मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन !

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक ! नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात. इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की. सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे. सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !

वाचने 4259 वाचनखूण प्रतिक्रिया 21

पैसा Tue, 01/10/2017 - 12:11
+१०० अगदी मनातलं लिहिलंत बघा! अजून थोडी कामे आहेत. पण सदस्यांसाठी जास्तीत जास्त सुविधा असतील हे नक्की!

In reply to by पैसा

किसन शिंदे Tue, 01/10/2017 - 12:32
नवी रचना आवडली मिपाची, सोबतच रंगसंगतीही. तेच ते रूप, तीच ती रचना किती दिवस ठेवणार!? काळाच्या ओघात थोडे तरी बदलायला हवेच.

गवि Tue, 01/10/2017 - 13:04
नीलकांतच्या संयमी सहनशीलतेचं कौतुक. मी या बदलाच्या प्रोसेसमधे असंख्य मुद्द्यांवर खडूस टीका केली. (प्रा.डाँ.नीही केली पण ते वयोवृद्ध असल्याने त्यांना खडूस कसं म्हणणार?) ... पण नीलकांतने न वैतागता ते ते बदलून पॉझिटिव्ह बदल घडवत नेले. अजूनही प्रक्रिया चालूच आहे. थँक्स आणि अभिनंदन.

In reply to by गवि

नवी थीम युजर फ्रेंडली नाही. मिपा मिपा आणि मिपाला सूट होणारी नाही. मला या विषयावर आता काही मतं नाहीत. मला काही बोलायचंही नाही. माझ्यासाठी नवीन मिपा थीम संबंधीत विषय संपला. संक्षिसेठ, लैच खुश झाले आहात नवी थीम पाहून, कौतुकही तब्येतीने करत आहात, काय विशेष ? निलकांत आणि प्रशांत यांच्याशी खास सलगी दाखवायचा प्रयत्न आहे का ? ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत आणि प्रशांतला मी बघितलेलं नाही आणि बघण्याची शक्यताही नाही. इथले २/३ सदस्य सोडता (कारण त्यांच्या केसेस माझ्याकडे आहेत, पण ते सुद्धा मला अजून प्रत्यक्ष भेटलेले नाहीत ! ) माझी कुणाशी वैयक्तिक ओळख नाही. आणि होण्याची शक्यताही दुर्मिळ. सकाळी लॉग इन झालो की आयडी चालू आहे हे कळतं आणि तितपतच आयडीचा मोह आहे. सो धिस इज जस्ट काँप्लीमेंट फॉर अ नाईस फोरम. अँड अ फ्री फॅसिलीटी, विदाऊट मेकींग अस फील दॅट वे एनी टाईम.

In reply to by संजय क्षीरसागर

>>>> सकाळी लॉग इन झालो की आयडी चालू आहे हे कळतं आणि तितपतच आयडीचा मोह आहे. =)) हहपुवा. झाली. कोणाचं काय तर कोणाचं काय. बाकी, असंच चावलो हो, कुठला राग कुठे तरी काढला. सॉरी. बाय द वे, नवं काय लिहिताय. ये प्यार मोहब्बत की राहें होती बडी मुश्किल म मंझिल, ना हमसफर मिले, न कुछ हासिल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ये जो हल्का हल्का सुरूर है, ये तेरी नज़रका कुसूर है, तुने जाम नज़रसे पीला दिया, मुझे एक शराबी बना दिया |

संक्षीशी बेशर्त सहमती ! :) नीलकांत आणि प्रशांत पडद्यामागे राहून मिपासाठी जे काम करत असतात ते फार कमी लोकांना कळून येते. एक खुले मराठी संस्थळ, तेही पदराला खार लाऊन, चालवणे आणि अद्ययावत करत राहणे यातून ते मराठी भाषा आणि मराठी भाषकांबद्दल जे ममत्व दाखवत आहेत त्याला तोड नाही !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मोदक Tue, 01/10/2017 - 17:27
नीलकांत आणि प्रशांत पडद्यामागे राहून मिपासाठी जे काम करत असतात ते फार कमी लोकांना कळून येते. एक खुले मराठी संस्थळ, तेही पदराला खार लाऊन, चालवणे आणि अद्ययावत करत राहणे यातून ते मराठी भाषा आणि मराठी भाषकांबद्दल जे ममत्व दाखवत आहेत त्याला तोड नाही ! बेशर्त सहमत. __/\__

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गामा पैलवान Tue, 01/10/2017 - 22:42
संजय क्षीरसागर आणि डॉक्टर सुहास म्हात्रे यांना तीव्र सहमती दर्शवत आहे. नीलकांत आणि प्रशांत जे काम करताहेत त्यास घरचं खाऊन सैन्याच्या भाकऱ्या भाजणे म्हणतात. इतकं सगळं करूनही कसला डांगोरा पिटणं नाही. नाहीतर ते दुसरं संकेतस्थळ! किती माज दाखवतं. सदस्यत्व देतं तेव्हा सदस्यावर उपकार केल्याचा अविर्भाव असतो आणि अचानक रद्द केलं की इतरांवर उपकार केल्याचा अविर्भाव असतो. -गा.पै.

लाल टोपी Wed, 01/11/2017 - 08:19
नविन रचना हळुहळु अंगवळणी पडते आहे! पडद्यामागे राहुन उत्तम काम करणा र्‍ञा निलकांत आणि प्रशांत यांचे अगदी मनापासून अभिनंदन.