आकाश-जमीन

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
15 Sep 2008 - 10:43 am

ज्याचं त्याचं आकाश असतं
ज्याच्या त्याच्या माथ्यावर.
आकाश... निळंभोर
गुलाबी,जांभळ्या, नारिंगी, पिवळ्या
रंगानी रंगतं.
भुलवत....खुणावतं
कवेत आलसं वाटतं, कित्तेकदा
पण कवटाळायला जावं
तर , दूर्...दूर जातं
परस्थ होऊन राहतं
त्याला स्पर्श करण्यासाठी
उडया माराव्या उंच...उंच...
ते अधिकच उंचावतं
खिजवतं
वाकुल्या दाखवतं

त्या प्रत्तेक क्षणी
पायतळीची मातकट जमीन
मात्र
पायाला बिलगून असते.
बेछूट, बेताल पावलांना
आधार देते. सावरुन धरते

ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते.
ज्याची त्याची जमीन एक वास्तव.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

15 Sep 2008 - 11:48 am | दत्ता काळे

ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते.
ज्याची त्याची जमीन एक वास्तव.

फारच सुंदर . . . .

एकदम

काढ सखे गळ्यातले तुझे चांदण्यांचे हा त
क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत

आठवली

मनीषा's picture

15 Sep 2008 - 12:04 pm | मनीषा

सुंदर !!!

विसोबा खेचर's picture

15 Sep 2008 - 3:44 pm | विसोबा खेचर

सुरेख कविता....!

धनंजय's picture

16 Sep 2008 - 3:47 am | धनंजय

सुरेख

मुक्तसुनीत's picture

16 Sep 2008 - 4:11 am | मुक्तसुनीत

कविता आवडली. गुलजार यांच्या अनेक प्रतिमांची आठवण जागी झाली. कवितेत व्यक्त झालेल्या शब्दांची बरोब्बर उलटापालट करून लिहीलेल्या जुन्या हिंदी ओळी आठवतात :
"जमीं तो छूट जाती है.
थोडासा आसमां गुनगुना लेता हूं"