सृजनत्व द्या

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
4 Dec 2015 - 10:52 am

सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी व्यवसायात किंवा नोकरीत आवश्यक असे कौशल्य आहे. तुम्ही मिडीया मध्ये नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याची आवश्यकता जरा जास्त असेल. जिथे इंजिनीयरिंग प्रॉडक्शन चालते तिथे याची आवश्यकता कमी असेल परंतु सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी शिवाय नोकरी किंवा व्यवसाय वाढणे, किंवा त्यात प्रगती होणे अशक्य मानावे लागेल.

या संदर्भातली आजच्या जगातली काही उदाहरणे पाहु. १९७३ सालापर्यंत १ जानेवारीला नविन कॅलेंडर भितीवर लावले जायचे. हे कॅलेंडर सहसा गिफ्ट स्वरुपात असायचे. त्यावर नयन रम्य चित्रे असायची. काही नट नट्या यांची तर काही निसर्गदृष्ये किंवा देव देवता यांची. त्याच्या जोडीला गुडीपाडव्याला वेगळे पंचांग विकत घेणारा एक वर्ग होता. ज्यांना एकादशी, चतुर्थी किंवा अन्य सण, व्रत यासाठीचा सोयीचा दिवस शोधणे गरजेचे असायचे.

आजही पंचांग उघडायला नाखुष असलेले अनेक लोक आहेत. कारण पंचांगाची क्लिष्टता. यावर सुमंगल पब्लीशिंग कंपनीने कल्पकतेचा वापर करुन भितीवर लावायचे एक पंचांग काढले ज्याचे नाव कालनिर्णय आहे.

या कल्पनेला लोकांचा अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आहे. खालील कल्पना या निमीत्ताने बदलल्या आहेत.

१) कॅलेंडरचा वापर फक्त तारखा किंवा राष्ट्रीय सुट्या शोधण्यासाठी न करता इतर सण- वार यासाठी करावा.
२) कॅलेंडर पैसे खर्च करुन विकत घ्यायचे.
३) कोणाचेही चित्र नसलेले / फक्त तारखा असलेले कॅलेंडर भितीवर/ योग्य तेथे लावायचे.

ह्या कंपनीच्या ग्राहकांची संख्या आज १ कोटी ४० लाख आहे तर याचे सर्क्युलेशन Audit Bureau of Circulation (India), यांच्या मते १८ कोटी, १८ लाख, ७ हजार, १६८ आहे. ( या संख्या त्यांच्या वेबसाईतवरुन घेतल्या आहेत )

अनेक कल्पना येतात आणि व्यवहार्य नसतील तर मागे पडतात पण एखादा नविन व्यवसाय नविन कल्पना घेऊन सुरु करायचा, तो वाढवायचा आणि नावलौकीक मिळवायचा ह्या साठी सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी हा भाग खुप महत्वाचा आहे.

इतकच कशाला, फेस बुक आणि व्हाट्सअ‍ॅप मध्ये जी नाविन्यपुर्णता आहे त्याचेच फळ आजच्या त्या कंपन्यांच्या लौकीकात आणि संपत्तीत झालेली वाढ आहे.

अनेक उदाहरणे देता येतील ज्यात फक्त व्यवसायतच नव्हे तर नाविन्य पुर्ण कल्पनांचा वापर करुन नोकरीत ज्यांनी आपली भरभराट करुन घेतली आहे.

मग प्रश्न असा पडतो की हे सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कुठे असते आणि तीला प्रकट कशी करायची ? उत्तम सृजनत्व असलेली माणसे वेगळी असतात का? काय करतात म्हणुन त्यांना सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी प्रसन्न होते ?

खर तर सर्वच माणसांमध्ये सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी असतेच. कुणी त्याचा जाणिवपुर्व विकास करतो तर कुणी त्याकडे ढुंकुनही पहात नाही. याच कारण आमच्या जडण घडणीत दडलेल आहे.

खर तर ही कल्पक अथवा सृजनत्वाच वरदान असलेली मंडळी आपल्या सारख्यांच्याच घरात जन्मली. वारसा हक्काने त्यांना ही कला मिळाली असेही नाही. ना ते कोणत्या वेगळ्या शाळेत शिकले. पण त्यांना आपल्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी याच्या क्षमतेची जाणिव फार लवकर झाली असे म्हणावे लागेल.

आमची शिक्षण पध्दती पाहीली तर ज्यातुन सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी विकास होईल असा एकच तास उदाहरण अर्थ चित्रकला विद्यार्थ्यांच्या वाट्याला आलेला असतो. भाषेच्या माध्यमातुन क्रियेटीव्ह कसे लिहावे याचे मार्गदर्शन करणारे एखादेच शिक्षक असतात. बहुतेकांचा कल वाचलेला निंबध लिहीण्याकडे असतो.

