सिंहलव्दीपाची सहल : ०२ : औकानाची बुध्दमूर्ती

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
25 Nov 2015 - 12:33 am

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

डोळ्यांना थंडाई देणार्‍या हिरव्यागार महिरपीतून प्रवास चालू असताना आता औकानातली श्रीलंकेतली सर्वात उंच असलेली बुध्दमूर्ती पाहण्याचे वेध लागले होते.

कोलंबो ते औकाना या साधारण तीन तासांच्या प्रवासाचा बहुतांश रस्ता कडेच्या हिरव्यागार झाडांनी बनवलेल्या सुखद छत्रचामरांखालून जातो. त्या जरा लांब प्रवासाचा अजून एक फायदा म्हणजे मधून मधून पापण्या जड झाल्या की मस्तपैकी डुलक्या काढून झाल्या. त्यामुळे रात्रीच्या विमानप्रवासानंतर लगेच श्रीलंकेच्या सहलीला सुरुवात केली असली तरी औकानाला पोहोचेपर्यंत झोपेचा प्रभाव संपून डोळे खडखडीत उघडलेले होते !

पहिल्या दिवसात भेट द्यायच्या आकर्षणांचा आराखडा असा होता...


सिंहलव्दीपाची सहल : पहिला दिवस : कोलंबो --> औकाना --> अनुराधापुरा --> मिहिन्ताले --> पोलोन्नारुवा (वस्ती).
(मूळ नकाशा जालावरून साभार)

*********************************

औकानाची बुध्दमूर्ती

उत्तर-मध्य श्रीलंकेतील केकीरवा या गावाशेजारी असलेली ही उभ्या बुद्धाची मूर्ती एकाच शीळेतून कोरलेली आहे. या प्राचीन बुध्दशिल्पाची उंची ११.८४ मीटर (३८ फूट १० इंच) आहे आणि खांद्यांची रुंदी ३ मीटर (१० फूट) आहे. हे शिल्प आठव्या शतकाच्या उत्तरार्धात धातूसेन राजाच्या कारकीर्दीत कोरले गेले. या मूर्तीच्या कोरीवकामात गांधार व अमरावती या भारतीय शैलींचा आणि श्रीलंकन अनुराधापूरा शैलीचा प्रभाव दिसून येतो.

या मूर्तीवरची वस्त्रे शरीराचा सुडौल आकार स्पष्ट व्हावा इतकी घट्ट नेसलेली आहेत. उजवा खांदा उघडा आहे. डाव्या खांद्यावरून पाठीमागे टाकलेले उत्तरीय डाव्या खांद्याजवळ डाव्या हाताने धरलेले आहे व त्याचा पदर मागून पायाच्या घोट्यापर्यंत खाली लोंबताना दिसतो. वस्त्रांच्या नाजूक घड्या मोठ्या कलाकुसरीने कोरलेल्या आहेत. उजवा हात उजव्या खांद्यापर्यंत उंचावलेल्या आशिशमुद्रेत (पूर्ण उघडा आणि उजवीकडे वळवलेला) आहे. मूर्तीची पाठीमागच्या कड्याशी खेटून आहे. चेहर्‍यावर शांत भाव आहेत. मूर्ती अर्धवर्तुळाकार पद्मासनावर उभी आहे. मूर्तीच्या डोक्यावर शिरसपाता नावाची निशाणी आहे, परंतू ती बरीच नंतर इ स १८७० साली टाकलेली भर आहे असे मानले जाते

प्राचीन काळात ही मूर्ती दगडविटांनी बांधलेल्या २३ X १९ मीटर आकाराच्या मंदिरात स्थापीत होती. मात्र आता ती उघड्यावर असून तिच्याभोवतीचे मंदिराचे केवळ काही भग्नावशेष दिसतात.


औकानाची बुध्दमूर्ती ०१ (जालावरून साभार)

.


औकानाची बुध्दमूर्ती ०२

.


