शृंगापत्ती

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in काथ्याकूट
19 Aug 2016 - 9:55 am
गाभा: 

शृंगापत्ती

रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) हि एक सॉफ्ट वेअर कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला आहे. तेथे असणाऱ्या सर्व सोयी सुविधा आणि मोकळॆ वातावरण याचा ती मनसोक्त उपभोग घेते. त्यात तिच्या बरोबर काम करणाऱ्या इतर मित्रमंडळी पैकी एका बरोबर तिचे धागे जुळले. एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले. अर्थात रुपाली गरोदर होतीच. तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.
मग काय, बस, आपण फक्त चांगले मित्र राहूया असे रुपालीने त्याला सांगितले. अर्थात त्याला हे गरोदरपणाचे सांगायचं काही संबंधच नव्हता.
माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली तिथे तिने रीतसर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. दुर्दैवाने पूर्ण गर्भपात झाला नाही आणि थोडेसा भाग आत राहिला होता हे सोनोग्राफीत समजून आले मग परत एक छोटीशी शल्यक्रिया आणि सर्व आलबेल झालं.
सात आठ महिन्यांनी माझा हा मित्र त्याला मित्राच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण आले म्हणून गेला. स्वागत समारंभासाठी गेला. मित्राबरोबर गप्पा टप्पा झाल्या. कुणाची मुले काय करताहेत? एक कोण तरी आजोबा झाला होता त्याची म्हातारा म्हणून यथेच्छ टिंगल करून झाली. सून कुठली आहे तिचे घराणे, खानदान,, हनिमूनला कुठे जाणार इ सर्व चर्चा झाल्या आणि वधूवराना भेटायला हा स्टेज वर गेला. मुलाला अभिनंदन म्हणून हस्तांदोलन केले आणि वधूकडे वळून पहिले तर "रुपाली" . आमचा मित्र एकदम चमकला. त्याचा चेहरा उतरला. रुपालीने अर्थात ओळख दाखवली नाही. सासऱ्याचे "डॉक्टर मित्र" म्हणून नमस्कार चमत्कार झाले.
आमच्या मित्राला तेथे असलेले सुग्रास स्नेहभोजन काही घशाखाली उतरेना. तेवढ्यात त्याला एक फोन आला. त्याची संधी घेऊन मित्रांमधून हा मला कॉल आहे मी निघतो म्हणाला. मित्रमंडळींनी नेहमीप्रमाणे हा "बायकांच्या घोळक्यात कृष्ण" असतो म्हणून थट्टा केली ती पण त्याला जीवावर आली.
एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले. बायकोशी बोलायचे तर बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही. पाचव्या दिवशी त्याने मला फोन केला आणि हि कहाणी सांगितली. (मी त्याच्या त्या मित्राला ओळखत नाही.) मी त्याला गीतेतील "कर्मण्येवाधीकारस्ते सारखे ज्ञानामृत पाजले.
काही दिवसांनी त्याला या मित्राच्या घरी जाण्याचा प्रसंग आला तेंव्हा परत हीच कहाणी.
सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

प्रतिक्रिया

खेडूत's picture

19 Aug 2016 - 10:11 am | खेडूत

एकदम फिल्मी स्टोरी!
पण ते त्यांच्या मित्राला भेटायला जात असतील तर तितकेच भेटून यावे, इतरांकडे दुर्लक्ष्य करावे. किंवा बाहेरच बोलावून भेटावे.
व्यावसायिक नीतिमत्ता सर्वात महत्वाची.

तुमच्या मित्राला व्यावसायिक नीतीमत्तेची बर्‍यापैकी चाड असावी असे दिसते. त्यांनी त्या कुटुंबियांना काही सांगितलेले नाहीये म्हणून. तुम्हांला सांगितले नसते तरी चालले असते.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 1:29 pm | सुबोध खरे

यशोधरा ताई
माझ्या मित्राने हि गोष्ट कदाचित "मन मोकळे" करण्यासाठी मला सांगितली असावी
मला सांगितले नसते तरी चालले असते.हे मान्य.

मग ते तिथवरच रहायला हवे होते ना? इथे मिपावर मांडायचा उद्देश्य काय?

हे विचारते म्हणजे मलाही हे प्रश्न पडलेत की ह्या लेखात जी मुलीच्या स्वभावाची, वागण्याची, निर्णयांची चिकित्सा झालेली आहे हे तुमच्या मित्राचे मत की तुम्ही केलेले जजमेंट? अगदी त्या मुलीने तुमच्या मित्राला सांगितले आहे असे धरुन चालले तरी तुमच्यापरेंत येईपरेंत आणि तुमच्याकडून मिपावर पोहोचेपरेंत त्याला सांगोवांगीचे स्वरुप आले आहे, तेव्हा त्याला अर्थ नाही. तुम्हां दोघांपैकी कोणी खोटे बोलत आहे असेही म्हणायचे नाहीये, पण तरी मिपाकरांपरेंत ते सांगोवांगीच्याच स्वरुपात येत आहे.

आपण दोघे डॉ आहात, शरीरसंबंध दोघांनी ठेवले, मग फक्त मुलीचे वागणे/ खानदान/ विचार ह्याबद्दल्च उहापोह का करावासा वाटला? त्या मुलाविषयी ना तुमच्या मित्राच्या मनात काही शक्यता आल्या, ना तुमच्या - असे निदान लेखावरुन तरी वाटते आहे - असे का?

.. असो.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 10:15 pm | सुबोध खरे

ह्या लेखात जी मुलीच्या स्वभावाची, वागण्याची, निर्णयांची चिकित्सा झालेली आहे हे तुमच्या मित्राचे मत की तुम्ही केलेले जजमेंट?
तेव्हा त्याला अर्थ नाही. तुम्हां दोघांपैकी कोणी खोटे बोलत आहे असेही म्हणायचे नाहीये, पण तरी मिपाकरांपरेंत ते सांगोवांगीच्याच स्वरुपात येत आहे.

त्या मुलीची सोनोग्राफी मी दोनदा केली. सोनोग्राफी करण्यापूर्वी सरकारी फॉर्म "एफ" भरावा लागतो आपलं नाव, गाव, पत्ता, नवऱ्याचं ( अविवाहित असेल तर बापाचं) नाव हे सर्व त्यात मुलीला भरावं लागतं. त्याला (फॉर्म एफ ला) सोनोग्राफीसाठी पाठवणाऱ्या डॉक्टरने सोनोग्राफीसाठी का पाठवलं ते प्रिस्क्रिप्शन जोडावं लागतं.( यात काही चूक झाली तर रेडियोलॉजिस्टची मान्यता रद्द होऊन त्याला तुरुंगात जावे लागते
(या उफराट्या कायद्यात बदल करण्यासाठीच रेडियोलॉजिस्ट संपावर गेले होते).
गर्भपात करून घेणाऱ्या मुलीने गर्भपात का केला( गर्भलिंग जाणून घेतल्यावर केला कि कसे इ) यावर नजर ठेवण्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन भरला जातो.
त्यामुळे त्या मुलीची सर्व माहिती मला कळून येतेच.
या शिवाय एक मोठा मुद्दा असा आहे कि लग्न न झालेल्या स्त्रीची (कुमारिकेची) तपासणी आतून ( transvaginal) करता येत नाही. बऱ्याच वेळेस गर्भाचा आकार आणि वय हे आतून तपासणी केल्याशिवाय नीट दिसत नाही. परंतु ती स्त्री कुमारिका आहे कि नाही हे ठरवणे शक्य नाही म्हणून लग्न न झालेली हि कुमारिका आहे असे "समजण्यात" येते.
तिच्या दोन सोनोग्राफी मी केल्यामुळे लग्नाआधी ती गर्भार राहिली होती हे मला १०० % माहिती होते आणि याचा लिखित पुरावा त्या मुलीच्या हस्ताक्षरात लिहिलेला माझ्याकडे सरकारी नियमाप्रमाणे पुढचे तीन वर्षे मला जपून ठेवावा लागणार आहे.
यानंतरचा भाग त्या डॉक्टरांनी मला सांगितला तसा मी शब्दशः लिहिला आहे यात माझा एक पैशाचाही सहभाग नाही.
सांगोवांगीचे रूप आले म्हणजे आपले काय म्हणणे होते कि मी त्या डॉक्टरचे म्हणणे खरे खोटे शहानिशा करून पाहायला हवे होते?कि त्याला "मला तुझ्या मित्राकडे घेऊन चल" असे सांगायला पाहिजे होते.
आपले म्हणणे मी मिपावर "लिहूच नये" असे असेल तर तो भाग निराळा आहे. पण ते मी मान्य करेन असे नाही.
राहिली गोष्ट मुलीचे वागणे यावर उहापोह का केला? याचे कारण ती मुलगी आमच्या कडे "गर्भपात" करण्यासाठी आली होती.
त्या मित्राच्या मुलाचे चरित्र तपासून का पहिले नाही? कारण त्याला काळा कि गोरा मी पाहिलेला नाही. मित्राने आपल्या मित्राच्या मुलाच्या बद्दल माझ्याशी कशावरून चर्चा करावी? आपले म्हणणे फारच ओढून ताणून लिहिलेले आहे किंवा पूर्वग्रहदूषित आहे असेच मी म्हणतो.

आपण मिपावर लिहू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही, असे कुठे माझया प्रतिसादातून ध्वनितही होत नाहवे. तुमच्या मताशी ना जुळणारे लिहिले वा तुमच्या बाजूने लिहिले नाही की पूर्वग्रहदूषित? म्हणजे मी मत मांडूच नये की काय? ;)

मला हे नककीच म्हणायचे आहे की आपळता मिटाकडून किंचित का होईना व्यावसायिक नीतीमत्ता पाळली गेली नाही. त्याने पेशंटबद्दल तुमच्याशी चर्चा केली. तरी एक वेळ त्यांची मानसिक आणि भावनिक उलघाल मी समजू शकते. त्यांना टी मुलगी तुमच्याकडेहीले तपासायला आली होती हे माहीत होते का? असेल वा नसेल, डॉक्टर म्हणून नाही तर मिटी म्हणून त्यांनी आपली बोच, काही एका विश्वासाने आपल्याकडे बोलून दाखवली असणं शक्य आहे, की गोष्ट तुमच्याकडेच राहील, तिला पंख फुटणार नाहीत. पण तुम्हीं तर अख्ख्या मिपावर जाहीर करून टाकले की हो! अलबत्ता नाव बदललेत, पण इतके डिटेल्स दिलेत की ज्याचा संबंध आहे त्याला कदाचित समजूनही जाईल. आणि तुमचीही पेशंट होती तर मग तुमच्याकडून तर व्यावसायिकतेचेही उल्लंघन झालेय की. मित्राचे नाव पुढे केलेत तरी. जे रिपोर्ट्स तुम्हाला जपून ठेवावे लागतील, ते गोपनीय असायला हवेत ना? माहिती तुंगाला डॉ म्हणून कळणं आणि तुम्हीच टी मिपाजाहिर करणं ह्यात फरक नाही का?

मला काहीही म्हणा, वस्तुस्थिती अशी आहे. लिहायचं म्हणाल तर अजूनही विषय आहेत की लोकांचा आयुष्य चव्हाट्यावर ना मांडताही लिहिता येण्यायोगे. नाही का?

आणि हो, तुमच्या मताविरुद्ध काही लिहिणे म्हणजे तुमच्याबद्दल आकस असणे, पूर्वग्रह असणे, असा होत नाही.

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 9:07 am | उडन खटोला

काहीही....

