डेली सोप.... एक कथा वाचन -२

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 5:59 am

मागील दुवा http://misalpav.com/node/37012

रघु: बाराखडी म्हणजे ते नाही का मुलाना शाळेत शिकवतात... क का कि की कु कू ...ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः
ती बाराखडी .... जाऊ दे तुम्हाला नाही कळायचे ते.... तुम्ही इंग्लीश मिडीयम मधे शिकलेले असाल.
निर्दालनः म्हणजे....
रघु: ते जाउ दे हो.... पण ही कथा मी मॅडमला कशी सांगु? मला नीट समजावून सांगा.
निर्दालनः नीट समजावून सांगायचे? ओक्के .... हे बघा .... हे बघा.... अगदी सोप्पे आहे... मी आणखी सोप्पे करुन सांगतो.
(टेबला वरचे फळांच्या ट्रे मधील फळ घेतो ) हे बघा हे हे .... हे काय आहे.

निर्दालनः नीट समजावून सांगायचे? ओक्के .... हे बघा .... हे बघा.... अगदी सोप्पे आहे... मी आणखी सोप्पे करुन सांगतो.
(टेबला वरचे फळांच्या ट्रे मधील फळ घेतो ) हे बघा हे हे .... हे काय आहे.
रघु: सफरचंद..
निर्दालनः हे सफरचंद आहे हे मलाही माहीत आहे... पण हे सफरचंद म्हणजे बाप आहे असे समजूया...
रघु: हं
निर्दालनः हे काय आहे....
रघु : डाळींब
निर्दालनः व्वा... आता डाळींब म्हणजे मुलगा. आता हा मुलगा आहे... ( सफरंदाकडे बोट दाखवून) हे काय आहे.
रघु: बाप..
निर्दालनः बाप? अहो ते सफरचंद आहे.... तुम्ही मला कन्फ्यूज करु नका ... मी एकदम सिंपलीफाय करुन सांगतो.
बाप आणि मुलगा....बाप आणि मुलगा.... डाळींब आणि सफरचंद..... आता सफरचंदाची बायको एक दिवस
म्हणते... की मला त्या काकडी सारखे दिसायचे आहे.... सफरचंदाला सुद्धा काकडी आवडत असते. काकडी म्हणजे
कोण तर सफरचंदाच्या बायकोच्या बॉसची सेक्रीटरी... पण डाळींब त्याच्या मैत्रीणीच्या प्रेमात आहे.
आता डाळीम्बाची मैत्रीण कोण
रघु: कोण ?
निर्दालनः कोण...... मोसंबी... ( फळे टेबलावर ठेवत) आता बघा कळेल तुम्हाला बाप, मुलगा ,बॉसची सेक्रेटरी आणि गर्लफ्रेंड
आले एका लायनीत बसले... आता काय..
रघु: काय?
निर्दालनः काय....
रघु: अहो काय काय काय करताय तुम्ही स्टॉरी पुढे न्या ना...
निर्दालनः हो हो हो सांगतो सांगतो.. ह... काय होते की खूप दमल्यामुळे सफरचंद त्या दिवशी लवकर झोपून जाते.
रघु: सफरचंद झोपतं?
निर्दालनः हो ...झोपतं दिवसभर वणवण चालल्यामुळे झोप लागणारच ना साहेब...... तुम्ही म्हणत असाल तर जागे करतो
त्याला...... तर होतं काय की सफरचंद गाढ झोपलंय ही संधी साधून डाळींब आणि मोसंबी मंदीरात जाऊन लग्न
लावतात...
रघु: कुणाचं
निर्दालनः कुणाचं काय त्या दोघांचे.डाळींबाचा मुलगा सफरचंद आणि काकडीची मुलगी मोसंबी यांच.. त्यांचे स्वतःचं
डाळींब आणि मोसंबी चं लग्न होतं .... सहाजीकच लग्न केल्या नंतर मोसंबी सफरचंदाच्या घरी रहायला येते.
रघु: अहो मोसंबीचं लग्न डाळींबाशी झालाय ना... मग ती सफरचंदाच्या घरी कशाला येईल.
निर्दालनः अहो साहेब... डाळींब हा सफरचंदाचा मुलगा.... मोसंबी ही डाळींबाची बायको..... मग ती सफरचंदाच्याच घरी येईल
ना....
रघु: कशी काय?
निर्दालन: अहो सफरचंद मोसंबीचा सासरा नाही का..... तर लग्न केल्यामुळे मोसंबी डाळींबाबरोबर सफरचंदाच्या घरी येते.
पण येताना दोन द्राक्षे ही सोबत घेउन येते.
