खुरटी झुडपं

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 11:21 pm

एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो.

त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा. अन झाडपाल्याची समृद्ध जमीन.

मी चालत गेलो अनवाणी त्या पवित्र भूमीवरुन. तुडवल्या रानवाटा अन बेमालूम सुखाचा हिशोब मांडला. या धवल धुक्यातून जाता जाता तृप्तीच्या स्मशानात जाण्याची आस लागून राहिली.

त्या सुपीक पठारावर शेवटी एक झोपडं दिसलंच. एवढ्या उन्हाचं तिष्ठत बसलेलं. गावकुसाच्या बाहेर. दूरवर. एकलंच. गर्द झाडीत भिताडाच्या भेगाभेगात जिव्हाळा घेऊन लपलेलं.

"ओंजळभर पाणी दे गं माय " म्हणत पडवीत बसलो. झोळी बाजूला ठेवली अन अगदीच थकून गेलो.
आतून एक तलम वस्त्रातली स्त्री बाहेर आली. थंडगार पाण्याची बाटली हातात ठेवून जराशीच हसली. अन "आज लवकर आलास?" म्हणत आत निघून गेली.
फ्रिजमधले ते थंडगार पाणी जरा जास्तच थंड होते. घोटभर पिऊन बाटली टेबलावर ठेवली. शूज काढून टिव्ही ऑन केला. बाथरुमध्ये जाऊन शॉवर घेतला. मग प्रसन्न मनाने गॅलरीत जाऊन दूरवर पसरत गेलेल्या झोपडपट्ट्या बघत सिगारेट पेटवली.

"आज भाजीला काय करु रे? भरीत करू तुझं आवडतं? की पनीर मसाला? की आपलं नेहमीचंच, पावभाजी?" तिनं आतून विचारलं.
"चालेल काहीही !" एव्हाना मी उड्डाणपुलावरच्या वाहनांची लखलखती येजा निरखत होतो.
कंटाळा आल्यावर आत आलो. सोफ्यावर बसून रिमोटच्या बटनांशी खेळत बसलो. एकही चॅनल बघण्यासारखा वाटत नव्हता. मग उठून लॅपटॉप उघडला अन प्रोजेक्ट वर्क करत बसलो.

तिनं जेवायला हाक दिली. आज तिनं दुधखीर केली होती. तुप टाकून. अन सोबतीला भरलं वांगं. तिची बडबड चालूच होती. सिरीयलच्याच गप्पा त्या. नेहमीच्याच. त्या ऐकत सुग्रास जेवलो.
पाटपीट करत पुन्हा गॅलरीत गेलो अन परत येऊन बेडवर पुस्तक चाळत पडलो. सिंकमध्ये भांडी टाकून तीही आली.
"आज पाऊस पडणार बहुतेक" लाईट ऑफ करत बेडवर पडली.
"हु" करत मी पुस्तक बाजूला ठेऊन दिले.
डोळ्यावर झापड आली.
पाऊस?
साला पाऊसही कधीकधी बुचकळ्यात टाकतो. रात्रीचा येतो अन काळाखोत मिसळून जातो. सुट्या सुट्या पारंब्यात जीव ओलाचिंब होतो.

काळ्याभोर अंधाराला हुलकावणी देत त्यादिवशी पाऊस आलाच. जगदंबेच्या पायऱ्या विसळून गावशिवारात गेला. आडोश्याच्या पाखरांना भिजवत जरा वेळ विसावला. चिखलझडीतून वाट काढत मग छपरावर येऊन कोसळला.
मग भिताडावरुन ओघळत राहिला. रातभर.

"सोबराबायचं खळं कसलं झिंबाट झालयं वो " झापडं उघडून बाहेर डोकावत ती म्हणाली. अन उघड्यावरच्या पाऊसधारा बघत मी आतल्या आत गारठून गेलो.

कथाप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

25 Apr 2016 - 11:29 pm | कविता१९७८

भारी, डोळ्यातले भाव जसे क्षणार्धात बदलावेत अशी कलाटणी दिलीये कथेला, मस्तच

रातराणी's picture

26 Apr 2016 - 12:17 am | रातराणी

पुस्तकाच मनावर घ्या. सुंदर लिहिताय!

अर्धवटराव's picture

26 Apr 2016 - 4:24 am | अर्धवटराव

हे नेमकं काय आहे?

