रिंगा रिंगा रोझेस आणि श्रावण मासी.....

पद्मावति's picture
पद्मावति in जनातलं, मनातलं
15 Jun 2015 - 1:13 am

लहान असतांना आम्ही एक खेळ खेळायचो. रिंगा-रिंगा रोझेस म्हणत एकमेकांचा हात धरून गोल गोल फिरायचे आणि मग ते हाशा-हुशा करत धड़ामकन खाली पडायचे... ते गोल गोल फिरण्यात आणि पडण्यात आम्हाला फारच मजा यायची...आमचा हा अगदी फ़ेवरेट टाइमपास होता.

पुढे कधीतरी एक पुस्तक वाचत असतांना त्यात या खेळाचा उल्लेख वाचला. तो असा कि सोळाव्या शतकात लंडन मधे प्लेग ने धूमाकुळ घातला होता. लाखो लोक मृत्यु पावले होते. वर वर अतिशय निरागस वाटणाऱ्याया खेळाची पार्श्वभूमि या महाभयानक ग्रेट प्लेग ची होती.

मुळ रूप -रिंग-ओ-रिंग-ओ-रोझेस, पॉकेट फुल्ल ऑफ पोसिस, अॅशस अॅशस वी ऑल फॉल डाउन.

याचा साधारण अर्थ असा की प्लेग चे लाल गुलाबी पुरळ आपल्या अंगावर उठले आहे. त्यावर उपाय काय तर पोसिस ही वनौषधि त्यावर लावा. पण शेवटी काय होणार? तर शेवटी सगळीजण राख रांगोळी होवुन पडणार. प्लेग च्या संसर्गाचया भीतीने त्या वेळी नेहमी-प्रमाणे दफ़न न करता मृतकांचा दहन विधि करणे सुरू झाले होते.
ही कथा वाचल्यावर मात्र आता कोणी लहान मूले हे म्हणत असतील तर ऐकुन मनात कसंतरिच होतं.

नंतर ज़रा या विषयी विचार केला, ज़रा गूगलून बघितले तर मला लक्षात आले की अरे, फक्त हेच गाणे नाही पण अशी अनेक इंग्रजी बालगीते आहेत ज्यामागे मागे काही ना काही तरी काळी बाजू आहे. त्या गीतांवर त्या त्या वेळेसच्या सामाजिक, राजकीय परिस्थितिचा, अनिष्ट प्रथांचा पगड़ा आहे. सरळसोट पणे कधीही नाही पण आड़वाटेने मात्र त्या चालीरितींचा वेळोवेळी विरोध केलेला दिसतो.

जसे बा बा ब्लॅकशिप ही कविता. ह्या कवितेत काय आहे? तर तीन ब्यागा भरुन लोकर आहे. पण ती कोणासाठि? तर वन फॉर द मास्टर - राजाला टॅक्स. वन फॉर द डेम- इथे अर्थ चर्च ला जो वाटा जातो तो आणि लहान मुलाला? त्या कष्टकऱ्याला काय तर जेमतेम एक पोतं.
किंग एडवर्ड दूसरा हा लोकरिवर भरमसाठ कर वसूल करीत असे. बा बा ब्लॅकशिप या गाण्यात या अन्यायाचा आपल्या परीने निषेध केला आहे. आता विरोध खुलेआम तर करणे शक्यच नाही. नाहीतर आपल्या मानेची आणि राजाच्या तलवारीची भेट होणे नक्की. मग असा काहीतरी केविलवाणा प्रयत्न करुन मनाचे समाधान करा.

अज़ून एक बाजू मला लक्षात आली ती अशी की बऱ्याच बालगीतांचा एक समान पैलु आहे. तो म्हणजे त्यातील धडपडणे, डोके फुटणे, काहीतरी तुटणे नाहीतर कुणीतरी पडणे....उदाहरणे कितीतरी आहेत. जसे--लंडन ब्रिज इज फॉलिंग डाउन, हम्प्टि-डम्प्टि हॅड ए ग्रेट फॉल, रॉक अ बाय बेबी--व्हेन द बाउ ब्रेक्स, क्रेडल विल फॉल वग़ैरे वग़ैरे. त्यात सर्वात लोकप्रिय - जॅक फेल डाउन- ब्रोक हिज़ क्राउन इत्यादि......

आपल्या मराठी बड़बड़- गीतांमध्ुन मात्र हा प्रकार नाही. असेलसुद्धा पण मला तरी आठवत नहिये. मला लक्षात असलेली गाणी म्हणजे श्रावण मासी - हर्ष मानसी, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला वग़ैरे...सगळे कसे छान छान.

लहान मूलांकारिता लिहिलेल्या कवितांमध्ुन अशा दुख़:द परिस्थिती विषयी टिप्पणी, अथवा जनजागृति वग़ैरे करण्याचा अजिबात प्रयत्न केला गेला नाहीये.
मला तर वाटत ते योग्य ही आहे. अन्यायाचा प्रतिकार, वास्तविकतेची जणिव या सर्व गोष्टिंकरिता तर उभा जन्म आहेच त्यासाठी बाळपणापासुन का म्हणुन त्यांना वेठीला धरा...राहु दया ना त्या पिल्लांना ज़रा परिकथेच्या राज्यात....जिथे सगळं काही ठीक आहे, मस्तं मजेदार आहे. जिथे बागडत असतांना त्यांना वाटावं की या जगात All is well.......

