७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.
- LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
- Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
- स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
- थंडीचे आणि साधे पायमोजे.
- एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
- ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
- बलक्लावा आणि राईडींग मास्क.
- किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
- गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
- थर्मल वेअर्स.
- थंडीचे जॅकेट.
- एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
- एक बॅकपॅक / सॅक.
- सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
- सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
- २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
- दोरी / रोप.
- सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
- आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
- पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
- गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
- आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
- गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
- गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
- गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अॅक्सलरेटर केबल.
- जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
- चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
- पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
- भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
- वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)
(क्रमशः)प्रतिक्रिया
In reply to ज्जे ब्बात!!! जे नाम रोसण कर by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे by टवाळ कार्टा
In reply to जशी माननीय टका शेठची विच्छा ; by कैलासवासी सोन्याबापु
In reply to एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे by टवाळ कार्टा
In reply to कुछ भी कहो by अनिरुद्ध.वैद्य
एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक ईट ऑर हेट ईट.+१११११११
In reply to मोदक भौ, by बाबा योगिराज
In reply to फोटो दिसत नाहीत. पुभाप्र . by वेदांत
In reply to जबराट by नाखु
In reply to अरे व्वा मस्तच!! by चेक आणि मेट
In reply to खरं आहे राव.. मला जास्ती by मोदक
In reply to मस्त. बुलेट म्हणजे अलगच चीज by अभ्या..
In reply to अभ्या लगा तुह्याकडं हाय का by कैलासवासी सोन्याबापु
In reply to पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच by तुषार काळभोर
ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!!
+१११
जियो बापुसाहब..!In reply to अभ्या लगा तुह्याकडं हाय का by कैलासवासी सोन्याबापु
In reply to इसरला का सोन्याबापू त्यो by अभ्या..
In reply to अर्रर्रर्र!!! आमचाच धागा त्यो!!! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to वाह. फिरोज्पूर ला गेल्याच कळल by प्रीत-मोहर
In reply to मस्तच by उल्का
In reply to नवा भाग कधी आहे? by आदूबाळ
अरे वा!