गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
14 Apr 2015 - 4:26 pm

एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55)

वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे.

महाराष्ट्रात गौ. हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अति शहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ. बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौ. मांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ. बंदी असल्यामुळे गौ. मांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौ. बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन.

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौ. मांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. या गायी गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल.

परिणाम भारतीय गौ. वंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड नसतात व भारतीय बैलांसारखे काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही). गौ. मांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. मांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. .४-५ वर्षातच २० लाख टन पेक्षा गौ. मांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख टन गौ. मांसाचे निर्यात ही होऊ लागेल.

आता जगात सर्वात जास्त गौ. मांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौ. मांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात. ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते. एक किलो मांसासाठी ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५००० चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn) साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात २5 किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा, ३० गहू ). महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.

दुसर्या शब्दात गौ. मांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल.शिवाय देश्यात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.

या भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी आहे. त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.

सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ. आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).

आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौ. हत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे . केवळ मांसासाठी जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.
अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे. अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.

http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full
http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt.pdf

संस्कृतीविचार

प्रतिक्रिया

hitesh's picture

14 Apr 2015 - 4:46 pm | hitesh

इतके होते तर प्राचीन काळात हेच लोक गायी का खात होते ?

संदीप डांगे's picture

14 Apr 2015 - 4:49 pm | संदीप डांगे

जास्त काही बोलू शकत नाही.
पण आपल्या अतार्किक, धार्मिक आणि भावनिक मुद्द्यांना पर्यावरणीय जागरूकता व सामाजिक समस्यांची झूल चढवण्याचे प्रयत्न गोवंशहत्याबंदी समर्थकांकडून होत आहेत. हा लेखही त्यातलाच. यातल्या सगळ्या मुद्द्यांचे गृहितक चुकीच्या संकल्पनांवर आधारित आहे.

विचार करण्यासारखी गोष्ट. धन्यवाद.

तुम्ही एक टोकाचे चित्र रंगवलेले आहे. त्यात विचार करण्यासारख्या गोष्टी असल्या तरीही मांसहाराच्या मागणी बद्दल तुम्हाला बरीच खात्री दिसते. गोमांस बिलकुल चविष्ट लागत नाही असं माझं वैयक्तिक, अनुभवसिद्ध मत आहे. धार्मिकतेचा विचार केला तर, त्याची मागणीही वेगात वाढेल असे वाटत नाही.

चिमिचांगा's picture

14 Apr 2015 - 5:37 pm | चिमिचांगा

गोमांस बिलकुल चविष्ट लागत नाही असं माझं वैयक्तिक, अनुभवसिद्ध मत आहे.>>>

चिकनप्रमाणे गोमांसाची चव एकसंध नसते. गोमांसाच्या क्वालिटीत त्याचा कट(गायीच्या शरीराच्या कोणत्या भागापासून मांस कापले आहे) आणि बनवण्याची पद्धत, Aging करण्याची पद्धत, यानुसार बराच फरक असतो. उदा. सर्वाधिक स्वस्त आणि कमी प्रतीचा भाग chuck याची चव जवळजवळ रक्तासारखी लागते. याचा उपयोग साधारण बर्गरसाठीचे पुरण, खिमा इत्यादींसाठी करतात. त्याउलट 'स्टेक'ची चव (गायीच्या सर्वाधिक चवदार भागांपासून कापून काढलेले मांसखंड) योग्य पद्धतीने भाजले असल्यास अफाट लागते. याखेरीज अधल्या मधल्या क्वालिटीचे भाग (flank, brisket इ.) हे त्यांच्या-त्यांच्या विशिष्ट पद्धतीनुसार बनवले जातात. याखेरीज प्रत्येक समाजाच्या आपापल्या पद्धती आहेत. उदा. मेक्सिकन लोक गायीची जीभ, गायीचे जमिनीत पुरून मंद आचेवर शिजवलेले अक्खे डोके, गायीच्या जठरातले कुरकुरीत आवरण, यांपासून रुचकर पदार्थ बनवतात. तेव्हा गोमांसाला चव नसते असे सरसकट विधान करणे हा गोमातेवर अन्याय आहे!

पारा's picture

15 Apr 2015 - 12:20 am | पारा

माफ करा. अगदीच सणसणीत माहितीची चपराक दिलीत. झकास माहिती. आता बहुदा केरळ किंवा भारताबाहेर जाउनच हे सर्व चाखायला मिळेल.

नंदन's picture

15 Apr 2015 - 5:56 am | नंदन

नव्या माहितीच्या संदर्भात आपली भूमिका तपासून पाहण्याचा तुमचा खिलाडूपणा, दाद द्यावी असाच आहे.

hitesh's picture

14 Apr 2015 - 4:53 pm | hitesh

आन्न धान्य पाणी इ इ गायींसाठी जे लागते असे वर दिले आहे , ते सगळे इतर प्राण्यानाही तितकेच लागत असेल की. मग इतर प्राण्यांच्या हत्येवर का बंदी नाही ?

चिनार's picture

14 Apr 2015 - 5:02 pm | चिनार

माहितीपूर्ण लेख !

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 5:12 pm | खंडेराव

आपणास शेती विषयी कितपत माहिती आहे? काही अंदाज आहे का दुधाच्या धंद्याच्या अर्थशास्त्राचा?

भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).

भाकडकथा आहेत हो सगळ्या..काहीही! रासायनिक कीट नाशके आणि खते बंद करुन हा काय वरचा व्यवस्थित उपयोग केला तर उपाशी मरु आपण.