अर्थात हे सगळे माझे निरीक्षण, विचार आहेत. ते चुकीचे असतील अथवा एकांगीही असतील. तुमचेहि विचार येऊ द्या.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 1:43 am | श्रीरंग_जोशी

बालगीतांमध्ये स्थानिक संस्कृती अन तत्कालीन घडामोडींचा संदर्भ असणारंच.

मी लहान असताना माझे वडील रवी गेला रे सोडूनी आकाशाला, नीज नीज माझ्या बाळा हे गीत म्हणत असत.
त्यात, "तो तिकडे सिद्दी पठाण हा इकडे अफजुल खान, हे आले रे सगळे तुजला न्याया, नीज नीज माझ्या बाळा" अशी ओळ होती. या लेखानिमित्त त्या गीताचे स्मरण झाले.

बालगीतांखेरीज वाक्प्रचार, म्हणी व विशेषणांमागेही ऐतिहासिक संदर्भ असतातच, मोगलाई, तुघलकी इत्यादी.
नुकत्याच संपलेल्या सुरजमल जाट आया भाऊके दरबार या लेखमालिकेतही हरयाणामध्ये सदाशिवरावभाऊ यांच्या नावाने वापरात असलेल्या वाक्प्रचारांचा उल्लेख आला आहे.

तो तिकडे सिद्दी पठाण हा इकडे अफजुल खान, हे आले रे सगळे तुजला न्याया, नीज नीज माझ्या बाळा

ही तर अंगाई शिवकल्याण राजा मधली आहे. जिजाऊ जोजवतायेत बाळ शिवाजीला. कवी आहेत गडकरी.

श्रीरंग_जोशी's picture

17 Jun 2015 - 8:44 pm | श्रीरंग_जोशी

माहितीसाठी धन्यवाद.

खाली किसन शिंदे यांनी पूर्ण गीत टंकले आहे.

जुइ's picture

15 Jun 2015 - 2:37 am | जुइ

मला वाटते की बालगीतांमध्ये त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती व्यक्त होत असावी. शिवाय दोन संस्कृतीमधील हा फरक ही असावा. मला तरी आपल्याकडील बाल गीतांमध्ये हा प्रभाव ऐकविता नाही. पोवाडे इत्यादी मधून हा प्रभाव जाणवायचा.

आदूबाळ's picture

15 Jun 2015 - 3:19 am | आदूबाळ

तर वन फॉर द मास्टर - राजाला टॅक्स. वन फॉर द डेम- इथे अर्थ चर्च ला जो वाटा जातो तो आणि लहान मुलाला? त्या कष्टकऱ्याला काय तर जेमतेम एक पोतं.

One for my master - मालकाला नफ्यातला ३३% वाटा
One for his dame - राणीला कर ३३%
One for the little boy who lives down the lane - कष्टकऱ्याच्या हातात उरलेले ३३%

हा अर्थ आधीही वाचला होता, पण पटला नाही.
- ब्रिटिश आयकर १८५२ (चुभू) साली आला. हे बालगीत नक्की त्याआधीचं आहे.
- व्हिक्टोरिया राणीही एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली.
- कष्टकऱ्याला/कामगाराला ३३% नफा म्हणजे चिक्कार झाले राव!

hitesh's picture

15 Jun 2015 - 6:44 am | hitesh

मालक मालकीण आणि मुलगा इतके स्पष्ट लिहिले आहे.

पद्मावति's picture

15 Jun 2015 - 4:16 am | पद्मावति

श्रीरंग- तुम्ही ऐकलेल्या कवितेत त्यावेळेसच्या परिस्थीतिंचा प्रभाव नक्कीच दिसतो. मला ही कविता माहीत नव्हती. अशा नक्कीच अजूनही कविता, गाणी असतीलच- मला या बाबतीत फारच कमी माहिती आहे.
आदुबाळ- तो काळ तेराव्या शतकातील असावा. राजा आणि चर्च ला आपला नफा देऊन त्या शेतकर्याला ३३ टक्केच मिळत असणार म्हणून हा असंतोष असेल. आता ही सगळी माहिती पण ऐकिवच. तुम्ही म्हणता तेही पटलं.
मी जरा या लेखात फारच एका बाजूने विचार केलाय की काय असे आता वाटत आहे. पण काही हरकत नाही, निदान या चर्चेमधून दुसरी बाजू पण पुढे येईल.
मला स्वत:ला जुई नी म्हटल्याप्रमाणे दोन भिन्न संस्कृती चा फरक जाणवला.

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 8:40 am | श्रीरंग_जोशी

रवी गेला रे सोडूनी आकाशाला हे गीत आई कुणा म्हणू मी या मराठी चित्रपटात आहे. १ तास २१ मिनिट झाल्यावर लागते. कवी आहेत दत्तात्रय धोंडो घाटे.

परंतु मुखडा सोडल्यास गीत पूर्णपणे वेगळे आहे. वडीलांना विचारुन बघतो या गाण्याचा उगम कुठला आहे ते.

