तीन्ही डिबेटमधे जिंकून, अमेरिकन दुर्गेची- हिलरीची, ८ नव्हेंबरकडे आगेकूच

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
22 Oct 2016 - 8:02 am

"हिलरीने ट्रम्पला तिसर्‍या डिबेटमधे सफशेल पाडलं हे खरं आहे का रे भाऊ?"

"नक्कीच. अरे, शेवटी चिडून ट्रम्प चक्क तिला म्हणालाही
"दुर्गे दुर्घट भारी.."
त्याच्या द्दष्टीने,
"Nasty woman"
पण ती त्याच्याकडे बघून हसली मात्र.
"मी जिंकलो तरच निवडणूकीच्या रिझल्टला मान्यता देईन" असं दुसर्‍या दिवशी सकाळी म्हणाला.पोरकटपणाची परिसीमा म्हटली पाहिजे."

"आता पुढे काय होणार असं तुला वाटतं भाऊ?"

"अंदाज असा आहे की,हिलरी ज्याअर्थी इलेक्टरल व्होटमधे सहजच ३०५ ह्या आकड्यावर पोहोचली आहे.(निवडणूक जिंकायला २७० व्होटस लागतात.)आणि ट्रम्प अजून १७१ व्होटसला रेंगाळतो आहे त्याअर्थी निकाल उघडच आहे.आणि हे त्यालाही माहित आहे.आता उरलेले दिवस तो आदळ-आपट करणार हे निश्चीत."

"इलेक्टरल व्होटस म्हणजे रे काय भाऊ?"

"१०० सिनेटर्स आणि ४३५ कॉंग्रेसमन मिळून ५३५ इलेक्टरल व्होटस अधीक ३ डिस्ट्रीक कोलंबीयाचे मिळून ५३८ व्होट्स होतात.५३५च्या निम्मेच्या जवळ म्हणजे २७० व्होटस मेजारीटी व्होटस म्हणून समजली जातात.२७० च्या वर ज्याला व्होट्स मिळतात तो जिंकतो.
सर्व साधारण प्रत्येक राज्यातून २ सिनेटर्स निवडले जातात.म्हणजे ५० राज्यांचे १०० सिनेटर्स.आणि प्रत्येक राज्याच्या लोकसंख्ये प्रमाणे कॉंग्रेसमन निवडले जातात. एकून ४३५+३ म्हणजे ४३८ कॉंग्रेसमन होतात.४३८+१०० म्हणजे ५३८ एकूण इलेक्टरल व्होटस होतात."

मग प्रत्येक नागरिकाच्या व्होट्सचं काय रे भाऊ?

"त्या त्या राज्यातले नागरिक आपल्या उमेदवाराला मत देतात.दोघा प्रेसिडेंट उमेदवारापैकी ज्याला जास्त मतं मिळतात ते राज्य तो उमेदवार जिंकतो आणि त्या राज्याला दिलेली सर्वच्या सर्व इलेक्टरल व्होटस त्याला मिळतात.ज्या राज्यात जास्त लोकसंख्या त्या राज्यातील इलेक्टरल व्होटस जास्त.

उदा: कॉलिफोरनीयाला ५५ इलेक्टरल व्होटस आहेत.

नागरिकानी दिलेली व्होटस ज्याला पॉप्युलर व्होटस म्हणतात ती ज्या उमेदवाराला जास्त मिळतात तो जिंकला असं नाही.ज्याला २७० पेक्षा जास्त इलेक्टरल व्होटस मिळाली तो जिंकतो."

"मग ही इलेक्टरल व्होटस ही काय भानगड आहे रे भाऊ?"

"अरे,त्याला खूप इतिहास आहे.पण थोडक्यात सांगायच्ं तर जास्तीत जास्त पॉप्युलर व्होटस मिळतात त्या पार्टीच्या उमेदवाराची आणि त्याच्या पार्टीची मिरास होऊ नये म्हणून ५० ही राज्यात इलेक्टरल व्होटस आहेत.त्यामुळे पॉप्युलर व्होटस मिळाली म्हणून तो जिंकला असं होत नाही.ज्याला २७० वर इलेक्टरल व्होटस मिळतात तो जिंकतो कारण त्याची पॉप्युल्यारीटी किती राज्यातून तो निवडून आला ह्या वर आहे.त्यामुळे सर्व राज्याना न्याय मिळतो.
एखाद्या निवडणूकीत एखादं राज्य एकावेळे एका पार्टीचा उमेदवार निवडून देईल तर दुसर्‍या वेळच्या प्रेसिडेंटच्या निवडणूकीत दुसर्‍या पार्टीचा निवडून देईल.अशा राज्याना स्विंग स्टेट्स म्हणतात.प्रचार करून करून एखादं राज्य आपल्या पार्टीकडे फिरवून घेता येतं अशा राज्याना बॅटलग्राऊंड स्टेट म्हणतात.पण काही राज्यं काही झालं तरी एकाच पार्टीला मेजारीटी व्होट देतात .