आणि पाण्याचे कसले आकडे देताय? औरंगाबाद आहे आपल्याच राज्यात, मराठवाड्यात, जिथे पाण्याची प्रचंड बोंब आहे, शेतकरी मरता दर वर्षी पाणी नाही शेतीला म्हणुन. तिथे १८ कोटि लिटर बियर तयार होते दर वर्षी. रोजचा पाणी वापर आहे चार कोटी लिटर या धंद्याचा. हे का नाही बंद करत मग सरकार? ( आकडे २०१२ चे आहेत, मागितल्यास संदर्भ देइल )

काही उपाययोजना केलीय का आता भाकड गायी संभाळायची..की नुसता कायदा आणलाय.
यात ज्याचा तोटा होणार, तो शेतकरी सोडुन भलतेच भलावण करताय कायद्याची..महान देश आहे आपला.

लेख वाचून मी थक्क झालो आहे. असले तर्कदुष्ट विचारशास्त्र निपजते तरी कसे आणि त्याची इतकी भलावण तरी होते कशी?

धर्मराजमुटके's picture

14 Apr 2015 - 5:30 pm | धर्मराजमुटके

पटाईत साहेब ! खाणे पिणे हा अतिशय वैयक्तीक विषय झाला. कोणी काय खावे, काय खाऊ नये हे दुसर्‍याने सांगू नये असे माझे मत आहे. त्याचे काय फायदे तोटे आहेत ते ते भोगायला जो तो समर्थ आहे. असो.

अवांतर :
का कोण जाणे पण एका जुन्या कथेची आठवण झाली. त्या कथेत एक नगर असते तेथे शरीरसंबंध उघडपणे चाललेले असतात पण खाणे मात्र पडद्याआड / भिंतीआड चालते. जेव्हा लेखक त्या नगरात पाहुणा म्हणून जातो आणि सहजपणे उल्लेख करतो की तुम्हाला आता जेवायला जायचे असेल ना तेव्हा तेथील लोक एकदम चकीत होतात व त्याच्याकडे तिरस्काराने बघू लागतात. कोणी या कथेचे नाव आणि लेखक सांगू शकेल काय ?

एका चित्रपटाची कथा आहे ती आणि "फँटम ऑफ लिबर्टी" हा तो चित्रपट. बादवे कथा थोडी वेगळी आहे.

जिज्ञासु आनन्द's picture

17 Apr 2015 - 11:30 am | जिज्ञासु आनन्द

कल्पनेच्या तीरावर - कुसुमाग्रज

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 5:40 pm | काळा पहाड

धन्यवाद. एक किलो मांस 'पिकवण्यासाठी' किती प्रचंड संसाधने लागतात हे काही सायन्स साईट्स मुळे आणि डिस्कव्हरी वरचे प्रोग्राम्स वगैरे पाहून माहिती होतं पण त्याचे साईड इफेक्ट्स हे फारच भयंकर दिसताहेत. शाकाहारी हे पर्यावरण दृष्ट्या मित्रत्वाचं आहे हा विचार आपल्याकडे फारसा माहीत नसला तरी आपण पश्चिमेकडची खानपान संस्कृती स्विकारायचं (आपलं पर्यावरण बिघडवून) काहीच कारण नाही.

hitesh's picture

14 Apr 2015 - 5:47 pm | hitesh

गाय खाणे ही पाश्चिमात्य संस्कृती आहे हे विधान वाचुन माझे पौर्वात्य डोळे उत्तर दक्षिण गरगरुन पाणावले गेले आहेत.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 6:01 pm | काळा पहाड

आमची संस्कृती वैदीक नसून सनातनी आहे हे तरी माहिती आहे का हितेशभाऊ? आम्ही वैदिक लोक जे करायचं ते काहीच करत नाही. आमचे सध्याचे देव वैदिक देव नव्हेत, आमच्या खान पान सवयी तशा नाहियेत. संस्कृती ही तुमचे पूर्वज ७००० वर्षांपूर्वी जे करायचे त्याच्यावर अवलंबून नसते. तर तुम्ही जसे वाढलात आणि जगताय त्याच्यावर अवलंबून असते. माझा एकही मित्र (वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरचे) बीफ खात नाही. निदान जे मला माहिती आहेत त्या पर्यंत मर्यादित वर्तुळात कुणीही गाय खात नाही. तेवढं पुरेसं आहे.

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 5:45 pm | खंडेराव

तुमच्या लेखात आहे.

भारतात एकही असा उद्योग नाही जो विदेशी गायी आणुन मांस उत्पादन करतो. फक्त भा़कड जनावरे कापली जातात इथे. त्यामुळे पुर्ण लेख गैरलागु आहे. आणि भविष्यात होईल वगैरे सांगु नका. त्याचे अर्थशास्त्र वेगळे आहे, हवामान वेगळे लागते.

काळा पहाड's picture

14 Apr 2015 - 5:55 pm | काळा पहाड

खंडेराव साहेब, हेच बीयर बद्दल आणि वाईन बद्दल बोललं गेलं होतं ना? आता होतीये ना ती तयार? धोका हा आहे की मल्टीनॅशनल कंपनीज याचा वापर करून इथल्या संसाधनांचा अतिवापर सुरू करतील (जसा पिण्याच्या पाण्याबाबत सुरू आहे).. शेतकर्‍याला घंटा काही मिळणार नाही. ते आत्महत्याच करत राहतील आणि मॅक्डी सारख्या कंपन्या प्रॉफिटियरींग साठी इथे गायींच्या पाळण्याचे प्रचंड तबेले बांधून ते मांस त्यांच्या अमेरिकन आणि युरोपियन फ्रॅन्चाईजीज ना पुरवतील.

hitesh's picture

14 Apr 2015 - 6:01 pm | hitesh

पाशिचिमात्य लोक हा व्यवसाय करुन पैसा मिळवतात .मग हाच व्यवसाय करुन एतद्देशीयानी पैसे मिळवले तर तो गुन्हा कsaa ?

