चो..पली

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
26 Jun 2016 - 3:40 pm

चो... अरे पली बोलतोय
" बोल रे"
अरे तुला घरी भेटायचे आहे
"काही खास"
माझ्या पुतणीला तुला भेटायचे आहे. तीच्या मुलाला दहावीत ९२ % मार्क मिळाले आहेत.
"व्वा व्वा, अभिनंदन"
तु नसतास हे शक्यच नव्हते. ७२ वरुन डायरेक्ट ९२. तुझे पेपर्स आणि मार्गदर्शन एकदम बुल्स आय. पर्सनली भेटुन पेढे द्यायचे आहेत.कधी भेटशील.
"येत्या रविवारी ७ वाजता स॑काळी"
चालेल, तु काय बाबा बिझी माणुस. तो पर्यंत एक सल्ला हवा होता. आय आय टी ला चांगला क्लास कुठला रे?
"हे राम" (मनातल्या मनात)
नाही पुतणी दोन क्लासेस ला जाउन आली. अ चे इन्फ्रा सॉलिड आहे ब पण वाईट नाही.
"मेलो मेलो"(म.... म...)
रिझल्ट दोन्ही कडे आहे. तुझे मत महत्वाचे.
"फी काय सांगताहेत"?
४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५
"पुतणी ला परवडेल?"
आता स्कॉलर मुलगा म्हटले तर काही तरी जुगाड करायला लागेल. मुलगा पवई कॉम्प म्हणतोय. १ कोटी नको पण २५ ची प्लेसमेंट कुठे गेली नाही.
"मंत्राग्नी"(म्... म..)
१ लाखाची स्कॉलरशिप पण दिली आहे अ ने. परिक्षा घेतली आणि मार्कांवरुन कन्शेशन.
"मुकी बिचारी कुणी हाका" (म... म..)
ब मधे तुझे नाव घेतल्यावर तिथला काउंसेलर जरा कावरा बावरा झाला आणि नमस्कार सांगा सरांना म्हणाला, फी ची अडचण असेल तर करेन म्हणाला, तु जरा फोन करशील का?
"मग त्या अ च्या इन्फ्रा चे काय"
तुझी अ मधे ओळख आहे का बघ जरा ५० कमी झाले तर बजेट मधे येइल.
"आय आय टी झेपेल का याचा विचार केला आहे का"?
न झेपायला काय झाले, आय. सी. एस. सी. च्या ९२ ला नाही झेपणार तर कुणाला झेपणार?
"आयशीएसशी, सीबीएस्शी घाल चुलीत"
झाली का तुझी मस्करी चालु
" हे बघ पली तुम्ही निर्णय घेतला असेल तर गो अहेड उगाच माझ्या शिक्कामोर्तबीची नौटंकी कशाला? राहता राहीले अ आणि ब मधे निवड? टॉस कर. कारण दोन गाढवामधे चांगले कुठले ह्या प्रश्नाचे माझ्याकडे उत्तर नाही. हां माहीतीच हवे असेल तर पुर्ण मोकळ्या मनाने दोन तास काढुन या. सुरुवातीला जरा जड जाईल पण नंतर सर्व लक्षात येईल. तु फक्स्त साक्षिदार... आपली अक्कल मधे बोलुन उधळायची नाही."
क्रमशः

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jun 2016 - 3:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, तुझा निर्णय झाला असेल तर जिथं टाकायचं तिथे टाक ना म्हणावं ? बाय द वे, सर ११ वी आर्ट्स, कॉमर्स, आणि सायन्सचा सल्लाही तुम्ही गुणवंताच्या पाल्यांना देता का ?

सर, किती दिवसांनी मिपावर येताय ? सालं आमची आठवण येते काय नाय तुम्हाला ? लव यू डियर सर :)

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

26 Jun 2016 - 4:17 pm | विनायक प्रभू

आर्ट्स कॉमर्स १२ वी नंतर

किसन शिंदे's picture

26 Jun 2016 - 3:56 pm | किसन शिंदे

हम्म!! आहे खरे असे...
येऊंद्या सर पुढचा भाग

धनंजय माने's picture

26 Jun 2016 - 3:59 pm | धनंजय माने

वि प्र सर, पुनरागमन केल्याबद्दल हार्दिक आभार आणि समजेल असं लिहिल्याबद्दल दुप्पट (खरंतर अनेक पट) आभार.