उदा:कॅलिफोरनीया .....नेहमीच डेमॉक्रेटीक पार्टी्ला निवडून देते
टेक्सस......रिबक्लीन पार्टी.
असं काहीसं आहे.सगळं समजावून सांगायला जागा ही नाही आणि पूर्ण माहिती खिचकट आहे,आणखी डिटेल माहिती हवी असल्यास गुगल करून पहाणं सोपं होईल.पण सगळ्यानांच त्यात इंटरेस्ट नसतं."

म्हणजे आता ८ नोव्हेंबरची वाट पहावी लागेल असंच ना भाऊ?

"होय,अगदी असंच"

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

राजकारणलेख

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

22 Oct 2016 - 8:12 am | पिलीयन रायडर

चांगलं लिहीलय तुम्ही, पण मला अजुनही नीट कळालेलं नाही. परत एकदा वाचते. थोडं नवीन आहे ना..

अस्वस्थामा's picture

22 Oct 2016 - 4:36 pm | अस्वस्थामा

अहो, हे सगळं अगदी मस्त असं इथल्या क्लिंटन भौ नी समजावलंय इथे आधीच (कसलाही आविर्भाव न आणता!).

संदीप डांगे's picture

22 Oct 2016 - 9:11 am | संदीप डांगे

ते मरू देत हो, हे डुप्लिकेट हिलरी काय प्रकरण आहे ते जरा कळू देत,

काय कि आमच्या जाणत्या साहेबाकडून ट्रम्प ने 'पाडापाडीचे राजकारण' ह्या विषयावर गुप्त सल्ला घेतलेला जाणवतोय...

नाखु's picture

22 Oct 2016 - 11:17 am | नाखु

जर ट्रम्प हरले तर बहुधा बीसीसीआय मध्ये एखादे पद द्यावे लागेल ट्रम्प बाबाला आणि दोनचार वायनरी उद्योगांमध्ये भागीदारी.(त्या करीता भारताचे नागरिकत्व मिळण्याची अडचण अगदी चिल्लर आहे ट्रम्प बाबांना)

विशाखा पाटील's picture

22 Oct 2016 - 11:09 am | विशाखा पाटील

या पद्धतीचा तोटाही आहेच. २००० मधल्या निवडणुकीत अल गोर यांना पॉप्युलर व्होटमध्ये जास्त मते मिळूनही जॉर्ज डब्ल्यू. बुश निवडून आले. केवळ एका राज्यात (फ्लोरिडा) जास्त मते मिळाल्यामुळे ते अध्यक्षपदी बसले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2016 - 11:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती निवडणूक ऐतिहासिक होती !

त्या निवडणुकीतल्या फेरमोजणीची कहाणी, फ्लोरिडा सुप्रिम कोर्टाचा हस्तक्षेप व एकंदर निर्णयप्रक्रिया पाहिली तर वोट बूथ कॅप्चरिंगमध्ये तरबेज असलेल्या आपल्या बिहारची मान शरमेने खाली जाईल =)) =)) =))

गामा पैलवान's picture

23 Oct 2016 - 12:01 am | गामा पैलवान

डॉक्टर सुहास म्हात्रे,

अगदी मनातलं बोललात पहा. हिलरीला जिंकून यायचा एकमेव मार्ग म्हणजे मतं चोरणे. झाम्या बुशने हेच केलं होतं २००० साली (खरंतर ड्याडी बुशच सगळी सूत्रं हलवीत होता).

आ.न.,
-गा.पै.

कपिलमुनी's picture

22 Oct 2016 - 2:44 pm | कपिलमुनी

श्रीगुरुजींचा मोदी प्रचारानंतर श्रीकृष्ण काकांना हिलरी प्रचार !
'श्री' नामाचा महिमा अगाध आहे
( ह.घ्या)

गॅरी ट्रुमन's picture

22 Oct 2016 - 2:55 pm | गॅरी ट्रुमन

गेल्या काही दिवसात डॉनल्ड ट्रम्पच्या हातातून निवडणुक गेली आहे असे चित्र दिसत आहे. तसेच चित्र कायम राहिले तर निवडणुक भलतीच एकतर्फी होईल असे वाटायला लागले आहे.

