माझीही काही रेखाटने - लहान बाळे

सैरंध्री's picture
सैरंध्री in जनातलं, मनातलं
20 Aug 2008 - 4:24 am

नमस्कार मिपाकर ,
मी सैरंध्री. मिपाचे नुकतेच सदस्यत्व घेतले आहे.
मराठी संकेतस्थळांमधले मिपा हे एक छान संकेतस्थळ आहे. मिपावर वाचण्यासारखे खूप काही आहे पण सध्या मी तेवढा वेळ देऊ शकत नाहीये. पण कोणी चित्रे , रेखाटने टाकली तर आवर्जून बघते.
चित्रकला माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. मी पेन्सिल स्केचेस काढते आणि २००४ पासून ऑईल पेंटिंग ही करत आहे.
येथे बर्‍याच जणांनी काढलेली चित्रे बघून मलाही माझी रेखाटने मिपाकरांबरोबर शेअर करावीत असे वाटले.
सुरवात लहान बाळांच्या रेखाटनापासून करते.
लहान बाळे किती निरागस, निष्पाप आणि निर्मल मनाची असतात. त्यांच्या बाळलीला बघणे कोणाला आवडत नाही? नुसते त्यांच्या निरागस चेहर्‍याकडे पाहिले तरी मन प्रसन्न होते. माझा हा प्रयत्न तुम्हाला प्रसन्न करून गेला की नाही हे नक्की सांगा.

बाळ १
innocent baby

बाळ २
baby1

बाळ ३
baby2

(रेखाटनांच्या फोटोंचे रेझोल्युशन चांगले नसल्याने फोटो काही ठिकाणी पुसट दिसत आहेत)

कलाप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

शितल's picture

20 Aug 2008 - 5:04 am | शितल

सुदंर रेखाटने :)

भाग्यश्री's picture

20 Aug 2008 - 5:59 am | भाग्यश्री

अप्रतिम स्केचेस!! खूपच आवडली..
दुसरं स्केच सर्व दृष्टींनी पर्फेक्ट! बाळांच्या स्केचेस मधलं मी पाहीलेलं उत्कृष्ठ..!

प्रियाली's picture

20 Aug 2008 - 6:06 am | प्रियाली

रेखाटने आवडली. छान आहेत.

बेसनलाडू's picture

20 Aug 2008 - 6:38 am | बेसनलाडू

रेखाटने १,३,२ या क्रमाने आवडली.
छान!
(आस्वादक)बेसनलाडू

कोलबेर's picture

20 Aug 2008 - 9:08 am | कोलबेर

१,३,२ ह्या क्रमाने आवडली.

चतुरंग's picture

20 Aug 2008 - 7:41 am | चतुरंग

चतुरंग

अनिल हटेला's picture

20 Aug 2008 - 7:46 am | अनिल हटेला

छान !!

तीनही स्केचेस +१ आहेत !!!

आणी आपले मि पा वर हार्दीक स्वागत !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु's picture

20 Aug 2008 - 8:04 am | प्राजु

सैरंध्री,
सगळीच रेखाटने आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

20 Aug 2008 - 8:07 am | सहज

रेखाटने मस्तच आहेत.

नीलकांत बघा बॉ एक चित्रकला विभाग होऊनच जाउ दे. मिपावर अनेक उत्तमोत्तम कलाकार आले आहेत.

आनंदयात्री's picture

20 Aug 2008 - 9:07 am | आनंदयात्री

पहिले बाळ खुपच छान आलेय, अगदी नुकतेच वळुन बघतेय असे वाटते !
बाकी २ पण सुंदर.

भडकमकर मास्तर's picture

20 Aug 2008 - 9:21 am | भडकमकर मास्तर

खूप छान आहेत चित्रे...
...
आपली ऑईल पेंटिंग्जसुद्धा इथे लावा...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

20 Aug 2008 - 10:22 am | टारझन

जबरी कला आहे ब्वॉ तुमच्याकडे ...
चालू द्यात ... वेल्कम टू मिपा ...
सहजशी सहमत, आता तर चित्रकला नावाचा नवा कॉलम हवा :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मिंटी's picture

20 Aug 2008 - 10:50 am | मिंटी

सुरेख .............

अतिशय मस्त्......सगळीच रेखटने +१

मला सगळ्यात जास्त पहिले आवडले.................:)

मदनबाण's picture

20 Aug 2008 - 10:53 am | मदनबाण

मस्त..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

ईश्वरी's picture

20 Aug 2008 - 11:04 am | ईश्वरी

सर्वच रेखाटने सुंदर.
१ ले खूप आवडले. २र्‍या चित्रातील छोटीचा ड्रेस छान जमला आहे. क्रोशाचा वाटतोय. जाळीदार डिझाईन मस्त जमले आहे.
ईश्वरी

राघव१'s picture

20 Aug 2008 - 11:20 am | राघव१

वाहवा! खूपच छान. खरोखर प्रसन्न वाटले हां :)
३-२-१ या क्रमाने आवडलीत. डोळे विशेष बोलके आलेत!
आणखी येऊ द्यात! :)

राघव

डोमकावळा's picture

20 Aug 2008 - 11:40 am | डोमकावळा

सुंदर चित्रे आहेत...
त्यातल्या त्यात दुसरे बाळ फार आवडले...
येऊ द्या अजून... :)

सूर्य's picture

20 Aug 2008 - 12:13 pm | सूर्य

सर्व चित्रे आवडली. ही चित्रे खर्‍याखुर्‍या बाळांना पाहुन काढली आहेत की त्यांच्या चित्रावरुन ? अजुन अशी काही चित्रे येउद्यात.

