लंडनवारी - भाग ५ - याचसाठी केला होता सारा अट्टाहास!

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
21 Oct 2016 - 3:04 pm

लंडनवारी:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
याचसाठी केला होता सारा अट्टाहास!

ब्लॉग दुवे:
पूर्वतयारी
छोटालं गाव आणि मोठालं शेत
कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस

याचसाठी केला होता सारा अट्टाहास!... असं म्हटलं तर शिव्या मिळतील मला घरी. 'म्हणजे म्हणू....न तू लंडन लंडन करत होतास?' इत्यादी इत्यादी. तसं नव्हतं काही; पण आता जातोच आहे म्हटल्यावर मग... :) असो. तर, माझ्या ओल्ड ट्रॅफर्ड भेटीचं वर्णन खरं तर मी इंग्रजीत लिहिलंय, पण मिपा मराठी संकेतस्थळ असल्यामुळे, संक्षिप्त का होईना, मिपासाठी एक वेगळा वृत्तांत. छोटा वाटल्यास सांगा, इंग्रजी लेखाचा दुवा देतो. काय आहे, मँचेस्टर, युनायटेड बद्दल लिहायला बसलो ते इंग्रजीतच सुचलं, त्यामुळे तसंच लिहिलं.

1

वारकर्‍याला पंढरपुराची जशी ओढ लागावी तशीच अगदी ओढ मला त्या दिवशी रात्री लागलेली होती. उद्या उठून निघेन, मॅन्चेस्टरला जाईन असं कल्पनाचित्र रंगवायला घेतलेलं होतं आणि तशात कधी डोळा लागला कळलं नाही. तत्पूर्वी स्टेडियम टूरच्या तिकिटाच्या चौपट किंमत ट्रेनला मोजली तेंव्हा 'काय ही लोकं वेडी आहेत ना त्या मॅन्चेस्टर पायी' वगैरे ऐकून झालं होतं. ते तसं बरेचदा ऐकतो म्हणा. गजर लावून उठून मॅच बघणं, मॅचडे ला आपणही जर्सी घालून राहणं इत्यादी प्रकार आजूबाजूच्या मंडळींना चमत्कारिकच वाटतात. चालायचंच.

1

दुसर्‍या दिवशीचा घर ते मॅन्चेस्टर हा व्हर्जिन ट्रेनचा प्रवास फार झकास झाला. ट्रेनचा स्पीड तगडा आहे आणि जास्त कलकल नव्हती. त्यामुळे निवांत एकटा खिडकीत बसायचा आनंद घेतला. बायको आणि मुलगा माझ्यासोबत आज येणार नव्हते कारण एक तर प्रवास मोठा होता, बायकोला 'इतक्कं काय त्यात' चं उत्तर माहित नव्हतं आणि मुलाने म्युझियम वगैरे आवडत नसल्याचं आदल्या दिवशीच सूचित केलेलं होतं. त्यामुळे एकासाठी तिघांची जा जा ये ये नको असं ठरलं होतं. एकटा म्हणजे धमाल असते राव. हवं तिथे थांबा हवं ते करा. आज एन्जॉय करत होतो त्यामुळे.

a

मॅन्चेस्टरला उतरलो. सुरुवातीला गंडलो पण लवकरच बसची सिस्टिम कळली आणि नेमक्या बशीत बसलो. मॅट बस्बी वे ला उतरल्यावर आधीच ठरवल्याप्रमाणे नाकासमोरही नाही, तर हनुवटीखालीच बघत चालत गेटपर्यंत पोचलो. मला ते अर्ध लक्ष ट्रॅफिककडे आणि अर्ध लक्ष स्टेडियमकडे असं करून पहिलं दर्शन नको होतं. त्यामुळे एकदाचा गेटच्या आत गेलो आणि वर बघितलं. बॅक्ग्राउंडला 'माऊली माऊली माऊली माऊली' वाजतंय अशी कल्पना करा. चक्क मी ओल्ड ट्रॅफर्ड ला आलोय! च्च्या गाव्वात! #अणबिळिव्हेबळ

a

म्युझियमकडे धावलो. स्टेडियम टूरची वेळ होत आली होती. साडेचारहज्जार मैलावरून इथवर आल्यावर एक मिनिटही मला वाया घालवायचं नव्हतं.

a

स्टेडियम टूर सुरू झाली तसा मी हरवायला लागलो. 'We are sitting where the home fans sit' असं म्हटल्यावर होम फॅन्स चा डेफनिंग कलकलाट कानात ऐकू आला. 'This is where the club directors and other VIP members sit' म्हटल्यावर बॉबी चार्ल्टन, एड वुडवर्ड्स, 'सर' अ‍ॅलेक्स फर्ग्युसन वगैरे दिसल्याचा भास झाला. असं करत करत मी माझ्याच विश्वात हरवत गेलो. लोकं फोटो काढत तेंव्हा माझी तंद्री लागलेली असायची आणि सगळे निघाले की 'yup. just a moment' असं टूर गाईडला म्हणून मी फोटो काढायचो.

a
a

a
Hey! Pass it forward!