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 10:58 pm | खंडेराव

बियर १८३० पासुन बनते भारतात.

बियर वाइन बनवणे आणि कॅट्ल रांचेस वेगळ्या गोष्टी आहेत. रांचेस ह्या आपल्याकडे चालणार नाही. तुमची भिती अनाठायी आहे.

आणि ही भाकड जनावरे, जी आता जिवंत रहातील, ती हवेबरोबर पाणी पितील, रिसोर्सेस खातील त्याचे काय? ते नाही हिशोबात? आता प्लिज तुम्ही मुताचे इतके, शेणाचे इतके हा हिशोब नका देउ, तो शुद्ध मुर्खपणा आहे.

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 7:55 pm | संदीप डांगे

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील
घेऊ द्या ना. तसेही हिंदू लोक विदेशी गायींना गोमाता मानतच नाहीत. बरंय की विदेशी गायी खाल्ल्या जातील ते. देशी गायी वाचतील. ते गोमाता-भक्तांनी आपापल्या घरी नेऊन पाळाव्या अथवा वर्गणी करून शेतकर्‍यास द्यावी.

ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल.

मग समस्या काय आहे नक्की?

कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड नसतात व भारतीय बैलांसारखे काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही).
शेतीसाठी बैल वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही शेतकर्‍यांस. त्यापेक्षा छोटे ट्रॅक्टर्स व इतर आधुनिक यंत्रे जास्त फायदेशीर आहेत.

गौ. मांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. मांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल.

खरी जळजळ इथे आहे तर. पण ज्याला जे खायचे ते खाण्याचे स्वातंत्र्य का नाही?

४-५ वर्षातच २० लाख टन पेक्षा गौ. मांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख टन गौ. मांसाचे निर्यात ही होऊ लागेल.

चांगले आहे की. तसेही अमेरिकन लोकांना नैसर्गिक परिस्थितीत वाढलेल्या जनावरांचे मांस खाण्याचा पुळका आलाय. ३०-४० टक्के जास्त किंमतीने ते हे मांस विकत घेण्यास तयार होतील. विदेशी मुद्रा वाढेल आपल्याकडे.

आता जगात सर्वात जास्त गौ. मांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौ. मांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात.
त्यांचे मुख्य अन्न तेच आहे तर अजून काय अपेक्षा आहे?

तिथल्याच आंकड्यानुसार एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात. ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते. एक किलो मांसासाठी ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५००० चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn) साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात २5 किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा, ३० गहू ).

हे पाणी मांसासाठी तयार केल्या जाणार्‍या गायींनाच लागते? देशी गायी हवा-प्रकाशावर जगतात? हा पाण्याचा मुद्दा तर तद्दन भावनिक आहे. असा पाण्याच्या वापराचा सगळ्याच उत्पादनांच्या आणि त्यांच्या वॉल्यूमच्या संदर्भात बारकाईने विचार केला तर मेंदू चक्रावून जाईल असे आकडे मिळतील. ती सगळी उत्पादने पाण्याच्या वापर करतात म्हणून बंद करायची तयारी आहे का?

महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.

पाण्याचा स्तर खाली जाण्यासाठी अनिर्बंध आणि मुर्खासारखी केली जाणारी शेती जबाबदार आहे. मांस-उत्पादन नाही. तेव्हा मुद्दा सपशेल बाद ठरतो. खाद्यान्न आणि मांस हे वेगवेगळे आहेत हे नवीनच कळले या निमित्ताने.

दुसर्या शब्दात गौ. मांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून).
५० लक्ष टन मांस हा आकडा कुठल्या अभ्यासातून प्राप्त झाला ते कळले तर बरे होईल.

जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल.शिवाय देश्यात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.
अमेरिकेत राहणार्‍या बांधवांनी प्रकाश टाकावा. २०% गोमांस खाणार्‍यांमुळे ८०% गरिब उपाशी राहतील हे तर्कट अजबच. शिवाय दुष्काळी वातावरणाची भीती दाखवून खोटे बोला पण रेटून बोलाचा प्रत्यय आला.

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.
आफ्रिकन लोक त्यांचे पोट स्वतः भरू शकत नाही यात अमेरिकेत बसून बीफ खाणारा कसा जबाबदार? उगाच गिल्ट-फीडींग का करायचे. अमेरिकेतल्या लोकांना आफ्रिकेतली उदाहरणे देणे म्हणजे हा लेख भारतीयांसाठी नक्की नाही याचा पुरावा आहे.

या भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी आहे. त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.

स्वतः गाय पाळली आहे का हो कधी तुम्ही? आजच्या सामान्य शेतकर्‍यास हे दिव्य ज्ञान सांगा. सत्य कळेल. माझ्या घरी मागच्या वर्षी चांगल्या शुभलक्षणी पांढर्‍या रंगाच्या दोन गायी व त्यांची दोन गोंडस पांढरी वासरे वडीलांनी हौसेखातर आणल्या होत्या. दोघींचा रोजचा खर्च ३००-४०० होता. वरून त्यांना सांभाळणे, त्यांचे खाणे-पिणे बघणे, दुध काढणे याला ३००० रुपये महिन्याचा माणूस ठेवला होता. २१००० हजार रुपये महिना खर्च होऊन त्या गायी पांढर्‍या हत्तीसारख्या ६ महिने पोसल्या. पुढे कठीण होत गेले. ती हौस होती म्हणून पदरचे पैसे घातले.

सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ. आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).

तर ही पतंजली योगपीठची झैरात आहे. दिक्षीतसाहेब पण असेच प्रवचन करून विदेशी कंपनीके उत्पादमें ये गलत वो गलत करत छुपी झैरात करत.

आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौ. हत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे . केवळ मांसासाठी जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे.
फारच भयंकर चित्र रेखाटले आहे हो. एकदम हातघाईला आल्यासारखे. थोडा अभ्यास. पण ठीक आहे. ही झैरात आहे म्हणून माफ.

लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.

या वाक्यात विशीष्ट अजेंडा सरळ दिसून येत आहे. लोक शाकाहारी करण्याचं सोडा आधी जे पिकवतात दरवर्षी त्यातलं अर्धं वाया जातं त्याचं बघा. ते सर्वच्या सर्व नीट सगळ्यांपर्यंत पोचू देत. गोहत्याबंदीच का? सर्व मांसभक्षणावर बंदी करा. मग टिकवा तुमचा अखंड भारत देश. तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होईल असे म्हणतात. असे महान विचार असतील तर मला वाटतं मांस खाण्यासाठी होईल.

अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे. अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.
विदेशी दाखले दिल्याशिवाय देशाभिमानी लोकांना मुद्दा पटवून द्यायला आत्मविश्वास कमी पडतो असे वाटते.

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 11:01 pm | खंडेराव

चिकाटीला आणि निट उत्तर देण्याला प्रणाम!

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 1:50 am | अत्रुप्त आत्मा

+++१११
अर्थात ही गायाळ मंडळि असल्या प्रतिवादांना कधीच मुद्देसुद आणि खरी उत्तर देत नाहित. .. हे पाहात आलेलो आहे.

हाडक्या's picture

15 Apr 2015 - 3:10 pm | हाडक्या

+१
अगदी अगदी.. वैताग या गोष्टीचा येतो की अजून ४-५ महिन्यांनी कोणीतरी असाच धागा काढेल आणि म्हणत बसेल की आता का कोणी काही उत्तर देत नाही ?
तेव्हा म्हणावेसे वाटते की अरे बाबा जेव्हा जेव्हा मुद्देसूद उत्तरे दिली गेलीत तेव्हा कुठे होतास?
अवघड प्रश्नांना, तार्किक मुद्द्यांना दुर्लक्षित करायचं आणि आपलाच मुद्दा रेटत रहायचं हे आता खूपच बोकाळलंय.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Apr 2015 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा

शेषराव मोरे सरांनी त्यांच्या एका भाषणामध्ये अश्या प्रकारच्या कुठल्याही मूळ(धार्मिक/सामाजिक)गोष्टींचा/व्यक्तिविचारांचा -आशय विकृत करुन केल्या जाणार्‍या वैचारीक अप्रामाणिकपणा* विरुद्ध पिनलकोड कायदाशिक्षा असली पाहिजे..अशी मागणी केलेली आठवते आहे. ज्याप्रमाणे आमली पदार्थांचं प्रचारकी स्वरुपाचं लेखन दंडात्मक ठरु शकतं..तसं! मला तर ही प्रचंड इच्छा आहे,की या सनातनी कोल्ह्यांना जागोजाग जेरबंद करून ..रीहॅबिलिटेशन सेंटर प्रमाणे धर्मचिकित्सासुधारणा गृहात रहाण्याची शिक्षा करायला हवी.

* मोरेंचा शब्द.

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 5:05 pm | खंडेराव

अनुमोदन :-)

धर्मचिकित्सासुधारणा गृहात रहाण्याची शिक्षा

:)))) अगदी अगदी. फक्त त्या धर्मचिकित्सासुधारणा गृहातून नवीन धर्मच तयार न व्हावा म्हणजे झाले.. :)

जेपी's picture

15 Apr 2015 - 6:12 pm | जेपी

+1111111

नाखु's picture

17 Apr 2015 - 10:04 am | नाखु

सर्वांना अनुमोदन

रीहॅबिलिटेशन सेंटर प्रमाणे धर्मचिकित्सासुधारणा गृहात रहाण्याची शिक्षा करायला हवी.

खास
====
आपला धर्म्/संस्कृती विक्रुतीकरणासाठी "बाहेरच्या" लोकांची काहीच गरज नाही इथेलेच ते काम आक्रस्ताळी पणाने करीत आहेत.
काय योगायोग आहे कालच सावरकरांचा गाय गोमाता नव्हे फक्त एक उपयुक्त पशू हा झणझणीत अंजन लेख वाचला आणि हे आज..

पटाईतकाका मुटेंच्या धाग्यावरअभ्यासू प्रतिसाद आणि हाभावार्थ प्रतिसाद पाहून तुमचा हा लेख तुमच्याच विचारांशी फारकत घेणारा आणि झैरात्बाज वाटला हे खेदाने नमूद करतो.

सुजित पवार's picture

14 Apr 2015 - 10:33 pm | सुजित पवार

आपन जस प्रान्याना मारुन खातो हे बरोबर आहे का? जर आप्ल्याकडे शाकाहारि नसेल तर मासाहार करने ठिक पन विनाकारन जिभेचे चोचले पुरन्यासठि मासाहार करने कित्पत योग्य आहे?

