ऋतू प्रेमाचा 1

मयुरMK's picture
मयुरMK in जनातलं, मनातलं
28 Dec 2015 - 3:03 pm

ऋतूमागुनी ऋतू येतो; ऋतूमागुनी ऋतू जातो. ठराविक कावाधीनंतर ऋतुकाळ हा बदलत आसतोच; पण आपल्या जीवनात आसाही एक ऋतू आहे ; जो कधीही बदलत नाही, तो कधीही संपत नाही. तो ऋतू म्हणजेच प्रेमाचा ऋतू .'सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था ,आज भी हे और कल भी रहेगा, असे जे म्हटले आहे ; ते चुकीचे नाही. या सृष्टीच्या उत्पतीपासून प्रेम आहेच आहे , असे म्हणन्यापेक्षा या प्रेमभावनेतूनच सृष्टीची उत्पती झाली आहे , असे म्हणणे योग्य होईल .

मानवाला जगण्यासाठी जितकी हवेची गरज आहे; तितकीच गरज त्याला प्रेमाचीही आहे. मानवी मनाची सर्वात मोठी तहान जर कोणती असेल तर ती म्हणजे केवळ प्रेम. एखाद्यावर प्रेम करणे आणि कोणाचे तरी प्रेम प्राप्त करणे याशिवाय मानवी जीवनाला पूर्णत्व येताच नाही. प्रेम द्यावे ;प्रेम घ्यावे ;प्रेम बोलावे ;प्रेम एकवे ;प्रेमात अवघे प्रेमचि व्हावे, असे मानवी मनाला सतत वाटत आसते. हे सर्व जरी खरे असले तरी प्रेम म्हणजे काय , प्रेमाची व्याख्या काय, हे पाहनेही महत्वाचे आहे . प्रेम हे पाण्यासारखे आहे . पाण्यात जो रंग मिसळाल ; त्या रंगाशी पाणी एकरूप होते . आपले मूळचे रूप हरवून पाणी त्या रंगत रंगून जाते . मानवी जीवनातही प्रेम हे अनेक रूपे धारण करून प्रकटत आसते .प्रत्येक वेळी प्रेमाचे आपणास जाणवणारे रूप हे आपल्यासाठी अवर्णनीय आसते . अगदी गर्भात जीव अंकुरल्यापासून प्रेमभावनेशी आपण बांधले जातो ; ते आपल्या जीवनाच्या अंतानंतरही आपण त्या बंधनातून सुटू शकत नाही अशा या पवित्र परमभावनेला आज जे काहीशा संकुचित नजरेतून पाहिले जात आहे, प्रेमाला आजच्या काहीशा चुकीच्या विचारसरणीमुळे ओंगळवाणे रूप येऊ पाहत आहे. परमपवित्र आशी हि प्रेमभावना बदनाम होत आहे. प्रेम करताना आजकाल युवक शारीरिक सौंदर्यास प्राधान्य देतात; तर युवती सांपतीक स्थितीला प्राधान्य देतात. या दोन्ही गोष्टी चिरकाल टिकणार्या नाहीत. जोपर्यंत या गोष्टी एकमेकाकडे आहेत तोपर्यंत प्रेमाचा खेळ बहरत आसतो . जसजसे या गोष्टी कमी-कमी होत जातात; तसतसे प्रेमाचा बहर ओसरत जातो निष्पर्ण वृक्षाची साथ सोडून जसे पक्षी नव्या वृक्षाचा आसरा शोधतात; तसे आजकालचे प्रेमिक आपला प्रेमरूपी आधार गरजेनुसार बदलत असतात.
मैत्रीचा पहिला अंक संपून प्रेमाचा दुसरा अंक सूर होतो . प्रेमाचा प्रवास तर सूर झाला , आत्ता पुढे काय ? प्रेम झाले म्हणजे नेमके काय , याबाबत बरेच जन अज्ञान असतात. केवळ एकमेकांच्या संगतीत वेळ घालविणे, एकमेकांच्या सुख -दुखाविषयी चर्चा करणे, चोरून स्पर्शसुख अनुभुवने म्हणजेच प्रेम आस भ्रम अनेकांचा झाला आहे. ते म्हणजे दूरचित्रवाणीवरील विविध मालिका,चित्रपट,साहित्य वा प्रसिद्धीमाध्यमातून दाखवले जाणारे प्रेमाचे स्वरूप; पण हे पूर्णत: अवास्तव व अपूर्ण असते. यातूनच प्रेमाविषयी बरेच गैरसमजही पसरले आहेत. प्रेम म्हणंजेच विवाह, प्रेम म्हणजेच शरीरसंबध असे काहीसे सांगितले जाते; जे सर्वथा चुकीचे आहे .
क्रमश :-

राहणीविचार

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

28 Dec 2015 - 5:42 pm | DEADPOOL

mast

विश्वव्यापी's picture

28 Dec 2015 - 7:38 pm | विश्वव्यापी

लेख छान आहे.
2रा भाग कधी येतोय?

उद्या टाकेन २ रा भाग
धन्यवाद