प्रवाह

आर्यचाणक्य's picture
आर्यचाणक्य in जे न देखे रवी...
11 Sep 2008 - 7:47 pm

किनाऱ्यावर कोरडे बसण्यापेक्षा
मी जेव्हा आठवणींच्या डोहात बुडी मारली...
तेव्हा मलाच माहीत नव्हते मी काय शोधायचा प्रयत्न करतोय?

कधी निस्तब्ध ओंडक्यासारखा लाटेवरती पहुडलो
तर कधी वाळके पान होऊन भोवऱ्यामध्ये गुरफटलो
कधी मोती वेचले तर कधी शिंपले शोधले
कधी निसटणारी वाळू हातात घेतली
तर कधी चिखलाने बोटे बरबटली
पण तरीही मला कळले नाही की मी काय शोधतोय?

दमून भागून शेवटी जेव्हा किनाऱ्याला लागलो
आणि तट्स्थ नजरेने पुन्हा डोहाकडे पाहीले ....
तेव्हा दिसले की खोल, गूढ अश्या त्या डोहामधूनच उगम पावलाय एक सोनेरी प्रवाह...
जो जातोय दूर, दूर... क्षितीजापर्यंत
मी स्वत:ला बेशक झोकून दिले त्या प्रवाहात...

आता मला उमगलंय
मला फक्त वहात रहायचयं, पुढे पुढे जात रहायचयं

कविताप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

11 Sep 2008 - 7:51 pm | प्राजु

विचार प्रवाह आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

आनंदयात्री's picture

12 Sep 2008 - 9:29 am | आनंदयात्री

छान जमलिये कविता.
सोनेरी प्रवाहाची कल्पना पण मस्त.

आर्यचाणक्य's picture

12 Sep 2008 - 12:59 pm | आर्यचाणक्य

प्राजु, आनंदयात्री.... धन्यवाद
नविन असुनही प्रतिकिर्या मिळाली हे बघून आनंद झाला