रघु: द्राक्षे? आता द्राक्षे कोण?
निर्दालन: मला वाटलंच होतं की तुम्ही हा प्रश्न विचारणार म्हणून... द्राक्षे म्हणजे मोसंबीची दोन छोटी छोटी गोड मुलं...
तीला तिच्या पहील्या लग्नाची मुलं. पेरु पासून झालेली. पेरु म्हणजे मोसंबीचा पहीला नवरा. लीव्ह इन रीलेशन
वाला. थोडे लक्ष्य द्या बरं का.. नीट ऐका आता नातेवाईक आणि पात्रे वाढत जातील. त्यांच्या मागोमाग चवळी येते...
चवळी म्हणजे.... मोसंबीची सासू.... पहिल्या लग्नातली.....
इकडे डाळींब आणि मोसंबी घरात येतात.... आणि सफरचंदाला जाग येते..... काय टायटल आहे साहेब... आम्ही बुक
करून ठेवलय .... आणि सफरचंदाला जाग येते........ सफरचंद चवळीला बघते. चवळी सफरचंदाला बघते.. त्यांची
नजरानजर होते. आणि धडाम धडाम धडाम्म्म्म्म्म्म.
रघु : हे कायरघु : हे काय
निर्दालन : बॅग्राउम्ड म्युझीक साहेब... आपले एकदम सुप्परहीट ट्यून आहे.... धडाम धडाम धडाम्म्म्म्म्म्म लोक नुसत्या या
आवाजानेच बालाजीची सिरीयल चालू आहे हे ओळखतात. बालाजीची ही खासीयत आहे. जितके नातेवाईक जास्त
तितकी सिरीयल फेमस. फुल्ल टी आर पी.
रघु: अहो पण इतके नातेवाईक?
निर्दालनः असू दे की साहेब. आणि नातेवाईक वाढले म्हणुन तुम्हाला कुठे त्याना रीसेप्शन ला निमंत्रण द्यायचंय? वाढू दे.
तर काय म्हणत होतो साहेब डाळिंबाचं आणि मोसंबीचं लग्न झाल्यावर चवळी ही डाळिंबाची कोण लागेल
रघु: कोण लागेल?
निर्दालनः बघा ना तुमच्या बायकोची सासू तुमची कोण लागते?
रघु: आई
निर्दालनः बरोब्बर बोललात सर. तर चवळी ही मोसंबीच्या पहिल्या लग्नातली सासू या लग्नामुळे लॉजीकली डाळिंबाची आई
झाली. सफरचंदाच्या लक्षात हे लॉजीक येते. आणि तो चवळी ला प्रपोज करायला जातो. पण चवळी ही सफरचंदाला
ती मोसंबीची लहान बहीण असल्याचे सांगते. आता बघा.... सफरचंद डाळिंब मोसंबी द्राक्षे काकडी चवळी...
आणि हा बटाटा.
रघु: आता बटाटा पण.... अरे बापरे. डोक्याची आता खरंच मंडई झालीय.
निर्दालनः अहो मंडई कशाला... सगळं इथेच आहे. . एकदम सोप्पे आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा समजाऊन सांगतो. अगदी
पहिल्यापासून सांगतो.
रघु: नको नको.पुन्हा पहिल्यापासून नको... समजलय मला समजलय. समजलंय मला
निर्दालनः आता बघा इथून कथेला वळण लागते. डाळिंब आणि मोसंबीचे लग्न होते मोसंबीला यथावकाश दिवस जातात.
तीला मुलगा होतो. तो कोण
रघु: कोणः
निर्दालनः मुळा
रघु: मुळा?
निर्दालनः सफरचंदाने इकडे चवळीला प्रपोज केलेले असते. त्याना लग्ना आधीच चवळीला दिवस जातात त्याना मुलगी होते.
ही मुलगी असते. भेंडी. डाळिंब आणि मोसंबीचा मुलगा मुळा आणि सफरचंद आणि चवळीची मुलगी भेंडी एकाच
कॉलेजात शिकत असतात.
रघु: त्याना मुले होतात आणि ती लगेच कॉलेजातही जातात? इतक्या लग्गेच...
निर्दालनः हो ना बघा बालाजी उगाच वेळ घालवत नाही . आमच्याकडे सगळ्यागोष्टी कशा फटाफट होतात.
रघु: पण इतक्या.
निर्दालनः भेंडी आणि मुळा हे दोघेही एकाच कोलेजात असतात मुळ्याला बाईक वर स्टंट करायची आवड असते
. एकदा असाच स्टंट करत असताना भेंडीला बाईकचा धक्का लागतो. भेंडीच्या डोक्याला मार बसतो. तीचे स्मृती हरवते.
