लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
9 Sep 2008 - 12:23 pm
गाभा: 

आज सकाळी इजाभौंनी माझ्या ज्ञानात भर पाडली, ती ही इथे पहा. आणि वर मला म्हणाले की यावर थोडं जास्त लिही. म्हणून जरा घाईघाईत चार शब्द खरडत आहे. घाई अशासाठी की जर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर जर उद्या सुरू झालो आणि "तेज" बातम्यांप्रमाणे जर आपण सगळे मेलो तर कळलं पाहिजे ना आपल्याला कसे मेलो ते! (हे पण इजाभौंचेच विचार.)

मी ही माहिती उचलली, माझ्या दोन मित्रांकडून आणि एक नेहेमीचा मित्र विकीपीडियाकडून. अधिक, परीपूर्ण माहीती तिथे आणि तिकडच्या लिंक्समधून मिळेलच. इंग्रजी वाचायचं नसेल तर हा लेख, अगदीच मोजक्या शब्दात!

तर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजे काय त्याआधी थोडक्यात हॅड्रॉन म्हणजे काय? अणूच्या केंद्रात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन्स असतात, ते एक प्रकारचे हॅड्रॉन्सच आहेत. पार्टीकल फिजिक्समधे वेगवेगळ्या प्रकारचे कण असतात, त्यात हॅड्रॉन्स, बोसॉन्स (शास्त्रज्ञ एस.एन. बोस यांच्या नावाने), लेप्टॉन्स, क्वार्क्स असे वेगवेगळे कण असतात. आणि त्यांचं एक स्टँडर्ड मॉडेल आहे त्यामुळे अनेक गोष्टी सिद्ध करता येतात. (काय ते मला माहीत नाही, हवं असेल तर वहीत किंवा निरोप पाठवून विचारा, वाचून सांगेन वेळ मिळाला की; सध्या उपरोल्लेखित कारणासाठी घाई आहे.) तर या प्रमाण मॉडेलमधे एक प्रकारचे बोसॉन्स आहेत, हिग्ज बोसॉन्स, त्यांचं अस्तित्व वर्तवण्यात आलं आहे. हे हिग्ज बोसॉन्स अजूनपर्यंत कोणीही "पाहिले" नाही आहेत, पण अनेक अप्रत्यक्ष पुराव्यांवरून त्यांचं अस्तित्व "दिसतं". या लार्ज हॅड्रॉन कोलायडर बनवण्यामागचं मुख्य कारण हे हिग्ज बोसॉन्स "बघणे".

या कोलाडरच्या आणि पुढे पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या मनात प्रश्न पैदा केले आहेत. या कोलायडरमधे अतीसूक्ष्म कृष्णविवरं तयार होतील, ती आकारानी वाढत जाऊन सगळ्या गोष्टी एका बिंदूत समाविष्ट होतील (आठवा, अद्वैत सिद्धांत, तसंच काहीसं) आणि अर्थातच आपण सगळे (शनी-मंगळ युती नसतानाही) मरून जाऊ. किंवा आपलं कृष्णविवराच्या आत होईल ते होईल. तर या सगळ्या अफवा आहेत. अशी काही अतीसूक्ष्म कृष्णविवरं तिथे तयार करणार/होणार नाही आहेत. (झाली तर खरोखर सगळी पृथ्वी, कदाचित सूर्यमंडळ एका बिंदूत समाविष्ट होईल.)

तर या कोलाडरबद्दल एक रॅप गाणं तयार केलं आहे; वरचा लेख वाचून (पुरेशी) करमणूक झाली नसेल ते गाणं ऐका:
http://www.youtube.com/watch?v=j50ZssEojtM

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

9 Sep 2008 - 12:30 pm | आनंदयात्री

>>या कोलाडरच्या आणि पुढे पृथ्वीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या मनात प्रश्न पैदा केले आहेत.

पटले. मराठीतुन माहितीबद्दल धन्यवाद.

सहज's picture

9 Sep 2008 - 12:48 pm | सहज

तू नळी वर शास्त्रज्ञ "काकू" यांची मुलाखत

मिपावर वेगवेगळ्या विषयावर वाचायला मिळायचा आनंद काही औरच!