पुढचा लेख लवकर येऊ दे. आजही शैक्षणिक क्षेत्रातला दुर्लक्षित झालेला पण अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे हा.

विनायक प्रभू's picture

26 Jun 2016 - 4:22 pm | विनायक प्रभू

पुढचा लेख येइल च. पण u can raise pertinent questions which i will answer

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 4:32 pm | सतिश गावडे

विप्र बरेच दिवसांनी आलात.

>> ४ प्लस कॉलेजचे वोकेशनल चे १ जवळ जवळ ५
हे आकडे काही झेपले नाहीत. जरा इस्कटून सांगा त्यांच्या परीमाणांसहीत.

बाकी आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते. आजच एका प्राध्यापक मित्राशी गप्पा झाल्या. त्याने आपल्या मुलीला कला शाखेत प्रवेश घेतला आहे. बरे वाटले. नाही तर आम्ही, अभियांत्रिकीची पदवी घेऊन, दहा वर्ष संगणक प्रणाली विकासक म्हणून काम केल्यानंतरही वाटते की आपण कला शाखेला गेलो असतो तर चांगले मानसशास्त्रज्ञ होऊ शकलो असतो. :(

अभ्या..'s picture

26 Jun 2016 - 4:52 pm | अभ्या..

आज प्रत्येक पालकाला आपला पाल्य इंजिनीयर किंवा डॉक्टर व्हावा असे वाटते.

हम्म. त्यात पण अजून स्पेशलायझेशन्स असणारच. माहीत नाही ते फिल्ड अ‍ॅक्चुअली पण आजकाल ज्या प्रमाणात आणि स्टाइलने माझ्याकडे क्लासेसच्या जाहीराती येताहेत त्यावरुन जगात फक्त कसल्यातरी एन्ट्रन्स आणि कसलेतरी इंटर्व्ह्युज क्रॅक करणे एवढेच शिकवले जाते असे वाटत आहे.
परवाच्या वन करोड फॉरीन पीजी चे लेख आणी प्रतिक्रीया वाचून ही दुनिया आपली नाही एवढेच कळले.
असो.

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 4:57 pm | सतिश गावडे

इंजिनीयर = आयटी असे समिकरण आहे. अभियांत्रिकी ही पदवी पाहिली जाते. अभियांत्रिकी कोणत्या विद्याशाखेतून केले आहे हा मुद्दा गौण असतो. (मी स्वतः याचे उदाहरण आहे. ;) )

धनंजय माने's picture

26 Jun 2016 - 5:57 pm | धनंजय माने

फॉरेन पीजी नाही रे अभ्या..
फ़क्त 'जी'. पण तरी करतात काही हुच्च लोक.
त्याचं काये ना की..... जाऊ दे, सांगेन कधीतरी. ;)

अभ्या..'s picture

26 Jun 2016 - 6:14 pm | अभ्या..

नकोच रे बाबा. आपली दुनिया नाही ही म्हणलेय ना. संपला प्रश्न.
बारावीपासून पीजीपत्तुर ५ हजार पण फी लागली नाही टोटल. असो. लेकराच्या वेळी बघता येईल. देवाने त्याला बी दिली एखादी कला तर ते बी हेच म्हणेल.

विनायक प्रभू's picture

26 Jun 2016 - 5:34 pm | विनायक प्रभू

क्लासेस ४ लाख, कॉलेज एक लाख इंटेग्रेटेड

सतिश गावडे's picture

26 Jun 2016 - 5:48 pm | सतिश गावडे

भयानक आहे हे.

दहा वर्षांपूर्वी एका पुर्ण शासकीय तंत्रशास्त्र विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीचे वार्षिक शुल्क फक्त सोळा हजार होते. कहर म्हणजे २००३ पर्यंत हे शुल्क फक्त चार हजार होते वर्षाला.

स्मिता_१३'s picture

27 Jun 2016 - 9:34 am | स्मिता_१३

सहमत. लाखातले आकडे वाचुन शिक्शण हे गुणंावर नाही पैशावर अवलंबून राहिलंय असं वाटतंय.

