रामा मेघ दे.......प्रत्यक्ष प्रयोग

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Feb 2016 - 6:28 am

मागील दुवा http://www.misalpav.com/node/34751

संदेश गायकवाडच्या उत्तम दिग्दर्शनाने बहरलेल्या, चंदर पाटीलच्या अस्सल हजरजबाबी विनोदी अभिनयाने रंगलेल्या, नामांतर कांबळे , श्रीकांत हांडे कल्पना कदम, श्रुती चव्हाण या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजवलेल्या , लोक संगीताने नटलेल्या अशा माझ्या "रामा मेघ दे " या विनोदी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ................
नेहमी लक्षात राहील अशी एक आनंदी, हास्य विनोदाने बहरलेली संध्याकाळ साजरी करण्यासाठी

एक मिपाकर म्हणून मी तुम्हा सर्वाना आमंत्रीत करतोय.
आपला
विजुभाऊ ( चकोर शाह)

आज शुक्रवार. सोमवारी नाटकाचा प्रयोगाचा दिवस .आज रंगीत तालीम. दामोदर हॉलतुकड्या तुकड्यात केलेली तालीम आज एकसंध प्रयोग म्हणून दिसणार होता. सगळ्यांचे कॉस्च्यूम्स , प्रॉपर्टी , नेपथ्य सगळे गोळा झाले होते. कोण कुठून कधी एन्ट्री घेणार हे प्रत्येकाला समजावून दिले. यशवन्त नाट्यमम्दीराच्या टेरेसवर केलेल्या तालमीत कधीतरी खुर्च्या , ब्यागा मांडून, खडूने आखून नेपथ्याची कल्पना करत होतो ते नेपथ्य आज प्रत्यक्ष मांडले जाणार होते. आत्ता पर्यन्त केवळ कागदावर असलेली प्रकाश योजना सुनील मेस्त्री प्रत्यक्ष दाखवणार होएत. कधी कोणत्या प्रसंगी कोणता स्पॉट येईल कधी अम्धार येईल उजेड कधी होईल हे सगळे त्यानी वेगळ्या स्क्रीपटवर मार्क केले होते.
संगीत वाजवणारा त्याचे स्क्रीप्ट घेवून तयार होता.
ज्यांचा मेकअप/ कपडे नाटक चालू असताना बदलणार होता त्यांची वेगळीच धावपळ चाललेली होती.
दुपारचे पाच वाजताहेत. संदेश आणि नामांतर सर्वात अगोदर आलेले आहेत. शैलेश त्यांच्या पाठोपाठ.
गोसावी सरांची हार्मोनियम स्कूटरवर घालून मी आणि चंदर माहीमच्या ट्रॅफिक मधे अडकलोय्. एक एक कलाकार थिएटरवर पोहोचल्याचे अपडेट्स मोबाईलवर ऐकतोय्.खरं तर दुपारी इतका ट्रॅफिक नसतो पण काय करणार आपल्या वेळेस असेच व्हायचे. पण त्यातून प्रयोगाच्या दिवशी काय करायला हवे याचा अंदाज येतोय.
कसेबसे साडेसहाला दामोदरहॉल च्या दारात. सगळेजण आलेले. हार नारळ पूजेचे साहित्य हे ऐनवेळेचे साहित्य आले. सेट लावायला सुरवात केली. सेट लावणे ,मेक अप करणे ,सगळे कसे घड्याळ लावून करताहेत. सगळ्यांच्या एन्ट्री चा क्रम प्रत्येक कलाकाराच्या हातात. कलाकारच एकमेकांसाठी बॅकस्टेज सपोर्ट करताहेत.
ढोलकी वाले अजून पोहोचलेले नाहीत. बस ने येतोय. अजून सायनला आहे असा फोन येतोय. ट्रॅफिक तुंबलेले आहे. गेले अर्धा तास एकाच जागेवर उभे आहोत. यायला वेळ लागेल.
सेट लावून झालाय. लाईट्स लागलेले आहेत.
ढोलकीवाल्यांची वाट पहाण्यावाचून पर्याय नाही. जय मुंबई ट्रॅफिक......
आम्ही ढोलकीशिवाय सुरवात करायचे ठरवतो. सगळ्या पात्रानी जागा घेतलेल्या. पडदा वर जातो. गणेश वंदनेने संदेश सुरवात करतो. एकेक प्रसंग घडत रहातात. नाटक पुढे सरकत रहाते.कुठेतरी हवा असलेला नेहमीचा उत्स्फूर्तपणा येत नाहिय्ये ही जाणीव प्रत्येकालाच अस्वस्थ करत असते.