किसन शिंदे's picture

15 Jun 2015 - 8:41 am | किसन शिंदे

मुळ गीत गोविंद्राग्रजांचे आहे, जे शिवकल्याणराजामध्ये वापरले आहे. लताबाईंचा स्वर आणि पंडितजींचे संगीत.

गुणी बाळ असा जागसि का रे वाया,
नीज रे नीज शिवराया
अपरात्रीचा प्रहर लोटला बाई
तरी डोळा लागत नाही
हा चालतसे, चाळा एकच असला
तिळ उसंत नाही जीवाला
निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविशी तुझी सावळी काया ?
नीज रे नीज शिवराया

हे शांत निजे बारा मावळ थेट
शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या ना, तशाच घाटाखाली
कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया, बागुल तो बघ बाळा
किती बाई काळा काळा
इकडे हे सिद्धी-जमान
तो तिकडे अफझुलखान
पलीकडे मुलुख मैदान
हे आले रे, तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 8:44 am | श्रीरंग_जोशी

हे गीत इथे लिहिण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. वडिलांना पण कळवतो.

कवितानागेश's picture

16 Jun 2015 - 4:53 pm | कवितानागेश

पूर्ण कविता इथे दिल्याबद्दल थैंक्स.
आता मला शब्द अडणार नाहीत. हे गाणे हल्ली रोज म्हणतेय मी. :)

तुमचा प्रतिसाद वाचायच्या आधेच वरची प्रतिक्रिया दिली :)

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 8:42 am | श्रीरंग_जोशी

नुकतंच वडिलांबरोबर फोनवरून बोलणं झालं. ते जे गीत म्हणायचे ते त्यांनी त्यांच्या आईकडून ऐकले होते. माझी आजी आता हयात नाही.

यसवायजी's picture

15 Jun 2015 - 6:51 am | यसवायजी

छान माहिती.
पण श्रावणमासी हे बालगीत?.
आपल्या मराठी बड़बड़- गीतांमध्ुन मात्र हा प्रकार नाही आपल्याकडेही अशी बड़बड़गीते असावीत.
लगेच आठवलेले हे एक- सातातलं एक मेलं, गाडीत घालून नेलं.
अजुन पहावे लागेल.

अजया's picture

15 Jun 2015 - 7:12 am | अजया

रोचक लेख.आठवणीतल्या कवितामध्ये अनेक बालगीतं आहेत.परत उघडुन बघते.असे संदर्भ मराठी बालगीतात फारसे आठवत नाहीत पण.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jun 2015 - 7:27 am | अत्रुप्त आत्मा

लेखन आवडले.

शरद's picture

15 Jun 2015 - 8:00 am | शरद

बा नीज गडे नीज गडे श्र्कै.दत्त यांचे गाणे आहे. संपूर्ण कविता पाहिजे आहे कां ?
शरद

श्रीरंग_जोशी's picture

15 Jun 2015 - 8:04 am | श्रीरंग_जोशी

माझ्या वरच्या प्रतिसादात जो दुवा आहे त्यात ही कविता आहे.

परंतु माझे वडिल मी व माझा धाकटा भाऊ लहान असताना आम्हाला झोपवताना गायचे त्यात याच गीताचा अंतरा पूर्णपणे वेगळा होता.

एक एकटा एकटाच's picture

15 Jun 2015 - 8:04 am | एक एकटा एकटाच

लेख आवडला.

शब्दबम्बाळ's picture

15 Jun 2015 - 8:31 am | शब्दबम्बाळ

मला एक बाल-गीत वाचून किळस वाटली होती! ते गाण लहान मुलं म्हणत असतील का? आणि का म्हणत असतील असे प्रश्न पडले होते…
ते गाण एका खुनी बाई वरती रचलेलं आहे.
Mary Ann Cotton also had her own nursery rhyme of the same title, sung after her hanging on 24 March 1873.[2]

Mary Ann Cotton, she's dead and she's rotten,
Lying in bed with her eyes wide open.
Sing, sing, oh what should I sing?
Mary Ann Cotton, she's tied up with string.
Where, where? Up in the air.
Selling black puddings, a penny a pair.

Mary Ann Cotton, she's dead and forgotten,
Lying in bed with her bones all rotten.
Sing, sing, what can I sing?
Mary Ann Cotton, tied up with string.

अद्याप सोलोमन ग्रांडी कसं आठवलं नाही?

का हल्ली नसते ती पुस्तकात? आम्हाला ही पाचवीत होती!

Solomon Grundy,
Born on a Monday,
Christened on Tuesday,
Married on Wednesday,
Took ill on Thursday,
Grew worse on Friday,
Died on Saturday,
Buried on Sunday.
That was the end,Of Solomon Grundy

Collected by James Orchard Halliwell-Phillipps (1842)

काय ती कवीची अक्कल!

सतिश गावडे's picture

15 Jun 2015 - 8:51 am | सतिश गावडे

आम्हाला रोझेश किंवा रोझेस असं काही म्हटलं की साराभाई वर्सेस साराभाई मधला रोझेश आणि त्याच्या (बाल) कविता आठवतात.

