प्रश्न

इना's picture
इना in जे न देखे रवी...
10 Aug 2016 - 3:10 am

हलकेचं आलीस आयुष्यात
वाऱ्याच्या झुळूकीसारखी
मनात मात्र माझ्या
वादळासारखी राहिलीयेस
तुझं हसणं, तुझं दिसणं
कोरलय माझ्या अस्तित्वावर
रात्रीच्या आकाशात
ध्रुव चमकत रहावा
तसा गुणगुणत राहतो
तुझा आवाज माझ्या कानात
त्या क्षणी जवळ असतीस तर
मिठीत घेतली असती तुला
किती आवडतेस तू मला
मीही सांगितलं असत मग
पण नाही सांगता आलं
तेव्हाही आणि आताही
आता फक्त स्वप्नं पाहतो
त्या स्वप्नातही तू भेटतेस
तेही दूर जाण्यासाठीच
मग भेटतेस तरी का
ते तुलाच माहीत
तुझ्याचंजवळ हरवून आलोय
मी स्वतःला बेमालूमपणे
पण तुझ्या नाही येतं लक्षात
आणि माझ्याजवळ असलेला
मी अजूनच अगतिक होतो
पण यातलं काहीही
तुला कळून उपयोग नाही
कारण तुला सगळी उत्तरं माहितीयेत
आणि मला आता कुठे
प्रश्न पडायला सुरुवात झालीये.

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

रातराणी's picture

10 Aug 2016 - 8:18 am | रातराणी

सुरेख!

ज्योति अळवणी's picture

10 Aug 2016 - 4:35 pm | ज्योति अळवणी

भावना सुरेख मांडल्या आहेत. पण कविता म्हणून काहीतरी चुकत आहे अस वाटत.

धन्यवाद रातराणी आणि ज्योती अलवनि. पहिला प्रयत्न फसलेला दिसतोय.

चांदणे संदीप's picture

11 Aug 2016 - 10:37 am | चांदणे संदीप

फारच आवडली कविता! लिहित रहा!

Sandy

सस्नेह's picture

11 Aug 2016 - 1:27 pm | सस्नेह

सुंदर कविता !

जावई's picture

11 Aug 2016 - 9:12 pm | जावई

पहिला प्रयत्न, मस्त लिहिले आहे.

इना's picture

12 Aug 2016 - 2:08 am | इना

आभार!

चाणक्य's picture

12 Aug 2016 - 8:44 am | चाणक्य

.

Bhagyashri satish vasane's picture

13 Aug 2016 - 2:38 pm | Bhagyashri sati...

आवडली आपल्याला