या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
12 Dec 2015 - 12:05 pm

मला
बाबा आमटेंच्या 'आनंदवनात',
अभय बंगाच्या 'मेळघाटात',
कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात',
पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत,
जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे,
दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये,
वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे,
अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात,
चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे,
'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे,
'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे,
साहेबाच्या देशातल्या 221B 'बेकर स्ट्रीट' मधे,

सरते शेवटी गणपतीमधे बेभान होणाऱ्या,
आणि
सलग 63 वर्षे होऊनही तितक्याच रसिकतेने 'सवाई' ला भरभरून दाद देत गर्दी करणाऱ्या
गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात हरवायचं आहे.

बस इतनासा ख्वाब है !!!

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????

जीवनमानप्रवासदेशांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

12 Dec 2015 - 12:48 pm | तुषार काळभोर

त्यामुळे "गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात" उआ शब्दांचा कड्डक णिषेढ!
(उद्याच्या ऐवजी आजच कुंजीरवाडीच्या 'स्नेहल'मध्ये चुलीवरची मटनभाकरी फिक्स!)

महासंग्राम's picture

12 Dec 2015 - 12:58 pm | महासंग्राम

सेम हियर राव , त्यामुळे नुकसाण भरपाई म्हणून संध्याकाळी 'सवाई' मध्ये 'उकडीचे मोदक' चापणार आहे ….

मोदक प्रेमी मंदार

पप्पुपेजर's picture

12 Dec 2015 - 2:49 pm | पप्पुपेजर

क्युबा !!!!!

यशश्री-हर्श's picture

15 Dec 2015 - 6:37 pm | यशश्री-हर्श

इटली आणि पास्ता...

यशश्री-हर्श's picture

15 Dec 2015 - 6:37 pm | यशश्री-हर्श

इटली आणि पास्ता...

.....पुण्यात हरवायचं आहे.

केवळ साखरभात खाल्ला म्हणून...पुण्यात काय वाट्टेल ते होवू शकते...असे कुणीतरी लिहून गेले आहे....

तस्मात अशा पुण्यात हरवण्यापेक्षा, आम्ही नागपुरी संत्री आणि वडाभात खाऊन मग वाळ्याचे तट्टे लावलेल्या बेडरूम मध्ये मस्त कूलर लावून झोपू किंवा गोव्यात जावून बांगड्याची आमटी आणि भात खाऊन राहू.

यशोधरा's picture

15 Dec 2015 - 8:57 pm | यशोधरा

हिमालयात.

हे माझं डिफॉल्ट सेटिंग आहे.

महासंग्राम's picture

16 Dec 2015 - 9:40 am | महासंग्राम

हेहेहेहे आवडेश

शब्दानुज's picture

16 Dec 2015 - 8:57 am | शब्दानुज

आम्हाला कोणाच्या तरी डोळ्यात स्वता:ला हरवायचे आहे..मित्रांच्या मिठीत हरवायचे आहे...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Dec 2015 - 12:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नेत्राशी मयतरी क्रा.

सुमीत भातखंडे's picture

16 Dec 2015 - 9:51 am | सुमीत भातखंडे

मिपा वाचनात,
भीमसेनजी, वसंतराव, कुमारजी, बाल गंधर्वांच्या गाण्यात,
गीत रामायणात,
अत्रे, पु.ल. यांच्या लेखनात आणि भाषणात,
नारायण धारपांच्या गूढ लेखन विश्वात,
बाबा महाराज सातारकर यांच्या हरीपाठात आणि आफळे बुवांच्या कीर्तनात,
हिचकॉक आणि बिली वाईल्डरच्या सिनेमात
.
.
.
.

महासंग्राम's picture

17 Dec 2015 - 9:43 am | महासंग्राम

कालच बिली वाईल्डरचा 'द अपार्टमेंट' पहिला, सुपर्ब मूवी आहे हो तो आणि Shirley MacLaine - काय सुंदर दिसते अहहः प्रेमात पडाव अशी कलाकुसर घडविली आहे विधात्याने….

भरगच्च भरलेल्या,
कोलाहलाने तट्ट्लेल्या,
कोयत्याने नटलेल्या
....
....
....
मासळी बाजारात!!!!!

यशोधरा's picture

16 Dec 2015 - 7:29 pm | यशोधरा

वा! वा!

महासंग्राम's picture

17 Dec 2015 - 9:39 am | महासंग्राम

हेहेहे हे सौंदर्य आहे कि भीती ….