इथे भूतदया , देशी वाण जपणे अशी खोटी कारणे सांगुन हिंदुत्वाचा अजेंडा पुढे ढकलणे सुरु आहे.

आणि गोमाता दूध या प्रकर्णाचा सर्वात मोठा विनोद हा आहे की कदाचित सत्तर टक्के वा अधिक लोक दूध म्हशीचे पितात. ती म्हओस कापण्यावर बंदी नाही.. पण ज्या गायीचे दूध कमी लोक पितात ती मात्र सर्व हिंदुंची म्हणे माता आहे.

...तुला त्याची क रे एव्ह्ढी विवंचना ??? तुझ्या आजवरच्या हिंदुंविरोधी प्रतिक्रिया पाहुन तुझा अजेंडा मात्र इथे सर्वांच्या लक्षात आल्याशिवाय रहात नाही, अगदी चेकाळल्यासारख्या.

समजले का रे हितेसभॉय, समजले का रे नेफळ्यांच्या नान्या, समजले का रे ग्रेट्थिंकर फिलॉसॉफरा, समजले का ग माई फुरसुंदीकर, समजले का रे ........, समजले का रे ........., समजले का रे ......... ????

hitesh's picture

15 Apr 2015 - 1:05 am | hitesh

मी नाना , थिन्कर , माइ नाही.

सिद्धार्थ ४'s picture

15 Apr 2015 - 1:58 am | सिद्धार्थ ४

हितेश भाऊंच्या या प्रतिसादा वरती माई काहीच उत्तर देत नाहीत.

hitesh's picture

15 Apr 2015 - 4:48 am | hitesh

माई गप्प रहाते म्हणजे माझे उत्तर खोटे ठरत नाही.

सिद्धार्थ ४'s picture

15 Apr 2015 - 4:52 am | सिद्धार्थ ४

लोल :)

hitesh's picture

15 Apr 2015 - 4:50 am | hitesh

कोडगा असण्यापेक्षा बाटगा असणं चांगलं.

मिपावर "डूआयडी बंदी" कधी लागू होईल कोण जाणे?
आणि झालीच तर "हा हिंदुत्वाचा अजेंडा" आहे असं हितेश भाई आणि माई च्या ह्यांचे मत असेल.

आनंदी गोपाळ's picture

16 Apr 2015 - 9:47 pm | आनंदी गोपाळ

म्हणजे विनोद१८ अशी आयडी काढून प्रच्छन्न शिवीगाळ केलेली चालते वाटते?

खंडेराव's picture

14 Apr 2015 - 11:34 pm | खंडेराव

तानले तर मानव वंशच संपवला पाहीजे, सगळ्यात जास्त बांडगुळी जमात आपण!

रामपुरी's picture

15 Apr 2015 - 2:45 am | रामपुरी

ताना ताना

hitesh's picture

15 Apr 2015 - 5:04 am | hitesh

आमचे पिता व माता म्हणजे कुणी आचार्य व गाय नाही. शेतकरी व त्याची पत्नी हेच आमचे पिता माता , राम सीता , शिव पार्वती इ इ इ इ . त्याना विश्वासात न घेता दडपशाहीच्या मार्गाने केलेल्या कायद्याला आमचा विरोधच राहील.

रामदेवबाबा व्यवसायात लाखो रुपयांच्या सवलती घेतो. तो चार भाकड गायी पोसू शकतो. त्याचे उदाहरण आम जनतेवर लादणे योग्य होणार नाही. ज्याना धर्म गोमाता प्रिय आहे त्यानीशेतक४र्‍यांकडुन नेऊन स्वतःच्या अंगणात बांधावी.

या विषयावर एक कोर्ट ट्रायल सुरु आहे. त्यात गाय न कापण्यामागे सरकारने कारण दिले आहे ... गायीची हत्या म्हणे अमानुषपणे केली जाते.

कोर्ट बोललं ... मग बाकी प्राण्यांच्या हत्या दयाळूपणे होतात का ?

:)

बाहुली's picture

15 Apr 2015 - 2:05 pm | बाहुली

गाय हा एक प्राणि आहे .. त्याला/तीला प्राणीच राहु दे !! आई म्हणायच्या भानगडीत का पडता? आता पर्यन्त खाणारे खात होतेच की कुथे फरक पडत होता??? मोदी स्वत खात नाहि मणुन हे कायदे !!!

सुबोध खरे's picture

15 Apr 2015 - 6:04 pm | सुबोध खरे

बाहुली ताई
हिरवा चष्मा लावला कि सर्व जग हिरवे दिसायला लागते. मोदी साहेबांचा येथे कुठे प्रश्न आला? आंधळा द्वेष करणे सोडून द्या.
भारतात २९ पैकी २४ राज्यांमध्ये कोणत्या न कोणत्या प्रकारे गोहत्या बंदी आहे. यात आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश,जम्मू काश्मीर,पंजाब बिहार इ राज्ये येतात जेथे भाजपचे सरकार नव्हते. गोवासुद्धा यात मोडते.
सर्वोच्च न्यायालयाने २००५ साली गोहत्या बंदी घटनेअनुसार वैध असल्याचा निवाडा दिलेला आहे.
वाचा http://en.wikipedia.org/wiki/Cattle_slaughter_in_India.
आपण साडेसहा वर्षे मिपा सदस्य असूनही आपल्याला अभ्यास वाढवा असे सांगावेसे वाटते (लायकी किंवा ज्येष्ठता नसूनही)
बाकी गोमास खावे कि नाही हा प्रश्न वैयक्तिक आहे आणि त्याला धार्मिक स्वरूप देऊ नये असे माझे मत आहे.( त्याल कोणी विचारत नाही हा भाग अलाहिदा)

अगदी खरे बोललात डॉक्टर!