- सूर्य.

वेलदोडा's picture

20 Aug 2008 - 12:28 pm | वेलदोडा

मिपावर स्वागत.
मस्त आली आहेत सर्वच चित्रे. १ ल्या चित्रातील छोटीचा बाळदात , तिच्या हातातले पिस, डोक्यावरचे जावळ , बोलके डोळे सर्व छान आले आहे.
२र्‍या आणि ३र्‍या चित्रातील कपड्यांचे बारकावे मस्त रेखाटले आहेत.
बाळ ३ पण आवडला. गप्प राहून हळूच खोड्या करणारा वाटतोय. :)

सैरंध्री's picture

21 Aug 2008 - 12:14 pm | सैरंध्री

>> ही चित्रे खर्‍याखुर्‍या बाळांना पाहुन काढली आहेत की त्यांच्या चित्रावरुन .
खर्‍याखुर्‍या नाही , त्यांच्या चित्रावरुन काढली . मूळ चित्र समोर ठेवुन डायरे़क्ट च काढली..म्हणजे मूळ चित्रावर स्केल आखून नाही घेतले .

शितल , भाग्यश्री , प्राजू, ईश्वरी,प्रियाली, चतुरंग,आनंदयात्री, बेसनलाडू, कोलबेर, मदनबाण,सूर्य, राघव, डोमकावळा, टारझन, भ. मास्तर, मिटी, सहज, अनिल , वेलदोडा
तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार. इतर प्रतिसाद न दिलेल्या आस्वादकांचेही आभार.

सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci

सुमीत भातखंडे's picture

20 Aug 2008 - 1:08 pm | सुमीत भातखंडे

रेखाटने. जाम आवडली

सैरंध्री's picture

21 Aug 2008 - 12:13 pm | सैरंध्री

धन्यवाद सुमीतजी
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci

वर्षा's picture

21 Aug 2008 - 12:49 am | वर्षा

चित्र क्र. २ खूपच सही आलंय. 'द पर्फेक्ट बेबी' च्या खूप जवळ जातंय
बाळाचा क्रोशाचा झगा खूप कठीण आहे काढायला...
अजून टाक ना तुझी स्केचेस..
-वर्षा

वर्षा's picture

21 Aug 2008 - 12:50 am | वर्षा

आणि तू चारकोल वापरतेस की काय ते पण सांग ना
-वर्षा

धम्मकलाडू's picture

21 Aug 2008 - 3:17 am | धम्मकलाडू

अमेरिकन बाळे दिसतात! छान. शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सैरंध्री's picture

21 Aug 2008 - 12:16 pm | सैरंध्री

धन्यवाद वर्षा आणि धम्मकलाडू

>> ....अजून टाक ना तुझी स्केचेस..आणि तू चारकोल वापरतेस की काय ते पण सांग ना
हो..अजून टाकेन काही स्केचेस. मी चारकोल वापरत नाही. वरील चित्रे पेन्सिलनेच शेडींग करून काढली आहेत.

सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci

मनस्वी's picture

21 Aug 2008 - 12:22 pm | मनस्वी

बाळं मस्त आलीयेत!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

विसोबा खेचर's picture

22 Aug 2008 - 6:39 am | विसोबा खेचर

सर्व बाळे छान! :)

आपला,
तात्या बाळ.

अनिरुध्द's picture

22 Aug 2008 - 12:20 pm | अनिरुध्द

सगळी चित्रे एकदम मस्त. परंतु चित्र क्रमांक २ अतिशय आवडले. एकदम बोलके चित्र आहे.

लिखाळ's picture

22 Aug 2008 - 8:12 pm | लिखाळ

छान चित्रे !
पहिले चित्र तर फारच आवडले ! अभिनंदन !
आपली स्वाक्षरी सुद्धा आवडली.
-- लिखाळ.

ऋषिकेश's picture

22 Aug 2008 - 8:17 pm | ऋषिकेश

गोड गोजिरी बाळे खूप आवडली :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

सैरंध्री's picture

23 Aug 2008 - 1:09 pm | सैरंध्री

मनस्वी , तात्या , काऊ , लिखाळ, ऋषिकेश
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सैरंध्री

Painting is poetry that is seen rather than felt,
and poetry is painting that is felt rather than seen. ~Leonardo da Vinci