एकंदर 'वेड' अनुभव होता. म्हणजे सांगणं कठीण आहे, पण सगळं स्वप्नवत तरीही ओळखीचं वाटत होतं. कधी वाटलं मी यांच्यापैकी एक असतो तर, मी कसा खेळलो असतो. कधी वाटलं मी मॅनेजर असतो तर, मी कसे डाव आखले असते. असं काय काय होत होतं. बघता बघता टूर संपली. ऐंशी मिनिटं कशी गेली कळलंच नाही. पुरली नाही हे सांगायलाच नको.

a
a
a
a

खरं तर मॅच बघण्याचा बेत होता माझा. पण खूप प्रयत्न करूनही तिकिटं मिळाली नाहीत. ट्रीप ठरल्यापासूनच मागावर होतो, पण गेम सोल्ड आऊटच दाखवला तिकिटं ओपन झाल्यापासून. इतर स्त्रोतही बघितले पण एक तर तिकिटं नाहीत, किंवा भाव कैच्याकै असा प्रकार होता. त्यामुळे मग तो हट्ट सोडावा लागला होता. स्टेडियम टूरनंतर मेगास्टोअर मधे गेलो. अंतर्वस्त्रापसून ते चादरी, उशांपर्यंत, पेनापासून छत्रीपर्यंत सगळं काही मॅन्चेस्टर युनायटेड ब्रँडचं सामान इथे होतं. तिथे चार-पाच गोष्टी घेतल्या खर्‍या, पण त्यांनी माझा ओल्ड ट्रॅफर्डचा अनुभव पूर्ण होणार नव्हता.

a

मी पुन्हा ओल्ड ट्रॅफर्ड ला नक्की येणार. या वेळी मित्र मित्र येणार आणि मॅच बघायलाच येणार. तेंव्हा खरं हे वाक्य अर्थपूर्ण वाटेल, 'याचसाठी केला होता सारा अट्टाहास!'

a

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

21 Oct 2016 - 3:22 pm | महासंग्राम

जे ब्बात ... सुरॆख वर्णन लिहिलंय देवा ...

पद्मावति's picture

21 Oct 2016 - 3:42 pm | पद्मावति

क्या बात है!!!! मस्तं झालाय हाही भाग.

सिरुसेरि's picture

21 Oct 2016 - 3:53 pm | सिरुसेरि

सुरॆख वर्णन . लॉर्डस आणी शेरलॉक होम्स म्युझीअम लवकरच येउ दे .

वेल्लाभट's picture

21 Oct 2016 - 3:58 pm | वेल्लाभट

माफ करा, मी या दोनही ठिकाणांना भेट दिलेली नाही! :)

त्यासाठी अट्टाहास नाही केलात वेल्लाभट ? हा हंत हंत....

हा ही भाग छान झालाय. फोटो, वर्णन, सगळंच टॉप नॉच !

प्रभाकर पेठकर's picture

24 Oct 2016 - 7:32 pm | प्रभाकर पेठकर

>>>>लॉर्डस आणी शेरलॉक होम्स म्युझीअम

लॉर्डस म्हणजे क्रिकेटची पंढरी. तिथली टूर घेतली तर संपूर्ण स्टेडियम तपशीलवार पाहता येते. पण सामने चालले असतील तर ती संधी लाभत नाही तरी पण स्वस्तातले तिकिट काढून निवांत बसून अनुभव घेता येतो.

शेरलॉक होम्स म्युझिअम अगदी छोटंस आणि कांही खास नाहीये. महत्वाचा वेळ फुकट घालवू नये.

वेल्लाभट's picture

21 Oct 2016 - 3:59 pm | वेल्लाभट

सिरुसेरी, मंदार, पद्मावती: धन्यवाद!

वा!मस्त. अगदी मनातून आलंय वर्णन!

वेल्लाभट's picture

23 Oct 2016 - 3:43 pm | वेल्लाभट

सगळ्यांना धन्यवाद ! :)

रेवती's picture

23 Oct 2016 - 7:21 pm | रेवती

हे लेखन व फोटू आवडले.

झकास सुरू आहे लेखमाला...!!

पिलीयन रायडर's picture

25 Oct 2016 - 1:12 am | पिलीयन रायडर

गडबडीने हा भाग उघडला की बाबा कायंच पाहिलं असेल की!!! तर अमझीही अवस्था तुमच्या बायको सारखीच आहे =))

पण जसं जसा भाग वाचत गेले तस तशी तुमची तळमळ कळत गेली. आनंद वाटला की तुम्हाला हे पहायला मिळालं. :)

आता एक दिवस तुम्ही इथेच मॅच सुद्धा बघाल नक्कीच!

वेल्लाभट's picture

25 Oct 2016 - 10:43 am | वेल्लाभट

अमझीही अवस्था तुमच्या बायको सारखीच आहे

असं की काय! ग्रेट

हो मॅच नक्कीच बघीन एक दिवस लवकरच. कालच मित्र म्हणाला 'अरे मी सेव्हिंग सुरु केलंय आपल्या ट्रीपसाठी'! हाहा. फुल ऑन यक्सायटेड होता. सो; सर्टनली सूनर दॅन लेटर होणार तो प्लॅन.

असो; धन्यवाद पुन्हा एकदा.

जुइ's picture

25 Oct 2016 - 1:36 am | जुइ

आतापर्यंत आलेले सगळे भाग वाचले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

वेल्लाभट's picture

25 Oct 2016 - 10:40 am | वेल्लाभट

रेवती मोदक पिरातै जुई - अनेक आभार :)