उगाच बाळ कि खाळ काढणं सुरु दिसतंय. इथं स्त्रीवादी किंवा कौटुंबिक दृष्टीकोन सोडा. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने बघा. रुपाली पाटील ऐवजी क्ष असं नाव टाकायला हरकत नव्हती.
(अज्ञाती सोडणावे चालू शकलं असतं)

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 9:14 am | सुबोध खरे

आपण मिपावर लिहू नये असे माझे मुळीच म्हणणे नाही, असे कुठे माझया प्रतिसादातून ध्वनितही होत नाहवे.
मग ते तिथवरच रहायला हवे होते ना? इथे मिपावर मांडायचा उद्देश्य काय?
मला हे नककीच म्हणायचे आहे की आपळता मिटाकडून किंचित का होईना व्यावसायिक नीतीमत्ता पाळली गेली नाही
हा निकाल आपण कोणत्या आधारावर करीत आहात?
एक मुलगी लग्नाअगोदर गरोदर झाली तिचा गर्भपात केलेलय डॉक्टरांच्या मित्राच्या मुलाशी तिचे लग्न झाले आणि लग्नात डॉक्टरांनी तिला पाहून ते चमकले आणि आता आपल्या व्यावसायिक नीतीप्रमाणे गप्प बसायचे कि नाही या दोलायमान परिस्थितीत ते आहेत यात काय गोपनीयता आहे कि जी मी इथे मांडून व्यावसायिक नीतिमत्ता पाळली नाही.
तिला पंख फुटणार नाहीत. पण तुम्हीं तर अख्ख्या मिपावर जाहीर करून टाकले की हो! अलबत्ता नाव बदललेत, पण इतके डिटेल्स दिलेत की ज्याचा संबंध आहे त्याला कदाचित समजूनही जाईल.
काय काय डिटेल दिलेत हो ?आणि मित्राला किंवा त्याच्या मुलाला कसे समजेल कि आपल्या सुनेने लग्नापूर्वी गर्भपात करून घेतला आहे. मिपा वाचून?
उगाच डोगर पोखरून झुरळ काढू नका

त्याने पेशंटबद्दल तुमच्याशी चर्चा केली. तरी एक वेळ त्यांची मानसिक आणि भावनिक उलघाल मी समजू शकते. त्यांना टी मुलगी तुमच्याकडेहीले तपासायला आली होती हे माहीत होते का?
आपण लेख नीट न वाचता प्रतिसाद देता याचे हे उघड आणि धडधडीत उदाहरण आहे. लेखात काय लिहिले आहे ते आपल्यासाठी शब्दशः देतो आहे
एके दिवशी रुपाली आपली पाळी चुकली म्हणून माझ्या स्त्रीरोगतज्ञ मित्राकडे आली. त्याने तिला माझ्याकडे सोनोग्राफीसाठी पाठविले.
एकदा वाचा आणि मग प्रतिक्रिया देत जा. म्हणून मी लिहिले आहे कि आपला प्रतिसाद पूर्वग्रह दूषित आहे त्याची खात्रीच पटत आहे

अहो सोनोग्राफी तुमच्याकडे केली ना? दोनदा? हे कोणी लिहिलेय? मी?

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 9:36 am | सुबोध खरे

त्यांना टी मुलगी तुमच्याकडेहीले तपासायला आली होती हे माहीत होते का?

अहो डॉक्टर, मी माझ्या मनात आलेल्या शक्यता लिहितेय, तुम्हाला आणि तुमच्या मित्रालाही benefit of doubt देतेय, हे लक्षात घेताय का?

असो :)

उडन खटोला's picture

21 Aug 2016 - 9:48 am | उडन खटोला

त्यांनी तसं काही गुन्हा केल्याचं दिसलं नाही. त्यामुळे benefit of doubt सोडून द्या.
बाकी मनाच्या विषम अवस्थेत जगणारांनी इतरांना असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं बघून मौज वाटते.

फक्त काही स्त्रियाच तर्कशुद्ध विचार करु शकतात.
- ज्येष्ठ विचारवंत उ डनख टोला

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 10:30 am | प्रभाकर पेठकर

अरे बापरे फारच कोंडी झाली आहे तुमच्या मित्राची. आधी कळलं असतं तर गोपनियतेचे नियम पाळूनही मित्राच्या मुलाला वाचविता आले असते. कोणाच्या भल्यासाठी, आयुष्य वाचविण्यासाठी केलेले गोपनियता मोडण्याचे पापही पाप ठरू नये. जशी, स्वसंरक्षणासाठी हातून झालेली हत्या, कायद्याच्या चौकटीत, 'खून' समजली जात नाही.

इथे आपण मित्राच्या मुलाला धुतल्या तांदूळा सारखा मानत आहोत. पण खरंच तो तसा आहे का? हाही कळीचा मुद्दा आहे. कित्येक शांत, सभ्य आणि सुसंस्कारी दिसणार्‍या मुलांच्याही बाहेर 'भानगडी' असतात. पण त्यांना डॉक्टरकडे जावे लागत नाही. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची. माझा एक मित्र होता. (होता म्हणजे हल्ली कुठे असतो हे माहित नाही, म्हणून) त्याला 'तशा' बायकांच्या वस्तीत जायची सवय होती. पुढे त्याच्या आई-वडीलांनी त्याचेही लग्न लावून दिले. आम्ही वहिनीला थेट बोहल्यावरच पाहिले. अत्यंत शांत, सुस्वभावी आणि गुणी अशी मुलगी. आम्ही सर्व मित्रच हळहळलो. बिच्चारी, असा विचार मनांत आला. पण काही करू शकलो नाही. त्या मुलीचे आईवडील आमच्या बरोबर बोलताना म्हणाले, 'मुलाचे आईवडील खुप साधे आणि सुस्वभावी आहेत. घराणं चांगलं आहे.' आम्ही नुसत्या माना डोलावल्या. काय करणार? आई वडील खरोखरंच खुप साधे आणि सुस्वभावी होते पण मुलगा.....?

आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती. दिसायला सुंदर वगैरे. पण तिचे आमच्या ऑफिसमधल्याच एका, वयाने ज्येष्ठ अशा ऑफिसर बरोबर प्रेमसंबंध होते. तो विवाहित होता. माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाला ती मुलगी सांगून आली होती. तेंव्हा त्यांनी, मी त्याच कंपनीत नोकरीला असल्यामुळे, माझ्या वडिलांना माझ्याकडे तिच्याबद्दल चौकशी करायला सांगितली. वडिलांनी मला विचारलं तेंव्हा मी एव्हढेच म्हणालो की 'तुमच्या मित्राला, त्यांच्या मुलासाठी, दुसरी मुलगी शोधायला सांगा.' असो.

डॉक्टरसाहेब, तुम्ही व्हॅल्यु जजमेंटल झाला आहात असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते.

त्या मुली चे लग्ना आधी एकाशी शाररीक संबंध होते, ह्या गोष्टीवरुन तुम्ही/तुमचा मित्र तिच्या बद्दल/ तिच्या स्वभावाबद्दल / कॅरेक्टर बद्दल जजमेंट पास करत आहात. मुळात ते संबंध लग्ना आधी होते , तिने ते लग्न करायचे ठरवल्यावर संपवले असतील.

लग्न केल्यावर / ठरल्यावर जर ती असे संबंध ठेवत असेल तर थोडेसेच जजमेंटल होयला हरकत नाही. पण कोणाचे कोणाशी लग्नाआधी संबंध होते म्हणुन तोच काळीमा असल्यासारखे आयुष्यभर वागवायचे का?

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 1:28 pm | सुबोध खरे

गम्बा साहेब
मी जजमेंटल झाल्याचे किंवा जजमेंट पास केल्याचे आपल्याला कसे आणि कुठे दिसले ते सांगाल का?

गंम्बा's picture

19 Aug 2016 - 1:44 pm | गंम्बा

डॉक्टर साहेब,

लेख वाचुन तरी असे वाटतय की तुमच्या डॉक्टर मित्राला टोचणी लागली आहे. टोचणी कसली तर तुमच्या डॉक्टर मित्रानी त्याच्या मित्राला रुपाली बद्दल ची माहीती अगोदर दिली नाही ह्याची. म्हणजे कुठेतरी रुपाली चे वागणे ( लग्ना आधीचे ) चुक आहे असे वाटतय . मित्राला सावध करायला पाहिजे होते असेही वाटतय कारण काय तर रुपाली चांगली मुलगी नाही.

तुम्ही तुमच्या खालच्या प्रतिसादात हे नमुद पण केले आहे की लग्न पूर्व संबंध चुक वाटत होते, ह्यालाच जजमेंट पास करणे म्हणतात ना.

तेंव्हा आजच्या पिढीचे मापदंड त्याच्या सारख्या बाळबोध मनाला पटणे कठीण आहे. त्या पिढीत लग्न पूर्व संबंध हे चुकीचे मानले जात

तुम्ही जे वाक्य कोट केलंय, ते जजमेंटल वाटत नाही.
एखादा समाज /काळ, काय मानतो/ काय नाही याबद्दलचं माझं मत हे त्या मान्यतांबद्दलचं माझं मत असत नाही. जरी मी त्या समाजातला, काळातला असलो तरी.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:21 pm | सुबोध खरे

गम्बा साहेब
मी माझे कोणतेही मत या पूर्ण लेखात मांडलेले नाही.
माझ्या मित्राच्या असलेल्या विचारसरणी वर आपण मला जजमेंटल ठरवता आहेत हि मुळात चूक आहे. आपण १०. ५३ च्या रुपतिसादात जजमेंटल असल्याचे म्हणता आणि १३. ३७ च्या (मी "नंतर" दिलेल्या) प्रतिसादातील वाक्य उधृत करून आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहात. हे चूक आहे.

पैसा's picture

19 Aug 2016 - 10:59 am | पैसा

हल्ली झी मराठी टीव्हीवर एक सिरियल चालू आहे त्यात तर अशी लग्नाआधी प्रेग्नंट असलेली सून डॉक्टर नवर्‍याच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन सगळ्यांच्या डोक्यावर मिरे वाटताना दिसते. तेव्हा हे जरा जास्तच दाखवतात असे वाटले होते!

तुमच्या मित्राला कानकोंडे व्हायची गरज नाही. जे काय व्हायचे होते ते झाले. आधी न कळल्यामुळे ते थांबवता आले नाही यात त्याची काही चूक नाही. त्याने त्याची व्यावसायिक नीतीमत्ताही व्यवस्थित पाळली आहे. त्या सुनेकडे संपूर्ण दुर्लक्ष करावे. तिच्याशी बोलायला किंवा भेटायला तर तो जात नाही. त्याचा मित्र आणि मित्राची बायको यांच्याबरोबरची इतक्या वर्षांची नाती तिसर्‍याच कोणामुळे गमावायची गरज नाही.

मित्राची सून आपणहोऊन काही सांगायला आली तर सामंजस्याने बोलणे शक्य असेल तर सांगून पहावे. नाहीतर दुर्लक्ष करावे. फारतर आपण तुझ्यासारखे नाही हे सांगून तिला एकदाच झटकून टाकावे. मित्राच्या मुलाने कदाचित सगळे माहीत असताना तिला स्वीकारलेले असू शकेल. कोणाला माहित!

मित्राच्या मुलाने कदाचित सगळे माहीत असताना तिला स्वीकारलेले असू शकेल. कोणाला माहित!

+१...अशी बरीच जास्त शक्यता आहे.

रविकिरण फडके's picture

20 Aug 2016 - 9:04 pm | रविकिरण फडके

"हल्ली झी मराठी टीव्हीवर एक सिरियल चालू आहे त्यात तर अशी लग्नाआधी प्रेग्नंट असलेली सून.......हे जरा जास्तच दाखवतात असे वाटले होते!"
जरा जास्तच? असा नवरा जगात कोठे असेल तर मी पैसे खर्च करून त्याला बघायला जायला तयार आहे!
खरे तर मराठी TV मालिकांवर काही लिहावे एवढी त्यांची लायकी नाही (काही अपवाद असतील तर मला ते माहीत नाहीत.) प्रत्येक मालिकेबरोबर हे चॅनेलवाले अधिकाधिक खालची पातळी गाठताहेत. (हे बोलूनही काय होणार म्हणा; बघणारे बघतातच आणि चॅनेलवाले पैसे कमावतातच. प्रेक्षकांची अभिरुची हळूहळू पण निश्चितपणे खाली जात आहे ह्याचीच फक्त खंत.)
BTW , सुबोध खरेंची गोष्ट निश्चितपणे संभाव्य - घडू शकेल अशी - आहे.

nanaba's picture

22 Aug 2016 - 8:04 am | nanaba

This is possible in world - not in India.
In my office in USA - a lady became grandma and she got married in the same month.

पी. के.'s picture

19 Aug 2016 - 11:11 am | पी. के.

जर तर च्या गोष्टी...

जर मुलाची प्रेमप्रकरण असतील तर?
जर लग्नानंतर मुलांनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर?
जर लग्नानंतर मुलींनी विवाहबाह्य संबंध ठेवले तर?

माझं मत.. विष आहे हे माहित असेल तर चव बघू नये. पूर्ण चौकशी करून लग्न करावे.
हि झाली आपली( माझीही) भारतीय सुंस्कृती.

मागे एक यूरोपीय कस्टमर भेटला होता. वयाच्या पंचेचाळिसावाय वर्षी पहिल लग्न करतोय. म्हणतो कसा " तीन तिचं लाईफ एंजॉय केलाय मी माझं ( त्या अर्थी) आता आम्ही लग्न करतोय ".

आता बोला..

मराठमोळा's picture

19 Aug 2016 - 11:28 am | मराठमोळा

रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता

हे तिने स्वतः सांगितले का? नसेल तर कशावरून हा तर्क काढला?

मित्राला फसवले गेल्याची भावना

सर्वात पहिले फसवणूक कशी झाली आहे हे स्पष्ट करा. मुलगी आणि मुलाने एकमेकांना सगळं खरं सांगून (आई वडीलांना न कळू देता) लग्न केलं असेल तर? आणि आधी चुका केलेले/झालेले लोक कधीच सुधारत किंवा बदलत नाहीत असा दावा करत आहात का? किंवा आधी अशी चूक केली म्हणून लग्नासाठी तशाच चुका केलेला जोडीदार निवडायचा असा कायदा आहे? म्हणजे एखाद्या विधवेने विधूरच जोडीदार शोधयचा असे काही? बाकीचे नंतर.....

