रिंगा रिंगा रोझेस आणि श्रावण मासी.....
लेखनप्रकार
लहान असतांना आम्ही एक खेळ खेळायचो. रिंगा-रिंगा रोझेस म्हणत एकमेकांचा हात धरून गोल गोल फिरायचे आणि मग ते हाशा-हुशा करत धड़ामकन खाली पडायचे... ते गोल गोल फिरण्यात आणि पडण्यात आम्हाला फारच मजा यायची...आमचा हा अगदी फ़ेवरेट टाइमपास होता.
पुढे कधीतरी एक पुस्तक वाचत असतांना त्यात या खेळाचा उल्लेख वाचला. तो असा कि सोळाव्या शतकात लंडन मधे प्लेग ने धूमाकुळ घातला होता. लाखो लोक मृत्यु पावले होते. वर वर अतिशय निरागस वाटणाऱ्याया खेळाची पार्श्वभूमि या महाभयानक ग्रेट प्लेग ची होती.
मुळ रूप -रिंग-ओ-रिंग-ओ-रोझेस, पॉकेट फुल्ल ऑफ पोसिस, अॅशस अॅशस वी ऑल फॉल डाउन.
याचा साधारण अर्थ असा की प्लेग चे लाल गुलाबी पुरळ आपल्या अंगावर उठले आहे. त्यावर उपाय काय तर पोसिस ही वनौषधि त्यावर लावा. पण शेवटी काय होणार? तर शेवटी सगळीजण राख रांगोळी होवुन पडणार. प्लेग च्या संसर्गाचया भीतीने त्या वेळी नेहमी-प्रमाणे दफ़न न करता मृतकांचा दहन विधि करणे सुरू झाले होते.
ही कथा वाचल्यावर मात्र आता कोणी लहान मूले हे म्हणत असतील तर ऐकुन मनात कसंतरिच होतं.
नंतर ज़रा या विषयी विचार केला, ज़रा गूगलून बघितले तर मला लक्षात आले की अरे, फक्त हेच गाणे नाही पण अशी अनेक इंग्रजी बालगीते आहेत ज्यामागे मागे काही ना काही तरी काळी बाजू आहे. त्या गीतांवर त्या त्या वेळेसच्या सामाजिक, राजकीय परिस्थितिचा, अनिष्ट प्रथांचा पगड़ा आहे. सरळसोट पणे कधीही नाही पण आड़वाटेने मात्र त्या चालीरितींचा वेळोवेळी विरोध केलेला दिसतो.
जसे बा बा ब्लॅकशिप ही कविता. ह्या कवितेत काय आहे? तर तीन ब्यागा भरुन लोकर आहे. पण ती कोणासाठि? तर वन फॉर द मास्टर - राजाला टॅक्स. वन फॉर द डेम- इथे अर्थ चर्च ला जो वाटा जातो तो आणि लहान मुलाला? त्या कष्टकऱ्याला काय तर जेमतेम एक पोतं.
किंग एडवर्ड दूसरा हा लोकरिवर भरमसाठ कर वसूल करीत असे. बा बा ब्लॅकशिप या गाण्यात या अन्यायाचा आपल्या परीने निषेध केला आहे. आता विरोध खुलेआम तर करणे शक्यच नाही. नाहीतर आपल्या मानेची आणि राजाच्या तलवारीची भेट होणे नक्की. मग असा काहीतरी केविलवाणा प्रयत्न करुन मनाचे समाधान करा.
अज़ून एक बाजू मला लक्षात आली ती अशी की बऱ्याच बालगीतांचा एक समान पैलु आहे. तो म्हणजे त्यातील धडपडणे, डोके फुटणे, काहीतरी तुटणे नाहीतर कुणीतरी पडणे....उदाहरणे कितीतरी आहेत. जसे--लंडन ब्रिज इज फॉलिंग डाउन, हम्प्टि-डम्प्टि हॅड ए ग्रेट फॉल, रॉक अ बाय बेबी--व्हेन द बाउ ब्रेक्स, क्रेडल विल फॉल वग़ैरे वग़ैरे. त्यात सर्वात लोकप्रिय - जॅक फेल डाउन- ब्रोक हिज़ क्राउन इत्यादि......
आपल्या मराठी बड़बड़- गीतांमध्ुन मात्र हा प्रकार नाही. असेलसुद्धा पण मला तरी आठवत नहिये. मला लक्षात असलेली गाणी म्हणजे श्रावण मासी - हर्ष मानसी, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला वग़ैरे...सगळे कसे छान छान.
लहान मूलांकारिता लिहिलेल्या कवितांमध्ुन अशा दुख़:द परिस्थिती विषयी टिप्पणी, अथवा जनजागृति वग़ैरे करण्याचा अजिबात प्रयत्न केला गेला नाहीये.
मला तर वाटत ते योग्य ही आहे. अन्यायाचा प्रतिकार, वास्तविकतेची जणिव या सर्व गोष्टिंकरिता तर उभा जन्म आहेच त्यासाठी बाळपणापासुन का म्हणुन त्यांना वेठीला धरा...राहु दया ना त्या पिल्लांना ज़रा परिकथेच्या राज्यात....जिथे सगळं काही ठीक आहे, मस्तं मजेदार आहे. जिथे बागडत असतांना त्यांना वाटावं की या जगात All is well.......
अर्थात हे सगळे माझे निरीक्षण, विचार आहेत. ते चुकीचे असतील अथवा एकांगीही असतील. तुमचेहि विचार येऊ द्या.
वाचन
13347
प्रतिक्रिया
59