अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!

Rajvardhan's picture
Rajvardhan in जे न देखे रवी...
24 Apr 2015 - 1:02 am

आज मी माझा कुंचला कागदावर शिंपित आहे
लेखणी दवात डूबवतो आहे
कागदावर लेखणीच काय
कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय
कारण तू जाताना
माझी लेखणी माझा कुंचला
सोबत घेऊन गेलीस ते ही कायमची !
जाताना तेवढ माझं मन मात्र विसरलीस
माझं मन , माझा कुंचला , माझी लेखणी
आजही तेवढीच तळपते आहे
रंग भावनांचे, रंग उत्कटतेचे , रंग उसत्वाचे ,
रंग विरहाचे ,रंग प्रणयाचे ,रंग प्रेमाचे ,
रंग सदोदित संवादांचे
आताशा मी कागदावर उमटवत आहे
आजही तळपते आहे माझी लेखणी, माझा कुंचला !!
तुझी नेत्रापालवी औस्तुक्याने फुलते आहे
तुझ्या भाळी सौभाग्य नांदते आहे
तुझ्या कर्ण -स्फुटिकावर मोती झळाळत आहे
केसांतून निघालेली एक खट्याळ बट
तुझी मोहक स्वर्ण-कांती
मधाळ ओठांची कुपी
सर्वांग शहारलेले बावरलेली तू
रेखाटतो आहे तुझे प्रतिबिंब
अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!
>>मी मात्र @ राजवर्धन

भावकविताकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Apr 2015 - 10:02 pm | पैसा

कागदावर लेखणीच काय
कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय

अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!

हे दोन्ही कसं एकत्र?