पुंबा's picture

27 Jun 2016 - 2:13 pm | पुंबा

माझ्या कॉलेजची(शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड) ची १ वर्षाची फी १००० रु.(ई. बी. सी. सवलती असताना), २५००० (ओपन ई. बी. सी. सवलत नसताना) आणि २०० रु.(कुठल्याही मागास प्रवर्गासाठी) होती. अत्यंत गरीब परिस्थितीतील विद्यार्थी इथे उत्तम (प्रॅक्टीकल नॉले़ज फार उच्च दर्जाचे नाही म्हणणार पण.. तरीही त्यातल्या त्यात बरे) शिक्षण घेऊ शकत असे. हॉस्टेल्ची फी देखील ६० रु.(१ वर्षाला) होती. अट एकच मार्क भरपूर हवेत. पुण्यातल्या कुठल्याही प्रसिद्ध कॉलेजपेक्षा जास्त मेरीट लागत असे आणि प्लेसमेंट जवळजवळ १००%. अक्षरशः घरी खायची भ्रांत असणार्या असंख्य मुला-मुलींना उत्तम शिक्षण आणि चांगल्या पगाराची नोकरी घेऊन बाहेर पडताना कराड्करांनी पाहीले आहे. तेव्हा ह्या लाख आणि कोटींच्या गोष्टी झीट आणणार्याच आहेत मला पण.

अनिरुद्ध.वैद्य's picture

27 Jun 2016 - 3:41 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्ही ह्या फॉर्मॅटमधले शेवटले. ह्यानंतर आमच्या ज्युनिअर मुलांना सरळ ५०+ हजार फी भरावी लागलीय.

४+१ हे लाखाचे आकडे दिसतायत! बाबौ!

यशोधरा's picture

26 Jun 2016 - 5:54 pm | यशोधरा

अवघड आहे पाल्यांचे... :(

एस's picture

26 Jun 2016 - 8:20 pm | एस

काय चाललेय काय!... :-(

नगरीनिरंजन's picture

26 Jun 2016 - 9:07 pm | नगरीनिरंजन

आयआयटीच्या/ आयआयएमच्या विद्यार्थ्याला अमुक कोटी रुपयांची नोकरी मिळाली अशा बातम्या दरवर्षी नेमाने येत असतात. पालकांना बहुतेक त्याजागी आपलं मूल दिसत असेल. पण सगळ्यांना तेवढा पगार मिळतो असं नाही.
खूप लोक कोट्याला (राजस्थान) घेऊन जातात मुलांना असं ऐकलं. किती जणांना एवढे पैसे टाकून प्रवेश मिळत असेल? मिळाला तरी नक्की शिकतात काय? नोकरी करण्यातच धन्यता?

बोका-ए-आझम's picture

26 Jun 2016 - 11:40 pm | बोका-ए-आझम

म्हणजे CTC असतो. हातात प्रत्यक्ष पडणारा पगार हा कमीच असतो.

नाखु's picture

27 Jun 2016 - 9:09 am | नाखु

असलं वाचलं की "शिक्षा"णच होतयं.

माझ्या (जुन्याच्)गावंढ्ळ शंका:

विद्यार्थ्याने कलचाचणी (अ‍ॅप्टीट्युड टेस्ट) नक्की कधी द्यावी.
वाजवी शुल्क आणि विश्वासार्ह अशी पुण्यात्/पिंचिमध्ये कुठे असल्यास सांगणे.
मी प्रभुसरांना अत्ताच त्रास देण्याऐवजी दोन वर्षांनी द्यावा लागेल तोपर्यंत याच्या दुसर्या-तीस्र्या भागात मनातील जळमटे दूर झाली तर त्रास कमी द्यावा लागेल.

मुल्गा दहावीत असल्याने (सध्या सुपात असलेला पालक) नाखु

सर्व साधारण अशी चाचणी १० नंतर करतात. ज्ञान प्रबोधीनी मध्ये (पुण्याच्या, पिंचि चे माहीत नाही) ही चाचणी होते. माझ्या मते तरी शुल्क वाजवी असुन ती विश्वासार्ह असते.