अजुन काही दुवे

लार्ज हॅड्रॉन कोलायडर - हिग्ज च्या शोधात

भाग १

भाग २

भाग ३

चंबा मुतनाळ's picture

9 Sep 2008 - 1:40 pm | चंबा मुतनाळ

अकराव्या मितीतल्या 'काकूं'ची मते समजली.
परंतू आम्हि अजून तीन मितिंमध्येच अडकलोत

शिवा जमदाडे's picture

9 Sep 2008 - 12:36 pm | शिवा जमदाडे

थोडं कळलं, थोडं नाही.....

तुम्हाला वेळ मिळाला तर याबद्दल सविस्तर लिहावे. अजुन जाणून घ्यायला आवडेल.

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

मनीषा's picture

9 Sep 2008 - 12:43 pm | मनीषा

संकल्पनेबद्दल थोडक्यात पण माझ्या सारख्या (अज्ञानी ) वाचकांना कळेल अशा शब्दात दिलेल्या माहिती बद्दल आभार
तुम्हाला वेळ मिळाला तर याबद्दल सविस्तर लिहावे. अजुन जाणून घ्यायला आवडेल. हेच म्हणते ..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2008 - 12:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही लोकांनी तत्काल मला सविस्तर लिहायला सांगितलं आहे. मी काही या (खरंतर कोणत्याच) विषयातली तज्ञ नाही. पण वर लिहिल्याप्रमाणे "घाई" असल्यामुळे आत्ता झटपट लेख पाडला. संध्याकाळी (किंवा वाचलो आपण सगळे) तर एक-दोन दिवसात ते लार्ज हॅड्रॉन कोलायडर आणि बिग-बँगवर थोडं जास्त लिहेन. सध्या माझे बिग-बँगबद्दलचे थोडे विचार:
http://www.misalpav.com/node/3366#comment-47823

अवलिया's picture

9 Sep 2008 - 4:07 pm | अवलिया

संध्याकाळी (किंवा वाचलो आपण सगळे) तर एक-दोन दिवसात ते लार्ज हॅड्रॉन कोलायडर आणि बिग-बँगवर थोडं जास्त लिहेन

आपण वाचणारच आहेत हो...
तेव्हा तुम्हाला लेख लिहावाच लागेल. तयारीला लागा.
बाकी वरच्या लेखाबद्दल धन्यवाद.
बिगबैंग बद्दल तिथेच बोलु. काय?

सुनील's picture

9 Sep 2008 - 12:47 pm | सुनील

जर आपण सगळेच जगलो-वाचलो तर, गुरुवारी अधिक विस्तृत माहिती देणारा लेख लिहावा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला's picture

9 Sep 2008 - 12:49 pm | अनिल हटेला

बरचस डोक्यावरून गेल !!!

पण सारांश पॄथ्वी ला व पृथ्वी तलावरील प्राण्यांना काहीही धोका नाही , हे वाचुन आनंद झाला...

( अगदी गगनात मावेनासा झाला )

वेळ मिळालाच तर अधीक सोप्या भाषेत आणी विस्तॄत लिखाण करावे ...

म्हणजे माझ्या सारख्याना समजेन .....

(पॄथ्वीतलावरील निरूपद्रवी प्राणी )
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ऋचा's picture

9 Sep 2008 - 12:50 pm | ऋचा

अदिती
थोडं कळल्,बरच नाही कळालं
जे कळालं त्या बद्दल ते कळवल्या बद्दल धन्यवाद!!
जे नाही कळालं त्याची माहीती तुझ्याच कडुन घेइन :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

जैनाचं कार्ट's picture

9 Sep 2008 - 1:33 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हा प्रयोग तुम्ही थेट प्रेक्षपणाद्वारे येथे पाहू शकता - http://webcast.cern.ch/

ह्या प्रयोगासाठी भारताने देखील आर्थिक मदत केली आहे तसेच टाटा संशोधन संस्था, भाभा अणू संशोधन केंद्र, साहा इन्स्टिट्यूट आणि पंजाब विद्यापीठ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अजून रंजक माहीती हवी असेल तर तुनळी गुगलून पाहा ... ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

गेल्या महिन्याच्या सायंटिफिक अमेरिकन (इंडिया) च्या अंकात या विषयाबद्दल सविस्तर माहिती आली होती.
असो.

