म्हणी मॅन्चेस्टर युनायटेडच्या

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
19 May 2015 - 12:12 pm

ब्लॉग दुवा हा

a

मी मॅन्चेस्टर युनायटेड चा फॅन आहे. हे सांगितल्यावर आणखी प्रस्तावनेची आवश्यकता नाही असं समजतो. तर, प्रिमियर लीग २०१४-१५, त्यातील मॅन्चेस्टर युनायटेड चा खेळ, यश/अपयश, पुढील लीगच्या दृष्टीने वाटचाल, खेळाडू, इत्यादी विषयांवरचा हा माझा एक म्हणी टेक. आय मीन, फनी टेक. मराठी म्हणींमधून मॅन्चेस्टर युनायटेड कडे बघण्याचा प्रयत्न. पुढे वाचूनतुम्ही काही मत बनवण्याच्या आधीच सांगतो. आय बिलीव्ह इन वॅन हाल अँड द प्लेयर्स. द नेक्स्ट सीझन इज अवर्स.

१) एक ना गोल, भाराभर फॉर्मेशन्स - लुई वॅन हाल आल्यापासून प्लेयर्स ना आपण नक्की कुठल्या पोझिशनवर खेळतो याचा संपूर्ण विसर पडला असणार. कारण कुणालाही कुठेही खेळायला सांगण्याचा त्याने सपाटा लावला होता. ३-५-२ काय ४-४-२ काय ४-१-४-१ काय आणि अनेक प्रकार झाले. स्ट्रायकर मिड्फिल्ड ला खेळले, लेफ्ट बॅक राईट बॅक ला खेळले, राईट बॅक विंगर म्हणून खेळले आणि काय वाट्टेल ते.

२) दैव देतं आणि डिफ्लेक्शन नेतं - या सीझन मधे ३ महत्वाच्या सामन्यात डिफ्लेक्ट झालेल्या शॉट मुळे प्रतिस्पर्ध्याला गोल मिळाला आणि मॅन्चेस्टर युनायटेडचा हातात आलेला विजय हुकला.

३) गोलचा नाही ठाव आणि म्हणे राडामेल फाल्काव - दुर्दैवी अशा या सायनिंगने अख्या सीझन मधे ४ गोल केले. तेही कन्व्हिन्सिंग वाटणारे नाहीत. क्रुशियल पोझिशन मधे स्लिप होण्याचा शाप जो काही या फाल्काव ला लागलाय तो खरंच वाईट आहे. पुढे तो राहील का नाही युनायटेड मधे, ठाऊक नाही.

४) असेल चँम्पियन्स लीग तर लागेल प्लेयर्सची रीघ - टॉप फोर मधे युनायटेड निश्चित आहे. त्यामुळे ही म्हण फारच रिलेवंट झालेली आहे. याबद्दल दुमत असू शकतं. गेल्या वर्षी चँपियन्स लीग नसूनही भारी सायनिंग्स झाली. हेच युनायटेडच्या नावाचं यश आहे. इट्स द क्लब एव्हरीवन वाँट्स टू प्ले फॉर. पण सध्या मटेरियलिस्टिक अ‍ॅप्रोच असलेले प्लेयर्स जास्त आहेत.

५) डोकं मारीन तिथे गोल करीन - मरुआन फेलेनी ने या सीझन मधे आपल्या उंचीची कमाल दाखवली. वॅन हाल चा विश्वास सार्थ ठरवत काही क्रूशियल गोल केले. "अँड इट्स हेडेड इन्टू द पोस्ट बाय फलेनी....." ..... चक्क सेंटर फॉरवर्ड खेळला हो तो अनेकदा.

६) भरवशाच्या प्लेयर ला इंज्युरी - सीझन च्या सुरुवातीला युनायटेड संघ इंज्युरीज ने ग्रासलेला होता. त्यामुळे निश्चितच निकालांवर परिणाम झाला. पण ज्या प्लेयरवर अवलंबून रहावं तोच प्लेयर इंजुअर्ड होई.

७) गोल केल्यावाचून विजय दिसत नाही - वॅन हाल च्या पझेशन गेमवर अनेकांनी ताशेरे ओढले. वेन यु डॉमिनेट द गेम, यू मस्ट ऑलसो, विन ! हे त्याचं वाक्य त्यानेच ऐकावं पुन्हा. गोल नसेल तर पझेशन ला अर्थ नाही.

८) अडवून बिडवून भागले आणि मॅड्रिड चे वेध लागले - डेविड ड हेया. न जावो तो युनायटेड सोडून, पण गेला तर मात्र.... हेच.

९) हरत्याला ड्रॉ चा आधार - या सीझन मधे जर एखाद दोन गेम युनायटेड ड्रॉ न करता हरले असते तर आज टॉप फोर मधे कदाचीत नसते.

१०) स्ट्रायकर पेक्षा मिडफील्ड जड - इथे वाद होऊ शकतो. नक्की मिडफिल्ड ने मार खाल्ला की स्ट्रायकर कमी पडले हे या सीझन मधे कळत नाहीये. पण स्ट्रायकरच कमी पडले; त्यापेक्षा मिडफील्ड चांगलं होतं, असं माझं मत.