कुठे चुकतेय ते समजत नाही. प्रत्येकजण टेन्शन मधे आहे. सगळे कसे व्यवस्थीत आखून दिल्यासारखे होतेय नामांतर. चंदर, संदेश , शैलेश सगळे बरोबर करताहेत्.पण.... हा पण खटकतोय. श्रुतीची एन्ट्री होते. शाळकरी मुलगी म्हणून श्रुती स्टेजवर आली . तिच्या पंचलाईनमुळे गाडी जागेवर आली नाही. विनोदी नाटक करतोय की सिरीयस तेच कळत नव्हते. पहिला अंक संपला. ढोलकीवाले आत्ताशा कुठे पोहोचताहेत.
त्यानी ढोलकी लावायला घेतली. काळी दोन ला ढोलकी खट्ट लागली. आणि ढोलकीवर थाप पडू लागली.
टां टां टां टां टां टां टा धिग धिग धागीन धा तिरकिट धागीन धा धिग धिग धागीन धा तिरकिट धागीन धा करत पहिला तोडा वाजला आणि जादू झाली. दुसरा अंक सरू झालाय. आत्ता पर्यन्त हरवलेला उत्सफूर्त पण आम्हाला सापडलाय. एका ढोलकीच्या थापेने तिळा उघड चा मंत्र आम्हाला दिला. एखादे वाद्य काय जादू करते हा अनूभव आम्ही घेतोय.
रात्रीचे साडेबारा वाजले. आम्ही घरी पाम्गलो. प्रॉपर्टी मधे काय कमी होते काय हवे आहे याच्या नोंदी करून घेतल्या. अजून तिकिटे हातात आलेली नव्हती. उद्या सकाळपर्यत लोकसत्ता मधे जहीरात येईल त्याच्या अगोदर तिजिटे यायला हवीत.
आज रवीवार जहिरात वर्तमान पत्रात आलेली . सगळेजण एकमेकाना फोन करतोय. उद्याच्या प्रयोगाला कोणाकोणाला बोलवायचे त्याचे फोन जाताहेत.
आज प्रयोग. आमची खरीखुरी परीक्षा. साडीसहा वाजता सगळे थेटरवर. ढोलकीवाली आज सर्वात अगोदर.
सात वाजता स्टेज हातात मिळाले. पालेकारांच्या लोकानी स्टेज लावायला सुरवात केली. सुनील मेस्त्री नी लाईट्स चा ताबा घेतला. स्पीकर माईक सगळे टेस्ट झाले. मी बॅकस्टेज आणि बुकिंग ऑफिस या मध्ये येरझार्‍या घालतोय.
लोक यायला लागले. सात पन्नास पर्यन्त अर्ध्या पेक्षा जास्त थिएटर भरले.
पहिली घंटा झाली, दुसरी झाली, तिसरी घंटा झाली आनि पडदा उघडला. गणेश वंदना झाली. स्टेजवर संदेश प्रेक्षकांशी संवाद करायला लागला. आता चंदरची एन्ट्री. त्याच्या दोन वाक्या नंतर आम्हाला आजच्या प्रयोगात काय घडेल याची चुणूक दिसणार होती. चंदरने ते वाक्य घेतले आणि आम्हाला हवा तो रीस्पॉन आला. याचा पुढचे दोन तास आमची टीम झकास ब्याटिंग करणार याचीच ती नांदी होती.
कल्पना मॅडमचा प्रसंग सुरु झाला . गवळणीचे सुरवातीचे बोल त्यानी म्हंटले आणि त्या पाठोपाठ म्यूझीकच्या प्रवाहावर प्रिया पंडीत ने एन्ट्री घेतली. इतकी बहारदार गवळण. प्रेक्षकानी खुशीची पावती दिली.
नाटकाचा एकेक प्रसंग येवू लागला. चंदरच्या वाक्याना हवी तशी दाद मिळत होती. अपेक्षीत वाक्याना दाद मिळतच होती पण चंदर आणि नामांतर च्या प्रसंगाना तर शिट्ट्या सुद्धा मिळाल्या.
आम्ही सगळे एका वेगळ्याच उर्जेने भारावून गेलो होतो. दोन महिने कसून केलेल्या तालमीला दाद मिळत होती.
"उपोषणाने पाऊस पाडणार का?" या श्रुतीच्या वाक्याने पहिला अंक संपला.
ग्रीन रूम मधे कोणीच एकमेकांशी बोलत नव्हते.कोणाला काय हवे चहा/पाणी यांची लगबग सुरु झाली. मात्र सगळे कलाकार वेगळ्याच ट्रान्स मधे होते.