ज्यांना या प्रयोगाविषयी सर्वसामान्यांच्या इंग्रजी भाषेत समजण्याजोगी माहिती हवी असेल त्यांनी या दुव्यावर पहावे.

लिखाळ's picture

9 Sep 2008 - 3:50 pm | लिखाळ

थोडक्यात चांगली माहिती दिलीत. आताच सकाळमध्ये बातमी वाचून मिपवर दुवाद्यावा असे ठरवले आणि आपला लेख दिसला.
अजून सविस्तर वाचायला आवडेल.

सहज यांनी दिलेल्या दुव्यावरील काकू काकांचे बोलणे सुद्धा ऐकले.

उद्या असलो तर जास्त माहिती वाचीन.. नाहितर काय उपयोग !
-- लिखाळ.

मदनबाण's picture

9 Sep 2008 - 4:14 pm | मदनबाण

आता १० तारखेलाच समजेल .जगबुडी होते का न्ह्याय ते..
या विषयावर डिस्कव्हरी वाहिनी वर डोक्युमेंट्री पाहिल्याच आठवतय !!

(जगबुडीला टरकणारा..)
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

विकास's picture

9 Sep 2008 - 6:25 pm | विकास

काय मस्त दिवस आहे! संख्याशास्त्र वाले याच्यावरून (उगाचच) चर्चा करू शकतात :-) त्यात अमेरिकन लोकांच्या दृष्टीने ९११च्या जवळ... (९११ नुसती दहशतवादाची आठवण करून देत नाही तर तो "इमर्जन्सीचा" राष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आहे...)

बाकी या प्रयोगाबद्दल उत्सुकता नक्कीच आहे. त्यात कृष्णविवर होऊ शकेल असे ऐकल्यावर जरा पोटात गोळा आला पण जेंव्हा इ-सकाळ मधे या संदर्भात वाचले की, "ती निराधार असल्याचे "सर्न'च्या सुरक्षाविषयक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोगाच्या वेळी कृष्णविवर तयार होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे आणि ते झालेच तर आकाराने खूप लहान असेल..." - म्हणजेच शक्यता आहे, असा याचा अर्थ होतो... तेंव्हा अंमळ जास्तच गोळा आला. :S

ही सृष्टी कोणी निर्माण केली ते माहीत नाही, पण संपवायला शंकराच्या तिसर्‍या डोळ्याऐवजी माणूस स्वतः समर्थतर नाही ना असे वाटले... :?

तरी देखील सर्वकाही व्यवस्थित होईल अशी खात्री आहे. माझ्या कडून या प्रकल्पाला शुभेच्छा!

बाकी अजून तूनळी अथवा या संदर्भात अजून विशेष न वाचल्याने पडलेला एक प्रश्न: या प्रयोगाचे काही गर्भित फायदे आहेत का? म्हणजे अब्जावधी डॉलर्सचा उपयोग फक्त विश्वाची उत्पत्ती समजण्यासाठीच होणार आहे की त्या व्यतिरीक्त काही व्यावहारीक फायदे देखील त्यात आहेत? उ.दा. उर्जा निर्मितीचे नवीन तंत्र, वगैरे...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2008 - 8:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"सर्न'च्या सुरक्षाविषयक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या प्रयोगाच्या वेळी कृष्णविवर तयार होण्याची शक्‍यता खूपच कमी आहे आणि ते झालेच तर आकाराने खूप लहान असेल..."

बरोबर... हे मी पण विश्वासार्ह स्रोताकडून ऐकलं आणि पुढचं स्पष्टीकरण पण! आणि जर असं काही कृष्णविवर तयार झालं तरिही ते हॉकिंग रेडीएशन टाकून नष्ट पावेल असं गणित सांगतं.
त्यामुळे विकासराव खुशाल एंजॉय करा.

>> ही सृष्टी कोणी निर्माण केली ते माहीत नाही, पण संपवायला शंकराच्या तिसर्‍या डोळ्याऐवजी माणूस स्वतः समर्थतर नाही ना असे वाटले...
अणुबाँब टाकला तर मात्र हे नक्की होईल.

