( चाल : रेशमाच्या रेघांनी )
रेशमच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे, माझा काढिला..
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ध्रु ||
चुक झालि माझी, लाखमोलाची ..
विचारंल मि, ही पोरं कोणाची, गं कोनाची
विसरंल आहे कोण, आहे कोण जोडिला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| १ ||
जात होति वाटेनं ती तोर्यात...
अवचीत आला बाप म्होर्यात, गं म्होर्यात
आणी माझ्या नरडीला, धरुनिया ओढीला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| २ ||
भीड नाही केली, आल्यागेल्याची....
मागितली माफी मी त्या मेल्याची, गं मेल्याचि
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ३ ||
(सदर विडंबनाच्या लेखकाचे नाव माहीती नसल्यामुळे त्याचा ऊल्लेख येथे केलेला नाही. कुनाला कल्पना असल्यास त्याबद्द्ल खुलासा करावा हि विनंति)
.............अभिजीत मोटे.
प्रतिक्रिया
19 Sep 2008 - 7:35 pm | धनंजय
लोककला अशीच विकसित होत जाते. कवीचे नाव विसरले गेले, आणि काव्य "सर्वांचीच" झाली, तेव्हा कवीचे खरे यश. पण तरी केशवाला काही सुमार शल्य वाटेलच - नामोनिशाण पैकी नाम गेले, फक्त निशाण राहिले.
20 Sep 2008 - 2:24 am | चतुरंग
(सदर विडंबनाच्या लेखकाचे नाव माहीती नसल्यामुळे त्याचा ऊल्लेख येथे केलेला नाही. कुनाला कल्पना असल्यास त्याबद्द्ल खुलासा करावा हि विनंति)
का नाव माहीती असल्यामुळे उल्लेख केलेला नाही!!
http://www.misalpav.com/node/72
ह्या उपरोल्लेखित 'धाग्या-दोर्या'बद्दल तुझे काही मत आहे? ;)
चतुरंग
22 Sep 2008 - 2:23 pm | अभिजीत मोटे
सदर धागा मी सभासद होण्यापूर्विचा असल्यामुळे कदाचित माझ्या वाचनात आला नसावा. मी जर तो धागा पाहीला असता तर हा नवीन धागा सुरुच केला नसता. सदर ऊत्तम काव्याबद्दल केशवसुमारांचे हार्दिक अभिनंदन. नकळत झालेल्या चुकीबद्द्ल क्शमस्व!....
कळावे लोभ असावा..
..............................अभिजीत मोटे.