आठवण

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in जे न देखे रवी...
25 Sep 2008 - 9:47 am

धुक्यापरी तु निघुन गेलीस,नजरे पुढुनी बघता बघता
इथे-तिथे मी शोधीत असतो तुझ्याकडे येणार्‍या वाटा...
दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे
गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे...
दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन
तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन...
दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मनीषा's picture

25 Sep 2008 - 10:13 am | मनीषा

--आवडली

दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे
गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... खूप छान

अरुण मनोहर's picture

25 Sep 2008 - 10:20 am | अरुण मनोहर

सुंदर वर्णन

मदनबाण's picture

25 Sep 2008 - 10:20 am | मदनबाण

सुंदर कविता ..

दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....
हे मस्तच...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Sep 2008 - 10:30 am | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली.छान लिहिली आहे.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 12:31 pm | जैनाचं कार्ट (not verified)

दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

वा वा !
एकदम मस्त कडवे आहे !

सुचना : कविता लहान वाटत आहे मला तरी ... जरा वाढवता येईल का ?

* ओ की ठो कळत नाही पण उगाच वा वा ... करण्यापेक्षा अजून काही खरडावे म्हणून खालील वरील सुचना... मनावर घेऊ नये ;)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

दत्ता काळे's picture

25 Sep 2008 - 4:46 pm | दत्ता काळे

. . . . . . . . . स्पर्श तयाचा आहे घेरुन
व्वा सुंदर कल्पना

स्वाती फडणीस's picture

25 Sep 2008 - 4:56 pm | स्वाती फडणीस

छान लिहिली आहे.

यशोधरा's picture

25 Sep 2008 - 6:11 pm | यशोधरा

छान लिहिलेस फुलवा..

टुकुल's picture

26 Sep 2008 - 5:03 am | टुकुल

खुपच सुंदर कविता... मनाला भावली..

दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

हे खुपच मस्त

प्राजु's picture

26 Sep 2008 - 5:12 am | प्राजु

खास. वेगळी आहे आणि नितांत सुंदर..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

26 Sep 2008 - 6:11 am | बेसनलाडू

कविता छान आहे. फार आवडली. मोगरा आणि निळी चांदणी सगळ्यात जास्त आवडले.
कवितेत एक अंगभूत लय आहे, जी काही ठिकाणी मात्रांनी बिघडवली. मात्रांमध्ये किरकोळ सुधारणा केल्यास लयसुद्धा सांभाळली जाईल असे वाटते.
शुभेच्छा!
(आस्वादक)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

26 Sep 2008 - 10:02 am | आनंदयात्री

>>दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
>>जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

वाचकाला भावविभोर करणारे कडवे !
कवितेच्या शेवटी आल्यामुळे रेंगाळत रहाते मनात !

अनिरुद्धशेटे's picture

26 Sep 2008 - 10:30 am | अनिरुद्धशेटे

अप्रतिम शब्द,

दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन
तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन...

अनिरुद्ध

श्रीकान्त पाटिल's picture

5 Dec 2008 - 1:08 pm | श्रीकान्त पाटिल

दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे
गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे...

खुप छान ...

दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे
जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

खुप खुप छान ....
फुलवा अशीच फुलत रहा आणि फुलवत रहा ...