मध्यंतर संपल्याची घंटा झाली. पुढच्या प्रसंगात गुलाबराव झालेल्या श्रीकांतची, आमोद मुलाखत घेतोय. आत्ता पर्यन्त तालमीत या प्रसंगाला प्रेक्षकांचा या प्रसंगाला इतका छप्परफाड रीस्पॉन येईल हे आम्ही इंमॅजीन सुद्धा केले नव्हते. हशा आणि टाळ्यांच्या गजरात हा प्रसंग संपला. आता लावणी. ढोलकी ऐवजी ऑक्टोपॅड वापरायच्या माझ्या हट्टावर बरेचजणानी कॉमेम्ट्स केलेल्या. पण लावणी नृत्य करणारी प्रिया पंडीत त्या ठेक्यावर खुश होती . आमचा हट्ट योग्य्/अयोग्य याचा फैसला आत्ता होणार होता. लावणीचा तोडा वाजला, तुणतुण्याचे बोल ऐकायला आले. प्रेक्षकातुन एक कचकचीत शिट्टी ऐकू आली आणि लावणी सुरु झाली. टाळ्या आणि हशानी प्रेक्षागृह दणाणून गेले.
एक वर्ल्ड कप जिंकल्याची आम्हाला जाणीव होत होती.
आता नाटकातील सिरीयस प्रसंग सुरु होत होते. आत्ता पर्यन्तच्या विनोदी प्रसंगाना दिलखुलास हशा आणि टाळ्या देणारा प्रेक्षक या प्रसंगाना कसे रीअ‍ॅक्ट करतोय याची धाकधूक होतीच. हवे तशा रीअ‍ॅक्षन्स मिळत होत्या. नाटकातील शेवटचा सीन आत्ता पर्यन्तच्या प्रवासावर पूर्णविराम देणारा. नाटकाचे भरवाक्य अधोरीखीत करणारा.
शैलेश , आमोद , नामांतर्,श्रीकांत गणेश त्यांच्या एकेक वाक्याना अपेक्षीत दाद मिळव्त होते. शैलेषच्या राज ठाकरे आणि त्या पाठोपाठच्या म्यूझीकच्या पीस ला प्रेक्षकानी प्रचंड उचलून धरले.
संदेशच्या वाक्याने गाणे सुरू झाले . प्रेक्षक आता आमच्याशी जणू तादात्म्य पावले होते. ते उभे राहून टाळ्या देत होते. पडदा पडला. पडद्याच्या एका बाजुला प्रेक्षक जल्लोश करत होते. आणि दुसर्‍या बाजूला कलाकार. एकेमेकाना मिठ्या मारत आनंद. नाटकात तीन वर्षांच्यादीर्घ गॅप नंतर येणार्‍या कल्पना कदमांच्या डोळ्यात पाणी होते.
सगळेच जण भारावून गेलो होतो. चंदर , संदेश, नामांतर, शैलेश श्रीकान्त आमोद , विक्रम , श्रुती चव्हाण , गणेश, प्रिया पंडीत.सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणि प्रत्येकजण नि:शब्द. एका वेगळ्या विश्वात होतो.
पाठीवर एक खणखणीत थाप पडली.आणि मी भानावर आलो.ग्रीनरूम मधे मित्रांची गर्दी उसळली होती.
कुणीतरी संदेशला उचलून घेतले होते.
दोन महिन्यांच्या आमच्या मेहनीतेचे फळ आता मिळाले. कलाकारानी लेखकावर दाखवलेल्या विश्वासाचे फळ मिळाले.
शेकहँड, पाठीवर थाप , दंडाला हात लावून ,वेल डन म्हणत लोक आमच्या प्रयोगाला दाद देत होते.
प्रेक्षक घरी गेले. प्रेक्षागृह रीकामे झाले. आमच्या मनात मात्र ते अजून भरलेलेच होते.
गेली एकशे वीस मिनिटे ते जसे होते तसेच गच्च भरलेले, कलाकारांच्या संवादावर हसणारे टाळ्यांची दाद देणारे ते जिवंत प्रेक्षागृह आमच्या मनात कायमचे रहाणार आहे.
आज घरी गेल्या वर कुणालाच झोप येणार नाही हे नक्की. प्रत्येकजण आजचे नाटक मनात पुन्हा जागवणार आहे.
आमचा हा खजीना कधीच रीता होणार नाही. पुढच्या प्रयोगाना सुद्धा असाच अनुभव येत रहणार हे ही नक्की.
मायबाप रसिकहो....... दिलखुलास दाद देणार्‍या तुम्हा सर्वाना "रामा मेघ दे" च्या टीमचा सलाम.

