मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आठवण

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
धुक्यापरी तु निघुन गेलीस,नजरे पुढुनी बघता बघता इथे-तिथे मी शोधीत असतो तुझ्याकडे येणार्‍या वाटा... दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे....

वाचने 3840 वाचनखूण प्रतिक्रिया 14

मनीषा गुरुवार, 09/25/2008 - 10:13
--आवडली दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... खूप छान

मदनबाण गुरुवार, 09/25/2008 - 10:20
सुंदर कविता .. दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... हे मस्तच... मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

जैनाचं कार्ट गुरुवार, 09/25/2008 - 12:31
दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... वा वा ! एकदम मस्त कडवे आहे ! सुचना : कविता लहान वाटत आहे मला तरी ... जरा वाढवता येईल का ? * ओ की ठो कळत नाही पण उगाच वा वा ... करण्यापेक्षा अजून काही खरडावे म्हणून खालील वरील सुचना... मनावर घेऊ नये ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

टुकुल Fri, 09/26/2008 - 05:03
खुपच सुंदर कविता... मनाला भावली.. दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... हे खुपच मस्त

बेसनलाडू Fri, 09/26/2008 - 06:11
कविता छान आहे. फार आवडली. मोगरा आणि निळी चांदणी सगळ्यात जास्त आवडले. कवितेत एक अंगभूत लय आहे, जी काही ठिकाणी मात्रांनी बिघडवली. मात्रांमध्ये किरकोळ सुधारणा केल्यास लयसुद्धा सांभाळली जाईल असे वाटते. शुभेच्छा! (आस्वादक)बेसनलाडू

आनंदयात्री Fri, 09/26/2008 - 10:02
>>दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे >>जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... वाचकाला भावविभोर करणारे कडवे ! कवितेच्या शेवटी आल्यामुळे रेंगाळत रहाते मनात !

अनिरुद्धशेटे Fri, 09/26/2008 - 10:30
अप्रतिम शब्द, दिलास तू जो हात उदासीत, स्पर्श तयाचा आहे घेरुन तुझे प्रेम ही बरसत आहे मनात माझ्या श्रावण होवुन... अनिरुद्ध

दिलास तू जो मला मोगरा ओंजळ अजुनी भरुनी आहे गंध तयाचा पाकळी सारीत, तुला आठवीत खुलतो आहे... खुप छान ... दुर दुर त्या नभात निळ्सर एक चांदणी हसते आहे जाणवते का तुला या क्षणी,कुणी तरी तुज आठवीत आहे.... खुप खुप छान .... फुलवा अशीच फुलत रहा आणि फुलवत रहा ...