७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - फिरोझपूर (आणि समाप्त..!)

Primary tabs

मोदक's picture
मोदक in भटकंती
20 Apr 2017 - 6:50 pm

************************

.

************************

भाग १ - तयारी

भाग २ - पुणे ते रोहतक

भाग ३ - पानिपत

भाग ४ - चंदिगड आणि मनाली

भाग ५ - रोहतांग आणि केलाँग

भाग ६ - केलाँग ते कारू

भाग ७ - लेह शहर आणि BRO

भाग ८ - पँगाँग लेक

भाग ९ - खार्दुंगला पास

भाग १० - कारगिल वॉर मेमोरीयल

भाग ११ - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग

************************

उगाचच आळस केल्याने हा शेवटचा भाग टाकायचा राहून गेला.. त्याबद्दल क्षमस्व..!
पूर्वीच्या भागांमधले फोटोही दिसत नाहीयेत. नंतर सवडीने दुरूस्त करेन.

************************

हरियाणामध्ये जाटांचा संप आणि रास्तारोको सुरू असल्याने आज राजस्थानातून परत जाणे भाग होते.

पंजाबातल्या प्रसन्न सकाळी बाजूने पसरलेल्या शेतांच्या सोबतीने प्रवास सुरू झाला. आता बघण्यासारखे फारसे काही शिल्लक नव्हते आणि घरी जाण्याचीही ओढ लागली होती.

एका धाब्यावर पेटपुजा उरकली. पराठे, लोणी आणि लस्सी..!

.

आज पूर्वी ठरवलेल्या रस्त्यांना फाटा दिल्याने रस्ते शोधत शोधतच जात होतो. अनेकदा एखाद्या गावात-खेड्यात थांबून पत्ता विचारला की तो पत्ता सांगणारा माणूस चहा आणि खाण्यापिण्याचा आग्रह करायचा. हे आमच्यासाठी एकदम नवीन होते. "मेहमान लोग हो.. चलो कुछ चाय वाय पीते है" असे पदोपदी ऐकू येत होते.

यथावकाश फिरोझपूरला पोहोचलो.

.

फिरोझपूरहून पुढचा रस्ता कुणालातरी विचारणे भाग होते. अचानक एक हट्टाकट्टा सहा फुटी सरदार पोलीस रस्त्याकडेला दिसला. जवळ गाडी नेली तर खांद्यावरचे तीन तीन स्टारही दिसले. मी त्यांच्याजवळ थांबताच पुढील संवाद झाला. तो माणूस प्रचंड बडबड्या होता. इथे निवडक अंशच दिला आहे.

पोलीस अधिकारी : आओ जी आओ.. कहां जा रहे हो..?
मी : अंकलजी हनुमानगढ जाना है.
पोलीस अधिकारी : जाओगे जी.. वो तो पास है, आपको पहले भगतसिंगसाबकी समाधी पे जाना है..!
मी : जी..??
पोलीस अधिकारी : हां.. देखो, इ लोग्गोंने अपनी आज्जादी के लिये जान दी है.. आप वहाँ मत्था टेककेही जाना..!
मी : हाँ देखते है. (इथे मला ती समाधी नक्की किती अंतरावर आहे ते माहिती नव्हते.)
पोलीस अधिकारी : आप चलो.. हम भी वहींपे जा रहें है.. आप को वहीं पे मिलेंगे.
मी : ....
पोलीस अधिकारी : चलो चाय नाश्ता करते है.
मी : नही नही सर.. जाना है हमे.
पोलीस अधिकारी : जाओगे जी.. क्या जल्दी है.

असे बराच वेळ संभाषण सुरू राहिले आणि नंतर आंम्ही भगतसिंगसाबच्या समाधीकडे मत्था टेकण्यासाठी कूच केले.

तेथे वेगळाच माहोल.. सुरूवातीला सगळ्या हुसैनीवाला बॉर्डरचे अंतर दाखवणार्‍या पाट्या दिसत होत्या आणि नंतर नंतर समाधीच्या पाट्या दिसू लागल्या.

.

यथावकाश रस्ता चुकत चुकत समाधीपाशी पोहोचलो, हुसैनीवाला बॉर्डर आणि समाधी अगदीच शेजारी शेजारी आहे.

समाधीचा रस्ता.

.
.
.

तेथे गेल्यावर आणखी एक गोष्ट लक्षात आली, तेथे एकत्रच अनेक वेगवेगळी स्मारके होती. त्यातच भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्मारक होते.

पुढील प्रवास फोटोमधून करूया..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

हुसैनीवाला बॉर्डरला पाकिस्तानने अनेकवेळा उपद्रव दिला आहे. त्यामुळे येथे प्रत्येक युद्धाचे एक असे स्मारक उभे केले होते.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कैसर ए हिंद टॉवर - हा टॉवर पाडण्याचे प्रयत्न प्रत्येक युद्धात झालेले आहेत आणि वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांना तोंड देऊन आजही हा टॉवर उभा आहे.

.
.
.

