प्रथम आमच्या परमस्नेही विसोबा खेचरांचे आणि समस्त मिसळपाव पंचायतिचे हे संकेत स्थळ चालू केल्याबद्दल मनापासुन आभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..
आम्ही सभासद व्हायच्या आधीच आमच्या नावांने इथे शिमगा चालू असलेला बघून आम्ही धन्य झालो..असो..
सध्या जालावर आम्हाला फारसा चांगला कच्चा माल मिळत नसल्यामुळे आमची गोची झाली आहे..म्हणून वेळ काढायला .. जालावर मराठी गाणी ऐकत होतो . तेव्हा शांताबाई शेळक्यांचे रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी हे सुरेख गाणे ऐकायला मिळाले आणि आम्हाला ते 'प्रसव' का काय म्हणतात त्या वेदना सुरू झाल्या
जित्याची खोड मेल्याशिवाय कशी जाणार
रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाबा म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
38327
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवचित आला बाबा म्होऱ्यात :)
सहमत / सावधगिरी
In reply to अवचित आला बाबा म्होऱ्यात :) by विसोबा खेचर
केशवसुमारांची बॉडी बेताची?
In reply to अवचित आला बाबा म्होऱ्यात :) by विसोबा खेचर
नजर नगा लावू माझ्या बॉडीला
In reply to केशवसुमारांची बॉडी बेताची? by सन्जोप राव
:))
In reply to नजर नगा लावू माझ्या बॉडीला by केशवसुमार
तात्काल प्रसव
In reply to नजर नगा लावू माझ्या बॉडीला by केशवसुमार
शंभर !!!
In reply to तात्काल प्रसव by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
धमाकेदार सुरुवात !
वा
मस्त
स्वागत
स्वासुगम्मत!
हेच
In reply to स्वासुगम्मत! by विसुनाना
फरमास
मी म्हणतो
फर्मास!
रेशमाच्या
हहलोपो!
फर्मास
माझ्या माहितीप्रमाणे नाही
In reply to फर्मास by धनंजय
आडनावबंधू
In reply to फर्मास by धनंजय
च्यामारी..
In reply to आडनावबंधू by बेसनलाडू
संशोधन
In reply to च्यामारी.. by केशवसुमार
पांढरा शर्ट
In reply to फर्मास by धनंजय
आधुनिक एकनाथ?
एकनाथ की एकलव्य?
In reply to आधुनिक एकनाथ? by प्रमोद देव
एकनाथच!
In reply to एकनाथ की एकलव्य? by विसोबा खेचर
एकनाथच बरा, एकलव्य नको
In reply to एकनाथ की एकलव्य? by विसोबा खेचर
गौप्यस्फोट
In reply to आधुनिक एकनाथ? by प्रमोद देव
बोर्डातील विद्यार्थी
In reply to गौप्यस्फोट by सहज
घोळ..
In reply to आधुनिक एकनाथ? by प्रमोद देव
वरील कविता
या वरून आठवले...
मस्तच
वाहवा
reshmacha baap......laei danger.....!
असेच एक
ऐला काय खत्रा विडंबन!!
असे असावे
मस्तच आहे हे
@हात नगा लावू माझ्या बॉडीला !
सध्या हे "केशवसुमार" कुठे आहेत?
अप्रतिम...कोणीतरी यावर व्हिडो