स्नेहल महेश's picture

27 Jun 2016 - 4:19 pm | स्नेहल महेश

मुंबईत अ‍ॅप्टीट्युड टेस्ट कुठे करतात आणि साधारण किती फी असते

सुनील's picture

28 Jun 2016 - 10:02 am | सुनील

ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या इंस्टिट्युट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ ह्या संस्थेत होते.

डोंबिवलीला २ ठिकाणी ही टेस्ट होते.

डोंबिवली वेस्टला उषा बोडसे मॅडम कडे. (फी साधारण ३,०००/- च्या आसपास. नक्की फी आठवत नाही.)

आणि

डोंबिवली ईस्टला डॉ. अद्वैत पाध्ये, ह्यांच्याकडे. (फी साधारण ५,०००/- च्या आसपास.नक्की फी आठवत नाही.)

स्नेहल महेश's picture

28 Jun 2016 - 11:25 am | स्नेहल महेश

ही टेस्ट १०वी नंतरच करतात का ?माझी मुलगी आता आठवीत आहे

ज्ञानप्रबोधिनीत बाराशेला होते.
मुंबईतून येऊन स्वस्त पडेल. शिवाय एक कलचाचणी कट्टा होईल... !

नाखु's picture

28 Jun 2016 - 2:51 pm | नाखु

हजर राहीन आणि लेकाची कलचाचणी आणि माझी कलकलाट चाचणी एकाच फेरीत होईल ते वेगळेच.

अश्या कट्टोत्सुक नाखु

धनंजय माने's picture

28 Jun 2016 - 3:25 pm | धनंजय माने

टेस्ट कुणाची करायची आहे? पालक की पाल्य? कारण पाल्य एकटा येऊन कट्टा व्हायचा नाही, पालक एकटा येऊन टेस्ट होणार नाही. ;)

लेकाची कलचाचणी आणि माझी कलकलाट चाचणी (पक्षी कट्टा).

आपलाच प्यारे मित्र नाखु

धनंजय माने's picture

29 Jun 2016 - 12:19 pm | धनंजय माने

काका आपने हमें पहचाना यह हमने पहचान लिया है.
पण प्रश्न was for खेडुत सर.
१२०० मध्ये चाचणी होईल पण मूल आणि आई/बा असे किमान दोघेजण येणार आणि जाणार.
अर्थात अटेंडिंग कट्टा इज ऑलवेज ..... priceless!

खेडूत's picture

29 Jun 2016 - 3:40 pm | खेडूत

बराबर. :)
कट्टा होईल आणि जाता-येता बालक-पालक सुसंवाद होईल आणि पाल्याचा कलही कळून येईल.

राजाभाउ's picture

27 Jun 2016 - 3:13 pm | राजाभाउ

उपयुक्त लेखमालेची उत्तम सुरुवात. पुभाप्र.

अजया's picture

27 Jun 2016 - 3:55 pm | अजया

वाचतेय.

सिरुसेरि's picture

28 Jun 2016 - 9:56 am | सिरुसेरि

ऑनलाइन अ‍ॅप्टीट्युड टेस्ट आहे का ? कोणती वेबसाइट ?

मुक्त विहारि's picture

28 Jun 2016 - 11:13 am | मुक्त विहारि

सुदैवाने आमची मुले "मानव" प्रजातीत मोडत असल्याने, निदान माझी मुले तरी ह्या "रॅट रेस" मध्ये नाहीत.

पुभाप्र

सतिश गावडे's picture

29 Jun 2016 - 1:03 pm | सतिश गावडे

आपल्या पाल्याची कल चाचणी जरुर करा.

माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो. उपकरण अभियांत्रिकीची पदवी. एका नामांकित माहीती तंत्रज्ञान आस्थापनेत संगणक आज्ञावलीकर्ता, व्यवसाय विश्लेषक, गुणवत्ता प्रमाण अभियंता अशा विविध पदावर काम केलेला. तीनेक वर्ष अमेरिकेत राहून आलेला.

वयाच्या सदतिसाव्या त्याला कामात असमाधानी वाटू लागले. ही भावना खुप आधिपासून होती हे ही लक्षात आलं. केवळ पैसे कमावन्याच्या नादात ही भावना दबून राहीली. आता आर्थिक स्थैर्य आल्यावर ते प्रकर्षाने जाणवू लागले.

