आकाश-जमीन
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
ज्याचं त्याचं आकाश असतं
ज्याच्या त्याच्या माथ्यावर.
आकाश... निळंभोर
गुलाबी,जांभळ्या, नारिंगी, पिवळ्या
रंगानी रंगतं.
भुलवत....खुणावतं
कवेत आलसं वाटतं, कित्तेकदा
पण कवटाळायला जावं
तर , दूर्...दूर जातं
परस्थ होऊन राहतं
त्याला स्पर्श करण्यासाठी
उडया माराव्या उंच...उंच...
ते अधिकच उंचावतं
खिजवतं
वाकुल्या दाखवतं
त्या प्रत्तेक क्षणी
पायतळीची मातकट जमीन
मात्र
पायाला बिलगून असते.
बेछूट, बेताल पावलांना
आधार देते. सावरुन धरते
ज्याचं त्याचं आकाश एक कल्पना असते.
ज्याची त्याची जमीन एक वास्तव.
वाचन
2212
प्रतिक्रिया
0