विशाल कुलकर्णी's picture

16 Dec 2015 - 12:57 pm | विशाल कुलकर्णी

एशियाटिक लायब्ररी किंवा ब्रिटिश कौन्सिलची कुठलीही लायब्ररी चालेल. फ़क्त कुणीही शोधायला येता कामा नये एवढी एकमेव अट आहे.

जव्हेरगंज's picture

16 Dec 2015 - 8:38 pm | जव्हेरगंज

दूर कुठेतरी डोंगर ऊतारावर गच्च हिरवळीतल्या झोपडीत....!

संदीप डांगे's picture

16 Dec 2015 - 10:53 pm | संदीप डांगे

इफ यु नो व्हाट आय मीन..;-)

जव्हेरगंज's picture

17 Dec 2015 - 11:45 am | जव्हेरगंज

खिक्क!!

तसं काही नाही हो!!

शुचि's picture

16 Dec 2015 - 9:26 pm | शुचि

आईच्या कुशीत.

पुस्तकांच्या भिंती असणाऱ्या पुस्तकांच्या घरात!

सौन्दर्य's picture

17 Dec 2015 - 9:23 am | सौन्दर्य

झाडा-झुडूपानी भरलेल्या एखाद्या घनदाट जंगलात.

प्रचेतस's picture

17 Dec 2015 - 9:30 am | प्रचेतस

रतनवाडीत.

महासंग्राम's picture

17 Dec 2015 - 11:23 am | महासंग्राम

कधी जाणारेत ते सांगा ???? मी नक्की येईन, जमाना झाला रतनवाडीत जाउन ….

प्रचेतस's picture

17 Dec 2015 - 12:27 pm | प्रचेतस

बहुतेक जानेवारी किंवा फेब्रुवारी. सांधणचा प्लान आहे.

महासंग्राम's picture

17 Dec 2015 - 12:29 pm | महासंग्राम

नक्की सांगा …. मी येईन

नाखु's picture

17 Dec 2015 - 12:34 pm | नाखु

न नेता प्लॅन केला तर बुवांकडे तुमची तक्रार करू..

नोंद घेणे

(तरकारी) प्रतीसाद मात्र नाखु

प्रचेतस's picture

17 Dec 2015 - 12:37 pm | प्रचेतस

बुवा तुमच्या तक्रारीला प्रतिसाद देणार नाहीत. त्यांचे सध्या फुलपाखरी दिवस चालू आहेत म्हणे.

नाखु's picture

17 Dec 2015 - 1:00 pm | नाखु

आम्च्या बाजूने तक्रार करू, दखल घेणे न घेणे ,अंमलबजावणी ही सारी बाप्पाची (आकाशातल्या) ईच्छा असे आम्च्या निदर्शनास आले आहे , ताज्या घटनांवरून...

प्रतिसाद मात्र

नाखु वाटपहाणे

कपिलमुनी's picture

17 Dec 2015 - 3:17 pm | कपिलमुनी

:)

स्वच्छंदी_मनोज's picture

17 Dec 2015 - 4:38 pm | स्वच्छंदी_मनोज

जायच्या आधी नक्की सांग रे. यायचा नक्कीच प्रयत्न करीन. सांधण करून साम्रदवरून त्रंबकदरवाज्याने गडावर जाऊ आणी रतनवाडीत उतरू.
मी जोडून एखादी घाटवाट पण करून टाकीन. एक दोन ऑफबीट घाटवाटा राहिल्यात ह्या एरीयातल्या :)

प्रचेतस's picture

17 Dec 2015 - 7:31 pm | प्रचेतस

नक्कीच.
मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय.
मला वाटते खिंडीतली दुसऱ्या बाजूस उतरणारी वाट साम्रदला जाते.

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Jan 2016 - 6:26 pm | स्वच्छंदी_मनोज

मी साम्रदमार्गे कधी गडावर गेलो नाही पण त्र्यंबक दरवाजातून उतरून खुट्टा आणि सुळका ह्यांच्या मधील खिंडीतून रतनवाडीत उतरलोय. >>>> करेक्ट. त्र्यंबकदरवाजा उतरून खुट्टा सुळक्याच्या पायथ्याशी आले की दो वाटा आहेत. उजवीकडची वाट पुर्ण वळसा घालून रतनवाडीत उतरते आणी थोडी डावीकडे जाणारी वाट समोरच्या डोंगराच्या डावीकडून साम्रद गावात उतरते.
आम्ही कोकणातल्या डेणे-वोरपड गावातून करवली (करोली) घाट चढून साम्रद मार्गे रतनगडावर गेलो होतो. तेव्हा साम्रद सांधण व्हॅली पेक्षा रतनगडाचा बेस, करोलीचा टॉपचे गाव, घाटघर ला जाण्यासाठी एस्टीचा लास्ट स्टॉप अश्या कारणांसाठीच माहीत होते. अतीशय साधे गांव होते. ना हॉटेल, ना टपरी, ना अजून काही. आता सांधण व्हॅली प्रसिद्ध झाल्या पासून गावात आणी गावाचा बाजार झालाय अक्षरशः :(