रणगाड्याच्या तोफगोळ्यांनी पडलेली भगदाडे..

.

थोडे जवळून..

.

या टॉवरमध्ये त्या वेळचे रेल्वे रूळही जपून ठेवले आहेत.

.

तेथेच भगतसिंह यांच्या मातोश्रींचीही समाधी होती.

.
.
.
.
आणखी एक स्मारक..

.
.
.

भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे स्मारक..

.

स्वागत

.
.
.
.
.
.
.

येथे अचानक यशवंतराव चव्हाणांचे नांव वाचून सुखद धक्का बसला.

.
.
.
.
तेथेच बटुकेश्वर दत्त यांचीही समाधी होती.

.

या स्मारकाचे आवार एकदम प्रशस्त होते. पूर्वी आणखी चांगल्या अवस्थेत असावे असे अनेक पुरावे जागोजागी दिसत होते.

.
.
.

या तिघांपुढे खरोखरीच डोके टेकवून बाहेर पडलो.

हुसैनीवाला बॉर्डर या स्मारकाच्या शेजारीच आहे.

.
.
या कमानीच्या मागे दिसत आहे तो पाकिस्तान..

.

तोपर्यंत फिरोझपूरमध्ये भेटलेले पोलीस अधिकारी भेटले. पुन्हा गप्पा झाल्या.

नंतर आंम्ही तेथून निघालो. आता लक्ष्य होते हनुमानगढ किंवा जमले तर आणखी पुढे.

जेवणाची वेळ झाली होती म्हणून विजय एका पोलीसालाच रस्ता विचारताना..

.

(या साहेबांनी एकदम डीट्टेल पत्ता सांगितला. आगे गांव है वहाँपे मंदिरके बाद दो धाबे है.. वहाँपे पहला साफ और दुसरा धाबा गंदासा दिखेगा.. लेकिन वही अच्छा खाना खिलाता है.)

त्या धाबेवाल्याने खरोखरीच चांगले जेवण बनवले होते.

नंतर राजस्थानातील गरम हवेतून प्रवास सुरू झाला. अगदीच असह्य झाले की एखादा पेट्रोल पंप बघायचा, गार पाणी डोक्यावर ओतून घ्यायचे. जॅकेट, हेल्मेट, ग्लोव्हज अगदी बुट आणि मोजेही गार पाण्याने भिजवायचे आणि प्रवास सुरू ठेवायचा असे सुरू होते.
..आम्ही एका पंपावर असेच भिजून बाहेर पडलो आणि धूळ + मातीच्या वादळात सापडलो. जोडीला नंतर प्रचंड पाऊस.
त्यामुळे आजचा मुक्काम हनुमानगडलाच केला.

*************************************
दुसर्‍या दिवशी बाहेर पडून पुन्हा प्रवास सुरू केला.

राजस्थानातल्या खेड्याखेड्यांमध्ये खूप मजा येत होती, कुठेही थांबल्यावर भर्रकन लोकं गोळा व्हायची, आमच्या जॅकेटच्या आर्मर्सची हात लावून तपासणी होत होती आणि "गरम नहीं होता क्या..?" असा हमखास प्रश्न विचारला जात होता.

.

राजस्थानातच कुठेतरी..

.

या दिवशी हनुमानगढ ते उदयपूर असा ७०० किमीचा पल्ला गाठला.

*************************************

आजचा प्रवासाचा शेवटचा दिवस.. आज मुंबई आणि शक्य झाले तर पुणे असा प्लॅन होता. आंम्ही सकाळी लवकर बाहेर पडलो. थोड्याच वेळात गुजरातमध्ये प्रवेश केला.

वाटेत अचानक हा माईलस्टोन दिसला म्हणून मी आजुबाजूला कोणी नाही याची खात्री केली व धूमधाम हसत गाडी वळवून परत गेलो.

.

.

वडोदरा, सुरत, वापी एका लयीत मागे पडले.. मुंबईच्या ट्रॅफिकमधूनही बाहेर पडलो. सकाळी राजस्थानात सुरूवात केल्यापासूनही आजिबात न लागलेले ट्रॅफिक मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेला लागले. तेथे अर्धा पाऊणतास गेला.

यथावकाश पुण्याला पोहोचलो..!!

.

एक स्वप्नवत प्रवास पूर्ण झाला होता. कोठेही न धडपडता सुखरूप घरी पोहोचलो होतो.

आत्तापर्यंतचे सर्वाधिक अंतर आज कापले होते. आज न थांबता एका दिवसात ९५० किमी अंतर कापले होते. इतके अंतर सलग कापूनही कोणताही त्रास झाला नाही. गाडीसुद्धा व्यवस्थित होती. :)

या प्रवासाने खूप गोष्टी शिकवल्या.. खूप लोकांना भेटलो. खूप भटकलो.. हिमालयाची पहिली भेट 'कधीच विसरली जाणार नाही' अशी झक्कास झाली.

भेटू परत.. अशाच एखाद्या प्रवासानंतर..!

.

