's picture

10 Jan 2017 - 10:42 pm | गामा पैलवान

संजय क्षीरसागर आणि डॉक्टर सुहास म्हात्रे यांना तीव्र सहमती दर्शवत आहे. नीलकांत आणि प्रशांत जे काम करताहेत त्यास घरचं खाऊन सैन्याच्या भाकऱ्या भाजणे म्हणतात. इतकं सगळं करूनही कसला डांगोरा पिटणं नाही. नाहीतर ते दुसरं संकेतस्थळ! किती माज दाखवतं. सदस्यत्व देतं तेव्हा सदस्यावर उपकार केल्याचा अविर्भाव असतो आणि अचानक रद्द केलं की इतरांवर उपकार केल्याचा अविर्भाव असतो.

-गा.पै.

स्मिता_१३'s picture

10 Jan 2017 - 5:03 pm | स्मिता_१३

अतिशय सुरेख थीम. नीलकांत आणि प्रशांत चे मन:पूर्वक अभिनंदन व खूप खूप धन्यवाद.

लाल टोपी's picture

11 Jan 2017 - 8:19 am | लाल टोपी

नविन रचना हळुहळु अंगवळणी पडते आहे! पडद्यामागे राहुन उत्तम काम करणा र्‍ञा निलकांत आणि प्रशांत यांचे अगदी मनापासून अभिनंदन.