स्पा's picture

26 Apr 2016 - 7:32 am | स्पा

काही कळेल काय?

DEADPOOL's picture

26 Apr 2016 - 8:03 am | DEADPOOL

मस्त!

एस's picture

26 Apr 2016 - 8:24 am | एस

अफाट!!!

किसन शिंदे's picture

26 Apr 2016 - 8:29 am | किसन शिंदे

वाचता वाचता मध्येच आईंग झालं. माय कि ..?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Apr 2016 - 8:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सालं तुमच्यात लिहिण्याची ताकद आहे, तुम्ही लिहिलं पाहिजे.

-दिलीप बिरुटे

क्रेझी's picture

26 Apr 2016 - 8:46 am | क्रेझी

काहीच कळालं नाही :(

विजय पुरोहित's picture

26 Apr 2016 - 9:54 am | विजय पुरोहित

क्लासच लिहिलंय!!!
विशेषतः तो जेव्हा भणंग भटक्या अवस्थेतून एकदम स्वतःच्या मालकीच्या फ्लॅट्मध्ये येतो तेव्हां एक्दम एखाद्या चित्रपटात विज्युअल इफेक्ट पहावेत तसे वर्णन केलेले आहेत.

चांदणे संदीप's picture

26 Apr 2016 - 11:02 am | चांदणे संदीप

कहर!

जव्हेरभाऊ....ओन्ली ___/\___ घ्या!

Sandy

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2016 - 11:06 am | पिलीयन रायडर

समजलं आणि समजलं नाही पण..

पण मला जे समजलय तेच तुम्हाला सांगायचं असेल तर हे भारी लिहीलय!

जव्हेरगंज's picture

27 Apr 2016 - 6:32 pm | जव्हेरगंज

तुम्हाला जे समजलं ते सांगा तरी.

:)

नाखु's picture

26 Apr 2016 - 12:39 pm | नाखु

मिश्र धारा !!!!

आणि तपशिलाबद्दल काय बोलायचं अगदी बेस्तवार..

अपरिचित मी's picture

26 Apr 2016 - 12:43 pm | अपरिचित मी

तुमची लेखन शैलीच मुळी जबर आहे !!

तर्राट जोकर's picture

26 Apr 2016 - 12:46 pm | तर्राट जोकर

कधी कधी वाटतं जसा अकबराच्या राज्यात फक्त तानसेनला गाण्याचा अधिकार होता तसं मिपावर फक्त जव्हेरगंज यांना लिहिण्याचा अधिकार असावा? _/\_

बाबा योगीराज's picture

26 Apr 2016 - 12:49 pm | बाबा योगीराज

एकदा पुण्याला कट्टा करावाच लागलं.
जरा पाऊस पडून गेल्यावरच नियोजन करावं म्हणतोय.

प्रा. डॉ., येणार का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2016 - 11:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला परवडत नै ते...
आपलाच बरा दोघांचा कट्टा.

पहिला पाऊस पडला की विद्यापीठ लेणीत जाऊ या.

-दिलीप बिरुटे

कुठलीतरी इन्शुरन्सची जाहीरात होती. एकदम १८० डिग्रीजमध्ये समोरचा सीन बदलतो फिरत्या रंगमंचाप्रमाणे. ती आठवली.
जव्हेरभौंचे प्रयोग जोरात चालुयेत मात्र. आवडलेले आहेत. थोडी जळजळही झालेली आहे ;)

जव्हेरभौ काय जबरदस्त लिहीलय राव. थोड समजल अस वाटतय पण बरच काही सुटुन गेलय किंवा जे समजलय ते शब्दात मांडता येत नैये. पण तरीही पुन्हा पुन्हा वाचु वाटतय. जि.ए, च्या कथांसारख होतय राव तुमचं लेखन.

अवांतर : समजा जव्हेरभौचे लिखाण बी.ए. वगैरेला सिल्याबस म्हणुन लावल तर पोरांची वाट लागलं राव समजून घेता घेता.

मराठी कथालेखक's picture

26 Apr 2016 - 6:14 pm | मराठी कथालेखक

कथेला split personality disorder झाला का ? :)

तुमची भाषा वाचायला खूप वेगळी, छान वाटते. एक विनंती - लेखातल्या वेगळ्या शब्दांचे अर्थ लेखाच्या शेवटी द्याल का (या लेखातले सगळे शब्द कळले (असं वाटतंय :प ) )

प्रमोद देर्देकर's picture

27 Apr 2016 - 11:06 am | प्रमोद देर्देकर

काहीच नाही कळलं हो जव्हेरभावु. पण जर बाकी सगळेजण समजलं असं म्हणतायत तर सालं मिपावर वावरायची पण लायकी नाही याची जाणीव आज झाली.