हम्प्टी दम्प्टी स्याट ऑन गाडी
गाडीपे बैठा तभी आ गयी दादी
दादीने कहा आजा मेरे पास
क्युंकी गाडीपे बैठना इज सो मिडल क्लास

+१ रोसेश च्या कविता हा फारच रोचक विषय आहे :)

सुनील's picture

15 Jun 2015 - 8:53 am | सुनील

लहान मूलांकारिता लिहिलेल्या कवितांमध्ुन अशा दुख़:द परिस्थिती विषयी टिप्पणी, अथवा जनजागृति वग़ैरे करण्याचा अजिबात प्रयत्न केला गेला नाहीये

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा (बालपणापासूनच लाचेची शिकवण!!)
पैसा झाला खोटा (लाचेतही प्रामाणिकपणा नाही!!)
पाऊस आला मोठा!

आपल्या मराठी बड़बड़- गीतांमध्ुन मात्र हा (धडपडणे, डोके फुटणे, काहीतरी तुटणे नाहीतर कुणीतरी पडणे.) प्रकार नाही

ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाऊन
मडके गेले वाहून!

असंका's picture

16 Jun 2015 - 6:29 pm | असंका

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा (बालपणापासूनच लाचेची शिकवण!!)

_/\_

विशाल कुलकर्णी's picture

15 Jun 2015 - 9:44 am | विशाल कुलकर्णी

रोचक लेख..
प्रतिसादही तितकेच रोचक ;)

बालगीतांवर देखील तत्कालीन संस्कृतीचा प्रभाव हा नेहमीच आढळतो. जर जनसामान्यच राजाच्या किंवा सरकारच्या जुलमाने कंटाळले असतील तर अशा वेळेला त्त्यांचे विचार अशा प्रकारच्या माध्यमातून व्यक्त होता असतात.
आपल्याकडे देखील स्वातंत्र्यपूर्व काळात देखील हेच पाहायला मिळते तत्कालीन नाटकं, सिनेमा किंवा मनोरंजाची जी साधने होती त्यातून ब्रिटीश सरकारप्रतीचा रोष दाखवला आहे. तसेच मंगळागौरीची देखील काही गाणी आहेत ज्यात सासू आणि सुनेचे संबध कसे होते हे दाखवले गेले आहे. भाषा हे व्यक्त होण्याचे साधन असल्यामुळे राग, आनंद, चीड , प्रेम अशा सगळ्या भावना गद्य आणि पद्य स्वरुपात व्यक्त होतात

स्पंदना's picture

16 Jun 2015 - 12:06 pm | स्पंदना

रोचक लेख आणि प्रतिसाद!!

Jyoti Deshpande's picture

16 Jun 2015 - 3:59 pm | Jyoti Deshpande

रोचक लेख..
प्रतिसादही तितकेच रोचक .........
रिन्गा रिन्गा चि story mahiti navhati.
chuk ki barobar bhag vegala........
pan balkavitan chya observation cha ha pailu bhari ch.....

पैसा's picture

16 Jun 2015 - 6:17 pm | पैसा

लिखाण आवडले. वेळ मिळाला की अजून थोडे लिहीन.

गणेशा's picture

16 Jun 2015 - 7:00 pm | गणेशा

मस्त वाटले वाचुन..
संस्क्रुतीतला फरक आहेच...

अवांतर :
पण मराठीच कविता शिकल्याने त्या इंग्रजी कविता जास्त माहितीच नाही...
सुमन कल्यानपुर यांनी गाईलेले .. "निंबोनीच्या झाडामागे ..." ही कविता मला खुप आवडते.. अजुनही बाळाला झोपवताना हीच म्हणतो... त्यातही.. मिट पापण्या डोळ्यांच्या हे म्हणताना काय आवाज आला आहे.. वा..

मला दूसरीतील/तिसरीतील
"इंजिनदादा इंजिनदादा काय करतोस...
कोळसा मी खातो...." ही कविता खुप आवडायची.. ही कविता बाईंच्या ( मॅडमच्या) मागे म्हणताना सर्व मुले त्यांच्या मागे म्हणत अआणि मी त्यावेळेस पुढच्या ओळी म्हणत म्हणुन आईला शाळेत बोलावले होते.. हे आठवले..

नंतर चौथीतील...
आला शिशिर संपत ही कविता आठवते...

त्यानंतर मात्र पाचवी ती आठवी बालभारतीमधील कविता आवडत नव्हत्या.. थेट कविता आवडली ती "कणा" नववीतील...

बालगीतातील आनखिन एक आवडती कविता म्हणजे...

एका तळ्यात होती.. बदके पिले सुरेख..
आई नेहमी म्हणायची हे गाणे...

