नको लावूस पारिजात दारी

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
22 Sep 2008 - 12:50 pm

नको लावूस पारिजात दारी
====================

नको लावूस पारिजात दारी..!
बावळा, फुलतो रोज नव्यानी..!!

कळी-कळीत, मोती-पवळी..
वेंधळा, सांडत राहतो अंगणी..!

टप-टप बरसती गंधीत सरी..
कोवळा, भिजतो श्रावण राती..!

आकाशी विझती चांदणं जोती..
सोवळा, रचतो निर्माल्य राशी..!

चौकटीत पाखरे गलबलती..
सावळा, ऐकतो निरव वाणी..!!!

====================
स्वाती फडणीस.......... १६-०९-२००८

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

पावसाची परी's picture

22 Sep 2008 - 2:51 pm | पावसाची परी

अतिशय सुन्दर
पारिजाताच्या फुलाचे खुप छान आणि योग्य वर्णन!

राघव's picture

22 Sep 2008 - 5:43 pm | राघव

नेहमीप्रमाणेच छान कविता.
तुमच्या कविता वेगळ्या असतात. जे कवितेच्या रूपकांतून सांगता ते काही वेळेस समजते तर काही वेळेस नाही. ह्या कवितेतले पारिजाताचे वर्णन हे केवळ पारिजाताचेच आहे की त्यातून आणखीही काही सांगायचे आहे (तसे असेल तर नाही समजले बुवा.)?

मीनल's picture

22 Sep 2008 - 6:04 pm | मीनल

खूप खूप आवडली.
परिजात असतोच असा -कोवळा,सोवळा.
मीनल.

स्वाती फडणीस's picture

23 Sep 2008 - 12:31 am | स्वाती फडणीस

:)

अनामिक's picture

23 Sep 2008 - 12:36 am | अनामिक

आहाहा!

कळी-कळीत, मोती-पवळी..
वेंधळा, सांडत राहतो अंगणी..!

मस्तच!!

ज्यांच्या ज्यांच्या घरी पारिजातकाचे झाड आहे त्यांना दररोज येणारा अनुभव.... अगदि अचूक शब्दात मांडलाय... छान कविता....!!!

धनंजय's picture

23 Sep 2008 - 12:38 am | धनंजय

मोती-पवळी छानच.

पण "निर्माल्य राशी" वाचून वाईट वाटले. बाकी कडव्यांत स्वांतसुखाय झडत असला तरी तो कुठला त्रासदायक कचरा करत नाही. या एका कडव्यात सोवळा पारिजात भोंदू वाटतो.

स्वाती फडणीस's picture

23 Sep 2008 - 12:52 am | स्वाती फडणीस

ज्याला जसे वाटेल ते
मला तो असा वाटतो :)
प्राजक्त बहरतो,फुलतो..पण आपल्याला त्याचा बहर झेलायला बर्‍याचदा वेळ नसतो/किंवा तसा तो आपण काढत नाही त्यामुळे .. उत्कटतेने ओसंडणारा तो अस्पर्श गळून कोमेजुन जातो.. तेव्हा ती फुल कधी बघा तुम्हाला निर्माल्याचीच आठवण होईल...[मी कचरा अजिबात म्हटलेल नाही.. निर्माल्य म्हटले आहे.. ]
आणि त्याच वेळी त्याच सोवळेपणही कळेल.

प्राजु's picture

23 Sep 2008 - 12:53 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

23 Sep 2008 - 12:57 am | चतुरंग

पारिजातकाच्या सुंदर कल्पना!

पहिल्या चार कडव्याशी पाचव्याची जुळणी मला झाली नाही..

चतुरंग

शितल's picture

23 Sep 2008 - 1:03 am | शितल

स्वाती ताई,
कविता नितांत सुंदर केली आहे.

कळी-कळीत, मोती-पवळी..
वेंधळा, सांडत राहतो अंगणी..!

ही उपमा तर मस्तच.
:)
मला पारिजातकाच्या फुलांचा सहवास अखंड लाभला आहे , अमेरिकेत आल्या पासुन मात्र तो मुकला आहे. :(
त्याचा पहाटे मंद वार्‍या बरोबर येणारा सुवास खुप छान असतो
आणि दारात पडलेला पारिजातकाचा सडा केवळ अप्रतिम चित्र.

स्वाती फडणीस's picture

23 Sep 2008 - 3:02 pm | स्वाती फडणीस

:)

पारिजातक's picture

24 Sep 2008 - 12:20 pm | पारिजातक

खुपच अप्रतिम !

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

स्वाती फडणीस's picture

24 Sep 2008 - 6:56 pm | स्वाती फडणीस

:)