विकास's picture

9 Sep 2008 - 8:29 pm | विकास

त्यामुळे विकासराव खुशाल एंजॉय करा

करतोय करतोय!

बाकी माझ्या आधीच्या प्रतिसादात ह.घ्या. लिहीले नव्हते पण उद्देश तसाच होता :-)

लिखाळ's picture

9 Sep 2008 - 8:33 pm | लिखाळ

>>बरोबर... हे मी पण विश्वासार्ह स्रोताकडून ऐकलं आणि पुढचं स्पष्टीकरण पण! आणि जर असं काही कृष्णविवर तयार झालं तरिही ते हॉकिंग रेडीएशन टाकून नष्ट पावेल असं गणित सांगतं.<<
वर सहज यांनी जो काकू यांच्या मुलाखतीचा दुवा दिला आहे, त्यात काकू सुद्धा असेच म्हणतात.. अत्यंत लहान कृष्णविवरे एखाद्यावेळी होतील पण त्यांचा आवाका एखाद्या विजेच्या बल्ब येवढा सुद्ध नसेल.

हॉकिंग रेडिएशन काय असते?
कृष्णविवराची ताकद त्याच्या लहानमोठेपणात असते का?

-- (रामभक्त)लिखाळ :)

मेघना भुस्कुटे's picture

9 Sep 2008 - 8:19 pm | मेघना भुस्कुटे

जरा सविस्तर लिही. म्हणजे मग काहीतरी कळण्याच्या शक्यतेची शक्यता निर्माण होऊ शकेल. आत्ता 'कुणीतरी काहीतरी लपेटलंय आणि तसं काही होणार नाहीय' इतकंच कळलंय.

मनिष's picture

9 Sep 2008 - 8:48 pm | मनिष

जरा सविस्तर लिही. म्हणजे मग काहीतरी कळण्याच्या शक्यतेची शक्यता निर्माण होऊ शकेल. आत्ता 'कुणीतरी काहीतरी लपेटलंय आणि तसं काही होणार नाहीय' इतकंच कळलंय.

हेच म्हणतो!!

भाग्यश्री's picture

9 Sep 2008 - 9:23 pm | भाग्यश्री

असंच माझंही.. इतकंच कळलं! सविस्तर लिही अजुन..

प्राजु's picture

9 Sep 2008 - 8:48 pm | प्राजु

छान माहिती सांगितलीस. पण यातूनच थोडंसंच समजलं गं. जरा सविस्तर लिहिशील का??
बाय द वे ते रॅप साँग सह्ही आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राघव's picture

10 Sep 2008 - 3:51 pm | राघव

म्हणतो. नीट सविस्तर वाचायला मिळाले तर बरे होईल.

राहूल's picture

9 Sep 2008 - 9:17 pm | राहूल

चर्चेचा विषय जरी क्लिष्ठ असला तरी आकर्षक नक्कीच आहे. सैद्धांतिक भौतिकशास्त्र (theoretical physics) समजायला जरा कठिण आहे, पण एकदा जर त्याची आवड लागली तर "आपले जग खरोखर किती अद्भुत आहे" याची खात्री पटते.

लार्ज हॅड्रोन कोलायडर (LHC) बद्दल भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांचे काय मत आहे हे या लेखामध्ये दिले आहे. LHC मुळे अति-सूक्ष्म कृष्णविवरे तयार होण्याची शक्यता खूप कमी आहे (अंदाजे १%); पण जरी ती तयार झाली तरी क्षणिक असतील.
सारांश, LHC मुळे खालील महत्वाच्या गोष्टींबद्दल अधिक माहिती मिळू शकेल:
१. हिग्ज बोसोन्स (अथर्थात God particles)
२. डार्क मॅटर
३. स्ट्रींग थिअरीला अभिप्रेत असलेली 'एकादश मिती' (अथर्थात extra dimensions - बाप रे, भीती वाटली ना!)
४. अँटी-मॅटर
५. सुपर-सिमेट्री
(हे जर डोक्याच्या ४ इंच वरून गेले तर सोडून द्या; 'स्ट्रींग थिअरी'चे पुस्तक पहिल्यांदा वाचताना माझेही असेच झाले होते!)