बाहुली, हे वाचा:

Article 48 of the Constitution reads, "The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter of cows and calves and other milch and draught cattle.

बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच सांगते आहे, संपूर्ण गोवंश (आणि बहुधा म्हैस वंश देखील)हत्या बंदी करा म्हणून!

हितेसभाय बुखारी (विखारी) आणि कं.
जर तु तुझ्या डोळ्यावरचा हिरवा चष्मा काढुन लेख पुन्हा वाचशिल तर तुला कळेल कि विवेक ने शेतकर्‍यांसाठिच हा लेख लिहिला आहे. "परिणाम भारतीय गौ. वंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही."

आम्हि हिंदु आहोत, सहिष्णु आहोत (खरोखरचे, काँग्रेस सारखे नाहि ). परधर्माचा सन्मान करतो ह्याचा अर्थ असा नका काढु कि आम्हाला ज्या धर्मात जन्म घेतला त्याबद्द्ल अनास्था आहे. तुला लेखकाचे मत पटले नाहि तु खुशाल मुद्देसुद विरोध कर पण जर का पुन्हा तु फक्त विद्वेशा पोटि आपल्या लायकि वर उतरुन वर हिंदुधर्माविषयी बोललास तसा बरळशील तर मग मि माझ्या औकात वर उतरेन, keep in mind.

भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात

भारतीय गायींचे सरवायवल पोटेन्शल जास्त असेल तर परदेशी गायी भारतात का बरे आणल्या जातील? मग ही भीती का वाटते बुवा ?

आणि कोणत्याही व्यावसायिकाला व्यवसाय करण्यासाठी नवा ऑप्शन स्वीकारण्याचा अधिकार आहेच की.

टाइपरायटर गेले काँपुटर घेतले. मायभाषा सोडली इंग्रजी घेतली... तेंव्हा हे राधासुता तुझा धर्म कोठे रे जातो?

टायपिंगवाल्याने नवा काँपुटर घ्यावा.

एखाद्या पंडिताने इंग्रजी शिकुन अमेरिकेची भांडी धुवत बसावीत.

आणि गरीब शेतकर्‍याने नव्या वाणेची गाय आणली तर देव देश धर्म बुडाला काय ? गंमतच की.

मांसासाठी परदेशी गायी उपयुक्त असतील तर ज्याना मांसासाठी व्यवसाय करायचा आहे ते त्या गायी पाळतील. तसेही तुमचे देव परदेशी गायीच्या पोटात रहात नसतील नै का ? मग त्या कापल्याने तुमचा धर्म का बरे बुडतो ?

हिंदु गायी खात नाहीत. पण कोंबड्या खातात. मांसासाठी परदेशी कोंबडीचे वाण आणले तर देशी कोंबडी बुडाली म्हणुन कुणी गळा नही काढला.

परदेशी बैल शेतीसाठी उपयुक्त नसतात म्हणे. मग ज्याना शेतीसाठी बैल पाळायचे असतील ते आपसूकच देशी गायी बैलच पाळतील ना ?

संदीप डांगे's picture

15 Apr 2015 - 7:30 pm | संदीप डांगे

हितेशभौ,

प्रत्येकाला इथे आपले मत आणि तेही आपल्या पद्धतीने मांडण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल मी तुमच्या अधिकाराचा आदरच करतो. पण माझी एक नम्र विनंती आहे. तुम्ही तुमचे विचार एकदम धारदारपणे असे मांडा की जेणेकरून प्रतिपक्षाला त्यावर उत्तर देणे कठीण व्हावे. तुमचे मुद्दे वेगळे आणि उचित असतात, ते ऐकायची सर्वांची तयारी आहे पण भावनेच्या भरात चुकीचे शब्द वापरून विषयाचा चिखल होऊन जातो. आता कुणाच्या भावना दुखावू नये म्हणून आपण कुणाला गोंजारत बसू शकत नाही. पण मत मांडायचीही एक पद्धत असते. बाकी ज्याच्या त्याचा स्वभाव, ज्याची त्याची शैली.

चर्चा कितीही बालिश किंवा महत्त्वाच्या विषयावर असो चर्चा करणारांनी सभ्य धारणा ठेवली तर चर्चेचं वातावरण योग्य राहून भाग घेणारांना काहितरी नवीन माहिती मिळाल्याचं समाधान वाटते. नुसती चिखलफेक करायची तर त्यासाठी (मिपा सोडून) इतर मार्ग आहेत.

माझी विनंती तुम्हास गैर वाटत असेल तर माफ करा. माझे मत खटकले असल्यास वाईट वाटून घेऊ नका.

सुबोध खरे's picture

15 Apr 2015 - 7:24 pm | सुबोध खरे

तुमचे देव परदेशी गायीच्या शेणात रहात नसतील नै का ?
हे वाक्य अनाठायी आहे आणि याचा अध्यारुथ अर्थ चांगला नाही.
हितेश राव
हिंदू देवतांबद्दल आपल्याला आदर नसेल पण इतक्या खालच्या थराला उतरू नका
संपादक मंडळाला विनंती हे वाक्य गाळावे

hitesh's picture

15 Apr 2015 - 7:26 pm | hitesh

हा शब्द वापरला आहे.

खंडेराव's picture

15 Apr 2015 - 7:29 pm | खंडेराव

आपणास विनंती, चर्चेचा स्तर खाली नेउ नका.