लोल, माझे पण असेच झालमझ, काही न समजणारी पेंटिंग करोडोत विकली जातात तसे काहीसे फिलिंग आलय
ज्यांना समजली त्यांना माझा लाल सलाम !!!!

मराठी कथालेखक's picture

27 Apr 2016 - 7:03 pm | मराठी कथालेखक

काही न समजणारी पेंटिंग करोडोत विकली जातात

घरी जावून निवांत बघत बसू , मग कधीतरी समजेलच असा विचार करुन बहूधा विकत घेत असावेत.
मी पण ३०-४० रुपये खर्चुन र्युबिक क्युब विकत घेणार आहे, कारण दुसर्‍याच्या क्युबवर प्रयत्न करुन कळालंय की मला तो अजून सोडवता येत नाही...सहजच सोडवता आला तर का घेईन विकत ?

शित्रेउमेश's picture

28 Apr 2016 - 9:45 am | शित्रेउमेश

कसले भन्नाट ट्विस्ट आहेत राव.....

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2016 - 10:00 am | प्रमोद देर्देकर

मकले तुम्ही क्युबची बरोबरी कथेशी का करताय ? कारण तुम्हीच म्हणताय त्याप्रमाणे सोडवता येत नाही तो पर्यंत तुम्ही ते सोडवत बसाल हो आयुष्यभर, पण मग आम्ही म्हणजे ज्यांना समजलेली नाही त्यांनी ही कथा काय रोज रोज वाचत बसायची का की कधीतरी समजेल.

पण मला एक कळंत नाही की आपलं लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असं सगळ्यांना वाटंत. मग यातल्या काही जणांना समजले नाही तर आता तरी ते कशा संबंधी लिखाण आहे , काय लिहलंय हे लेखकाने किंवा ज्यांना ते समजलंय त्यांनी उलगडुन सांगायला नको का? एवढं तरी सौजंन्य दाखवावं . जेणे करुन पुढिल लेखनाला अजुन जास्त प्रतिसाद मिळतील. असो.

मराठी कथालेखक's picture

28 Apr 2016 - 11:51 am | मराठी कथालेखक

असं बघा की तुम्हाला कथा कळली नाही म्हणून तुम्ही सगळे प्रतिसाद नीट वाचत आहात.
तुम्ही स्वतः दोन वेळा प्रतिसाद लिहलात. आणि किती वेळा धागा उघडलात ? नक्कीच दोनपेक्षा जास्त वेळा , बरोबर ?
त्याउलट कथा तुम्हाला सहजच कळाली असती तर एक वेळ आवडली असती किंवा आवडली नसती. आवडली नसती तर "जमली नाही" वगैरे प्रतिसाद देवुन पुन्हा फिरकला नसताच. आवडली तरी "आवडली/मस्त आहे" इतकच , पण पुन्हा फारसे फिरकला नसताच.
आता कथेवरचे प्रतिसाद बघा ..एकही नकारात्मक प्रतिसाद नाही (की एक आहे ?:) ). काहि "समजली नाही" म्हणणार्‍या प्रतिक्रिया आहेत, म्हणजे या पामरांनी स्वतःकडे कमीपणा घेतला आहे.
बाकी प्रतिक्रिया "काय भारी ट्विस्ट" वाल्या , म्हणजे पामरांना अजूनच खजील करणार्‍या :)

तुषार काळभोर's picture

28 Apr 2016 - 10:13 am | तुषार काळभोर

तुम्हीच सांगा.

रोजच्या नोकरी/व्यवसायाच्या दगदगीचं वर्णन पहिल्या भागात.
मग संध्याकाळी घरी आल्यावरचं वर्णन दुसर्‍या भागात.
तिसरा भाग (शेवटचा पॅरा कळला नाही असं वाटतंय.) बहुतेक मागे सोडून आलेल्या गावच्या संदर्भात असावं.

नीलमोहर's picture

28 Apr 2016 - 10:22 am | नीलमोहर

छान..

मानसी१'s picture

28 Apr 2016 - 5:18 pm | मानसी१

अजीबात कळलं नाही.