स्टीफन हॉकिंग्ज यांनी सांगितल्याप्रमाणे, LHC चे व्यावहारीक फायदे (नजिकच्या काळात) होतील की नाही हे आत्तातरी सांगता येणार नाही. आजपर्यंतच्या इतिहासात 'विज्ञान' हे मुख्यतः विश्वाबद्दलचे ज्ञान जाणून घेण्याचे साधन म्हणून वापरले आहे; वैज्ञानिक शोध हे त्यानंतर तंत्रज्ञानातील क्रांती घडवतात आणि व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर ठरतात. सांगायचा मुद्दा हा की LHC हा मानवी उत्क्रांतीमधील एक खूप महत्वाचा प्रयोग मानावा लागेल.
काही उद्बोधक दुवे: LHC accelerator at CERN, CERN in 3 minutes, the elegant universe

--
The most incomprehensible thing about the world is that it is comprehensible - Einstein.

राघव's picture

10 Sep 2008 - 3:58 pm | राघव

माहितीबद्दल धन्यवाद.
पण येथे बरेच जण असे आहेत की ज्यांचा अभ्यासाचा विषय फिजिक्स नाहिये. त्यामुळे जरी सर्व शास्त्रीय भाषेतले दुवे उपलब्ध असलेत, तरी संदर्भांची विशेष माहिती नसल्यामुळे नीट गाभा समजत नाही.
जर तुम्हांस साध्या भाषेत जरा विस्तॄतपणे सांगणे शक्य असेल तर समजून घेण्यास सगळ्यांसच सोपे होईल.

मुमुक्षू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2008 - 7:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुमुक्षू, प्राजू, ऋचा आणि माझ्याकडून माहीती मागणारे सगळे + राहूल,

मला राहूलचा प्रतिसाद वाचून असं वाटतंय की माझ्यापेक्षा त्यांनाच या विषयातलं जास्त समजतं. तर मी त्यांनाच विनंती करते की त्यांनी जरा या विषयावर लिहावं.

अदिती

अवलिया's picture

10 Sep 2008 - 7:47 pm | अवलिया

सहमत आहे

राहुल यांना विनंती की त्यांनी यावर अधिक लिहावे

नाना

राहूल's picture

11 Sep 2008 - 1:13 am | राहूल

बर्‍याच लोकांना ह्या विषयामध्ये रस आहे असे दिसते. काही जणांना मरायच्या भितीमुळे असेल कदाचित :-)
थोडे सविस्तर लिहिण्यासाठी नविन धागा सुरू करणे रास्त होईल.
मी काही या विषयातला तज्ञ नाही, तरीपण मला जमेल तेवढे लिहायचा प्रयत्न करेन.
तर मंडळी, वाईच दमानं घ्या.

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 2:17 am | चतुरंग

शेवटची ओळ मी चुकून
तर मंडळी, वाई दमानं घ्या.
अशी वाचली! ;)

चतुरंग

राहूल's picture

11 Sep 2008 - 4:40 am | राहूल

नतुरंग,
खरं तर मला 'वाईन'च लिहायचं होतं. पण वाईन 'घेऊन' लिहीत होतो; म्हणून 'न' चा 'च' झाला... जसा आनंदीबाईने 'ध' चा 'मा' केला.
-
राहूल

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 10:15 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर मंडळी, वाईन दमानं घ्या.
मी पण ... चला मग कुठे बसायचं?

राहुल, तुमच्या सवडीने लिहा, पण नक्की लिहा.

अदिती

जैनाचं कार्ट's picture

10 Sep 2008 - 12:56 pm | जैनाचं कार्ट (not verified)

मशीन चालू होऊन १० मिनीटे झाली ...

अजून तरी मी मेलो नाय बॉ ;)

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2008 - 1:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मशीन चालू होऊन १० मिनीटे झाली ...
अवो भौ, आत्ता तर एक बीम सुरू झाला. दुसरा सुरू झाला की मग बघायचं!

