७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे.
तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले.
गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले.
लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.
(क्रमशः)
- LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
- Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
- स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
- थंडीचे आणि साधे पायमोजे.
- एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
- ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
- बलक्लावा आणि राईडींग मास्क.
- किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
- गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
- थर्मल वेअर्स.
- थंडीचे जॅकेट.
- एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
- एक बॅकपॅक / सॅक.
- सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
- सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
- २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
- दोरी / रोप.
- सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
- आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
- पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
- गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
- आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
- गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
- गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
- गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अॅक्सलरेटर केबल.
- जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
- चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
- पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
- भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
- वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)
(क्रमशः)
वाचने
48251
वाचनखूण
प्रतिक्रिया
79
अरे वा!
In reply to अरे वा! by खेडूत
+१
ये बात! भाग मात्र लौकर लौकर
ते इनो हाये काय शिल्लक?
कडक..........
अरे बापरे
ज्जे ब्बात!!! जे नाम रोसण कर
In reply to ज्जे ब्बात!!! जे नाम रोसण कर by कैलासवासी सोन्याबापु
एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे
In reply to एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे by टवाळ कार्टा
जशी माननीय टका शेठची विच्छा ;
In reply to जशी माननीय टका शेठची विच्छा ; by कैलासवासी सोन्याबापु
खिक्क...माझ्या धाग्यावर करु
In reply to एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे by टवाळ कार्टा
कुछ भी कहो
In reply to कुछ भी कहो by अनिरुद्ध.वैद्य
एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक
जबरा
जबरा
मोदक भौ,
In reply to मोदक भौ, by बाबा योगिराज
क्रमांक 2 चा फोटू बघून पुन्हा
सायकल ?
In reply to सायकल ? by कंजूस
सायकल =))
फोटो दिसत नाहीत. पुभाप्र .
In reply to फोटो दिसत नाहीत. पुभाप्र . by वेदांत
+१
साक्षेपी कथन. ते फोटोंच्या
मस्त.
झकास लेख
जबरद्स्त
लेह-लडाख लोन (बुलेट सकट)
सुरुवात तर मस्त झालीय
मोदकाचा लेख व शीर्षक पाहून
मस्त!
मस्त सुरवात !!
जबराट
In reply to जबराट by नाखु
+१..
वा वा मस्त!
छान सुरुवात
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद
जंगी तयारी दिसतेय!! इन्जाय!!
मस्त सुरवात !!
वाह
वाह एकदम जबरदस्त सुरूवात ,
मस्त
अरे व्वा मस्तच!!
In reply to अरे व्वा मस्तच!! by चेक आणि मेट
खरं आहे राव.. मला जास्ती
In reply to खरं आहे राव.. मला जास्ती by मोदक
__/\__
मस्त. बुलेट म्हणजे अलगच चीज
In reply to मस्त. बुलेट म्हणजे अलगच चीज by अभ्या..
खरंय दादा... कसल्या कसल्या
पटापटा टाका पुढचे भाग...
अभ्या लगा तुह्याकडं हाय का
In reply to अभ्या लगा तुह्याकडं हाय का by कैलासवासी सोन्याबापु
पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच
In reply to पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच by तुषार काळभोर
ह्या quote साठी तुम्हाला एक
ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!!+१११ जियो बापुसाहब..!In reply to अभ्या लगा तुह्याकडं हाय का by कैलासवासी सोन्याबापु
इसरला का सोन्याबापू त्यो
In reply to इसरला का सोन्याबापू त्यो by अभ्या..
अर्रर्रर्र!!! आमचाच धागा त्यो!!!
In reply to अर्रर्रर्र!!! आमचाच धागा त्यो!!! by कैलासवासी सोन्याबापु
आपके मुंहमे ओएम.
मस्तच रे मोदका.. एक नंबर
तुफान!!
याड लागलं
हे बाकी बरयं
ज्जेबात
वाचतोय मोदकराव
झकास!
भन्नाट! हे करायच आहे एकदा!
पहिला फोटो अशक्य सुंदर आहे! _
अरे वा. छानच :)
अरे वा!
वाह. फिरोज्पूर ला गेल्याच कळल
In reply to वाह. फिरोज्पूर ला गेल्याच कळल by प्रीत-मोहर
पुढच्या भागात कळेलच. :)
मोदक
ज्ब्रा!
जबराट!!!!!!!!!!!!!
खत्रा!
वाचतोय, बघतोय ..... खूप
वाचतेय
जबरदस्त !
मस्तच
In reply to मस्तच by उल्का
नाही हो.. आमची मुलाखत कोणी
झकास
लडाख
नवा भाग कधी आहे?
In reply to नवा भाग कधी आहे? by आदूबाळ
आज किंवा उद्या...!!
फोटो दिसत नाहीत ..
जबरदस्त सुरूवात