असे वाटते आहे बरे झाले इंग्रजी कविता लहानपणी ऐकल्या नाहीत ( अजुन तरी कुठे ऐकल्यात म्हणा)

हाडक्या's picture

18 Jun 2015 - 5:18 pm | हाडक्या

बाकी बरेचसे सहमत.. (कदाचित आपण एकाच कालावधीत शाळेत असल्याने असेल )

पण उपरोधाने म्हणावेसे वाटतेय के बरे झाले अजून तुम्ही इंग्रजी कविता ऐकल्या नाहीत अजून कारण जेव्हा मी प्रथम एका इंग्रजाला "एका तळ्यात होती.. बदके पिले सुरेख.." ह्या गाण्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्याने मला हे The Ugly Duckling दाखवलं.. तीव्र फसवणूकीची भावना झाली तेव्हा.. :/

ओह, डॅनिश कवीची ही मुळ कविता आहे तर.. खुप सुंदर .. असे व्हायला नको आहे खरे तर...
अश्या बर्याच कलाकृती आहेत की त्यांची मुळ संक्लपना ज्यांची आहे ते माहीत नसतात.... वाईट वाटते तेंव्हा..

असेच जेंव्हा मैने प्यार कियाचे आवडते गाणे ऐकले आणि नंतर कळले हे दूसर्या गाण्याची कॉपी आहे तेंव्हा ही वाईट वाटलेच होते... असो.. ओरीजनल मग ते कसे का असेना मला प्रिय आहेच

हाडक्या's picture

18 Jun 2015 - 7:54 pm | हाडक्या

प्रिय तर आहेच हो.. आपल्या बालपणाच्या आठवणी त्यात असतात पण ती फसवणुकीची भावना त्याला गालबोट लावून जाते इतकंच..

हाडक्या's picture

18 Jun 2015 - 7:54 pm | हाडक्या

प्रिय तर आहेच हो.. आपल्या बालपणाच्या आठवणी त्यात असतात पण ती फसवणुकीची भावना त्याला गालबोट लावून जाते इतकंच..

मी बरीच मराठी बालगीतेही आजकाल मुलाला शिकवते तेव्हा त्यांतही हा प्रकार दिसतोच.

वर "येरे येरे पावसा", "ये गं ये गं सरी" चा उल्लेख आलाच आहे.

अजून मला आठवणारी -

"भात केला, कच्चा झाला,
पोळी केली, करपून गेली",

"बदका बदका नाच रे,
तुझी पिल्लं पाच रे,
एक पिल्लू मेलं,
गाडीत घालून नेलं"

"चिव चिव चिमणी, गाते गाणी,
बांधले घरटे, झाले उलटे,
पडले पिलू, बघते नीलू,
नीलूने बोट लावले, पिलू नीलूला चावले"

"बाळाची वाटी सांडली, मांजर चाटू लागली"

केतकी_२०१५'s picture

18 Jun 2015 - 7:56 am | केतकी_२०१५

दोन गीता मागील भावना नव्याने कळली. प्रसिद्ध कवीतेचा उगम कळला. पद्मवति, तुम्ही दिलेल्या महितिबद्दल धन्यवाद.

इरसाल's picture

18 Jun 2015 - 4:43 pm | इरसाल

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरविते
नकटे नाक उडविते
भात केला कच्चा झाला
पोळी केली करपून गेली
आडाचं पाणी शेंदायला गेली
धप्प्कन पडली आत,
दोनच पडले दात.

ज्याय्ला,नवीन सुंदर घार्‍या डोळ्यांची गोरीपान पोरगी आणली लग्न करुन पण सैपाक नीट येईना म्हणुन आडात ढकलली का क्कॉढ, रहाटावर पडुन बचावली नी दातांवर निभावले असा अर्थ नाय निंगाला म्हणजे मिळवली.

तरी आश्चर्य वाटेल पण आपल्या समोर असलेली ही युरोपियन बडबड गीते ही गेल्या १५०-२०० वर्षात फारच सौम्य केलेली आहेत. मध्यंतरी एक संशोधनात्मक पुस्तकाचा गोषवारा वाचला होता, त्यात त्यांनी जुनी बडबड गीते आणि त्यांचे नवीन सुधारित (सेंसॉर्ड) रूप यावर मिमांसा केली होती.
जुनी युरोपियन बडबड गीते इतकी बीभत्सता, हिंसा, क्रौर्य आणि अश्लीलतेने भरलेली दिसतात की प्रश्न पडतो ही नक्की मुलांसाठीच होती ना ?

अर्थात आपल्याकडेही गावाकडे बरीच लोकगीतं जी की त्यांच्या मते मुलांसाठीची गीतं होती त्यात क्रौर्य आणि इतर गोष्टी होत्याच. फक्त ती गीतं आज राहिली नाहीत बरीचशी, i guess. (मला एक आठवतेय त्यात मांडी चिरणे, त्यात कायतरी ठेवणे, आणि कसले कसले शाप होते. )

.तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी.

..हाय हाय काचेवर पाय..

.अशी निगेटिव्हही आहेत.

.इंग्रजीत अजून एक आहे गाणं.शब्द आठवत नाहीत.डुकरीण आणि पिल्ले..रेल्वे इंजिन ड्रायव्हर रॅन ओव्हर देम.

रेवती's picture

18 Jun 2015 - 7:47 pm | रेवती

लेखन आवडले.
आपल्याकडे एक बडबडगीत होते ते आता नीटसे आठवत नाही. त्यात एक होती मंदा, खसाखसा कांदा चिरला, मग बोटाला विळी लागून रक्त आलं वगैरे उल्लेख होते. मला ती सासूरवाशीण डोळ्यासमोर येत असे.

..मी वर दिलेली एक ओळ त्यातलीच आहे.