हा पैलूही विचारात घ्यावा एखाद्या प्रथमवराने विधवेशी लग्न करताना समाज (अर्थात आई वडील-नातलग आणि जवळचे मित्र) मोकळ्या मनाने स्वीकारतो का? जितका उदारपणा आणि पुढारलेपणा आंतरजातीय्/धर्मीय विवाहात आला आहे त्याच्या एक दशाम्शही अश्या प्रकरणात नाही.

ममोंचे प्रश्न मार्मीक आहेत खरे !

बोका-ए-आझम's picture

19 Aug 2016 - 12:16 pm | बोका-ए-आझम

जितका उदारपणा आणि पुढारलेपणा आंतरजातीय्/धर्मीय विवाहात आला आहे त्याच्या एक दशाम्शही अश्या प्रकरणात नाही.

असहमत नाखुकाका. Honour killing च्या बहुतांशी घटनांमध्ये आंतरधर्मीय/आंतरजातीय विवाहांची पार्श्वभूमी असते. अगदी शहरांमध्येही. एका प्रसिद्ध गिर्यारोहकाला आंतरजातीय विवाह केला म्हणून पूर्ण गावाने वाळीत टाकण्याची घटना महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात मुंबईपासून काही किमी अंतरावरच घडलेली आहे. त्यामुळे आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही. जोपर्यंत आंतरजातीय/धर्मीय विवाहांचा वेगळा उल्लेख होणं थांबत नाही, तोपर्यंत पुढारलेपणा आलाय असं म्हणणं चुकीचं आहे.

नाखु's picture

22 Aug 2016 - 9:03 am | नाखु

आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांत उदारपणा आणि पुढारलेपणा आलेला आहे हे पटत नाही.

जो काही आला आहे (अगदी २-५%) त्याबाबत फक्त निरिक्षण होते,म्हणजे शहाण्णव कुळी मान्य/स्वीकार करीत नसतीलही पण इतर उच्च वर्णीय (सामाजीक उतरंडीमधील, माझ्या मतानुसार नाही) स्वीकारण्याचे प्रमाण वाढत आहे. जैन-मराठा, ब्राह्मण-मराठा,ब्राह्मण-मराठा-पंजाबी-केरळी)

माझ्या नातेवाईकांमध्ये मामेभावाच्या मुलीने केरळीयन मुलाशी ल्ग्न केले आहे, तीला मल्याळम इल्ले,त्याला मराठी येत नश्शे.

तितक्या सहजपणे/मोकळेपणाने विधुर्/विधवा/घटस्फोटीत यांना प्रथमवर्/वधू स्वीकारत नाहीत आणि स्वीकारले तरी त्या प्रथमवर्/वधू यांच्या घरच्या/मित्र-आप्तेष्टांच्या सामाजीक दडपणाचा अद्रुश्य प्रभाव असतोच.

मराठी कथालेखक's picture

22 Aug 2016 - 10:57 am | मराठी कथालेखक

सहमत
माझ्या पाहण्यात घरच्यांच्या संमतीने (ते ही आनंदाने दिलेली संमती) आंतरजातीय/धर्मीय विवाह अनेक (मी स्वतःही) आहेत. पण प्रथमवराने विधवा/घटस्फोटितेशी लग्न केल्याचे एकच उदाहरण आहे. नात्यातील एका मुलाचे अशा प्रकारे लग्न तेही ठरवून झाले आहे. पण त्याची अडचण अशी होती की त्याचे लग्न जुळतच नव्हते. तो सामान्यपेक्षा किंचित कमी बुद्धीमत्तेचा मुलगा आहे (अगदी गतीमंद नाही म्हणता येणार), त्यामुळे जेमतेम दहावी झालाय (बर्‍याच प्रयत्नांत) , भावाच्या मदतीने व्यवसाय कसाबसा करत आहे बोलण्या वागण्यात हळूहळू सफाई / स्मार्टनेस येत आहे.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 1:37 pm | सुबोध खरे

हे तिने स्वतः सांगितले का?
होय.
कारण आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञ मित्राने गर्भपात कशासाठी करायचा आहे हे विचारले असताना रुपालीने त्यांना हे सांगितले.
आमचा मित्र ५५ + आहे. तेंव्हा आजच्या पिढीचे मापदंड त्याच्या सारख्या बाळबोध मनाला पटणे कठीण आहे. त्या पिढीत लग्न पूर्व संबंध हे चुकीचे मानले जात आणि या वयात आपली विचारसरणी बदलणे कठीण आहे. त्याच्या मित्राचा मुलगा हा त्याला आपल्या मुलासारखाच वाटत असावा. समजून उमजून लग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणारी मुलगी मागच्या पिढीतील कुणीही स्वतःला सून म्हणून करून घेही असे वाटत नाही. तयातून या मुलीने मित्राच्या मुलाशी "त्याच्या पैशासाठी" लग्न केले हि भावना त्याच्या मनातून जात नसावी.
अर्थात हे सर्व तर्क आहेत. कारण या प्रकरणात जेवढे मला माहित आहे तेवढेच मी लिहू शकतो.
शिवाय कुणी कसा विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

बोका-ए-आझम's picture

19 Aug 2016 - 1:45 pm | बोका-ए-आझम

हा प्रतिसाद तुम्ही तुम्हाला या धाग्यावर जेव्हा लोकांनी प्रश्न विचारले, तेव्हा स्पष्टीकरण म्हणून दिलाय. जर हा उल्लेख तुम्ही तुमच्या मूळ धाग्यात केला असता, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. Any way, जर रूपाली आणि तिचा नवरा सुखात असले तर बाकीच्यांना (ज्यात तुम्ही-आम्ही सगळे आलेच) का चौकशा? त्यांच्या घरचा किराणा आपण भरतोय का?

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:25 pm | सुबोध खरे

बोका साहेब
आपल्या "स्वतःच्या घरचा" सोडून इतर कुणाचाच किराणा आपण भरत नाही. मग इतर कोणत्याही व्यक्तीबद्दल नाव घेऊन काहीच बोलायचं आपल्याला अधिकार नाही. येथे तर कुणालाच "रुपाली"चे खरे नाव माहित नाही. आणि ती व्यक्ती एक प्रातिनिधिक स्वरूपात आहे. या लेखाचे उद्दिष्ट मी शेवटी टाकत आहेच.

अनुप ढेरे's picture

19 Aug 2016 - 1:38 pm | अनुप ढेरे

अगदी हेच्च मनात आलेलं. जर मुलीने मुलाला ऑनेस्टली सांगितलं असेल तर?

आणि याहून पुढे, विवाहपूर्व संबंध ही चूक कशी?

विजुभाऊ's picture

19 Aug 2016 - 11:40 am | विजुभाऊ

ज्याने केले त्याला डर नाही. पण ज्याने सोडवले तोच घाबरायला लागलाय.
मित्राचे भले विचार करत असाल तर हळु हळू त्याच्या घरी जाणे थांबवा.

देशपांडे विनायक's picture

19 Aug 2016 - 11:44 am | देशपांडे विनायक

पण आता मापदंड बदलले आहेत ना ?
हाच विषय -- लग्नाशिवाय शरीर संबंध - चर्चेत असताना पुढील गोष्ट सांगण्यात आली
रोज उशिरा घरी येणाऱ्या मुलीला आई म्हणाली '' तुझे बाबा हे एकमेव पुरुष ज्यांच्या बरोबर
मी लग्नाआधी फिरले .
तुझ्या मुलीला तू असं सांगू शकशील ? ''
मुलगी म्हणाली यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे ?
लग्नाच्या बाबतीत
माझ्या कायदेशीर सज्ञान वयात [ १८ ते ७५ ] मी पहिले ते असे
१] बायकोला किंवा नवऱ्याला सोडले जायचे पण घटस्फोट घेत नसत
२] लग्नानंतर सोडलेल्या बायकोने किंवा नवऱ्याने घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करणे
३] लग्नाच्या बंधनाखेरीज एकत्र राहणे
आताचे जेष्ठ नागरिक १ आणि २ पचवून बसले त्यांना ३ पचवणे मात्र कठीण जात आहे

समजा तुमच्या स्त्रीरोगतज्ञ मित्राने रुपालीचं दुसरं कुठलं operation केलं असतं तर त्याला असं वाटलं असतं का? जिने केलं तिला काही वाटत नाहीये आणि ज्याने operation करुन डाॅक्टरचं कर्तव्य पार पाडलं तो घाबरतोय. हा विपर्यास आहे.

तिला हा गर्भ नको होता. कारण ज्या मित्राबरोबर धागे जुळलेले होते तो तिच्या इतकाच पगार घेणारा होता. रुपालीचे विचार वेगळे होते. तिला सज्जड पगार घेणारा नवरा हवा होता. चार पैसे जास्त असले कि खरेदी खाणे पिणे पर्यटन यावर कसा सढळ हस्ते खर्च करता येतो. हा मित्र काही फार जास्त पगार मिळवत नव्हता.

हे कशावरून? तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम अाहे आणि तरीही तिला गर्भ नकोय असं असू शकतं की.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:30 pm | सुबोध खरे

बोका साहेब
दुसरा कुठलंहि ऑपरेशन करण्यासाठी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला ती मुलगी बहुतांशी जबाबदार नसते. उदा. गर्भाशयात मोठा फायब्रॉईड असेल तर त्याला ती मुलगी जबाबदार नाही. पण नको असलेली गर्भधारणा झाली तर त्याला ती मुलगी (कदाचित १०० % नाही पण) "थोड्याफार प्रमाणात" तरी जबाबदार "असू शकते"
तिचं त्याच्यावर मनापासून प्रेम अाहे आणि तरीही तिला गर्भ नकोय असं असू शकतं की.
अमान्य
असं होतं तर तिने दुसर्याशी लग्न का केलं?

मृत्युन्जय's picture

19 Aug 2016 - 12:32 pm | मृत्युन्जय

सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो

सुनेच्या दृष्टीत तिरस्कार का दिसतो म्हणे? उलटे सुनेने वरमुन पाहिले पाहिजे ना? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा झाल्या.

असो. एकुणच लेखच पटला नाही आणि तुमच्या मित्राचा दृष्टीकोनही नाही. सगळे वाचले असता "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म राधासुता" या धर्तीवर डॉक्टारच्या मानसिकतेबद्दल प्रश्न विचारायला हवा.

दुसरी गोष्ट म्हणजे मुलीने तिच्या गत आयुष्याला मागे सोडुन पुढे कूच केले असेल तर मुलीच्या लग्ना आधी च्या खाजगी आयुष्यावद्दल तुमच्या मित्रालाच काय तर तिच्या नवर्‍याला देखील काही प्रॉब्लेम असायचे काही कारण नाही. नवरा बायकोच्या नात्यात दोघांनीही एकमेकांशी प्रतारणा करु नये मात्र आधी जे काही मात्रासेल ते नजरेआड करावे अश्या मताचा मी तरी आहे.

शिवाय तुमच्या मित्राला सांगा की त्यांच्या मित्राच्या मुलाच्या आणि त्याच्या बायकोच्या नात्यात किती पारदर्शकता आहे हे तुमच्या मित्राला कदाचित माहितीही नसेल. कदाचित मुलीने सगळे सांगितलेही असेल. कदाचित दोघांनी संमतीने गत आयुष्याबद्दल विचार न करण्याचा निर्णयही घेतला असेल. कदाचित मुलाचे त्याच्या बायकोवर निरातिशय प्रेम असेल अश्या केसमध्ये तिचे पुर्वायुष्य त्याच्या दृष्टीने (त्या अर्थाने) कदाचित गौणही असेल.

या सगळ्या प्रकरणात एकच गोष्ट खटकली ती म्हणजे केवळ पैशाखातर एखाद्या मुलीने एखादे नाते किंवा एखाद्दा संबंध नाकारणे. तिचा दॄष्टीकोन जर खरेच तसा असेल तर मला तिची कीव वाटते आणि तिच्या नवर्‍याबद्दल वाईट वाटते.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 1:39 pm | सुबोध खरे

शिवाय तुमच्या मित्राला सांगा की त्यांच्या मित्राच्या मुलाच्या आणि त्याच्या बायकोच्या नात्यात किती पारदर्शकता आहे हे तुमच्या मित्राला कदाचित माहितीही नसेल. कदाचित मुलीने सगळे सांगितलेही असेल. कदाचित दोघांनी संमतीने गत आयुष्याबद्दल विचार न करण्याचा निर्णयही घेतला असेल. कदाचित मुलाचे त्याच्या बायकोवर निरातिशय प्रेम असेल अश्या केसमध्ये तिचे पुर्वायुष्य त्याच्या दृष्टीने (त्या अर्थाने) कदाचित गौणही असेल.
हे सर्व शक्य आहे. परंतु साठीच्या जवळ आलेल्या माणसाची विचारसरणी आपण बदलू शकत नाही.
लग्न बाह्य आणि लग्न पूर्व संबंध चूक आहेत असे मानणाऱ्या पिढीचा माणूस आपले विचार आता बदलू शकेल असे वाटत नाही.