औकानाची बुध्दमूर्ती ०३

.

या मूर्तीच्या कोरीवकामामागे शिल्पकार गुरुशिष्यांत झालेल्या चढाओढीची रोचक कथा आहे. या चढाओढीत गुरुने औकाना येथे तर शिष्याने तेथून ११ किलोमीटर दूर सास्सेरुवा येथे त्याच उंचीच्या बुध्दप्रतिमा बनविण्यास एकाच वेळी एका घंटेच्या टोलाने सुरुवात केली. गुरुने त्याचे काम प्रथम पुरे केल्यावर दुसर्‍या टोलाने चढाओढ संपल्याचे जाहीर केले गेले. शिष्याकरवी अपूर्ण राहिलेली मूर्ती अजून तशीच अर्धवट व दुर्लक्षित स्थितीत आहे. काही तज्ज्ञांच्या ही केवळ दंतकथा असून अर्धवट राहिलेले शिल्प औकानातील शिल्पापेक्षा काही शे वर्षांनी जुने आहे. अपुर्‍या वेळेमुळे सास्सेरुवाला भेट देणे शक्य झाले नाही.

पाचूच्या बेटाच्या हिरव्यागार वनराईतून प्रवास करत आम्ही प्राचीन श्रीलंकेची राजधानी अनुराधापुराकडे कूच केले.

(क्रमश : )

==================================================================

सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...   ०२ : औकानाची बुध्दमूर्ती...
    ०३ : अनुराधापुरा - प्राचीन श्रीलंकेची पहिली मोठी राजधानी...   ०४ : मिहिन्ताले - श्रीलंकेतील बौद्धधर्माचे प्रारंभस्थान...
    ०५ : पोलोन्नारुवा - प्राचीन श्रीलंकेची दुसरी मोठी राजधानी...    ०६ : गल विहारा व तिवांका प्रतिमागृह...
    ०७ : कौडुल्ला राष्ट्रीय उद्यान...                                       ०८ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (१)...
    ०९ : सिगिरिया - श्रीलंकेची अनवट प्राचीन राजधानी (२)...       १० : दांबुलाचे गुंफामंदिर व सुवर्णमंदिर...
    ११ : कँडी - श्रीलंकेची वसाहतकालापूर्वीची शेवटची राजधानी...   १२ : महावेली, हत्ती अनाथालय आणि चहा फॅक्टरी...
   
१३ : नुवारा एलिया उर्फ लिट्ल इंग्लंड...                              १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास...
    १५ : याला राष्ट्रीय उद्यान...                                           १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल...
    १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...                            १८ : कोलंबो... (समाप्त)

==================================================================
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे वाचनीय, फक्त हा भाग थोडा लहान वाटला.

पद्मावति's picture

25 Nov 2015 - 12:44 am | पद्मावति

काय अप्रतिम आहे!
या बुद्धमूर्तीविषयी पहिल्यांदाच वाचतेय आणि पाहतेय.

होबासराव's picture

25 Nov 2015 - 12:50 am | होबासराव

मोदक ने म्हटल्याप्रमाणे भाग थोडा लहान वाटला, लिखाण आणि अनुभव नेहमीप्रमाणे अप्रतिम.

रेवती's picture

25 Nov 2015 - 1:48 am | रेवती

वाचतिये.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Nov 2015 - 5:35 am | अत्रुप्त आत्मा

जबरी

बाबा योगिराज's picture

25 Nov 2015 - 6:35 am | बाबा योगिराज

मस्त अनुभव. आवड्यास.
पुलेशु.

मांत्रिक's picture

25 Nov 2015 - 6:56 am | मांत्रिक

मस्त चालली आहे लेखमाला.

मदनबाण's picture

25 Nov 2015 - 6:59 am | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा ... :- Ustad Imtiaz Ali Riaz Ali

अजया's picture

25 Nov 2015 - 8:14 am | अजया

पुभाप्र

प्रचेतस's picture

25 Nov 2015 - 9:13 am | प्रचेतस

खूपच त्रोटक भाग.