बिल क्लिंटनना १९९२ मध्ये ३७० तर १९९६ मध्ये ३७९ इतकी मते इलेक्टोरल कॉलेजमध्ये मिळाली होती.साधारण त्याच्या आसपास हिलरी जाणार असे वाटू लागले आहे. आणि ट्रम्पनी पुढील काही दिवसात अजून गोंधळ घातला तर १९८० च्या दशकातील तीनही निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा जोरदार विजय झाला होता तसा हिलरींना मिळाला तरी आश्चर्य वाटू नये. १९८८ मध्ये थोरल्या बुशना ४२६, १९८४ मध्ये रॉनाल्ड रेगनना ५२५ तर १९८० मध्ये ४८९ मते मिळाली होती.नक्की काय होते हे लवकरच समजेल.

रविकिरण फडके's picture

22 Oct 2016 - 5:00 pm | रविकिरण फडके

त्या बाईला दुर्गा वगैरे म्हणून गौरवू नका. तिची तेवढी पात्रता नाही. सर्वसाधारणपणे, राजकारणातल्या कोणत्याच व्यक्तीला अशा उपाध्या लावू नयेत, हे बरे.

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2016 - 3:45 pm | श्रीगुरुजी
विवेकपटाईत's picture

23 Oct 2016 - 7:40 pm | विवेकपटाईत

हिलेरीचे जिंकणे भारताचा हिताचे नाही. विकिपीडिया वरून "As Secretary of State in the Obama administration from 2009 to 2013, Clinton responded to the Arab Spring, during which she advocated the U.S. military intervention in Libya.

या काळात आपल्या देश्यात हि NGOच्या माध्यमातून अस्थिरता पसरविण्याचे प्रयत्न झाले होते. अमेरिकन भारतीयांनी ट्रम्प कितीही मूर्ख असला तरी त्याला वोट देणे योग्य. हिलेरींचे धोरण भारत विरोधी राहणार हे निश्चित.

अमेरिकेतल्या निवडणुकीत कसा झोल केला जातो त्यावर झालेले स्टिंग ऑपरेशन...

अमेरिकन मिडिया हिलरीच्या विरोधात ब्र देखील काढताना दिसणार नाही आणि तिच्या लिक्स बद्धल तर बोलणे सोडा वाचणे देखील पाप समजत असतील ! शेवटी इतके ब्रेन वॉश झाले आहे की डायरेक्ट दुर्गा भक्ती करायलाही कमी होत नाही हे सप्रमाण सिद्ध होते ! { हिलरी सारख्या नीच स्त्रीची तुलना दुर्गा देवीशी करणे हे मला व्यक्तिशः अत्यंत त्रास दायक वाटते } वाहिन्यांवर त्यांचे पत्रकार तिच्या विरोधात बोलायला लागले की न्यूज फिड डायरेकट कट केली जाते.

P1
संदर्भ :- http://www.investors.com/politics/trump-ibdtipp-poll/
What 20,000 pages of hacked WikiLeaks emails teach us about Hillary Clinton

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अय्यो पापम... :- Yevadu

मराठी कथालेखक's picture

7 Nov 2016 - 2:29 pm | मराठी कथालेखक

वाहिन्यांवर त्यांचे पत्रकार तिच्या विरोधात बोलायला लागले की न्यूज फिड डायरेकट कट केली जाते.

भयंकर आहे हे...अमेरिकेत स्वातंत्र्याची अशी गळचेपी !!

गामा पैलवान's picture

7 Nov 2016 - 1:46 pm | गामा पैलवान

लोकहो,

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक म्हणजे एक सर्कस आहे. तिच्यातून फक्त विदूषकंच निवडला जाऊ शकतो. तर हा विदूषक निवडायची वेळ उद्यावर येऊन ठेपली आहे.

ट्रंप डेमोक्रॅट कंपूतच वावरायचे. त्यांची आणि क्लिंटन दांपत्याची घनिष्ट दोस्ती जगजाहीर आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाकडे स्वत:चा स्वतंत्र उमेदवार नाही. एकंदरीत विदूषकही एकाच पार्टीतून निवडायची सक्ती अमेरिकी जनतेवर झाली आहे. तेव्हा विदूषक निवडीकरिता अमेरिकी जनतेस शुभेच्छा.

आ.न.,
-गा.पै.

अनुप ढेरे's picture

7 Nov 2016 - 3:08 pm | अनुप ढेरे

हिलरीच येवो. हिलरी मुक्त बाजारपेठेची समर्थक आहे असा समज झाला आहे थोडफार वाचून. भारत आणि इतर गरीब देशांना मुक्त बाजारपेठ फायद्याची असते. ट्रंप खुल्याबाजाराविरोधात आहे. खूप भारतीय कंपन्या अमेरिकेत कपडे निर्यात करतात. ट्रंपच्या धोरणांमुळे त्यांना फटका बसू शकतो. तेच औषधकंपन्यांबद्दल.