जास्त खोलात जाऊन विचार केलातर एखाद्या मुलीला पैसेवाला नवरा मिळवावासा वाटत असेल तर त्यात काय नैतिक चुक आहे.

आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त उंच, शरीरयष्टी चांगली असलेला मुलगा नवरा म्हणुन शोधला तर चालते. मग कोणी जास्त पैसेवाला नवरा शोधला तर काय चुक आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 1:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

मग एखाद्या विवाहपुर्व संबंध नसलेल्या मुलाने विवाहपुर्व संबंध नसलेली मुलगी हवी अशी अपेक्शा केली की लोक्स धावतत त्याच्या मागे बुरसटलेल्या विचारांचा म्हणुन.!

अभ्या..'s picture

19 Aug 2016 - 1:50 pm | अभ्या..

हायला, नॉर्मल तर आहे.
मला एका शंकाय, मी स्वतः तर काय लै पैसेवाला नाही पण एखाद्या मुलाला एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या पैशासाठी लग्न करतेय असे सांगितल्यावर काय रिऍक्शन असेल मुलाची? इतके दिवस मजबूत कमावल्याबद्दल कृतार्थता वगैरे? किंवा बापाचा पैसा असल्याबद्दल लै भारी वगैरे?

एखाद्या मुलीने मी फक्त तुझ्या पैशासाठी लग्न करतेय असे सांगितल्यावर काय रिऍक्शन असेल मुलाची?

ही गोष्ट मुलाच्या तोंडावर सांगण्याइतक्या मुली मूर्ख असतात असे वाटते का तुम्हाला अभिजीत.

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2016 - 2:48 pm | टवाळ कार्टा

तर ती मुलगी अतिशय प्रामाणिक समजावी

वामन देशमुख's picture

19 Aug 2016 - 1:52 pm | वामन देशमुख

सदर धाग्याचे प्रयोजन समजून घेण्यात मी कमी पडलोय...

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 1:55 pm | अनिरुद्ध.वैद्य

१. मुळात रुग्णाची स्थिती अशी एका डॉक्टरने दुसरी कडे डिस्कस करणे योग्य वाटले नाही. किंबहुना, अशा प्रकारची माहिती, कुठल्याही रोगाच्या बाबतीत दुसरीकडे नेणे योग्य नव्हे. अर्थात त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतोच.

२. वर बर्‍याच प्रतिसादांमध्ये लिहिल्याप्रमाणे इथे एक गोष्ट क्लियर नाहिये की ही बाब मुलीने मुलापासुन लपवुन ठेवलीय. त्यामूळे आता जे लग्न झालेय त्यात काही प्रॉब्लेम येत नसेल तर काय प्रॉब्लेम नसावा.

बाकि विवाहपुर्व/विवाहबाह्य संबंध त्या दोन व्यक्तिंचा मामला असे समजुन सोडुन द्यावे.
मिया बिवि राजी तो क्या करे?

पैसा's picture

19 Aug 2016 - 2:03 pm | पैसा

त्या डॉक्टरनी गोपनीय माहिती कोणालातरी सांगितली असे नव्हे, तर ती मुलगी डॉक्टर खरे यांच्याकडे सोनोग्राफीसाठी आली होती, म्हणजे ती त्यांचीही पेशंट होती. केस हिस्ट्री घेताना इतर काही माहिती त्याना मिळाली ती त्यानी नाव उघड न करता कथनाची पार्श्वभूमी म्हणून सांगितली. यात त्यांची किंवा त्यांच्या डॉक्टर मित्राची काही चूक झालेली नाही.

मामला मुलगी आणि तिचा नवरा या दोघातला असेल त्याबद्दल डॉक्टर खरे काही टिप्पणी करत नाहीयेत. ते नवराबायको तिकडे काहीही करू देत. डॉक्टर खरे इथे त्यांच्या मित्राचा प्रॉब्लेम, धर्मसंकट सांगत आहेत. तेव्हा त्यांच्या मित्राच्या प्रॉब्लेमबद्दल आपण बोलण्यातही काही चूक आहे असे मला वाटत नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:08 pm | अनिरुद्ध.वैद्य

सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

पैसा,

सहमत आहे.

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 2:20 pm | यशोधरा

अतिशय असहमत पेठकर काका.

लग्नाआधीच्या संबंधांमुळे मुलगी व्यभिचारी ठरत नाही. जर का तिच्यावर गर्भपाताची वेळ आली नसती तर कळलं तरी असतं का कुणाला ? मला वाटतं more than anything else भारतीयांची मानसिकता मोठा problem आहे. मुलं सर्वकाही करुन नामानिराळे राह्तात natural advantage मुळे. हेच लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ? Time to grow up.

- श

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:13 pm | अनिरुद्ध.वैद्य

लग्न केलेल्या मुलाच्याबद्द्ल (लग्नापूर्वीच) काही समजल असतं तर तुमच्या मित्राला वाईट वाटलं असतं का इतकं मुलीबद्दल ह्याच उत्तर त्यांना वाईट वाटलं असत अस देउ शकतो, कारण त्यांना विवाहपुर्व / बाह्य संबंध मान्य नाहित!

शरभ's picture

19 Aug 2016 - 2:16 pm | शरभ

हो का ? पण त्या केसमध्ये अगदी श्रूंगापत्ती वगैरे मुळीच आली नसती अस मी तुम्हाला सांगतो ! Theory of relativity !

- श

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:17 pm | अनिरुद्ध.वैद्य

.

मुलाबद्दल समजलं असतं तर वाईट वाटल असत हे नक्की का? कारण इथे ह्या कथानकातही एक मुलगा आहेच की असा, पण त्याच्या विषयी काहीही शंका आलेल्या लिहिलेल्या तरी नाहीयेत.

शरभ's picture

19 Aug 2016 - 2:22 pm | शरभ

म्हणूनच म्हंटलं - Theory of relativity...

- श

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

होतेयं का? प्रश्न मुलीबाबत उभा राहिला कारण त्या मुलीने त्यांच्या ओळखीतल्या मुलाशी लग्न केले. ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते. एखाद्या मुलीने विवाहपुर्व संबंध ठेवलेल्या मुलाशी लग्न केले तर हे प्रीमाय्सेस लागु होईल असे वाटते.

ओव्हरॉल डॉक्टरांची पहिल्यावेळेची (जेव्हा अबॉर्शन केले)रिअ‍ॅक्शन समजु शकली नसल्याने हे सगळे शक्यतांवरच राहते.

ओळख हा मुद्दा गोष्टीस पर्स्नल करतो असे मला वाटते.

करु नये. मुलगी डॉ कडे गेली ते पेशंट म्हणून, तिचे डिटेल्स डॉ ना माहिती आहेत ते व्यावसयिक कपॅसिटीमध्ये. ते पर्सनल लेव्हलला आणायला निदान नकोत तरी.

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:45 pm | अनिरुद्ध.वैद्य

इतके ईमोशनल सेपरेशन होत नाहियेत म्हणुन तर शृंगापत्ती झालिये.

यशोधरातै, जोपर्यंत त्यांचे संबध डॉ. आणि पेशंट असे होते तोपर्यंत हे ठीक होते. पण आता संबंध पर्सनल लेव्हल ला आलेले आहेत, तेव्हा आता हे पेर्सनल लेव्हलला आणू नका असे म्हणण्यात काय अर्थ आहे?
समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?

समजा तुम्ही डॉ आहात आणि तुमचा मुलगा तुमच्या अश्या पेशंटशी योगायोगाने लग्न करणार आहे असे तुम्हाला कळले तर तुम्ही काय कराल?

त्यापेक्षा असे समजा. तुमच्या मुलाचे/मुलीचे लग्ना आधी दुसर्‍यांशी संबंध आहेत/होते ( आणि हे तुम्हाला माहीती आहे ), आता त्यांचे लग्न ठरवायची वेळ आली, तर तुम्ही काय करणार?

दुसर्‍यांच्या मुला/मुलींबद्दल बोलायच्या आधी स्वता कडे बघा, मग कॉमेंट करा इतकेच नम्रतेनी सांगु इच्छितो.

माझा मुलगा जर लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतो तर कोणाशी लग्न करावे हाही निर्णय घेऊ शकतोच की. मी काही करण्याचा प्रश्न कुठे आला? त्यांच्या लग्नात वरमाय म्हणून मिरवेन आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन. हे अगदी मनापासून सांगते आहे.

nanaba's picture

19 Aug 2016 - 4:26 pm | nanaba

1. They should sit and discuss What their expectations are from each other now onwards..
2. Should get tested for STDs.

These are the 2 things I would expect..

विवाहपूर्व संबंध, त्यातनं उद्भवलेली गर्भधारणा ,नंतर दुसर्या मुलाशी लग्न करणे यात नक्की चूक काय समजायचे आहे?
या गोष्टी काही नविन नाहीत कुठल्याच काळात. गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले.
विवाहपूर्व बाॅयफ्रेंड आहे.त्याच्याशी संबंध आहेत पण तो लग्न करुन कायम राहण्यालायक नसेलही वाटला तिला.तर तिने का ते ओझे बाळगावे. उगाच आपले नैतिक मापदंड दुसर्याला लावण्यात काय अर्थ आहे?
डाॅ असे वागून उगाचच काॅम्प्लिकेशन तयार करत आहेत असे वाटतेय.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 Aug 2016 - 4:39 pm | माम्लेदारचा पन्खा

असेच म्हणतो....

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:38 pm | सुबोध खरे

गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले.
अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही
पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च".
आपण रोज जर तोंडाच्या कर्करोगाच्या केसेस पाहता तेंव्हा त्यात आपली भावनिक गुंतवणूक नसते. पण हीच गोष्ट आपल्या मित्राच्या बाबतीत होते तेंव्हा त्याचा आपल्याला प्रचंड त्रास/ धक्का बसू शकतो. हि मी प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट आहे.(माझ्या डेंटिस्ट मित्रालाच तोंडाचा कर्करोग झाला होता सिगरेट तंबाखू न खाता )

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Aug 2016 - 10:22 am | अनिरुद्ध.वैद्य

गायनॅक लोक हजार तर्हेच्या गोष्टी रोजचे बघत असतात.ते एवढे अपसेट कसे होतात याचेच आश्चर्य वाटले.
अशा गोष्टींकडे त्रयस्थ पणे तुम्ही जेंव्हा बघत असता तेंव्हा तुम्हाला त्याचे काहीही वाटत नाही
पण हीच गोष्ट तुमच्या जवळच्यांच्या बाबतीत होते तेंव्हा तुम्ही अपसेट होता"च".
>>

अनुमोदन. हेच म्हणतोय!

लग्नाआधी काय झालं होतं याचा पुढे संबंध नाही हे वरच्या अनेक प्रतिसादांत आलं आहे. त्याला खच्चून अनुमोदन.

त्याबरोबरचः व्यावसायिक नीतिमत्ता पहिली, दुसरी, शेवटची. डॉक्टर, वकील, बँकर, सीए वगैरे लोकांकडे त्यांचे क्लायंट अतिशय विश्वासाने आपल्या गोपनीय गोष्टी सोपवतात. त्यात काही बेकायदेशीर नसेल, तर व्यावसायिकाने ती गोष्ट दुसर्‍या कोणाला सांगायचा काही संबंधच येत नाही.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:40 pm | सुबोध खरे

आ बा साहेब
या सर्व लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे हे आपण सांगू शकाल काय?

वाल्मिक's picture

20 Aug 2016 - 11:44 pm | वाल्मिक

पण ते उल्लंघन झाले असे कुठे म्हणाले ?