अर्धवटराव's picture

15 Apr 2015 - 9:52 pm | अर्धवटराव

गोमांस खावे कि नको? गोमांसाचा धंदा करायची परवानगी सरकारने द्यावी म्हणुन मिपाकरांच्या आंदोलनात सामिल व्हावे कि नको? सगळ्या जगाला शाकाहारी बनवायची शपथ मिपाकरांनी घ्यावी काय?

अवतार's picture

16 Apr 2015 - 11:24 pm | अवतार

नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली.

ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.

hitesh's picture

17 Apr 2015 - 4:32 am | hitesh

जैनमत , बौद्धमत यांच्या आगमनानंतर हा देश शाकाहाराकडे वाटचाल करु लागला.

अमोल मेंढे's picture

22 Apr 2015 - 6:17 pm | अमोल मेंढे

ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.

गौतम बुद्ध छोटी व्यक्ती? _/\_

अवतार's picture

23 Apr 2015 - 7:33 pm | अवतार

एवढ्या मोठ्या व्यक्तीला ( आणि तिच्या कर्तृत्वाला ) अनुल्लेखाने मारण्यापेक्षा छोटीशी व्यक्ती म्हणून आठवण ठेवलेली ( आणि करून दिलेली ) चांगली नव्हे काय?

संदीप डांगे's picture

17 Apr 2015 - 6:26 am | संदीप डांगे

मोह आवरत नाही म्हणून या लेखातला अजून एक घोळ लक्षात आणुन देतो.

खरेसाहेबांनी दिलेल्या लिंकनुसार २०१२ मधे भारतात सुमारे ३६ लाख टन बीफ तयार झाले असून त्यातले सुमारे १९ लाख टन निर्यात झाले आहे. यात बहुतांश मांस हे म्हशीचे आहे असे म्हटले आहे.

वर लेखात ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल असे म्हटले आहे. जर आताच ३६ लक्ष टन मांस निर्मिती होते आहे ती संभावित निर्मितीच्या ७० टक्के आहे. या मांस निर्मितीला वरच्या गणिताप्रमाणे लागणारे खाद्य आणि चाराही लागत आहे. जर ७०% एवढे खाद्यान्न्+चारा+पाणी आत्ताच आपण देत आहोत तर वरच्या लेखात उल्लेखलेली संभाव्य भयावह परिस्थिती किमान ७० टक्क्याएवढी देशात आत्ताच दिसायला हवी होती. मागे एका लेखात ५० टक्क्यांच्या वर काही आढळत असेल तर ते लक्षात घेण्यासारखे आहे असे काही लोक म्हणत होते. आता हे ७०% मला या देशात आढळत नाही आहे. मला कोणी मार्गदर्शन कराल काय?

असो.

हिंदूंच्या फ्रॅक्चर्ड आयडीओलॉजीचा विकृत फायदा घेण्यासाठी गायीला पद्धतशीरपणे राजकारणात ओढण्यात आले आहे. हिंदूंचे मुक्या प्राण्यांवर दया करा, कणकणमें है भगवान ह्या सर्व कल्पना फक्त गायीवरच एकवटल्या आहेत. हा प्रचंड दांभिकपणा बघून हसायला येते. उद्या मासे हे विष्णुचा अवतार आहे म्हणून मासेमारी आणि खाणे बंद केले तर? हे सरकार हिंदुहिताची रक्षा करते असे खोटे चित्र रंगवून, यांनी दिलेली सर्व आश्वासने जणू पुर्ण झाली आहेत या मूर्ख बेहोशीत काही स्वतःला हिंदू समजणारे नाचतायत. आधी राममंदीरच्या नावावर पेटवून, नंतर गुपचुप रामालाच खाकेला मारून, आता गायीवरून जनमतात फूट पाडू इच्छीत आहेत. असे अजिबात न होवो, पण देश रवांडाचे अनुकरण करण्याचे दिशेने हळूवार शीळ घालत पावले टाकत आहे असे जाणवते आहे.

देशी गायींचे वाण जपणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हे मूळ कायद्यातले उद्देश हेतूपुरस्सर लपवून इतरधर्मीय खातात म्हणून हिंदूना पुज्य असणारी गाय कुणी मारू नये हा प्रचार विखारी आहे. त्याचा उद्देशही अतिशय भंगार आहे. असे निर्बुद्ध निर्णय म्हणजे साप सोडून जमीनीवर काठी आपटण्यासारखे आहे. मुस्लिमांना आपण आपल्या टाचेखाली ठेवले याचा दंभ काही स्वघोषीत हिंदूंना करायचा आहे. म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. तो दिवसेंदिवस बालिश आणि हास्यास्पद होत चालला आहे.

भाजपचा खंदा पुरस्कर्ता असूनही मला या मुद्द्यांवर विरोध करायचा आहे तो मी करत राहीन.

बाकी, एक कयास असा आहे की पटाईतसाहेब काडी टाकून पसार झाले आहेत. त्यांनी लेखात टंकलेले त्यांचे स्वतःचे मत आहे असे दिसत नाही.

आनंदी गोपाळ's picture

23 Apr 2015 - 10:07 am | आनंदी गोपाळ

आमच्या एक्सेल शीटमधील तुमच्या आयडीचे वर्गीकरण बदलण्यात आलेले आहे.