२०१० साली पहिल्यांदा सांधणला गेलो होतो आणि त्याच्या दोनेक वर्ष आधी रतनगडला. भंडारदरा ते रतनवाडी रस्ता जवळपास सम्पूर्ण कच्चा होता. ह्या ३/४ वर्षात मात्र अमृतेश्वरासकट सगळ्याचे बाजारीकरण होते आहे.

मृत्युन्जय's picture

17 Dec 2015 - 11:20 am | मृत्युन्जय

आपली माणसे असतील असे कुठलेही ठिकाण. ओम जय जगदीश नावाच्या अतिशय भिक्कार चित्रपटात एक सुंदर वाक्य आहे " जहा पर मेरे तीनो बेटे खडे हो जाये वही मेरा घर है". आपली माणसे असतील तोच स्वर्ग.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Dec 2015 - 1:04 pm | कैलासवासी सोन्याबापु

टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर स्वतःच्या नावचे एक २४ आऱ्यांचे अशोकचक्र लावलेले पहायच्या आधी सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे,

जिवंतपणे हरवायचे असल्यास अदृश्य होऊन अकादमी मधे हरवायला आवडेल, परत एकदा क्रिस्प चाल अन चखोट हेअरकट मधल्या पोरांत घुटमळायला आवडेल मला :)

नॉर्मल इच्छा विचारली तर लद्दाख मधे हरवायला आवडेल किंवा त्याहुन जास्त स्कॉटलंड अपर हाइलैंड भागात स्कॉच नामे अमृताचे घोट घेत आवडीच्या विषयाचा व्यासंग करण्यात घालवणे आवडेल :)

महासंग्राम's picture

17 Dec 2015 - 1:52 pm | महासंग्राम

सियाचीन मधे मस्त प्रॉपर छातीवर गोळी घेऊन हिमालय बाबांच्या कुशीत हरवायचे आहे, असं नका बोलू बाप्पा अजून लई देशसेवा बाकी हायी कि तुमची उगा अस बोलू नै

पैसा's picture

17 Dec 2015 - 3:09 pm | पैसा

अरे नको असं बोलू! :( घुसखोरांना पकडत नाहीतर मारत व्यवस्थित रिटायर हो, घरी येऊन पुन्हा गाय बैल बाळग आणि शंभर वर्षे जग.

कैलासवासी सोन्याबापु's picture

17 Dec 2015 - 3:14 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो ग ताय! असेच होणार कारण मी तितकासा लकी नाही!मुद्दा हा की आमची तयारी आहे! स्वतःहून कोण जाणार दाढ़ेत ? पण जावे लागले(च) तर हसत हसत जाईन इतकेच

सतिश गावडे's picture

17 Dec 2015 - 1:16 pm | सतिश गावडे

ख़्वाब अच्छे है !!

१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने भरलेल्या जंगलात(पण ते जंगल सुरक्षित हवे बर का :-) ) , जिथे खाऊन - पिउन आणि फक्त फिरण्यात हरवायचे आहे
२. बर्फाच्या डोंगरात हरवायचे आहे
३. काचेसारख्या स्वच्छ पाण्यात, रंगबेरंगी माश्यामाधेय हरवायचे आहे

आनंदराव's picture

18 Dec 2015 - 2:18 pm | आनंदराव

जिलब्यांच्या राशीत
चिंचेच्या आंबट गोड पाण्याच्या टबात
आंबे खात स्वताच्या आमराईत
काळ मागे नेता आला तर शिवाजी महाराजांच्या काळात
वगैरे वगैरे...

सूड's picture

8 Jan 2016 - 6:48 pm | सूड

पाण्यात, विहीर सिनेमातल्यासारखं!! आता आहे म्हणता म्हणता आता गायब!! :)

विवेकपटाईत's picture

8 Jan 2016 - 7:31 pm | विवेकपटाईत

परांठा वाल्या गल्लीत आता मोजून ३-४ दुकाने उरली आहे. चव हि आता पूर्वी सारखी (३० वर्षांपूर्वी सारखी) नाही. आजची मुले अंतर्जालावर हरवलेली आहेत.