बरं का गं मंदा,काय झालं एकदा..असं गाणं आहे.

..डोळ्याला चिकटली कांद्याची साल.
..हाय हाय काचेवर पाय..काच गेली पायात आता करायचं काय.

वगैरे ओळी आहेत.

.विंचवाची केली भाजी.ती खाल्ली मामीने..मामीला आली ओकारी..असेही दुसरे एक आहे.

आनंदी गोपाळ's picture

19 Jun 2015 - 12:11 pm | आनंदी गोपाळ

मुळ रूप -रिंग-ओ-रिंग-ओ-रोझेस, पॉकेट फुल्ल ऑफ पोसिस, अॅशस अॅशस वी ऑल फॉल डाउन.

याचा साधारण अर्थ असा की प्लेग चे लाल गुलाबी पुरळ आपल्या अंगावर उठले आहे. त्यावर उपाय काय तर पोसिस ही वनौषधि त्यावर लावा. पण शेवटी काय होणार? तर शेवटी सगळीजण राख रांगोळी होवुन पडणार. प्लेग च्या संसर्गाचया भीतीने त्या वेळी नेहमी-प्रमाणे दफ़न न करता मृतकांचा दहन विधि करणे सुरू झाले होते.

<<

Ring-a-ring-a roses,
A pocket full of posies,
A-tishoo! A-tishoo!
We all fall down.

रोझेस हा लाल रंगाचा पुरळ.

पॉकेट फुल ऑफ पोसिज = जांघेत जी ओळंब्याची गाठ येते. (Lymphadenitis) ती "खिसाभर" असते. अशाच गाठी बगलेतही येतात. पण इथे टेस्टिक्युलर स्वेलिंगही अभिप्रेत आहे. ;)

आशेस वगैरे काही नसून ते हश्शा हुश्शा किंवा वर दिलंय ते A-tishoo! A-tishoo! = शिंकांचा आवाज आहे. एयरबोर्न इन्फेक्शन.

शेवट आपण सगळे "फॉल डाऊन" अर्थात आजारी/मृत्यूमुखी पडतो, असा अर्थ आहे.

माझ्या आठवणीप्रमाणे हे प्लेग नसून जर्मन मीसल्स चे वर्णन आहे.

पद्मावति's picture

19 Jun 2015 - 2:42 pm | पद्मावति

ashes ashes वी ऑल फॉल डाउन हे अगदी पहिलं छापिल वर्णन आहे. तुम्ही म्हणता ते a tishoo a tishoo हे अजूनही एक version आहेच. माझ्या माहितीप्रमाणे तरी त्या काळी पोसिस या औषधाचा उपयोग प्लेग च्या गाठी/ पुरळ यावर लावायला होत असे. अर्थात माझी ही माहिती पण काही खात्रीची असेल असहि नाही. ती पण कथा कादांबरी आणि गूगल ह्याच्या आधारावरच आहे. तुम्ही म्हणता तसहि असेल.

आनंदी गोपाळ's picture

19 Jun 2015 - 8:30 pm | आनंदी गोपाळ

वाद घालण्यासाठी नव्हे, तर हिस्टरी ऑफ मेडिसीन हा माझ्या जिव्हाळ्याचा व सध्याच्या अभ्यासाचा विषय आहे, त्यात भर पडेल तशी बरे, यासाठी,

posy1
ˈpəʊzi/
noun
plural noun: posies

1.
a small bunch of flowers.
synonyms: bouquet, bunch, bunch of flowers, spray, nosegay, corsage; More
buttonhole, boutonnière;
raretussie-mussie
"a posy of snowdrops and violets"
2.
archaic
a short motto or line of verse inscribed inside a ring.

असे दिसते.

आता यात पोसीज साठी औषध हा अर्थ दिसला नाही. मात्र पोसी चा अर्थ गुच्छ असा होतो, तो लिंफॅडिनायटीसला चपखल बसतो.

पद्मावति's picture

19 Jun 2015 - 2:48 pm | पद्मावति

posy/posies या वनौषधी/ फुलांचा उपयोग प्लेग मधे होत असे. बहुतेक, एकतर पुरळावर लावायला अथवा त्या रोगमुळे शरीराला येणार्‍या दुर्गन्धिला झाकायला असा उल्लेख आहे.

सुबक ठेंगणी's picture

21 Jun 2015 - 2:42 pm | सुबक ठेंगणी

posy/posiesचा अर्थ थडग्यावर वहायला आणलेला पुष्पगुच्छ असाही लावता येईल का?
म्हणजेच रिंगा-रिंगा रोझेस सारखे लाल पुरळ अंगावर उठले की त्याचा शेवट posy/posies वाहिलेल्या थडग्यातच होतो असंही म्हणायचं असू शकतं का?

पद्मावति's picture

21 Jun 2015 - 3:16 pm | पद्मावति

सुबक ठेंगनी,
सॉरी तुम्हाला दिलेला प्रतिसाद चुकून खाली गेला आहे.

..असेच काही नाही..फुले गोळा करणारी लहान मुले..बागेत एका टैपच्या फुलांनी खिसे भरेपर्यंत ती गोळा केलीयेत.आता गोल गोल टपोरे गुलाब दिसले..हाश्श हुश्श दमलो बुवा असं म्हणत ते धरणीतलावर देह टाकते जाहले.
किंवा... परागकण अ‍ॅलर्जी..