हाडक्या's picture

23 Apr 2015 - 2:19 pm | हाडक्या

अग्गाग्गा.. अशी कुणी चित्रगुप्ताप्रमाणे मिपा पाप-पुण्याची नोंदपण ठेवत असेल असे वाटले नव्हते. ;)

आनंदी गोपाळ's picture

23 Apr 2015 - 3:30 pm | आनंदी गोपाळ

व्हय जी. हितल्याच जुन्या जाणत्यांकडून शिकलो.
बाकी तुमची नोंद घेण्यात आली आहे.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 4:57 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ...मिपावर लोक असे पण कर्तात...पुण्यातले पेंशनर्पण असले रिकामटेकडेपणाचे उद्योग करत नस्तील
रच्याकने....जमा झालेल्या पाप-पुण्यावर व्याज चढते कै? :)

हाडक्या's picture

23 Apr 2015 - 7:16 pm | हाडक्या

तुला जिथे तिथे व्याजाचीच चिंता रे..

(आता काय भागवतांची दीक्षा घेतलीयेस का ? ;))

बॅटमॅन's picture

23 Apr 2015 - 7:21 pm | बॅटमॅन

भागवतांची दीक्षा

अय्या ही कोण?

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 7:37 pm | टवाळ कार्टा

"अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला कै??

बॅटमॅन's picture

23 Apr 2015 - 7:41 pm | बॅटमॅन

हाहा, उगीच रे.

हाडक्या's picture

23 Apr 2015 - 7:43 pm | हाडक्या

"अय्या"???

संगतीचे परिणाम हैत भौतेक.. ;)

(टका, भागवतांच्या दिक्षेबाबत बोल तू.. ;) )

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 9:47 pm | टवाळ कार्टा

हाहा
आधी दीक्षा मिळू तर दे ;)

संदीप डांगे's picture

23 Apr 2015 - 4:09 pm | संदीप डांगे

फाईल ओपन ठेवा. बर्‍याच दुरुस्त्या कराव्या लागतील वारंवार...

आनंदी गोपाळ's picture

23 Apr 2015 - 11:40 pm | आनंदी गोपाळ

आमची कायम उघडी असते.
बंद करायचे काहीही प्रयोजन नाही. :)

संदीप डांगे's picture

24 Apr 2015 - 12:00 am | संदीप डांगे

बरं.

आनंदी गोपाळ's picture

24 Apr 2015 - 12:07 am | आनंदी गोपाळ

वयाच्या कॉलममधे नुकतीच दुरुस्ती केली. उघडी ठेवण्याच्या सूचने बद्दल धन्यवाद!

अन हो! उघडी असली, तरी ती फक्त आम्हालाच अ‍ॅक्सेसिबल अस्ते बरं का.

hitesh's picture

18 Apr 2015 - 10:01 am | hitesh

वंद्रे निवडणुकीच्या वेळी राणेंच्या घरासमोर कोंबड्या उडवणे तुडवणेअसे प्रकार झाले म्हणे..

www.youtube.com/watch?v=3SMtBYqftbM

cow & भूतदया हा संबंध जोडणारे लोक इतर प्राण्याना सावत्र वागणुक का देतात ?

अरेरे, त्या ब्रॉयलर कोंबड्या आधीच अर्धमेल्या असतात. गावठी कोंबड्या आणल्या असत्या तर त्यांना सांभाळताना निदर्शकांची त्रेधातिरपीट उडाली असती.

होबासराव's picture

18 Apr 2015 - 10:18 am | होबासराव

:)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Apr 2015 - 11:07 pm | निनाद मुक्काम प...

हे जरा वाचा

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2015 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे फार पूर्वीपासूनच आहे ! भारतातून निर्यात होणारे बीफ मुख्यतः कॅराबीफ (म्हैस आणि रेड्याचे मांस) असते, त्यामुळे या गोहत्याबंदीचा निर्यातीवर काहीच परिणाम होणार नाही. उलट, बीफ निर्यातीत जागतीक दुसर्‍या क्रमांकावरच्या असलेल्या भारत एक क्रमांकावर असलेल्या ब्राझीलला लवकरच मागे टाकेल अशीच लक्षणे आहेत...

जागतीक निर्यात : ९,१६५,००० टन

Rank Country.........2013.........% Of World

1 Brazil............1,849,000.........20.17%
2 India.............1,765,000.........19.26%
3 Australia.........1,593,000.........17.38%
4 United States.....1,172,000.........12.79%
5 New Zealand.........529,000.........5.77%
6 Uruguay.............338,000.........3.69%
7 Canada..............333,000.........3.63%
8 Paraguay............326,000.........3.56%
9 EU..................244,000.........2.66%
10 Belarus.............220,000.........2.40%
11 Argentina...........186,000.........2.03%
12 Mexico..............166,000.........1.81%
13 Nicaragua...........125,000.........1.36%
14 Pakistan.............50,000.........0.55%
15 Colombia.............46,000.........0.50%
16 Jordan...............35,000.........0.38%
17 Saudi Arabia.........35,000.........0.38%
18 Ukraine..............34,000.........0.37%
19 China................30,000.........0.33%
20 Costa Rica...........18,000.........0.20%
21 Honduras.............13,000.........0.14%
22 South Africa.........13,000.........0.14%
23 Russia...............12,000.........0.13%
24 Malaysia..............6,000.........0.07%
25 Chile.................5,000.........0.05%
26 Guatemala.............4,000.........0.04%
27 Korea, South..........4,000.........0.04%
28 Lebanon...............4,000.........0.04%
29 Switzerland...........3,000.........0.03%
30 Azerbaijan............2,000.........0.02%
31 Bosnia................1,000.........0.01%
32 Japan.................1,000.........0.01%
33 Kazakhstan............1,000.........0.01%
34 Philippines...........1,000.........0.01%
35 Taiwan................1,000.........0.01%
36 Senegal...................0.........0.00%

Source: FAS/USDA (metric tons)