या मूर्तीच्या कोरीवकामात गंधर्व व अमरावती या भारतीय शैलींचा आणि श्रीलंकन अनुराधापूरा शैलीचा प्रभाव दिसून येतो.

गंधर्व शब्द नसून 'गांधार' असावा का?

छायाचित्रे नेहमीप्रमाणेच उत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Nov 2015 - 2:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

ती शैली गांधार अशीच आहे... योग्य तो बदल करून घेतला आहे.

आमच्या टूर गाईडमध्ये तसा उल्लेख होता. मात्र गांधार हाच शब्द जास्त विश्वासू संदर्भांत आहे.

हे नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद !

सुबोध खरे's picture

25 Nov 2015 - 9:15 am | सुबोध खरे

लेख वाचनीय तर आहेच पण आपली नकाशा सकट संदर्भ देण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कुठे आहोत आणि कसे चाललो आहोत याची सुस्पष्ट कल्पना येते.त्यामुळे लेख जास्त वाचनीय होतात.
हे तंत्र दुर्दैवाने इतर बर्याच अतिशय चांगल्या प्रवास वर्णनातहि दिसून येत नाही.
पुभाप्र

नाखु's picture

25 Nov 2015 - 2:07 pm | नाखु

अगदी तंतोतंत...
तपशीलाने माहीतीत भर पडतेच पण नक्की ठिकाणाबाबत अचूक तपशील(अंतर ) ई कळतात.

पु भा प्र

विलासराव's picture

25 Nov 2015 - 9:29 am | विलासराव

मस्त सुरु आहे सफर.
अर्थातच भावतीये.

इडली डोसा's picture

25 Nov 2015 - 10:07 am | इडली डोसा

फारच सुंदर मूर्ती आहे.

शंतनु _०३१'s picture

25 Nov 2015 - 10:53 am | शंतनु _०३१
शंतनु _०३१'s picture

25 Nov 2015 - 10:53 am | शंतनु _०३१
दिपक.कुवेत's picture

25 Nov 2015 - 12:47 pm | दिपक.कुवेत

दोन्ही भाग अप्रतिम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2015 - 2:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्हीही भाग सुरेख.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Nov 2015 - 2:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकांना व वाचकांना अनेक धन्यवाद !

*** पुढचा अनुराधापुरावरचा भाग जरा मोठा होईल, तो मधेच तोडावा लागू नये यासाठी हा जरा लहान भाग वेगळा ठेवला आहे.

जगप्रवासी's picture

25 Nov 2015 - 4:12 pm | जगप्रवासी

लेख वाचनीय तर आहेच पण आपली नकाशा सकट संदर्भ देण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कुठे आहोत आणि कसे चाललो आहोत याची सुस्पष्ट कल्पना येते.त्यामुळे लेख जास्त वाचनीय होतात.>>>>>> खरे साहेबांच्या या वाक्याशी सहमत

चला अजून एका देशाची घरबसल्या सफर चालू.

पैसा's picture

25 Nov 2015 - 4:29 pm | पैसा

अतिशय प्रमाणबद्ध आणि शांत भाव असलेली मूर्ती आहे!

बॅटमॅन's picture

27 Nov 2015 - 5:22 pm | बॅटमॅन

बुद्धमूर्ती एकदम गांधार शैलीतली मस्त आहे.

भानिम's picture

27 Nov 2015 - 5:32 pm | भानिम

माहितीपूर्ण लेख! बुद्ध मूर्तीवरील तलम वस्त्राचा 'इफेक्ट' काय छान शिल्पित केला आहे शिल्पकाराने, नाही का?

काय सुरेख मूर्ती आहे! सुरेख.
वाचते आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2015 - 12:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वांना धन्यवाद !

सुमीत भातखंडे's picture

30 Nov 2015 - 4:08 pm | सुमीत भातखंडे

वाचतोय