सुबक ठेंगणी's picture

22 Jun 2015 - 7:55 pm | सुबक ठेंगणी

गविकल्पना :)

पद्मावति's picture

21 Jun 2015 - 3:09 pm | पद्मावति

मला वाटते की कुठल्याही जुन्या कविता म्हणा की कथा घ्या. अगदि आद्य कवीला जो अर्थ अपेक्षित असतो तो असतोच पण त्यानंतर त्याचे निरनिराळे versions निघतात. तेही मूळ अर्थात भर टाकत असतात आणि तेही योग्यच असतात. काही काळानन्तर मूळ अर्थ कुठेतरी लोपला जातो, बदलला जातो किन्व्हा त्याला एक नवीनच छान रूप मिळते. असेच होऊ शकतं की या कवितेबाबत सुद्धा असच झाले असणार.
सर्व प्रतिसादांचे खूप खूप आभार. मी कधीही न ऐकलेल्या कविता, गाणी या लेखाच्या निमित्ताने मला समजल्या. नवीन माहिती कळली. माझे विचार, मला जे वाटतं त्यापेक्षा काहीतरी वेगळं असु शकतं. नवीन पैलू, वेगळे विचार आणि छान माहिती असे बरेच या लेखामुळे मला कळले. धन्यवाद.

आपल्याकडेही काही बडबड गीते आहेत त्यात तुटणे फुटणे आहे पण त्यातून काही शिकवण मिळते असे मला वाटते.
जसे
१) एक होती इडली
ती खूप चिडली
पटा पटा पडली
सांबारात जाउन पडली
चमचा आला ख़ुशीत
जाऊन बसला बशी
चमच्याने पाहिले इकडे तिकडे
इडलीचे केले तुकडे तुकडे

२) एक होते माकड
त्याला मिळाला पापड
माकड चढले झाडावर
पापड पडला जमिनीवर
झाड होते वाकडे तिकडे
पापडाचे झाले तुकडे तुकडे.

भिंगरी's picture

21 Jun 2015 - 4:17 pm | भिंगरी

मधल्या ओळी राहिल्या....
सांबरात जाऊन पडली
सांबार होतगाररम गरम
इडली झाली नरम नरम
चमच आला खुशीत

घासले अंग बहुबळे..रक्त त्यामुळे वाहू लागले..घाबरा झाला..कावळा शेवटी मेला..

राही's picture

22 Jun 2015 - 9:00 pm | राही

आपली बडबडगीते किंवा शिशुगीते ही परंपरेतून आलेली नाहीत. ती सर्व बहुधा गेल्या सत्तर-ऐशी वर्षांत त्या काळातल्या मुलांसाठी खास लिहिली गेली आहेत. जयवंत दळवी किंवा पुलंसारख्या दोन पिढ्याआधीच्या लेखकांच्या साहित्यात याचे उल्लेख सापडतात. मिस मेरी भोर हे एक नाव आठवते. बहुधा 'वाहवा वाहवा चेंडू हा, सुंदर कितीतरी खचित अहा' हे गीत त्यांनी रचलेले आहे. मागच्या काही पिढ्यांच्या पाठ्यपुस्तकांत असलेल्या कविता (पारंपरिक बडबडगीते नव्हेत) याच बहुधा त्यांच्या मुलांनातवांना पारंपरिक बडबडगीते वाटतात. पुलंनी त्यांच्या लेखनात याविषयी वेळोवेळी टिप्पण्याही केल्या आहेत. त्यांच्या बालपणाचा आणि विद्यार्थिदशेचा उल्लेख बरेचदा त्यांच्या लिखाणात येतो आणि त्यात असे सोपे निर्मळ साहित्य लहानपणी न लाभल्याबद्दल हमखास खंत असते. मनोरमाबाई रानडे, श्री.बा. रानडे यांनीही पाठ्यपुस्तकांमध्ये सोपेपणा आणण्याचे काम केले आहे. पारंपरिक बालगीतांचा, अंगाईगीतांचा एक संग्रह कै. इंदिराबाई संतांनी संकलित करून प्रकाशित केला आहे. 'डोल ग झांभळी डोलाच्या, रत्नासारख्या बोराच्या' किंवा 'कीर कावळा, मोत्याचा दाणा,' 'गाई ये, हम्मा ये, अमुक बाळाला दुदू दे', ये ग गाई जा ग रानी खा ग पाने जांभळीची, 'दळू ग बाई दळू, एका ग पोपलीचं, माझ्या ग छकुलीचं पोट छोटं' अशी अनेक गाणी त्यात आहेत. लोकगीतांमध्ये अनेक बडबडगीते आहेत. त्यांचेही संकलन दुर्गाबाई, सरोजिनी बाबर यांनी केलेले आहे.

राही's picture

23 Jun 2015 - 12:29 pm | राही

पारंपरिक ब्रिटिश बालगीते कशी क्रूर आणि सध्याच्या मापदंडानुसार अश्लील होती यासंबंधी मला वाटते श्री.अरविंद कोल्हटकर यांनी 'ऐसि'वर एक लेख लिहिला आहे. मला दुवा लवकर सापडल्यास टाकीनच. तोपर्यंत तो कुणाला मिळाल्यास इथे टाकावा ही विनंती.