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 2:29 pm | प्रभाकर पेठकर

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील?
असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 2:36 pm | यशोधरा

मला वाटते पेठकरकाका, हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे.ज्यांना मुलाच्या/ मुलीच्या/ जावयाच्या/ सुनेच्या विवाहपूर्व संबंधांशी निगडीत संसार करायचा आहे, ते नाहीच स्वीकारणार. पण जर ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते, त्यांना फारश्या अडचणी येणार नाहीत, आल्याच तरी सोडवतील.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 4:17 pm | प्रभाकर पेठकर

पण यशोधरा, आपल्याकडे मुलाची-मुलीची चौकशी करण्याची पद्धत आजही आहे. जात-पात आजही पाहिली जाते. नवर्‍या मुलाच्या वडीलांची गुंडगिरीची, बेकायदेशीर दारू गाळण्याची, बाई ठेवलेली असण्याचा इतिहास असेल तर अशा घरात मुलगी आजही दिली जात नाही. तसेच आई कजाग आहे की सुस्वभावी आहे, तिच्याच कांही भानगडी कानावर आल्या तर अशा घरातही मुलगी द्यायचे धाडस कोणी करीत नाही हे वास्तव आहे. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते ते वरील परिस्थितीत विचलीत होत नाहीत? हेच मुलाच्या लग्ना बाबतही असते. मला मान्य आहे की ज्यांना संसार करायचा असतो त्यांचे कॅरेक्टर महत्वाचे तरी पण कुठल्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर त्या मुलाचे/मुलीचे संगोपन झाले आहे हे ही पाहिलं जातंच नं. त्यात कांही अयोग्य आहे असेही मला वाटत नाही. गुन्हेगार व्यक्ती (कायद्याने किवा नैतिकतेने) आयुष्यात कधी बदलतच नाही असं मला अजीबात म्हणायचे नाहीये. पण अशा किती टक्के व्यक्ती पुढील आयुष्यात १८० डिग्री कोनात वळतात/वळू शकतात? आपण आपल्या मुलांबाबत अशी जोखिम उचलणार नाही. आता मुलांनी आपल्यासमोर नाईलाजच उभा केला तर आपण कांही करूच शकत नाही म्हणून स्विकारतो. बाकी संधी मिळाल्यास जात, धर्म, सामाजिक पार्श्वभूमी, सुसंस्कृतपणा इ.इ. सर्व पाहूनच लग्न केली जातात. दोन वेगळ्या धर्मांमध्येही लग्न होतात पण ती सहजतेने स्विकारली जात नाही. नाईलाजाने स्विकारली जातात. ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे ज्यांना समजते तेही आपल्या मुलाला/मुलीला पाकिस्तानी जोडीदार स्विकारणार नाहीत. बाकी कोणी १८ वर्षावरील मुलाने मुलीने असा निर्णय घेतलाच तर आई-वडील काय करू शकणार? तरीपण मुलांशी कायमस्वरूपी संबंध तोडल्याच्या घटनाही आपण पाहतोच. त्यामुळे ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा हे फार क्वचित आचरणात आणलेले दिसून येते बहुतांशी माणसं ही वरील विधान तात्विक दृष्ट्या मान्य करतात पण वास्तवात स्विकारत नाहीत असे माझे निरिक्षण आहे. असो.

पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का?

पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 5:02 pm | प्रभाकर पेठकर

यशोधरा माझा प्रतिसाद हा 'ज्या क्षणापासून दोन जीव/ कुटुंबे लग्नाच्या बंधनाने एकत्र येतात, त्या क्षणापासून संसार सुरु करायचा' ह्या विधानाला खोडून काढण्यासाठी आहे. आपण, लग्न होतं त्या क्षणापासून नाही तर पार्श्वभुमीलाही तितकेच महत्त्व देतो. आणि ते रास्तच आहे असे मला वाटते. पैकी काळाच्या ओघात कांही संकल्पना धूसर झाल्या आहेत त्यामुळे शहरात तरी जातपात पाहिली जात नाही. गावाकडे अजूनही सैराट होऊन चालत नाही.

पाकिस्तानी उदाहरणातही आपल्यात रोटी व्यवहार होणे शक्य आहे पण बेटी व्यवहार सहसा मान्य होत नाही. एखाद्या पाकिस्तान्यामुळे आपले प्राण वाचले म्हणून आपण लगेच बेटी व्यवहार करणार नाही (आणि तेही करणार नाहीत). सर्वसाधारण परिस्थिती आणि अपवादात्मक परीस्थिती ही वेगवेगळी असते. गेल्या ३५ वर्षात मस्कतमध्ये अनेक पाकिस्तानी आणि अरबी व्यक्तींशी आणि कुटुंबांशी माझा जवळून संपर्क आला आहे. दोन वेळा मी कराचीलाही जाऊन आलो आहे. तिथल्या दुकानदाराशी पाकिस्तानी आणि भारतिय लोकांबद्दल विस्तृत चर्चाही केली आहे. त्या वृद्ध पाकिस्तानी दुकानदाराचे एक वाक्य मला पटले आणि आजही स्मरणात आहे. 'जमीनपार लकिर मारनेसे इन्सान अलग नही होते'. ह्याचा अर्थ भारतिय आणि पाकिस्तानी कौम एकच आहे. हा आदर्शवाद मला भावला. पण जिथे आपण ९२ कुळी आणि ९६ कुळीत फरक करतो किंवा देशस्थ आणि दैवज्ञ मध्ये फरक करतो तिथे भारतिय आणि पाकिस्तानी लग्नसंबंध कसे स्विकारले जातील?

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 5:09 pm | यशोधरा

काका :)

आपण बदल करणारच नाही म्हणता, मग कोण करणार बदल? आकाशवाणी तर नाही होणार! प्रत्येकानेच ठरवले तरच लहान मोठे बदल होतील ना?

आणि पाकिस्तानी व्यक्तीने जीव वाचवला म्हणून लग्न करायचं, असा नाहीये हो! मुद्दा हा होता की पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल?

असो. मला जे सांगायचंय ते सांगून झालेय. जमाना बदललाय, बदलतोय. बदलायला हवा.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 6:11 pm | प्रभाकर पेठकर

मी आजच्या परिस्थितीचे वर्णन केले आहे.

आपण बदल करणारच नाही म्हणता
असे मी कुठे म्हंटले आहे?

पाकिस्तानी व्यक्तीकडून मदत घेतलेली चालू शकते तर कोणी लग्न केल्यास काय बिघडेल?

पुन्हा तोच मुद्दा उगाळण्यात काय हशील आहे? रोटी व्यवहार आणि बेटी व्यवहार ह्यावर ते भाष्य आहे. मदत घेऊच नये, संबंध ठेवूच नये असे मी कुठेही विधान केलेले नाही. आपला विषय बेटी व्यवहाराबद्द्ल आहे. त्या अनुषंगाने लिहीले आहे. ते वास्तव आहे. पण त्यात बदल होऊच नये, होणारच नाही असे कांही मी म्हंटलेले नाही.

मूळ वादातील ज्या क्षणाला लग्न होते त्या क्षणापासून ह्या विषयाकडे पाहण्याचा आदर्शवाद तू मांडला होतास पण वास्तव विपरीत आहे हा माझा मुद्दा आहे. सर्व कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेतली जाते. आणि तेही फक्त भारतात नाही तर पाकिस्तानात, अरबस्थानात आणि जगाच्या इतर देशांमध्येही पाहिली जाते. कुठेही दोन टोकाच्या संस्कृतीतील लग्नसंबंध सहजासहजी मान्य होत नाहीत. अपवाद असतीलही पण ते अपवादच असतात.

पेठकरकाका, तुम्ही सफरचंदे आणि संत्री अशा तुलना करताय. खोटेपणा, गुंडगिरी, दुष्टपणा आणि गरोदरपण/ गर्भपात एकाच पारड्यात? गरोदर असणारी व्यक्ती सुसंस्कृत असू शकणार नाही, असं गृहीतक आहे का?

पाकिस्तानी सून वा जावई चालणार नाही पण असं समजून चालू कुठं एखाद्या पाकिस्तानी व्यक्तीमुळे आपल्या मुलाला/ मुलीचे प्राण वाचतात, ते चालेल का? मी extreme उदाहरण घेतलंय पण मुद्दा लक्षात घ्यायला ते चालेल असे वाटते.

चलत मुसाफिर's picture

19 Aug 2016 - 7:21 pm | चलत मुसाफिर

माझ्या अपत्याने हिंदू, बौद्ध, जैन, शीख धर्मातील कुणाशीही विवाह केला तरी मला चालेल. पण मुस्लीम किंवा ख्रिस्ती व्यक्तीशी विवाह करण्यास संमती मी देणार नाही. जर दिली, तर आधी त्या व्यक्तीने हिंदू धर्म स्वीकारावा आणि मुले हिंदू असतील याची हमी द्यावी अशी अट घालीन. (माझी संमती विचारलीच नाही तर काय, हा वेगळा मुद्दा.)

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?

दुसर्‍याच्या मुलामुलींबद्दल सोडा काका. समजा कोणाला आपल्या मुला/मुली बद्दलच असे समजले की त्यांनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवले आहेत तर हे प्रामाणीक प्रश्न विचारले जातील का?

शरभ's picture

19 Aug 2016 - 3:10 pm | शरभ

+१ असले प्रश्न हे दुसर्यांच्या मुलींबद्दलच यायचे हो..

- श

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील?
असे उगीच, आजच्या काळातले अनैतिक, पण प्रामाणिक प्रश्न मनांत आले.

अगदी प्रामाणिक प्रश्न आहे काका!! पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.

त्यांनी ओळख लपवली आहे, अशी माहिती तर अनेक लोक अनेक ठिकाणी मांडतात. त्यावरून त्रागा करायची गरज नाही. जोपर्यंत सदर कन्सल्टंट ही माहिती पक्षकाराच्या ओळखीसह मांडत नाही तोपर्यंत मला यात अनैतिक वाटत नाही

त्रागा म्हणालात म्हणून लिहीणं भाग पडलं!! मला कुठेही त्रागा दिसला नाही, आपणास दिसत असल्यास तुम्ही किंवा मी किंवा दोघांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
असो वाचनात आम्ही कमी पडत आहोत असं दिसतंय.

इति लेखनसीमा.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:43 pm | सुबोध खरे

पण अशा मुलीला/मुलाला ट्रीटमेंट देणारा/री डॉक्टर/रीण ते अनुभव चारचौघात मांडत असेल तर त्याच्याकडे/तिच्याकडे किती मिपाकर ट्रीटमेंट घेणं पसंत करतील हाही माझ्या भाबड्या मनाला पडलेला एक प्रश्न आहे.
सूड राव
भाबडेपणाचा आव सोडा
न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो.
मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.

सूड's picture

22 Aug 2016 - 11:04 am | सूड

न पाहता आकसाने किंवा पूर्वग्रहाने आरोप करत आहात तर तो सिद्ध करून दाखवा हे मी आपल्याला आव्हान देतो.
मी लिहिलेल्या या लेखात व्यावसायिक नीतिमत्तेचे कुठे उल्लंघन झाले आहे ते दाखवून द्या. कुणाचे नाव पत्ता किंवा वैयक्तिक माहिती कुणाला उघड झाली आहे ते दाखवा.

डॉक्टर ते तुमच्या मित्रासाठी होतं, जो तुम्हाला सांगतो आणि तिसर्‍याला बोलल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि लहानपणी खेळायचो त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार. आकस, पूर्वग्रह म्हणाल तर जसा लेख मला दिसतो तशी प्रतिक्रिया मी लिहीतो. अर्थात तो माझा दृष्टीकोन आहे, त्यामुळे सिद्ध वैगरे करुन दाखवायची इच्छा नाही.

धन्यवाद.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 11:16 am | सुबोध खरे

त्या कानगोष्टींप्रमाणे ही गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार.
यालाच पूर्वग्रह म्हणतात.
व्यावसायिक नीतिमत्ता कशाला म्हणतात याचे एक उदाहरण- माझे वडील मुलुंडच्या "विरंगुळा" या वरिष्ठ नागरिकांच्या केंद्राचे सचिव होते. त्या केंद्राचे २५०० सदस्य आहेत. आमचे वडील १९६५ पासून मुलुंड पूर्व मध्ये राहत आहेत. त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या वरिष्ठ नागरिकांपैकी निदान निम्म्या लोकांना ते अतिशय चांगले ओळखतात. माझे वडील दवाखान्यात आले असता त्यांचे आपापसात नमस्कार चमत्कार होतात. परंतु आजतागायत मी त्यांना एकाही माणसाची वैद्यकीय माहिती सांगितली नाही आणि सांगतही नाही. त्या रुग्णाने स्वतः वडिलांना सांगितली तर तो त्यांचा प्रश्न आहे.
असे असताना आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना माझ्या मित्रावर गंभीर आरोप करता आहात.
याला पूर्वग्रह म्हणायचे, आकस म्हणायचे कि पूर्ण अज्ञान हे आपणच ठरवा.
व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.

आपण कानगोष्टीमुळे ही "गोष्ट आणखी रंगत चार ठिकाणी पोचली असणार" असा गंभीर पण कोणताही ऐकीव अथवा प्रत्यक्ष पुरावा नसताना

हा सबंध लेख!! जरी रंगवून सांगितलं नसेल, नाव बदललं असेल तरी ही गोष्ट मिपावाचकांपर्यंत पोचली.

व्यावसायिक नीतिमत्तेचे उल्लंघन झाले याचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट पुरावा आपण दिलेला नाही.

