मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नको लावूस पारिजात दारी

स्वाती फडणीस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नको लावूस पारिजात दारी ==================== नको लावूस पारिजात दारी..! बावळा, फुलतो रोज नव्यानी..!! कळी-कळीत, मोती-पवळी.. वेंधळा, सांडत राहतो अंगणी..! टप-टप बरसती गंधीत सरी.. कोवळा, भिजतो श्रावण राती..! आकाशी विझती चांदणं जोती.. सोवळा, रचतो निर्माल्य राशी..! चौकटीत पाखरे गलबलती.. सावळा, ऐकतो निरव वाणी..!!! ==================== स्वाती फडणीस.......... १६-०९-२००८

वाचन 3740 प्रतिक्रिया 0