अवलिया's picture

10 Sep 2008 - 2:14 pm | अवलिया

अव काय होत नाय

लेख लिव्हा वरती सांगतले तसा

(आयला कारणच शोधताय न लिहायला)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2008 - 2:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(आयला कारणच शोधताय न लिहायला)

हो ... ज्यातलं काय समजत नाय त्यातलं काय लिवा लिवा ...
आणि हे आणखी एक कारणः
http://www.misalpav.com/node/3399#comment-48010
राहूलना समजतं त्यातलं असं दिसतंय, त्यांना सांगा!

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 3:03 pm | आनंदयात्री

पुण्यात पाउस आलाय. तुमचा एखादा हॅड्रोण वाट चुकला वाटतं !!

छोटा डॉन's picture

10 Sep 2008 - 3:12 pm | छोटा डॉन

खरे की काय ?
बघा तिच्यायला त्या " हैड्रोन कोलायडर" ला कांपेटिशन म्हणुन "पुणे - ३०" वाल्यांनी काय नविन उद्योग सुरु केले का ?
प्रयोग करत असतील तर आवरा त्यांना, नाहितर फुकट मरताल ...
च्यायला हे काय "रिस्क" घ्यायचे दिवस आहेत का ?
[ कॄपया ह. घ्या.च ]

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Sep 2008 - 3:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या मुळेला इंग्रजी आणि ल्याटीन येतं ना थोडंथोडं म्हणून त्याने हॅड्रॉन आणि पाण्याचा संबंध लावला.
तो जोक होता, आता हस!

अवांतरः त्याचं नाव त्याला येतं म्हणून नको लिहूस फळ्यावर! ;-)
आणि ते "रिस्क"चं काय?

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 3:55 pm | आनंदयात्री

मागच्या शनवारी आम्हाला नोहाची नौका हा चित्रपट दाखवला होता. त्यामूळे आम्ही अस समज करुन घेतला होता के जग नष्ट होणार म्हनजे पाउसच येणार खुप. बाकी आम्हाला मराठीच मोठ्या मुश्किलीने येते, ते ल्याटीन फिटीन काय येतेय आम्हाला ?

त्यामूळे आम्ही अस समज करुन घेतला होता के जग नष्ट होणार म्हनजे पाउसच येणार खुप...

ते या प्रयोगामुळे होणार नाही आहे तर क्लायमेट चेंजमुळे जे काही समुद्रातील पाणी (बर्फ वितळल्याने) वाढत आहे त्याने होत आहे.

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 4:05 pm | आनंदयात्री

>>तर क्लायमेट चेंजमुळे जे काही समुद्रातील पाणी (बर्फ वितळल्याने) वाढत आहे त्याने होत आहे.

लोकांमधे बीअर पिण्याचे प्रमाण वाढल्यानेसुद्धा समुद्राचे पाणी वाढलेय असे ऐकुन आहे;)

विकास's picture

10 Sep 2008 - 4:17 pm | विकास

लोकांमधे बीअर पिण्याचे प्रमाण वाढल्यानेसुद्धा समुद्राचे पाणी वाढलेय असे ऐकुन आहे;)

का पुण्यात समुद्र झाला वाटतं? :-)

आनंदयात्री's picture

10 Sep 2008 - 4:31 pm | आनंदयात्री

तो मुद्दा दुय्यम झाला.
बर जाउद्या, समुद्र खारट का आहे याचे उत्तर द्या बघु !!

रवि's picture

10 Sep 2008 - 9:47 pm | रवि

Large Hadron Collider च वर्णन करनारं एक गाण ......

http://www.youtube.com/watch?v=j50ZssEojtM

रवि

अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......

एक's picture

11 Sep 2008 - 3:49 am | एक

जात आहोत हे आपल्याला कळेल का?

आपण आत खेचले जात असताना ताणले वगैरे जावू पण हे ताणणं त्रयस्थाच्या नजरेतून की असा तणाव आपल्याला पण जाणवेल?

विकास's picture

11 Sep 2008 - 4:08 am | विकास

ब्लॅकहोल मधे गेलो तर कालचक्र थांबते/हळू होते असे ऐकून/वाचून आहे, अर्थात आपले वृद्धत्व थांबेल अथवा किमान लांबेल :-)

धनंजय's picture

11 Sep 2008 - 4:24 am | धनंजय

नाही कळणार.

