नुसतेच शब्द ओठी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
29 Jul 2015 - 3:02 pm

ब्लॉग दुवा हा.

नुसतेच शब्द ओठी

रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी
मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी

मी आवरू न शकलो आवेग भावनेचा
अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी

शून्यात पाहताना असतो मनात वणवा
ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी

एका दिशेस वळती माझे विचार सारे
एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी

होते कधीतरी जे हरवून ऐकलेले
नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी

कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी
विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी

ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व
या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी

- अपूर्व ओक
सर्व हक्क राखीव.

मराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

पथिक's picture

29 Jul 2015 - 3:45 pm | पथिक

छान ! आवडली गझल.

जडभरत's picture

29 Jul 2015 - 5:27 pm | जडभरत

छानंय! आवडली.

वेल्लाभट's picture

30 Jul 2015 - 12:15 pm | वेल्लाभट

धन्यवाद :)

विशाल कुलकर्णी's picture

30 Jul 2015 - 4:49 pm | विशाल कुलकर्णी

मस्तच झालीये. चौथा आणि सहावा शेर आवडला.
फक्त मतल्याच्या दुसर्‍या ओळीत वृत्तभंग झालाय तो सुधारून घ्या. :)

वेल्लाभट's picture

30 Jul 2015 - 5:27 pm | वेल्लाभट

डन ! धन्यवाद

विशाल कुलकर्णी's picture

31 Jul 2015 - 12:44 pm | विशाल कुलकर्णी

आता छान वाटतेय. :)

शून्यात पाहताना असतो मनात वणवा
ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी

सगळ्यात सुरेख!

अगदी अगदी ! जमलंय वेल्लाभट, खुप आवडली गझल.

शब्दबम्बाळ's picture

4 Aug 2015 - 7:16 pm | शब्दबम्बाळ

इथे मतला दोन वेळा आला आहे, मग हा हुस्नेमतला होतो का?

इथे मला गजलेबद्दल चांगली माहिती मिळाली!
फक्त हिंदी मध्ये आहे.

शून्यात पाहताना असतो मनात वणवा
ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी
वाह्ह...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }

रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी

होते कधीतरी जे हरवून ऐकलेले
नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी

या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी

वरील कल्पना आवडल्या.
थोडेसे मीटर गडबडलेले आहे एखाद ठिकाणी.. पण तशी रचना छानच. पु.ले.शु.