शेवटी न राहवून वर उल्लेख आलेल्या एका संस्थेत तो कल चाचणी करुन आला.

कळीचा मुद्दा हा आहे की पाल्याचा ओढा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा तत्सम विषयानकडे नसेल तर पालकांची भूमिका काय असेल?

टवाळ कार्टा's picture

29 Jun 2016 - 1:25 pm | टवाळ कार्टा

आणि पुढे काय केले?

सौंदाळा's picture

29 Jun 2016 - 1:29 pm | सौंदाळा

हेच विचारायचे होते.

नीलमोहर's picture

29 Jun 2016 - 2:03 pm | नीलमोहर

पुढे काय केले ते महत्वाचे.

सतिश गावडे's picture

29 Jun 2016 - 4:35 pm | सतिश गावडे

ते सांगितले नाही त्याने. :)

आनंदी गोपाळ's picture

29 Jun 2016 - 1:51 pm | आनंदी गोपाळ

याला मिडलाईफ क्रायसिस म्हणतात. उपरकण अभियंता होईल असं १०वीतल्या कल चाचणीत निघालं असतं, तरी याने हेच केलं असतं. या वयात अस्थिरता, अस्वस्थता जाणवू लागते व बरेच मोठे करियर्/लाईफ चेंजिंग निर्णय अनेकदा घेतले जातात.

सतिश गावडे's picture

29 Jun 2016 - 4:38 pm | सतिश गावडे

हा सिनेरियो मिड लाईफ क्रायसिसचा आहे. मात्र माझ्या मित्राची गोष्ट वेगळी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2016 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

"Great people change their career stream / profession at least thrice, in their lifetime." अशी एक म्हण आहे ! :)

प्रमोद देर्देकर's picture

29 Jun 2016 - 2:07 pm | प्रमोद देर्देकर

ही चाचणी खरंतर प्रत्येक विद्यार्थ्याने १० वी सोडताना त्या त्या शाळेतर्फे घेतली जावी अशी सरकारने सक्ती केली पाहीजे.
आमच्या कंपनीते सी.ई.ओ. ते व्ही.पी. ए.व्ही.पी. हे सर्व बी. ते टेक एम. टेक आहेत आणि शेयर मार्केटमध्ये काम करताहेत. कारण काय तर नोकरी नाही त्या क्षेत्रात सर्वांनी नंतर एम. बी. ए. केलंय फायनान्समध्ये.

म्हणजे पहिली ५ वर्षे एम.टेक साठी आणि नंतर ची ५ वर्षे एम.बी. ए. साठी गेली.
आता सर्व हुशार आणि पाल्य बर्यापैकी पैसेवाले होते म्हणुन हे शक्य झाले.
आता मात्र खोर्याने पैसा ओढताहेत.

एवढी वर्षे ?

आणि सर्व एम.टेक आहेत ? बी टेक कोणी नाही ???

सर लेख एकदम मस्त....पुनरागमन मस्त

पैसा's picture

29 Jun 2016 - 5:46 pm | पैसा

धन्य ते पालक! बोर्डात ९२% मार्क्स असलेल्या कित्येक पोराना सीईटीला सुद्धा ७० ८० मार्क्स मिळालेले पाहते. काय करणार एवढा खर्च करून? मग त्या पोराला आयायटीला अ‍ॅडमिशन नाही मिळाली की आंध्र राजस्थान सारख्या इकडे पण आत्महत्या सुरू होणार का?

@ सतिश गावडे, गोव्यात माझ्या मुलाला बी ई ला अजूनही सरकारी कॉलेजात वर्षाला २५००० रुपयात सगळे भागते.

आंध्र राजस्थान सारख्या इकडे पण आत्महत्या सुरू होणार का?

सुरू झाल्यासुद्धा!
नुस्ता येड्याचा बाजार!

अभिजीत अवलिया's picture

1 Jul 2016 - 1:33 am | अभिजीत अवलिया

छान लिहिलेय विनायकजी. प्रतिक्रिया देखील मस्त.