शाळेतले उरलेले तास गणितीकरण आणि सर्वच वर्गाचे उत्तर एकच कसे असेल याकडे असतो. कृती वर आधारीत शिक्षण असा नाविन्यपुर्ण प्रयोग करणार्‍या शाळा एकतर सर्वच शहरात नसतात. असल्याच तर सी बी एस सी/ आय सी एस बी च्या आकर्षणात याकडे फारसे कुणाचे लक्ष नसते. खेड्यात अक्षर ओळख करुन देणार्‍या शाळा आहेत हे नशिब आहे अस म्हणाव लागेल.

शाळांमध्ये मुलांना मातीच्या गोष्टी बनवायला शिकवले जाते, झाडे लावायला शिकवले जाते, सुतार कामातुन भुमीती शिकवली जाते असे सांगीतले तर आजचे पालक त्याकडे "क्रेझी" असा रिमार्क मारुन पाठांतरावर आणि मेमरी तंत्रावर आधारीत परिक्षा पध्दतीवर भर असलेल्या शाळेची निवड करतील.

आज जे पालक आहेत ते आपल्या पाल्याच्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कडे किती लक्ष देतात ? त्याचा विकास कसा होईल याकडे किती आग्रही असतात असे विचारले तर ही आकडेवारी फारशी आकर्षक असणार नाही. फार कशाला मी सुध्दा माझ्या एकुलत्या एका मुलीच्या सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी कडे फारसे गांभिर्याने पाहिले नाही. तिला बाहुल्यांचे ड्रेस शिवायचा छंद लहानपणी जडला होता. पुढे तिच्या कल चाचणीची लिमिटेशन्स म्हणा किंवा मला तिला फॅशन डिझाईन च्या शिक्षणाला पाठवावे अशी तीव्र इच्छा न झाल्यामुळे तिला पारंपरीक इंजिनीयरीग करावे लागले. आजच्या तिच्या नोकरीत सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी ला स्कोप असल्याने तिची प्रगती झाली पण व्यावसायीक समाधान म्हणाल तर फारसे लाभले नाही.

यावर पर्याय काय ? पालकांना किंवा आज नोकरी/ व्यवसाय करण्यार्‍या व्यक्तीला आपले सृजनत्व अर्थात क्रियेटीव्हीटी वाढवण्याचे काय मार्ग आहेत ? यावर प्रकाश पुढच्या लेखात टाकु.

कलानोकरीविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

4 Dec 2015 - 11:38 am | संदीप डांगे

चांगला विषय मांडल्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन!

तर आधी हे माहित करून घेणे आवश्यक आहे की क्रियेटीव्हीटी किंवा सृजन म्हणजे फक्त कला नाही. प्रत्येक मनुष्यात क्रियेटीव्हिटी जन्मजात असते. क्रियेटीव्हीटी म्हणजे ज्ञात परिस्थितीकडे रुढ दृष्टीकोनातून न बघता त्यापेक्षा वेगळ्या दृष्टीकोनातून बघणे. क्रिएटीव्हीटीची ही सगळ्यात सुलभ व्याख्या आहे. अगदी लहान मुले जी नुकतीच बोलायला लागली असतात, त्यांच्या प्रश्नोत्तरातून आपल्याला ह्या क्रियेटीव्हीटीची झलक मिळते. कारण त्यांच्यावर अजून संस्कार-शिक्षण-रुढी-मान्यतांचा पगडा पडलेला नसतो.

इन्डॉक्ट्रीनेशन हे क्रियेटीव्हीटीला मारणारे पहिल्या क्रमांकाचे विष आहे. पण रुढार्थाने समाजात शिस्त टिकवून ठेवण्याच्या अवाजवी हट्टामुळे हे होतेच. शालेय शिक्षण, घरचे संस्कार यातून मुलांमधे असलेली सहज सृजनशीलता, वेगळा विचार करण्याची क्षमता, समस्येकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची क्षमता ह्यांचा झपाट्याने र्‍हास होतो. फार थोडी मुले हा सगळा मारा सहन करून प्रवाहाविरूद्ध पोहण्याची क्षमता बाळगून असतात. खरे तर त्या लोकांमधे अफाट क्षमता असते. पण ती छाटली जाऊन खुजी राहते. आपण जगभरात जी काही सृजनशील, समाजाला वेगळी दिशा देणारी माणसे बघतो त्यांच्यामधे ह्या क्षमता भरपूर असतात म्हणून ते तशी कामे करू शकतात.