तुम्हीच म्हटलंत ही गोष्ट तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितली. एका डॉक्टरने दुसर्‍या डॉक्टरला कॉमन पेशंटच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी सांगणे हे व्यावसायिक नीतीमत्तेचे उल्लंघन नसेल तर मी माझे शब्द मागे घेतो.

सुबोध खरे's picture

22 Aug 2016 - 2:53 pm | सुबोध खरे

ब्वॉर

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 Aug 2016 - 2:45 pm | अनिरुद्ध.वैद्य

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?
>> ज्याचा त्याचा प्रश्न. बाकी, आजुन सुन वा जावई यायची वेळ आली नसल्याने पास.

किंवा किती मिपासदस्य, जाणिवपूर्वक, पत्नी म्हणून किंवा पती म्हणून अशी मुलगी किंवा मुलगा स्विकारतील?
>> लग्न ही नवी सुरुवात असल्याने भुतकाळ विसरौनी सुरुवात करावी ह्या मताचा मी आहे. सो ह्याच उत्तर येस असे आहे. अपेक्षा (दोघांकडुनही) ईतकीच की, नंतर विवाहबाह्य फंदात पडु नये ब्वा.

(बाकी खुलता कळी सारखं प्रकरण असेल तर नको)

विवाहपूर्व शरीरसंबंध ठेवणारी मुलगी सुन म्हणून किंवा मुलगा जावई म्हणून किती मिपासदस्य स्विकारतील?

मुळात हा सासू सासर्‍यांचा प्रश्न आहे काय? हा लग्न करणार्‍या जोडप्याचा प्रश्न आहे?

हा जो कोणी तथाकथित मित्राच्या मित्राचा मुलगा (मला हे लिहीताना चिऊचा काऊ तो माझा मामेभाऊ आठवलं!! =)) असो.) आहे तो एखादीच्या गर्भपाताला कारणीभूत झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे, त्यामुळे असले प्रश्न येत नाहीत.

पुभाप्र.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:46 pm | सुबोध खरे

अर्थात तुमचा मित्र कसा जुन्या विचारांचा होता आणि तुम्ही त्याला "पार्थास दाविले ते विश्वरुप" कसे दावलेत ते लिहीलेच आहे,
मानभावीपणा समजला.
लेखाचा खोल अर्थ समजता आला नसेल तर जाऊ द्या.
एखाद्या माणसाच्या परिस्थितीत तुम्हाला बदल घडवता आला नाही तर निदान त्याच्या वेदनेवर फुंकर घालायचा प्रयत्नाला तुम्ही विश्वरूप दर्शन म्हणता आहात.
धन्यवाद.

_मनश्री_'s picture

19 Aug 2016 - 3:02 pm | _मनश्री_

साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......

_मनश्री_'s picture

19 Aug 2016 - 3:12 pm | _मनश्री_

साधारण 2 वर्षापूर्वी मी माझ्या एका मैत्रीणीविषयी एक पोस्ट लिहीली होती तिच्या आई वडीलांंचा घटस्फोट झालेला असल्याने तिच लग्न ठरत नाहीये त्यावेळी बहुतेक प्रतिसादांंचा सूर हा होता की लग्न ठरवताना मुलीची कौटुबिक पार्श्वभूमी अशी असताना नकार येत असेल तर त्यात काही अयोग्य नाही ,घटस्फोटीत आई वडीलाच्या मूलीशी लग्न करण्याची रिस्क कोण घेईल ? म्हणजे थोडक्यात काय वरवर सगळ चांंगलंं असल पाहीजे बास मग लग्नाआधी प्रेग्नंंट राहून गर्भपात केलेली मुलगी लग्नाला उभी राहते कारण तिच खानदान चांंगलंं आहे पण दुसरीकडे एक मुलगी लग्नासाठी अयोग्य ठरते कारण ती घटस्फोटीत आई बापाची मुलगी आहे ......

_मनश्री_'s picture

19 Aug 2016 - 3:18 pm | _मनश्री_

http://www.misalpav.com/node/29045 ही माझ्या पोस्ट लिंंक

आनन्दा's picture

19 Aug 2016 - 3:03 pm | आनन्दा

बाकी खरेकाका तुम्च्या मित्राचा "तो" मित्र जर पिपावर असेल तर मात्र काही खरे नाही.
:)

खरेन्च्या मित्राचा मुलगा मिपावर असल्यास आणि तो खरेंना ओळखत असल्यास (त्यांच्या दॉ. मित्राचा मित्र म्हणून) तर जास्त डेन्जर आहे..

इरसाल's picture

19 Aug 2016 - 4:07 pm | इरसाल

आजकाल मनात येणार्‍या भावनाही किंवा लागलेली टोचणीही मिपावर मनापासुन मांडु शकत नाही असच वाट्टय.
घडलेल्या गोष्टी आपल्या विचाराप्रमाणे किंवा कलाने घडायला हव्या होत्या किंवा हव्यात हा अट्टाहास कशाला ? (हे म्हणजे असं झाल, लेख/कविता चांगला/ली आहे अजुन फुलवता आला असता/ती......ज्याने लिहीलाय त्याला योग्य वाटला म्हणुन तसा लिहीला त्यात मला वाट्ट्य म्हणुन कशाला फुलवायचा......भेंडी).

एका पिढीचे अंतर विचारात घ्यावे लोकांनी.

पिशी अबोली's picture

19 Aug 2016 - 4:10 pm | पिशी अबोली

एक रूपालीच्या पिढीची प्रतिनिधी म्हणून सांगते.
१.लग्नाआधी दुसर्‍या मुलीशी संबंध असले, म्हणून माझ्या समोरच्या मुलाला मी स्वतः जज करणार नाही. त्याने मला प्रामाणिकपणे सर्व सांगितलं असेल, तर काय हरकत आहे? पण मी स्वतःच्या आई-बाबांना हे सगळं सांगणार नाही. कारण तो आम्हा दोघांमधला पर्सनल मॅटर असेल. त्याच्या आई-बाबांनाही माहिती नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. मागच्या पिढीला हे पचवणं कठीण जात असेल हाही मुद्दा आहेच. मग या वरच्या उदाहरणात असंच काही झालं नसेल कशावरून? तिने तिच्या नवर्‍याला विश्वासात घेतले नसेल कशावरून? फक्त ती मुलगी होती आणि तिने गर्भपात केला म्हणून आक्षेप आहे का?

२.जास्त पैसे कमावणारा मुलगा पाहिजे असं तिचं वैयक्तिक मत असेल, तर मला त्यात काही गैर वाटत नाही. जर ही तिची अपेक्षा असेल तर लग्न ठरवताना तिने ते स्पष्ट सांगितलेही असेल. अशा गोष्टी स्पष्ट आणि राजरोस बोलल्या जातातच आणि त्यात जुन्या पिढीला भरपूर इंटरेस्ट असतो. त्यामुळे इथेही काही फसवणुकीचा भाग नाही.

३. त्या मुलीने त्या प्रियकरासोबत संबंध तोडले असंही तुम्ही नमूद केलंय. म्हणजे लग्न करून ती नंतर काही फसवणूक करतेय अशातला भाग नाही. मग नक्की फसवणूक कसली वाटतेय?

किंबहुना's picture

19 Aug 2016 - 4:20 pm | किंबहुना

जनरेशन गॅप आहे हो..
पण राहून राहून एक प्रश्न मनात येतो -
जर एखाद्या मुलाने अश्या प्रकारे गर्भधारणा झाल्यावर तिला गर्भपात करायला लावला तर त्या मुलाला तुम्ही काय म्हणाल?
इथे तुम्ही म्हणजे केवळ तुम्ही नव्हे तर इन जनरल लोक काय म्हणतील असा प्रश्न आहे.

पैसा's picture

19 Aug 2016 - 4:26 pm | पैसा

प्रतिक्रिया अपेक्षित लायनीने आल्यात. लेख वाचला तेव्हा एक जाणवले की

सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो आणि सासू सारखी म्हणत होती "भावजी तुमचं लक्ष कुठाय"
गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

हा डॉ खरे यांच्या मित्राचा प्रॉब्लेम आहे. माझा असा समज झाला की ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते. त्यानी त्या सुनेला किंवा तिच्या नवर्‍याला किंवा तिच्या प्रियकराला नीतिमत्तेबद्दल प्रवचन दिल्याचे कुठे दिसले नाही. दोन्ही डॉक्टरांच्या वयानुरुप त्यानी आपली मते लेखात आणि प्रतिक्रियातून व्यक्त केली आहेत. ते ठीक आहे. नाहीतर लेख टाकून पळून गेले म्हणायलाही लोक तयार असतात. मात्र डॉक्टरांच्या मित्राच्या ज्या प्रॉब्लेमबद्दल त्यानी लिहिले आहे त्याबद्दल ६०/६५ पैकी फक्त २/३ प्रतिक्रियांमधे थोडीफार चर्चा झाली आहे! =))

बाळ सप्रे's picture

19 Aug 2016 - 4:35 pm | बाळ सप्रे

हे ठीक वाटतय. जर मुलीने सर्व बोलून नवर्‍याला विश्वासात घेतले असेल तर डॉक्टरना बघितल्यावर तिरस्कार करण्याची गरज नाही. तितक्याच आश्वासकपणे 'आमचं आम्ही जमवलय' हे डॉक्टरनाही सांगायला हरकत नाही.

आणि जर डॉक्टर सांगतील या भितीने तिरस्कार असेल, तर डॉक्टरना लागलेली फसवणूक माहिती असल्याची टोचणीदेखिल रास्तच असेल.

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2016 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर

सुनेच्या दृष्टीत त्याला न बोलून तिरस्कार दिसतो..... गेले नाही तर एक चांगला मित्र गमावण्याची शक्यता किंवा गेलो तर आपले "स्वागत" तेथे "नाही आले तर बरे"असे होणार हि बोच अशा शृंगापत्तीत तो आहे.

ती मुलगी जर खरेंच्या मित्राशी घरी आल्यावर व्यवस्थित वागली असती तर त्याला या सगळ्याचे एवढे टेन्शन झाले नसते.

ती व्यवस्थित वागत नाही कारण डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने आपले गुपीत उघड होण्याची भिती तिला वाटते आहे, असे मला वाटते. जर हेच कारण असेल तर तिने नवर्‍यापासून 'ती' घटना लपवून ठेवलेली आहे हे उघड आहे. त्यामुळे फसवणूकीचा मुद्दाच सिद्ध होतो.
जर दोघांमध्ये ह्या विषयावर चर्चा होऊन 'आपण लग्न केल्यापासून आपला एकमेकांशी संबंध आहे गत आयुष्याशी आपला संबंध नाही' असे स्विकारलेले असेल तर डॉक्टरांच्या मित्राच्या येण्याने ती अस्वस्थ होणार नाही.

काका, क्राइम पेट्रोल बघता का तुम्ही :)

शाम भागवत's picture

20 Aug 2016 - 11:42 am | शाम भागवत

कदाचित सूनेला पूर्वीचे सगळे विसरायचे असावे. जे पूर्वी घडले त्याबद्दल अपराधीपणाची भावना असणेही शक्य आहे. बोल्डनेसच्या कल्पनांच्या नादात बऱ्याच वेळेस अशा चुका झाल्यावर मुलीं बदलतात. लग्न हा खरोखरच मुलीचा पुनर्जन्म असतो. पूर्वीचे सर्व विसरून नव्याने सर्व सुरवात करायची इच्छा असू शकते. डॉ. बद्दल राग नसला तरी ते उपस्थीत नसले तर बरे झाले असते असे वाटत असावे. तीच नापसंती डॉ. चे मन मोठी करून त्याला ते तिरस्कार समजताहेत.

असेच असेल असे काही मला म्हणायचे नाही. फक्त माझे मत मांडले. जर असे काही असेल असे वाटत असेल तरच....

मी येऊ नये असे वाटते का हे डॉ. नी सुनेशी स्पष्ट बोलून विचारले पाहिजे. तसेच तिने येऊ नका असे स्पष्ट शब्दात सांगितले तर तसे करणे शक्य होणार नाही. उलट त्यामुळे घरातील सगळ्यांच्या मनात संशय निर्माण होण्याची भिती आहे हेही स्पष्ट केले पाहिजे.

जव्हेरगंज स्टाईल ऑन
(म्हणजे
लग्न झाल्यापासून डॉ. घरी येण्याचे टाळताहेत. वगैरे वगैरे.
ते तर गायकॉनॉलॉजिस्ट आहेत. वगैरे वगैरे.
सूनबाई पेशंट होती का? वगैरे वगैरे.)
जव्हेरगंज मोड ऑफ

यशोधरा's picture

19 Aug 2016 - 4:49 pm | यशोधरा

अच्छा, ले केवळ डॉ खऱयांच्या डॉ मित्राच्या परसेप्शनबद्दलय होय! म्हणजे त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार वगैरे नसण्याचीही शक्यता गृहीत धरायची का?