११) नाव डी-मारिया आणि पासेसचीही बोंब - हा प्लेयर नावाला जागला नाही; या सीझन मधे तरी. ५९.७ मिलियन खर्चून आणलेल्या प्लेयर ने फक्त मोजके स्ट्रेट पासेस करावे आणि सब्स्टिट्यूट व्हावं हे शोभत नाही. कारणं अनेक असतील. पण हे असं आहे.

१२) ना विंगर ना डिफेन्डर - भलभलत्या पोझिशन मधे खेळून प्लेयर्स ची झालेली अवस्था

१३) मिडफील्डमधून आला आणि गोलस्कोरर झाला - युआन माटा ! प्रचंड ट्यालेंटेड प्लेयर. लई पुढे जाईल. होपफुली युनायटेडमधेच राहील. ही म्हण फेलेनीलाही लागू होते.

१४) जुन्याला स्टार्ट आणि नव्याला बेंच - वॅन हाल ने साईन केलेले दोन भारी प्लेयर्स ज्यांचा वर उल्लेख झाला, हे बेंचमास्टर ठरले. डी-मारिया आणि फाल्काव, या दोघांच्या नशिबी स्टार्ट्स कमीच आले. त्यांच्याऐवजी जुनेच प्लेयर्स पसंतीस उतरले.

१५) नवीन सायनिंगला पैसे ओता, कालचा संघ बरा होता - सरतेशेवटी असं वाटल्यावाचून राहत नाही. १२-१३ ची लीग मारणाराच अर्धा अधिक संघ आजही आहे. पण नवीन प्लेयर्स येत गेले आणि खेळ बदलत गेला. नवीन मॅनेजर आला की हे होणारच म्हणा.

असो. पुढचा सीझन युनायटेडच मारेल अशा पूर्ण विश्वासात फॅन्स आजही आहेत; आणि उद्याही राहतील.
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड,
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड,
ग्लोरी ग्लोरी मॅन्स युनायटेड,
अ‍ॅज द रेड्स गो मार्चिंग ऑन ऑन ऑन !

शब्दक्रीडाक्रीडाविचार

प्रतिक्रिया

पाटील हो's picture

19 May 2015 - 12:16 pm | पाटील हो

वाचतोय.....

टवाळ कार्टा's picture

19 May 2015 - 12:30 pm | टवाळ कार्टा

खिक्क...

-(Gunner by heart)

चुकलामाकला's picture

19 May 2015 - 12:39 pm | चुकलामाकला

लय भारी!

रंगासेठ's picture

19 May 2015 - 1:27 pm | रंगासेठ

एकदम भारी म्हणी. यंदाच्या सिझनला साजेश्या. मधल्या काळात सलग सामने जिंकून आशा उंचावलेल्या, पण ऐन्वेळचे पराभव महागत पडले. नाहीतर टॉप थ्री मध्ये असतो आत्ता!

'डेविड डे हेआ' पण माद्रिद्ला चालला राव.

वेल्लाभट's picture

19 May 2015 - 2:07 pm | वेल्लाभट

हो ना..... न जावो अजूनही आशा आहे.

अनुप७१८१'s picture

19 May 2015 - 1:30 pm | अनुप७१८१

जबरदस्त !!!!! अतिशय सुरेख वापर केलआयस्....मजा आ गया

उथळ पाण्याला खळखळाट फार .... जानुजाय / फाल्काओ / ल्युक शो !

वेल्लाभट's picture

19 May 2015 - 1:33 pm | वेल्लाभट

पहिले दोन ठीक पण लुक शॉ अपिअर्ड लाईक अ रॉक व्हेन ही प्लेड

अनुप७१८१'s picture

19 May 2015 - 1:38 pm | अनुप७१८१

अजुन सिद्ध करायचय त्याला !

अनुप७१८१'s picture

19 May 2015 - 1:32 pm | अनुप७१८१

अपने गलि के शेर.....
कहि अन्शी ह्य हन्गामात तसच झालय :(

अद्द्या's picture

19 May 2015 - 2:22 pm | अद्द्या

मुरिन्हो ने माटा घालवला . लै वाइट वाटलं तेव्हा. पण चलता है . .

परत एकदा चेलसी वी मॅन्चेस्टर युनायटेड लीग रेस बघण्यास उत्सुक आहेच . .

बाकि लिवरफूल आणी इतरांबद्दल काय बोलणार

ज्यांचा झाला गवगवा ते बसले डग्गात .
फुटबॅाल खेळात आणि खेळ बघण्यात जी मजा ती दुसय्रा खेळांत नाही .बाकीचे played by 22 and watched by 22 thousands.
फाडु लिहिलंय।

च्या मारी ! जबरदस्त हाणलय!

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 7:24 am | श्रीरंग_जोशी

फुटबॉलमध्ये रस नसला तरी या म्हणींचा असा वापर आवडला.