तीला दुसरेच काही आठवायला लागते. ती म्हणायला लागते... मे भेंडी नाही...भेंडी मी भेंडी नाही........
रघु: ओ बाआआआअस्स्स्स्स्स्स्स..... स्टॉप स्टॉप स्टॉप.....
निर्दालन : का तुम्हाला पण काही आठवायला लागले?
रघु: ओ निर्दालन भौ.... तुम्ही मला सिरीयलची स्टोरी सांगताय की येडं बनवताय.....
निर्दालनः दोन्ही....
रघु: म्हणजे.
निर्दालनः दोन्हीत फारसा फरक नाहिय्ये. डेली सोप ची कथा अशीच पुढे जात असते.
रघु: या आख्ख्या गोष्टीत सुप्रिया मॅडमचा रोल कुठे आहे?
निर्दालनः सुप्रीया मॅडम.... मॅडम वांगी....
रघु: ए गप्प बैस.....मॅडम ला वांगी म्हणतोसचल निघ ....निघ नीघ इथून अगोदर.
निर्दालनः तुम्ही मला नीघ म्हणताय... मला नीघ म्हणताय.
रघु: हो तुम्हाला..... नाही नाही तुला नीघ म्हणतोय.
निर्दालनः याचे परीणाम वाइट होतील
रघु: काय होतील रे... मला धमक्या देवू नकोस...
निर्दालनः अहो मी बालाजी चा कास्टिंग डिरेक्टर आहे. मॅडमला आमच्या सिरीयल मधे रोल तर मिळणार नाहीच ... आणि
तुम्ही मला घालवून दिलेत हे बाहेर समजले तर इतर सुद्धा कोणी रोल ऑफर करणार नाही.
रघु: जारे... जा... असल्या धमक्याना घाबरत नाही मी.... अरे समजलास काय मला.. ही ही असली फडतूस सिरीयल
निर्दालनः तुम्ही खुशाल म्हणा हो फडतूस...पण इथे या रोल साठी इंडस्ट्रीत अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत.
या सिरीयल मधे रोल मिळावा म्हणून तरूण पोरी अक्षरशः जीव ताकतात. काय वाट्टेल ते द्यायला तयार
असतात. पैसेच नाही तर इतर सुद्धा बरंच काही द्यायला तयार असतात. अ‍ॅज अ कास्टिंग डिरेक्टर म्हणून
माझ्या सोबत कुठल्याही लॉज मधेही यायला तयार असतात. समजलात काय तुम्ही. एकता मॅडम
च्या सेक्रेटरी नी सुप्रीया मॅडमचे नाव सुचवले म्हणून मी इकडे आलो... नाहीतर ती अंजली वाच्छानी, शालीमार
कोन्डोमची हॉट मॉडेल कधीची तयार आहे. नुसता फोन करायचा अवकाश. उड्या मारत येईल मी म्हणेल तिकडे
म्हणेन त्या लॉज मधे.तुमची सुप्रीया मॅडमेही फार वेगळी नसेल. बहुतेक जणी कोणाची ना कुणाची शिडी वापरतातच.
रघु: काय म्हणालास कुठल्याही लॉज मधे? तेही सुप्रिया ला... .... यु स्काउंड्रल.... गेट आउट
निर्दालनः बघा हां तुम्हाला हे महागात पडेल..मॅडचा रोल तर जाईलच शिवाय......
रघु: हाड रे कुत्र्या....... अजून काही बोललास तर तोंड फोडीन तुला नुसता हाकलून देतोय हे नशीब समज डुकरा. गेट आउट
अरे सुप्रिया म्हणजे तुम्हाला कोण वाटली...... गेट आउट... बास्टर्ड...( निर्दालन ला घालवून देतो---)

(----०००० ---०००---००००---- )

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

18 Aug 2016 - 6:32 am | नावातकायआहे

मी पैला..

एस's picture

18 Aug 2016 - 8:16 am | एस

:-) भारी!

क्षमस्व's picture

18 Aug 2016 - 2:43 pm | क्षमस्व

मस्त आहे।।

बोका-ए-आझम's picture

18 Aug 2016 - 3:38 pm | बोका-ए-आझम

१०% अतिशयोक्ती आहे. पुभाप्र!

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2016 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर

डोकं सुन्न झालंय.

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2016 - 3:42 pm | टवाळ कार्टा

ख्याख्याख्या