Skip to main content

नुसतेच शब्द ओठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 29/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा हा. नुसतेच शब्द ओठी रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी मी थोपवून धरले भलतेच शब्द ओठी मी आवरू न शकलो आवेग भावनेचा अन योग्य ते न सुचले, चुकलेच शब्द ओठी शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी एका दिशेस वळती माझे विचार सारे एकसारखेच होती सगळेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी कानी पडू न शकले झुरलेच शब्द ओठी विरले तसेच तिकडे नुरलेच शब्द ओठी ऐकूनही न येती ऐकू इथे अपूर्व या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी - अपूर्व ओक सर्व हक्क राखीव.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2349
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

मस्तच झालीये. चौथा आणि सहावा शेर आवडला. फक्त मतल्याच्या दुसर्‍या ओळीत वृत्तभंग झालाय तो सुधारून घ्या. :)

इथे मतला दोन वेळा आला आहे, मग हा हुस्नेमतला होतो का? इथे मला गजलेबद्दल चांगली माहिती मिळाली! फक्त हिंदी मध्ये आहे.

शून्यात पाहताना असतो मनात वणवा ठिणगीसमान विझती हलकेच शब्द ओठी वाह्ह...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- जीवन से भरी तेरी आँखें... :- Safar { किशोर कुमार }

रस्ता चुकून आले नुकतेच शब्द ओठी होते कधीतरी जे हरवून ऐकलेले नकळत तुझ्याही येती माझेच शब्द ओठी या भावहीन लोकी नुसतेच शब्द ओठी वरील कल्पना आवडल्या. थोडेसे मीटर गडबडलेले आहे एखाद ठिकाणी.. पण तशी रचना छानच. पु.ले.शु.