मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रश्न

इना · · जे न देखे रवी...
हलकेचं आलीस आयुष्यात वाऱ्याच्या झुळूकीसारखी मनात मात्र माझ्या वादळासारखी राहिलीयेस तुझं हसणं, तुझं दिसणं कोरलय माझ्या अस्तित्वावर रात्रीच्या आकाशात ध्रुव चमकत रहावा तसा गुणगुणत राहतो तुझा आवाज माझ्या कानात त्या क्षणी जवळ असतीस तर मिठीत घेतली असती तुला किती आवडतेस तू मला मीही सांगितलं असत मग पण नाही सांगता आलं तेव्हाही आणि आताही आता फक्त स्वप्नं पाहतो त्या स्वप्नातही तू भेटतेस तेही दूर जाण्यासाठीच मग भेटतेस तरी का ते तुलाच माहीत तुझ्याचंजवळ हरवून आलोय मी स्वतःला बेमालूमपणे पण तुझ्या नाही येतं लक्षात आणि माझ्याजवळ असलेला मी अजूनच अगतिक होतो पण यातलं काहीही तुला कळून उपयोग नाही कारण तुला सगळी उत्तरं माहितीयेत आणि मला आता कुठे प्रश्न पडायला सुरुवात झालीये.

वाचने 1986 वाचनखूण प्रतिक्रिया 9