उडन खटोला's picture

19 Aug 2016 - 4:28 pm | उडन खटोला

शृंगापत्ती चा नेमका अर्थ काय?
बाकी चालू आहेच.

ते लिहायचं कसं ते पण सांगा राव. मी चोप्य पस्ते केल तरी श्रीखंडातला श्र येतोय... :) तस्मात तुर्तास आमच्यासमोरील श्रुंगापत्ती ही आहे..

- श

आदूबाळ's picture

19 Aug 2016 - 6:18 pm | आदूबाळ

shRu = शृ

शरभ's picture

19 Aug 2016 - 6:23 pm | शरभ

- श

बाकी चालू द्या.

तुमच्या मित्राच्या दृष्टिकोनातून, तो नकळत काही अप्रिय गोष्टींचा साक्षीदार झाला आहे. ज्यावेळी हि गोष्ट समजली त्यावेळेस लग्न थांबवणे त्याला अथवा सर्वानाच जमलं असतं असं नाही.
कालाय तस्मे नमः म्हणून नव्या पिढीच्या गोष्टी सोडून द्याव्यात.
घडायच्या त्या घटना घडून गेल्या म्हणून विचार करणे थांबवावे. मित्राचे महत्व जाणून आहेत तर आपल्या मैत्रीकडे लक्ष द्यावे.

अभ्या..'s picture

19 Aug 2016 - 5:13 pm | अभ्या..

हा राव. हे शृंगापत्तीवर प्रॉपर सोल्युशन आहे. बाकी सगळा टाइमपास आहे.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 6:15 pm | सुबोध खरे

काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते.
असो
माझा स्त्रीरोग तज्ञ मित्र मराठी नाही तर गुजराती आहे आणि त्याचा मित्र कोणत्या प्रांतातील( मराठी गुजराती कि सिंधी इ) आहे हे मला माहित नाही किंवा मी त्याला पाहिलेला नाही.
मला स्त्रीरोग तज्ञ मित्राने "जसे सांगितले तसेच लिहिलेले" आहे. यात "कोणाचेही नाव घेतलेले नाही" तेंव्हा यात "वैयक्तिक किंवा व्यवसायिक गोपनीयतेचा" कोणताही भंग होत नाही.
लग्ना आधी गरोदर राहणाऱ्या मुली आम्ही (क्षकिरण तज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञ) वर्षानुवर्षे पाहत आलो आहोत. गणेशोत्सव आणि गरबा या कालावधीत यात बऱ्याच प्रमाणात वाढ होते. तेंव्हा त्याबद्दल दोघांना अप्रूप किंवा वाईट वाटण्याचे काही कारण नाही. आम्ही समाजसुधारक नाही जे आहे जसे आहे तसे स्वीकारायचे हे व्यवसायात शिकवले जाते आणि कोणालाही एक रुग्ण/ व्यक्ती म्हणूनच वागणूक द्यायची असते.
रुपाली जोवर तृतीय व्यक्ती होती तोवर तिच्याबद्दल बरे किंवा वाईट वाटण्याचे कारण नाहीच. पण जेंव्हा ती मित्राची सून म्हणून समोर आली तेंव्हा हा चमकला हि नैसर्गिक प्रतिक्रिया होती. नंतरही जे त्याला वाटले( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार) आणि त्याने मला जे सांगितले ते तसेच लिहिले आहे. त्याला काय वाटले हे त्याने बोलून दाखविले. ते बरोबर कि चूक हि कोणतीच टिप्पणी मी देऊ शकत नाही. रुपालीने काय करायला हवे होते कि नव्हते हे सांगणारा मी कोण?
मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.

कमॉन डॉक्टर! कोणीही तुमच्या विचारांच्या विरुद्ध काही लिहिले की तुम्हाला त्यात आकस कसा दिसतो हो? जवळ जवळ दर वेळी तुम्हाला असेच म्हणताना बघते.. आश्चर्य वाटते..

वामन देशमुख's picture

19 Aug 2016 - 10:19 pm | वामन देशमुख

1. काही लोकांचे प्रतिसाद आकसाने दिलेले आहेत किंवा स्कोअर सेटल करण्यासाठी आहेत असे वाटते.

2. मी जजमेंटल झालो किंवा या धाग्याचे प्रयोजन काय हा विषय ज्याने त्याने आपल्या कुवतीप्रमाणे ठरवायचा आहे.

This is not digestible, doc.

Not worth reading YOU.

Excuse me for writing in English, Marathi Keyboard not accessible.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:51 pm | सुबोध खरे

Not worth reading YOU.
आपली मर्जी

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2016 - 6:24 pm | राजेश घासकडवी

अतिशय विलक्षण घटना. वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक संबंध हे परस्परविरोधी कसे असू शकतात याचं उत्तम उदाहरण. शक्ती या हिंदी सिनेमातही बापाची वर्दी आणि त्याचं बाप असणं यांचा संघर्ष दाखवला आहे.

सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे. त्यापोटी त्याला मानसिक घालमेलही सोसावी लागलेली आहे.

मात्र लेखातल्या काही गोष्टी खटकल्या.

एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना

फसवलं जाणं हा फारच लोडेड शब्दप्रयोग आहे. जणू काही सर्व लग्नांच्या बाबतीत स्त्रीची योनिशुचिता ही वचन देऊन लग्नाच्या पदराबरोबर बांधलेली असते. आणि आधी गर्भपात झाला आहे म्हणजे काहीतरी 'डिफेक्टिव्ह माल' मिळाला आहे! गंमत म्हणजे तुमच्या मित्राने हा व्यवसाय स्वीकारला तेव्हा असले अनेक डिफेक्टिव्ह माल सुधारून देण्याचं कंत्राट घेतलं. त्यातून पैसे मिळवले, चरितार्थही चालवला. इतर तरुणींनाही त्याने गर्भपाताची औषधं दिली असतील तर यात काहीच अनैतिक नाही, हे त्याने मान्य केलेलं आहे. जर त्याला ही फसवणूक वाटत असेल तर अशी फसवणूक करून देण्यात त्यानेच हातभार लावलेला आहे. मग आता हे उमाळे का? म्हणजे हा धंदा गैर नाही म्हणून करायचा आणि पैसे मिळवायचे, आणि तरीही मूल्यं जपायची भावना ठेवायची हे एकाच वेळी केक खाणं आणि ठेवणं आहे.

'ही मुलगी माझ्याकडे काविळीचा रोग घेऊन आली होती, तिला मी बरी केली. पण हे तिच्या सासऱ्याला मी सांगू शकत नाही.' या परिस्थितीत जितकी बोच असावी तितकीच तुमच्या मित्राने ठेवावी.

सर्वप्रथम तुमच्या मित्राचं अभिनंदन. त्याने आपली व्यावसायिक निष्ठा पुरेपूर पाळलेली आहे.

असहमत आहे. लग्नाला गेल्यानंतर तिथे रूपाली भेटल्याची गोष्ट डॉ खर्‍यांना सांगायचं काही कारण नव्हतं. विशेषतः डॉ खरे रूपालीला ओळखत असताना ही घटना सांगणं चूक होतं.

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2016 - 6:51 pm | राजेश घासकडवी

ओह, रुपालीला डॉक्टर खरे ओळखतात ही गोष्ट माझ्या ध्यानात आली नव्हती. तरीही डॉक्टर पेशंट प्रीव्हिलेज जर दोन्ही डॉक्टरांना लागू असेल तर त्यात नक्की काय हरकत आहे? केस स्टडीजबद्दल एकमेकांशी बोलणं अयोग्य आहे का?

इथे मला एक तांत्रिक खुसपट दिसतं - ते म्हणजे खरेंचा मित्र खरेंकडे सायकिअॅट्रिस्ट म्हणून पाहात असेल तर सगळंच कोशर आहे.

म्हणजे हैसियत मामला म्हणा की,
एक डॉक्टरकी हैसियतसे नही तो एक दोस्त की हैसियत से वगैरे.
आदुबाळा तर प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल म्हणतोय.

एकदम करेक्ट. हैसियतचा मामला.

... आणि प्रोफेशनल हैसियत सगळ्यात अव्वल असायलाच पाहिजे. बिकॉज दॅट डिफाईन्स यू अ‍ॅज अ प्रोफेशनल. बाकी डिग्र्या आणि सर्टिफिकिटांना अर्थ नसतो. त्याशिवाय त्या प्रोफेशनचा सभासद म्हणवून घेण्याची पात्रता नसावी.

हे आपण काय विकतो त्याच्याशी संबंधित आहे. उदा० एखादा वकील फक्त कायद्याचं ज्ञान विकत नसून तो आपल्या अशिलाने दिलेल्या माहितीची गोपनीयता राहील हा विश्वासही विकत असतो. चितळे बंधू बाकरवडीचा दर्जा विकतात. उद्या दुकान बंद केल्यानंतर काका हलवाई बरोबर गलासभर बियर मारता मारता दुकानात आलेल्या जाड्या माणसाचा किस्सा सांगितला तर त्याचा प्रोफेशनल एथिक्सशी संबंध नाही. पण आपल्या अशिलाबद्दल एखादा वकील आपल्या दुसर्‍या वकील मित्राशी गॉसिप करायला लागला तर त्याचा जरूर संबंध आहे.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 11:56 pm | सुबोध खरे

गॉसिप
एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण झालेली पण आपल्याला अमान्य आहे का? यात एका वकिलाला माहित नसलेली गोष्ट दुसऱ्या वकिलाला त्याने सांगितले तर लगेच गॉसिप.
हां, त्या दुसऱ्या वकिलाचा त्या केसही संबंध नसेल तर गोष्ट वेगळी आहे.

आदूबाळ's picture

23 Aug 2016 - 9:34 pm | आदूबाळ

राईट. सिनारियो बघू.

व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन झालेला सिनारियो:
[मूळ लेखातून सुरू] रुपाली पाटील* ( नाव बदललेले आहे) ... आणि सर्व आलबेल झालं. [मूळ लेखातून समाप्त]

इथे स्त्रीरोगतज्ञ मित्र आणि डॉ खरे यांच्यातला व्यावसायिक संबंध - या केसपुरता - संपला.

पुढची घटना घडली आणि "एकीकडे रुग्णांच्या गोपनीयतेची शपथ घेतलेली, दुसरीकडे मित्राला फसवले गेल्याची भावना या दोलायमान परिस्थितीत चार दिवस त्याने अस्वस्थतेत घालवले" ही परिस्थिती आली.

आपला मित्र डॉ खरे - जो या केसशी आधी रेडियॉलॉजिस्ट म्हणून संबंधित होता - त्याच्याकडे मन मोकळं करावं असं त्या मित्राच्या मनात आलं. पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही. याचाच अर्थ, ही घटना डॉ खर्‍यांना सांगायचं कोणतंही वैद्यकीय (व्यावसायिक) कारण आपल्याकडे नाही.

या परिस्थितीत आपण डॉ खर्‍यांना ही घटना सांगितली, तर हा व्यावसायिक नीतिमत्तेचा भंग होईल. तस्मात आपण सांगितली नाही पाहिजे.

___________________________

हे घडलं का? ही घटना डॉ खर्‍यांना सांगितली जाण्याचं कारण ते डॉक्टर आहेत हे नसून ते मित्र आहेत हे आहे. डॉ खरे रेडियोलॉजिस्ट असण्याऐवजी इस्त्रीवाले असते तरी मित्र या नात्याने ही घटना सांगितली गेली असतीच.

___________________________

तुमच्या प्रश्नाचं उत्तरः

एकाच केस दोन वकील हाताळत असतील तर त्यांच्यात केस बद्दल विचार विनिमय किंवा विचारांची देवाण घेवाण अर्थातच मान्य आहे. पण त्या विचारविनिमय / देवाणघेवाण / माहितीचा संबंध (रिलेव्हन्स) "केस इन हँड" शी असावा.

इन्कम टॅक्सची केस, आणि वकील अ वकील ब ला आपल्या अशिलाचा नवरा कसा बाहेरख्याली आहे हे सांगत असेल तर ते नक्कीच गॉसिप.

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 10:21 pm | सुबोध खरे

आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही.
ब्वॉर

खरेसाहेब, मला तुमच्याविषयी अतीव आदर आहे. मिपावर "reasonable people" हा जो गट आहे त्यात तुमचं नाव वरच्या पाच नंबरांत असेल. त्याच नात्याने माझ्या मताचा उलगडा केला.

तुमच्याकडून "ब्वॉर" या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. मी चुकत असेन (आणि ती शक्यता बरीच आहे) तर मला हक्काने उलगडून सांगा. माझी चूक मान्य करायला आणि सॉरी म्हणायला मला कधीच किंचितही लाज वाटलेली नाही.

असो.

मोदक's picture

23 Aug 2016 - 11:13 pm | मोदक

ब्वॉर.

(ह्ये आदूबाळ मारतंय आता..!!)

