न न न कविता

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
16 May 2015 - 7:12 pm

त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........

कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......

इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....

..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?

फ्री स्टाइलमुक्तकविडंबन

प्रतिक्रिया

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2015 - 7:45 pm | माम्लेदारचा पन्खा

प्यायची तुमी…. आन अर्थ का काय ते आमास्नी कस्काय कलावं ???

तरीही "न पिताही समोरच्याला प्याल्यासारखं वाटावं" हेच यश आहे कवितेचं !!

टवाळ कार्टा's picture

16 May 2015 - 7:52 pm | टवाळ कार्टा

अ आ आंह
आह ओह स्स्स
सण्णी लोणी
.........
डूर्र डूर्र डूर्र
मठाधिपती
तांबिय संस्थान
.........
टवाळ मी
तळतो जिल्ब्या
मिपा मिपा
.........
खात खात क्वीता टाकली आहे, कामाच्या डोक्याला मुंग्या लाग्ल्या. कोणी मला अर्थ असलेल्या क्वीता शिकवेल कै?

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2015 - 7:54 pm | माम्लेदारचा पन्खा

सं मं इकडे लक्ष देईल काय ??? :-))

टवाळ कार्टा's picture

16 May 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा

उग्गीच चैला...

माम्लेदारचा पन्खा's picture

16 May 2015 - 8:18 pm | माम्लेदारचा पन्खा


अ आ आंह
आह ओह स्स्स
सण्णी लोणी

तुमी मंजे अगदी साग्रसंगीत भजनच लावलंय !! आनी पुढ्च्याच ओळीत तांब्या????????

अ रा रा रा रा रा ...........

टवाळ कार्टा's picture

16 May 2015 - 9:06 pm | टवाळ कार्टा

आम्ही बाराखडीच्या ऐवजी सन्नीखडी शिकलोय ;)

लैच वंगाळ लिवलय राव़
काय बि समजना झालय

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2015 - 7:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

डोक्याला फार मुंग्या आणू नका... पिऊन फॅस झाल्यावर असं काही होणं नॉर्मल असतं ;) :)

विवेकपटाईत's picture

18 May 2015 - 8:11 pm | विवेकपटाईत

त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........
शिळी भाकर खाऊन कुणाचेच पोट भारत नाही. तसेच तुकांत कविता वाचून, कवितेची भूक भागणार नाही.
कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......
आजकाल
कावळ्यांना भाव आहे. शब्द, भाव, गायकी नसलेले नसलेले गाणे व काहीच न करणाऱ्या कविता किती गाजतात आहे. कोकिळेला कुणीच विचारात नाही.
इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....
अध्यात्मिक चिंतन करणारे आणि अगम्य भाषेत दर्शन मांडणारे लोक म्हणजे .....

मस्त अर्थ .. मी वेगळा अर्थ लावला होता सुट्ती असल्याने येथे द्यायचा राहिला होता..
असाच देतो पण तुमचा अर्थ एकदम छान कारण कविता त्यानुसारच आहे..

माझे अर्थ :

त ते तुक
क के कुक
शिळी भाकर

तु कीती ही कुक म्हणशील स्वतास .. शेवटी ती शिळी भाकरच माझ्या नशिबाची... माझी मलाच लखलाभ
(तुक चा अर्थ माहित नाही, म्हणुन तु असा घेतला होता)

.........

कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा

.......
कावळ्यांच्या गोंगाट.. जणु तेच गायनाचार्य... आज खरेच कोकिळा मात्र अश्याच बुजलेल्या..विस्मरणात गेलेल्या...
बुर्ज्वा शब्द माहीत नव्हता म्हणुन त्याचा अर्थ बुजलेल्या असा घेतला होता.

इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू

हे कडवे मला चुकल्या सारखे वाटले.. वरील दोन्ही कडव्यातील अर्थ येथे भासवता आला नाही( कारण ग्लास संपला असेल कदाचीत)

अर्थः
माझ्य अस्तित्व छोटे आहे... तरीही आयुष्याशी युद्ध खेळुन मी लढतो आहे.. त्याच आनंदात मी उड्या मारतो आहे...
ढेन्चू चा अर्थ ढीन्च्याक असा घेतला आहे

झंम्प्या's picture

19 May 2015 - 9:00 am | झंम्प्या

"इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू

ह्या कडव्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केलेला. की आजकाल उगाचच बढाया मारून, ह्याव करीन त्याव करीन च्या गप्पा हाणणारे, हे.................... असतात. असं काहीतरी....

विवेकपटाईत's picture

23 May 2015 - 12:28 pm | विवेकपटाईत

गणेश आणि झंप्या दोघानाही धन्यवाद , दोघांनी लावलेले अर्थ मला आवडले. शेवटी न न न कविता जिंदाबाद.

पैसा's picture

23 May 2015 - 1:49 pm | पैसा

उतरली का?

नाखु's picture

23 May 2015 - 2:08 pm | नाखु

"उतरेल ईतकीच प्यावी आणि ऊमजेल तितकीच लिहावी"
मुवी-बाबा-महाराज लिखित "आचमनानंतरची प्रवचने" या थोर्र ग्रंथातील प्रकरण ७ पान ४९ ओळ २४.

अभा साधक्बाधकभक्त्गण मुबाम्हा सेसा तर्फे.
आजी-माजी-पाजी भक्तांसाठी

विवेकपटाईत's picture

23 May 2015 - 9:56 pm | विवेकपटाईत

ब्रह्मानंद टाळी लागल्या शिवाय मिपाव शोभेल अशी कविता कविता लिहिणे जमत नाही. आता कुठे स्वत:ला मिपावकर समजू लागलो आहे.

चढलेल्यांना उतरवणारी क क कविता!

नाव आडनाव's picture

24 May 2015 - 12:51 pm | नाव आडनाव

जबरदस्त कविता. नव कवींना प्रेरणा देणारी आहे. लिहित ( पीत (?) ) रहा :)
मला तर रामदास (च) आठवले.

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 1:45 pm | चित्रगुप्त

ढेंचू ढेंचू... गर्दभ-गायनाला हिंदीत म्हणतात. होय ना पटाईत साहेब ?