मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!!

Rajvardhan · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आज मी माझा कुंचला कागदावर शिंपित आहे लेखणी दवात डूबवतो आहे कागदावर लेखणीच काय कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय कारण तू जाताना माझी लेखणी माझा कुंचला सोबत घेऊन गेलीस ते ही कायमची ! जाताना तेवढ माझं मन मात्र विसरलीस माझं मन , माझा कुंचला , माझी लेखणी आजही तेवढीच तळपते आहे रंग भावनांचे, रंग उत्कटतेचे , रंग उसत्वाचे , रंग विरहाचे ,रंग प्रणयाचे ,रंग प्रेमाचे , रंग सदोदित संवादांचे आताशा मी कागदावर उमटवत आहे आजही तळपते आहे माझी लेखणी, माझा कुंचला !! तुझी नेत्रापालवी औस्तुक्याने फुलते आहे तुझ्या भाळी सौभाग्य नांदते आहे तुझ्या कर्ण -स्फुटिकावर मोती झळाळत आहे केसांतून निघालेली एक खट्याळ बट तुझी मोहक स्वर्ण-कांती मधाळ ओठांची कुपी सर्वांग शहारलेले बावरलेली तू रेखाटतो आहे तुझे प्रतिबिंब अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!! >>मी मात्र @ राजवर्धन

वाचने 998 वाचनखूण प्रतिक्रिया 1

पैसा Fri, 04/24/2015 - 22:02
कागदावर लेखणीच काय कुंचलासुद्धा आज निष्प्रभ झालाय अजूनही तळपते आहे माझी लेखणी , माझा कुंचला !!! हे दोन्ही कसं एकत्र?