मनीषा's picture

24 Jun 2015 - 5:00 am | मनीषा

लेखनाचा विषय छान आहे.
रिंगा रिंगा बद्दल नविन माहीती कळली.
मराठी बालगीतात देखिल काही नकारात्मक कविता आहेत. ज्यात वाईट गुणांचे मजेशीर वर्णन आढळते , त्यामुळे त्याचा वाईटपणा विस्मृतीत जातो.
ये रे ये रे पावसाचा उल्लेख आला आहेच.

आणखी काही -
१) दोन बोक्यांनी आणला हो चोरून लोण्याचा गोळा ...
२) एका माकडाने काढलय दुकान - आली गिर्‍हाईके छान छान
मनीने आणले पैसे नवे - म्हणाली ताजे उंदीर हवे .. छान छान :)
३) एक कोल्हा बहु भुकेला - फार होता कावला
एक तुकडा परी न त्याला खावयासी गावला
.... सगळं जंगल धुंडाळल्यावर त्याला मांसाचा तुकडा चोचीत घेतलेला कावळा दिसतो . कोल्हा त्याची खोटी स्तुती करताना म्हणतो
कोकीळेचे आप्तं तुम्ही घरीच त्यांच्या वाढला.
कावळा खुष होतो .. मग
मुर्खं वेड्या कावळ्याने रागदारी मांडली
चोची मधली चीज त्याच्या त्वरीत खाली सांडली

अजूनही आहेत काही

इंग्रजी मधे
सिंग अ साँग ऑफ सिक्स पेन्स् ...
मेड वॉज इन द गार्डन - हँगिंग अप द क्लोथ
डाउन केम द ब्लॅक बर्ड अ‍ॅण्ड पेक्ड ऑन हर नोज

हे पण आहे.

राही's picture

24 Jun 2015 - 11:06 am | राही

गेल्या साठसत्तर वर्षांत मराठीत बालसाहित्याचे वेगळी शाखा निर्माण झाली. त्या काळात आकाशवाणीवरून प्रसृत होणारे गम्मत जम्मत सारखे कार्यक्रम जसे याला कारणीभूत आहेत तशीच किशोर, आनंद सारखी मुलांसाठीची मासिके आणि प्रमुख वर्तमानपत्रांनी सुरू केलेले बालविभागही कारणीभूत आहेत. या कार्यक्रम आणि नियतकालिकांमुळे मुलांसाठी असे खास साहित्य मुद्दाम निर्माण केले गेले. 'लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना, खरं म्हणा खोटं म्हणा तिथे येती रोगी नाना' हे मला वाटते मूळ एक नभोगीत आहे. तसेच 'आमच्या चिमणीचे लगीन, वर्‍हाडी येतील कोण कोण' हेही मूळ नभोवाणीवरून प्रसृत झालेले असावे. अ आ आई म म मका किंवा लबाड लांडगं ढ्वांग करतंय ही सिनेगीते आहेत. देवबाप्पा आणि बोलकी बाहुली चित्रपटांतली गानी खूप लोकप्रिय झाली आणि त्यापैकी काहींचा पाठ्यपुस्तकांतही समावेश झाला.
ही गीते मुद्दाम लिहिलेली असल्यामुळे मौज-मजा, चुटकुले, निखळ करमणूक असेच त्यांचे स्वरूप राहिले. फारच झाले तर एखादा संदेश अथवा तात्पर्य. तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे दर्शन वगैरे त्यातून होत नाही. बाहेरचे वास्तव कठोर असताना ते दाखवून मुलांची मने का दुखवा, असा विचारही त्यामागे असू शकतो.
पारंपरिक लोकगीतांचे (यात लोकगीते, स्त्रीगीतेही आली) मात्र तसे नाही. सुखदु:ख ,मनुष्यस्वभाव, नात्यातले ताणेबाणे, ,पीक-पाणी, दुष्काळ, सुगी, गाडीघोडे, बैल इयादि गोठ्यातली जनावरे, थोडक्यात त्या काळच्या जीवनपद्धतीचे मोठे हृदयंगम चित्र या गीतांतून उमटले आहे.

पद्मावति's picture

24 Jun 2015 - 11:35 am | पद्मावति

राही,
सॉरी या धाग्यावर शेवटचे येऊन एकदोन दिवस झाले म्हणून प्रतिसादाला हा उशीर. छान विश्लेषण केलेत तुम्ही. बाळगीते आणि नाभोगीत, सीनेगीत यातला सूक्ष्म फरक दाखविला तो मला माहीत नव्हता. तुम्ही अरविंद कोल्हटकरांचा लेख म्हणलात तो मिळाला तर नक्की लिंक द्या. गूगल सर्च वर बरीच गाणी आणि त्याचे अर्थ आहेत पण एखाद्या आपल्या भारतीय व्यक्ती ने आपल्या दृष्टीकोनातून केलेले विश्लेषण नक्कीच जास्त रोचक आणि माहितीदार असेल.