आदूबाळ's picture

23 Aug 2016 - 11:22 pm | आदूबाळ

=))

सुबोध खरे's picture

23 Aug 2016 - 11:56 pm | सुबोध खरे

आदू बाळ साहेब
आपण पहिल्या प्रतिसादापासून व्यायसायिक नीतिमत्तेबद्दल बोलत आहात. मुलगी लग्न गरोदर झाली हि गोष्ट चूक आहे कि तिने मित्राच्या मुलाबरोबर लग्न केले हि चूक झाली? पहिली गोष्ट तर मला माहित होतीच दुसरी गोष्ट त्यांनी कधीही कोण मित्र ते नाव न सांगता फक्त मला सांगितली. त्यांच्या स्वतः च्या विचारसरणी प्रमाणे विवाह पूर्व संबंध हे त्यांना अमान्य असावेत. यामुळे ते अपसेट झाले आणि त्यांनी मला त्याबद्दल फोन केला मी त्यांचे सांत्वन केले इतकी साधी सरळ गोष्ट असताना यात व्यावसायिक नीतीचा भंग कसा होतो हे समजत नाही. त्यांनी मला तिचे माझ्या मित्राच्या मुलाबरोबर लग्न झाले एवढीच माहिती दिली.
तिचे लग्न होणारच होते आणि मला जर रुपालीची पुढची माहिती काढायचीच असेल तर ती मला सरकारी दप्तरात मिळणार नाही का?
तुम्ही एवढे व्यावसायिक नीतीमत्तेबद्दल डांगोरा का पिटत आहेत ते समजले नाही. त्याचा भंग कसा होतो हे तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही.
आणि शेवटी "पण मग त्या मित्राच्या लक्षात आलं, की आपली मनस्थिती, आपली दोलायमान परिस्थिती याचा रुपालीच्या वैद्यकीय फॅक्ट्सशी काहीच संबंध नाही" असे लिहिता. मित्राच्या दोलायमान परिस्थिती मूळच जर रुपालीचा गर्भपात आहे, जी गोष्ट मला नक्कीच माहित आहे. कारण गरोदर असताना आणि गर्भपात झाल्यावर मी तिची सोनोग्राफी केली आहे तर त्या दोन्हीचा संबंध नाही असे तुम्ही कसे म्हणू शकता?
म्हणून मग वितंडवाद घाला ऐवजी मी "बरं" म्हणून सोडून दिले.

आदूबाळ's picture

24 Aug 2016 - 12:15 am | आदूबाळ

मी डॉक्टरच्या professional ethics बद्दल बोलतो आहे. तुमच्या मित्राने त्यांच्या नितीमूल्यांप्रमाणे अपसेट होणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट non-professional capacity मध्ये सांगायला नको होती - कारण ते professional ethics ची पायमल्ली करणारं आहे असं मी म्हणतो आहे.

प्रत्येक व्यावसायिकासमोर त्याच्या व्यवसायिक capacityमध्ये अनेक अनैतिक गोष्टी येत असतात. (अनैतिक - बेकायदेशीर नव्हे.) नीतिमत्ता अंडरवेअरसारखी असते - प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न. जे पेशंटसाठी नैतिक ते डॉक्टरसाठी अनैतिक असू शकतं. डॉक्टरला एखादी गोष्ट अनैतिक वाटते म्हणून त्याने ती गावभर publicise करू नये. किंबहुना आपल्या चड्डीदोस्तालाही सांगू नये.

अर्थात - तुम्हाला तुमच्या मित्राने फोन करून रूपालीचं लग्न आपल्या मित्राच्या मुलाशी झाल्याचं सांगणे यात काही गैर आहे असं वाटत नसेल तर माझा मुद्दा निव्वळ अरण्यरुदन समजा.

आजानुकर्ण's picture

23 Aug 2016 - 10:37 pm | आजानुकर्ण

कहानीमे नया मोड! :)

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 10:46 pm | संदीप डांगे

=)) =)) =)) हसून फुट्लो राव..

सूड's picture

24 Aug 2016 - 12:37 am | सूड

=))

शरभ's picture

19 Aug 2016 - 6:36 pm | शरभ

आणि थोडी Empathy असू द्यात लोकहो, नुस्तीच Sympathy नको. अशी परिस्थिती कुणाच्याही मुलीवर येऊ शकते.

//
...( रुपालीच्या डोळ्यात तिरस्कार)...
//

नक्की तिरस्कार आहे की "Feeling of awkwardness" आहे ? तुमच्या मित्राने मुलीला तसं काहीही जाणवुन दिलं नाही म्हणजे झालं.

Anyway, खरे काकांनी सर्व वाचकांवर सोडले आहे, तेव्हा आण़खीन चर्चेत कोणालाही रस नसावा.

-श

पिलीयन रायडर's picture

19 Aug 2016 - 6:59 pm | पिलीयन रायडर

रुपालीने काय करावं हा तिचा प्रश्न आहे. काही मत व्यक्त करण्या इतपत मुळातच माहिती आपल्या हातात नाही. पण तुमच्या मित्राची परिस्थिती समजु शकते. मागच्या पिढीच्या लोकांना काही गोष्टी पचवायला जड जातातच. पण मुळात तुमच्या हातात कधी काही कंट्रोल नसतोच, तेव्हा उगाच हळहळ करण्यात काय हशील? वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे मुलीने मुलाला आधीच सगळे नीट सांगितले असेलही. तेव्हा कुणी फसवलं गेलं असेलच असंही नाही. तेव्हा तुमच्या मित्राला काहीच विचार करण्याची गरज नाही.

त्या मुलीच्या नजरेत तिरस्कार किंवा आणखी काही दिसत असेलही.. पण कदाचित त्या मुलीलाही तुमच्या मित्राच्या डोळ्यात तिरस्कार दिसत असेल..

मला वाटतं झाल्या प्रकरणाची ओळखही न दाखवुन मित्राला नेहमीसारखे भेटत रहाणे हेच सर्वांसाठी उत्तम असेल.

आणि खरंच.. शृंगापत्ती म्हणजे काय? (ती शिंगे अडकल्याची एक गोष्ट आहे... तिच्याशी काही निगडीत आहे का?)

चंपाबाई's picture

19 Aug 2016 - 7:15 pm | चंपाबाई

पटला नाही.

१ . रुपालीने लgnaa आधी काय करायचे , हा तिचा प्र्श्न आहे.

२. मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे. जर नॉन डिस्क्लोजरमुळे समोरच्या व्यक्तीला धोका असेल तरच डॉक्टर उघड करु शकतो. उदा. एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्ती स्टेटस दडवुन निगेटिव्ह व्यक्तीशी लग्न करत असेल तर डॉक्टर त्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी माहिती उघड करु शकतो.

पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 7:26 pm | सुबोध खरे

माहिती कुठे, कुणी आणि कुणाला उघड केली हे समजेल का?
कि असंच?

चंपाबाई's picture

19 Aug 2016 - 8:08 pm | चंपाबाई

पण उघड न केल्याची बोच असणे आवश्यक नाही.

सुबोध खरे's picture

19 Aug 2016 - 8:32 pm | सुबोध खरे

बोच कुणाला आहे?

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2016 - 9:08 pm | राजेश घासकडवी

बोच कुणाला आहे?

अहो तुमच्या मित्राला बोच आहे, त्याला चार दिवस अस्वस्थ वाटलं असं तुम्हीच लिहिलं आहे ना! जर त्याला कसली बोच नसेल तर या लेखाला काय अर्थ राहातो? मग मूळ लेख आणि बहुतांश प्रतिसाद बादच होतात की.

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 12:04 am | सुबोध खरे

मेडिकल एथिक्स नुसार हे डॉक्टरला उघड न करण्याचे बंधन आहे.
पण अ‍ॅबॉशन चा इतिहास असणे यात असे काही नसल्याने अशी माहिती उघड केल्यास डॉक्टरच गुन्हेगार ठरेल.
चंपाबाई / मोगा / जामोप्या/ हितेश राव यांनी
पहिल्यांदा असे बेलगाम बेदरकार आरोप केले.
त्यात कुठे आणि कसे हे विचारल्यावर सिद्ध करणे शक्य नाही.
म्हणून "बोच असल्याबद्दल" लिहितात. म्हणून ते विचारले.

राजेश घासकडवी's picture

21 Aug 2016 - 1:51 am | राजेश घासकडवी

चंपाबाईंच्या प्रतिसादांत मला कुठचेच आरोप दिसत नाहीत. त्यांनी 'तुमच्या मित्राने बोच ठेवून घेऊ नये' असं म्हटलेलं आहे. त्यावर तुम्ही अचानक 'बोच आहेच कुणाला' असा प्रश्न विचारला आहे.

असो. मला असं वाटतं आहे की या लेखापोटी तुम्ही अपसेट झालेला आहात. तसं करून घेण्याची गरज नाही असं मनापासून वाटतं. तुम्ही जो प्रश्न मांडलात त्याच्या अनेक वेगवेगळ्या पैलूंचा विचार करून मिपाकरांनी आपापली मतं मांडलेली आहेत. प्रत्येकच मत प्रत्येकाला पटायला हवं असं नाही. मात्र या चर्चेकडे थोडं त्रयस्थपणे एक चर्चा म्हणून पाहा, आणि वैयक्तिक घेऊ नका ही विनंती करतो.

मला आणि बहुतांश इतर मिपाकरांना तुमच्याबद्दल आदरच आहे.

सुबोध खरे's picture

21 Aug 2016 - 7:53 am | सुबोध खरे

ब्वॉर

वरुण मोहिते's picture

19 Aug 2016 - 8:42 pm | वरुण मोहिते

अहो साधा अनुभव आहे डॉक खरे यांचा ..त्यात इतका काय ...कुठेही त्यांनी नाव घेतला नाही त्यांना
इतक्या अश्या कंमेंट चा कारण कांय

आजानुकर्ण's picture

19 Aug 2016 - 8:56 pm | आजानुकर्ण

'ती' मुलगी आणि तिचा नवरा यांचा संसार सुखाने चाललाय! तुमच्या मित्राचे सदर कुटुंबाशी खरंच जवळचे संबंध असते तर लग्नापूर्वी हे नाते जुळवण्याच्या प्रक्रियेत तुमच्या मित्राचा सल्ला त्या कुटुंबाने घेतला असता. मात्र त्याला चारचौघांसारखं डायरेक्ट लग्नात जेवायलाच बोलावलंय. त्यामुळं तुमच्या मित्राचा सल्ला कितपत महत्त्वाचा आहे हे त्या कुटुंबाने यापूर्वीच दाखवून दिलंय. आता उगीच चहापाण्यापुरते संबंध असल्यानंतरही ह्या प्रसंगाबद्दल मित्राला टोचणी लागते आहे म्हणजे त्या कुटुंबाच्या संदर्भात त्याने स्वतःची प्रतिमा विनाकारण महत्त्वाची असल्याचा गैरसमज करुन घेतलेला दिसतोय. तुमच्या मित्राला काय वाटतंय याचा त्या कुटुंबाला काडीचाही फरक पडत नाहीये. मात्र निव्वळ आपण अत्यंत महत्त्वपूर्ण आहोत या गैरसमजात त्याने विनाकारण संशयाची काडी घालू नये ही एक माफक अपेक्षा आहे.

सुबोध खरे's picture

20 Aug 2016 - 10:38 am | सुबोध खरे

हे काहि पटले नाही.
सर्व साधारणपणे मुलगा/ मुलगी बघायला जाताना फक्त जवळचे नातेवाईकच जातात. बहुसंख्य मित्रांना थेट लग्नालाच बोलावले जाते. निर्णय प्रक्रियेत या डॉक्टरांचा सहभाग नव्हता यात नवल नाही परंतु म्हणून त्यांना वाईटही वाटू नये हे पटत नाही. यात स्वतःची प्रतिमा मोठी करून घेण्याचा काय संबंध आहे.
त्याने "संशयाची काडी" घालू नये. यात या डॉक्टरांनी काहीच केलेले नाही कि त्याने मित्राला मुलीबद्दल काही सांगितले आहे असेही नाही.
एकदा लग्न "झाल्यावर" दुधात मिठाचा खडा घालण्याला काही अर्थ नाही हे त्यालाही समजते .

आजानुकर्ण's picture

22 Aug 2016 - 7:53 am | आजानुकर्ण

हे मान्य!

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2016 - 9:10 pm | राजेश घासकडवी

मला आणखीन एक प्रश्न पडतो तो म्हणजे ज्या पुरुषामुळे रुपालीला गर्भधारणा झाली होती त्याच्याबद्दल. या कथेत कोणालाच त्याची ओळख नाही. पण त्याचंही कदाचित दुसऱ्या मुलीशी लग्न होईल. मग तोही डिफेक्टिव्ह माल समजला जाईल का? बीज सोडणारा पुरुष नामानिराळा, आणि क्षेत्र असलेली स्त्रीच बदनाम हे अन्याय्य आहे.