मा.तं कंपन्यांवर काय फरक पडेल माहिती नाही.

इस्लामी दशतवादावर दोहोंपैकी कोणीही खूप काहितरी वेगळं करेल/करू शकेल असं वाटत नाही.

रुस्तम's picture

9 Nov 2016 - 2:02 pm | रुस्तम

हिलरी हारली ...

महासंग्राम's picture

9 Nov 2016 - 2:20 pm | महासंग्राम

अरे बगताय काय रागानं, बाजी मारलीये वाघानं !!!

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2016 - 2:46 pm | श्रीगुरुजी

सामंतकाकांचं मत वाया गेलं.

आनन्दा's picture

9 Nov 2016 - 2:49 pm | आनन्दा

"लग्नाआधी मी पण वाघ होतो" च्या धर्तीवर "मतदानाआधी मी पण दुर्गा होते" असे म्हणायला हरकत नाही :)

नाखु's picture

9 Nov 2016 - 2:51 pm | नाखु

गेली दुर्गा आला मुर्गा असे घोषवाक्य टाकावे काय?

आनन्दा's picture

9 Nov 2016 - 2:58 pm | आनन्दा

ट्ठो!! बाय द वे, मला ट्रंप तेव्हढा बेभवरशी वाटत नाही. यावेळची अमेरिकन निवडणूक आणि २०१४ची भारतीय निवडणूक बर्‍याच बाबतीत सारखी आहे. आणि ते जर खरे असेल, तर ट्रंप हा पोचलेला खेळाडू वाटतो. असे लोक जेव्हढे गरम दिसतात त्याच्या हजारो पटींनी थंड डोक्याने चालणारे असतात. त्यामुळे त्याचा तेव्हढा धोका नाही असे मला वाटते. किंबहुना तो चांगले दीर्घकालीन निर्णय घेईल असे वाटते.
बाकी ट्रंपच्या विजयात अमेरिकन माध्यमांचा सगळ्यत मोठा हात आहे याबाबत दुमत नसावे.

ट्रंफने फक्त हिलरीला हरवलेले नाही, तर माध्यमे राजकारणी पंडीत व मतचाचण्या विश्लेषक यांनाही हरवलेय. अगदी मोदींप्रमाणे. आता त्यांना कोणताही निर्णय घेऊ दे. असे हातधुऊन मागे लागतील सगळे मिडियावाले व राजकीय पंडीत की बस्स.

समदु:खी म्हणून ते व मोदी मित्र झाले तर मग मजाच मजा.
:))

मराठी कथालेखक's picture

9 Nov 2016 - 4:22 pm | मराठी कथालेखक

ट्रम्प आता सगळ्या मिडियाला घोडा लावेल :)

गामा पैलवान's picture

9 Nov 2016 - 6:53 pm | गामा पैलवान

बाकी काही म्हणा, पण हुमा अबिदीन ही दहशतवादी बाई धवलगृही शिरू शकंत नाही याचा मला घोर आनंद झाला आहे.

-गा.पै.

हे धत्तड तत्त्ड, धत्तड तत्त्ड !!! ट्रंप अण्णांचे हार्दिक हबिणंदण

दुर्गे सूड, सूड दुर्गे !!! :)

पिलीयन रायडर's picture

9 Nov 2016 - 10:58 pm | पिलीयन रायडर

काकांना धक्का बसला असेल फार.. त्यांना फार मनातुन हिलरी जिंकायला हवी होती..

असु दे काका.. होतं असं..

वरुण मोहिते's picture

9 Nov 2016 - 11:09 pm | वरुण मोहिते

पण कृपया दुर्गा वैग्रे नको माझी विनंती आहे

बाजीगर's picture

10 Nov 2016 - 2:09 am | बाजीगर

काका काका...
fact is stranger than fantacy.

स्पार्टाकस's picture

10 Nov 2016 - 4:34 am | स्पार्टाकस

पूतना मावशी हरली

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2016 - 8:31 am | श्रीगुरुजी

बरोबर. पण कंसमामा जिंकला.

सेलफोन's picture

18 Nov 2016 - 9:18 pm | सेलफोन

नऊ नोव्हेंबरच्या आधीचे सर्व रिप्लाय आणि मूळ पोस्ट वाचून फार्फार मनोरंजन झाले. प्रस्थापित प्रसारमाध्यमांवर विसंबून आपले मत बनवले की काय होते ह्याचे ही पोस्ट उत्तम नमुना आहे.
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला
ट्रम्पशिवाय पर्याय नाही वॉशिंग्टनच्या मातीला

ह्या ह्या ह्या