कलाप्रतिसाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Feb 2016 - 6:35 am | यशोधरा

मस्त, आवडले. :)

जयंत कुलकर्णी's picture

15 Feb 2016 - 7:32 am | जयंत कुलकर्णी

नाटकाची झिंग म्हणजे काय ते तुमच्या लेखांतून पुरेपूर समजते. नाटवेड्या लोकांची बाबच काही और ! अभिनंदन...

बोका-ए-आझम's picture

15 Feb 2016 - 8:09 am | बोका-ए-आझम

मस्तच!

उगा काहितरीच's picture

15 Feb 2016 - 8:36 am | उगा काहितरीच

अभिनंदन ! पुण्यात करा प्रयोग .

सौंदाळा's picture

15 Feb 2016 - 10:52 am | सौंदाळा

मस्तच विजुभाऊ
कोणताही अभिनिवेश नसलेले वर्णन
पुढील प्रयोगांना शुभेच्छा.
मुंबईबाहेर दौरे करणार आहात का?

नाखु's picture

15 Feb 2016 - 11:55 am | नाखु

तंतोतंत

पुण्यात प्रयोग कधी ??

एस's picture

15 Feb 2016 - 12:13 pm | एस

येणार! येणार! पुण्यातल्या प्रयोगाला येणार.

भारी.. एकदम भारी विजुभौ.

असेच खूप रंग भरत राहूदेत.. शुभेच्छा.

पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा !

राही's picture

15 Feb 2016 - 1:04 pm | राही

पहिला अंक जरा लांबला. शब्दबंबाळ वाटला. शिवाय मंचावर बहुतेक वेळा दोनच पात्रे असायची. अर्थात वग हा फॉर्म निवडल्यामुळे सूत्रधार-पेंद्या किंवा अशीच जोडी जास्तकाळ मंचावर राहाणे अपरिहार्य होते. त्यामुळे एकसुरीपणा येऊ लागला होता. दुसर्‍या अंकात चित्र बदलले. प्रेक्षकांत कॉलेजविद्यार्थी वाटतील अशांची संख्या जास्त होती. कदाचित ते संबंधितही असावेत अशी शंका येत होती. नाट्यगृहाच्या एका कोपर्‍यातून जोरदार आणि संघटित प्रतिसाद येत होते. संहिता चांगली होती आणि संवादांमध्ये देशावरची भाषा चांगली पकडली होती. लावणी छान झाली. प्रेक्षकांना ठेका आवडत होता. काही कारणाने शेवटापर्यंत थांबता आले नाही.
प्रयोग सादर करायचा म्हणजे कितीतरी अवधाने असतात, अनेक बाजू सांभाळाव्या लागतात. संगीत, प्रकाशयोजना, कॉस्चूम्स, प्रॉप्स, अनेक गोष्टी. इतक्या लोकांचा मेळ बसवणे आणखीनच कठिण. हौशी लोकांच्या हौस आणि जिद्दीवरच इतके सगळे होऊ शकते. आपल्या मेहनतीला सलाम आणि भविष्यासाठी शुभेच्छा.

विजुभाऊ's picture

15 Feb 2016 - 4:12 pm | विजुभाऊ

धन्यवाद राहीजी.

विजुभाऊ's picture

15 Feb 2016 - 4:13 pm | विजुभाऊ

राहीजी तुमच्या सूचनां सर आखोंपर....\
आम्हाला नक्कीच सुधारणा करता येतील

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Feb 2016 - 5:35 pm | llपुण्याचे पेशवेll

प्रयोगाबद्दल माहीती छान.
लेख वाचल्यावर असे वाटले की एकूणच मराठी नाटकवाल्यांना मराठी शब्दांचे वावडेच दिसते.

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 1:27 am | स्वाती दिनेश

नाटकाच्या पहिल्या प्रयोगापर्यंतची घालमेल छान मांडली आहेत. रमा मेघ दे.. साठी खूप शुभेच्छा!
स्वाती

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 1:28 am | स्वाती दिनेश

साठी खूप शुभेच्छा असे वाचावे.
स्वाती

पैसा's picture

16 Feb 2016 - 11:17 am | पैसा

झकास वृत्तांत! नाटक असेच चालू दे!!! बघायचा योग कधी येतो पाहू!