"कृष्णविवरात जातो आहोत" येथे "जातो आहोत"ची व्याख्या करणे महत्त्वाचे.

कृष्णविवराकडे (किंवा कुठल्याही वस्तूकडे) जाणारे आपण ताणले जात आहोत हे लक्षातच येते - पण त्यात वेगळे काय आहे? (पृथ्वीच्या पृष्ठभागावरही आपले अंग ताणले जात असते. पैकी सर्वात सूक्ष्म ताण मापणारे मज्जातंतू आतल्या कानात असतात - त्यामुळे आपल्याला "खालची दिशा कुठली" ही संवेदना डोळे बंद करूनही होते.) ग्रहाचे गुरुत्व जितके जास्त तितका हा ताण अधिक. हाच ताण जास्त जाणवेल, पण तो जास्त होता होता नेमका कृष्णविवराचा कधी होतो ती कुठली विशिष्ट पातळी नाही. (त्या मानाने खूपच कमी ताणाच्या पातळीवर शरिराचा चेंदामेंदा होईल, ही बात सोडा.)

या क्षणी सुद्धा आपण कुठल्यातरी कृष्णविवराकडे ओढले जात आहोत. आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपाशी एक मोठे कृष्णविवर आहे, असे मानण्यासाठी बर्‍यापैकी समर्थन आहे. तर या क्षणी तरी आपल्याला काही खास संवेदना होत आहे काय? मला तरी नाही. कदाचित जोवर त्या कृष्णविवराकडचे आपले अंतर कमी-अधिक होऊ शकते, तोवर आपण "कृष्णविवराकडे जातो आहोत" असे म्हणू नये, अशी आपण व्याख्या करूया. मग त्याच्याकडे जातो आहोत असे कधी म्हणायचे?

कृष्णविवराच्या दिशेने जाताना एक असे कुठले ठिकाण असते की "येथून मागे फिरणे नाही". त्या ठिकाणाला पार केल्यावर आपण म्हणू की आता कृष्णविवराकडे जातो आहोत. पण त्या "सीमा"बिंदूपाशी त्याच्या आगल्या-मागल्या बिंदूपेक्षा कुठली खास वेगळी संवेदना अपेक्षित नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2008 - 10:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कृष्णविवराच्या दिशेने जाताना एक असे कुठले ठिकाण असते की "येथून मागे फिरणे नाही".
ते एक ठिकाण नसतं, एका विशिष्ट त्रिज्जेच्या आत गेल्यावर असतं की "येथून मागे फिरणे नाही", त्याला श्वार्तश्चाईल्ड त्रिज्जा (Schwarzschild radius) म्हणतात.

या क्षणी सुद्धा आपण कुठल्यातरी कृष्णविवराकडे ओढले जात आहोत. आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपाशी एक मोठे कृष्णविवर आहे, असे मानण्यासाठी बर्‍यापैकी समर्थन आहे. तर या क्षणी तरी आपल्याला काही खास संवेदना होत आहे काय? मला तरी नाही. कदाचित जोवर त्या कृष्णविवराकडचे आपले अंतर कमी-अधिक होऊ शकते, तोवर आपण "कृष्णविवराकडे जातो आहोत" असे म्हणू नये, अशी आपण व्याख्या करूया. मग त्याच्याकडे जातो आहोत असे कधी म्हणायचे?

मस्त समजवून सांगितलंत, धनंजय!

स्वप्निल..'s picture

11 Sep 2008 - 12:59 pm | स्वप्निल..

मी कालच Dan Brown चे angels & demons वाचायला घेतले. हे पुस्तक सुद्धा एलएचसी वगैरे वरच आधारीत आहे. मिळाल्यास वाचा..अतिशय मस्त आहे..ह्या पुस्तका बद्दल ऐकले होते पण तेव्हा हे एलएचसीशी संबंधीत आहे हे माहीत नव्हते..

स्वप्निल..

राहूल's picture

11 Sep 2008 - 5:13 pm | राहूल

वा... काय टायमींग आहे! मी हे पुस्तक दोन वेळा वाचले आहे. माझ्या सवर्वात आवडत्या पुस्तकापैकी हे एक पुस्तक.
जर कुणाला eBook वाचायचे असेल तर ही download link

-
राहूल