क्रियेटीव्हीटीला कुठल्याही क्षेत्राचे बंधन नाही. ज्या कोण्या क्षेत्रात नेहमीपेक्षा वेगळे काही घडवण्यात आले आले ज्याने नवे ट्रेंड्स तयार झाले ते क्रियेटीव्हीटीचेच अपत्य समजावे. भले ते खाणकाम असो, संगणकक्षेत्र असो, युद्धभूमी असो, वैद्यकिय, अभियांत्रिकी, शेती, अक्षरशः कोणतेही क्षेत्र हे क्रियेटीव्हीटीच्या प्रभावापासून अलिप्त नाही.

आता व्यवसाय-नोकरीत क्रियेटीव्हीटी कशी जपायची? तर ते फारच कठीण काम आहे. कारण अवतीभवती इन्डॉक्ट्रीनेटेड क्राउड असतांना त्यांना वेगळ्या संकल्पना सुचवणे, मान्य करायला लावणे कठीण जाते. आजवर आपण असेच केले ना मग असेच करायचे अशी कम्फर्ट झोनची भूमिका असते. कम्फर्ट झोन आणि क्रीयेटीव्हीटी एकत्र राहू शकत नाहीत हे ही तितकेच खरे. कायम कम्फर्टझोनला आव्हान देत राहणे हेच क्रियेटीव्हीटीचे काम आहे.

बरेच लोक कॉस्टकटींगसाठी नवनव्या कल्पना शोधतात, काम वेगात कसे होईल याच्या आयडीया लढवतात. बिलगेट्स चं फेमस वाक्य की मी आळशी लोकांना काम देईल कारण ते पटकन कसं करण्याचे मार्ग शोधून काढतात. असे मार्ग शोधून काढणे म्हणजेच क्रियेतीव्हीटी.

मी ग्राफिक डीझाइनमधे नुकताच नोकरीला सुरुवात केली असता एका अकाउंटंटनी मला वेळ वाचवण्याची क्लृप्ती सांगितली की किबोर्ड, माउसच्या क्लिक्स जितक्या कमी करत येतील तितक्या कमी कर. एक एक क्लिक म्हणजे शंभर रुपये अकाउंट मधून वजा होतायत असा विचार कर. त्याचा सल्ला उपयोगात आणताच माझी प्रॉडक्टीवीटी ३०% टक्क्याने वाढली. टायपींगकरतांना हात, मनगट, बोटांचे पोश्चर कसे ठेवले की टायपींग फास्ट होते हेही मी शोधून काढले. अशा बर्‍याच गोष्टी क्रियेटीवीटी शाबूत असल्याची लक्षणं आहेत. आपल्या सर्वांना ती जाणवतात. त्यावर थोडा विचार करून मेहनत घेतली तर सृजनशीलता ओसंडून वाहू लागते.

मेहनत काय घ्यावी? यु हॅव टु अनलर्न थींग्स यु लर्न्ड टील नाऊ. म्हणजे आपण एकदा मराठी वाचायला शिकलो की ते काही झाले तरी वाचणे शिकण्याच्या आधीच्या अवस्थेत नाही जाऊ शकत. हेच अनेक गोष्टींच्या बाबतीत. हे शिकलेले विसरलो की आपल्याला बालपणीची अवस्था प्राप्त होते, आपले विचारांना दाही दिशा मोकळ्या होतात. म्हणून बरेच विचारवंत थि़ंक लाइक अ चाइल्ड असे म्हणतात. कारण मुलांच्या विचारांवर परंपरांची बंधने नसल्याने त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होतात.

आतासाठी इतकंच. बाकी पुढे लिहूच...

नितीनचंद्र's picture

5 Dec 2015 - 10:14 pm | नितीनचंद्र

श्री डांगे,

प्रतिसादात एक संपुर्ण लेखच लिहलात या साठी धन्यवाद. ज्या मुद्यांना मी स्पर्श केला ते तुम्ही विस्ताराने लिहलेत. संपुर्ण लेकाचा विषय मला नोकरी/व्यवसाय आणि सृजनता इतकाच ठेवायचा होता म्हणुन साधे जेवण बनवण्यात सुध्दा सृजनता अभिप्रेत असते हे मी मुद्दाम लिहायचे टाळले. याच मुळे क्रियेटीव्हीटीला कुठल्याही क्षेत्राचे बंधन नाही. हे १००% मान्य.

आपल्या प्रतिसादाकरीता पुनश्च धन्यवाद.