(समाप्त)

****************

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे विशेष आभार.
व्यनीतून वेळोवेळी चौकशी करणार्‍या आणि प्रोत्साहन देणार्‍या मित्रांचेही आभार्स..!!

****************

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

20 Apr 2017 - 9:06 pm | राघवेंद्र

मोदक भाऊ मस्तच !!!
शेवटचा भाग हि मस्त. एकाच भागात पंजाब , राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र ची सफर केली.

पुढील ट्रिप ला शुभेच्छा !!!

दशानन's picture

20 Apr 2017 - 9:11 pm | दशानन

शाब्बास रे गड्या!!!!

पद्मावति's picture

20 Apr 2017 - 9:12 pm | पद्मावति

अप्रतिम सफर. समारोपही सजेसा.

देशपांडेमामा's picture

20 Apr 2017 - 9:50 pm | देशपांडेमामा

सुंदर लिहिले आहे मोदक भाऊ !!

लस्सीचा फेसाळलेला ग्लास बघून वारलो आहे !

देश

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2017 - 10:27 pm | बोका-ए-आझम

सर्व शहीदांना _/\_

प्रीत-मोहर's picture

20 Apr 2017 - 10:36 pm | प्रीत-मोहर

सुरेख. पंजाब मधे माझाही असाच अनुभव होता. ५ पैकी फक्त एक दिवस होटेल /ढाब्यात खाल्लं. एक दिवस गुरुद्वारातला लंगर प्रसाद. बाकी वेळेला लोकांनी हात धरधरून घरी नेऊन पोट भरेस्तो खाऊ पिऊचे लाड केलेत. मोठे दिलदार लोक!!

तुमचे पंजाब प्रवास वर्णन एके ठिकाणी वाचले आहे.. तेथील अनुभवांवर आणखी लिहा..!

शेवटच्या २ दिवसात १७००किमी एवढ अंतर पार केलं..नमन __/\__

स्थितप्रज्ञ's picture

21 Apr 2017 - 9:27 am | स्थितप्रज्ञ

अप्रतिम! पंजाबाबद्दल खूप ऐकले आहे...आता जायलाच पाहिजे.

नि३सोलपुरकर's picture

21 Apr 2017 - 10:27 am | नि३सोलपुरकर

१७००किमी दोन दिवसात ..बाब्बो ,
मोदक राव _/\_

लेखातला सगळ्यात पहिला फोटो आवडला.
तुम्ही राजगुरू- सुखदेव- भगतसिंगांच्या स्मारकास भेट दिली हे फार भारी वाटले.
आणि ते दोन्ही माईल स्टोन तर कहर म्हणायचे.

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Apr 2017 - 1:27 pm | लॉरी टांगटूंगकर

लैच भारी..

चित्रगुप्त's picture

21 Apr 2017 - 4:07 pm | चित्रगुप्त

धन्य हो प्रदक्षिणा मोदकरायांची. आमुचा त्रिवार मुजरा.

बाबा योगिराज's picture

22 Apr 2017 - 12:53 pm | बाबा योगिराज

जबरदस्त अनुभव कथन. भारी फोटो. पण, दोन दिवसात इतके मोठे अंतर पार करने, ह्ये काही पटले नाही बघा. एका दिवसात ३०० किमी खुप झाले. प्रवासाची मजा घेत-घेत प्रवास केला पाहिजे.
पुढिल प्रवासासाठी शुभेच्छा.

बाबा योगिराज.

अभिजीत अवलिया's picture

22 Apr 2017 - 1:45 pm | अभिजीत अवलिया

मस्त झाली ट्रिप

खटपट्या's picture

22 Apr 2017 - 11:23 pm | खटपट्या

वा खूप छाब

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2017 - 6:17 am | पिलीयन रायडर

अरे काय माईलस्टोन आहेत!!! नॉर्थ पोल?!!

मस्तच रे!!

पाटीलभाऊ's picture

26 Apr 2017 - 3:15 pm | पाटीलभाऊ

अप्रतिम लेखमाला मोदकराव _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 May 2017 - 4:39 pm | राजेंद्र मेहेंदळे

बर्‍याच दिवसांनी मिपावर आलो आणि सरळ हाच भाग वाचला. आता पुर्वीचे सगळे भाग वाचुन काढतो. प्रवास एकदम खासच. परिभ्रमणे कळे कौतुक!!!

बरखा's picture

22 May 2017 - 3:07 pm | बरखा

लेह लडाख म्हणल की मी लगेच माहीती गोळा करते. एकदा या ठिकाणी भेट द्यायची आहे. तुमची लेखमाला वाचली. खुप छान वर्णन आहे. फक्त फोटो अजिबात दिसले नाहीत. त्या मुळे जरा वाईट वाटल. तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे फोटो दिसतील अशी व्यवस्था करा.

बाबा पाटील's picture

31 Oct 2017 - 4:11 pm | बाबा पाटील

देवा फोटो नाही दिसत

पाटील साहेब, लदाख स्वारी काय आता..?