दिवस असे कि (भाग २ )

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
9 Apr 2015 - 9:45 pm

घरातील कार्य म्हटलं कि कामांचा डोंगर उभा राहतो . बहिणींच्या घरी सुद्धा अशीच खूप कामे होती . त्यातही मुंज घरीच करायची होती . कुठे कार्यालय वगैरे घेवून नाही . म्हणजे अगदी आचारी घरी येउन जेवण बनवणार आणि निमंत्रितांच्या पंगती उठणार . म्हणजे तर अतिशय जय्यत तयारी आवश्यक होती . त्यामुळे आम्ही गेलो ते त्या तयारीला हातभार लावायला म्हणूनच .
पहिल्या दिवशी दुपारून पोहोचलो . अगदी जेवायच्या वेळेवर . जेवून झाल्यावर छान झोप काढली . तोपर्यंत माझ्या मुलाला भाच्याची सायकल मिळाली होती . समोर मोठ अंगण पसरलेलं त्यामुळे तो लगेचच रमला . झोप झाल्यावर दुपारचा चहा घेवून फ्रेश झालो . आमच्याच बरोबर आणखीही काही नातेवाईक तिथे हजर झाले होते . चहा झाल्यावर मला समुद्रावर फिरायला जायचे होते . पण ४ वाजता चहा पिउन झाला आणि ताई म्हणाली एवढ्या लवकर समुद्रावर जाऊन काही उपयोग नाही . घराभोवती नारळी पोफळी असल्याने तुला उन जाणवत नाही पण समुद्रावर गेलीस तर वाळूचे चटके बसतील . मग थोड्या नाखुशीने का होईना काहीतरी काम हातात घेतलं . सगळ लक्ष मात्र घडाळ्याकडे . शेवटी ५.३० वाजत मी म्हटलं आता तरी जाते मी . ताई हसली आणि जा म्हणाली . वाडी पार करून आम्ही केवड्याच्या बन पाठी टाकल आणि समोरचा भव्य जलाशय पाहून मन सुखावलं .
पण एक गोष्ट अशी झाली कि ५. ३० म्हणजे सुद्धा आम्ही जरा लवकरच आलो होतो . कारण किनार्यावरची वाळू अजूनही गरमच होती . चटके बसत नसले तरीही वाळूचा गरमपणा जाणवत होता . माझ्या मुलाला मी प्रथमच समुद्र दाखवत होते . तो अनेक प्रश्न विचारात होता . समुद्र म्हणजे काय? एवढ पाणी कस?कुठून आल?कुठे जाणार? लाटा म्हणजे काय?त्या मागे पुढे का होतात ? एवढी वाळू कुणी आणली .?त्याच्या प्रश्नांना उत्तर देऊन मी थकले . मग थोडा वेळ आम्ही नुसतेच वाळूवर बसलो . आमच्याबरोबर विजयकाका आणि रेखाकाकू पण होते . हे खरे तर ताईचे सासरकडून नातेवाईक पण इशान ची विजयकाकांशी इतकी गट्टी जमली कि अजूनही तो त्यांची आठवण काढतो . पहिल्याच दिवशी गप्पा मारत असताना विजय काकांनी ईशान ला आपलेसे केले .

थोड्या वेळाने रेखाकाकू नि किनार्यावरून एक राउंड मारून यायची कल्पना काढली . पण ईशान एवढा चालणार कसा? विजयाकाका म्हणाले मी त्याला घेवून बसतो तुम्ही या फिरून . मग मी आणि रेखाताई किनार्याच्या कडेकडेने चालत निघलो. बर्यापैकी अंतर कापल्यावर किनार्याच्या जवजवळ एका टोकाला भरपूर कातळ आहे . अगदी सिनेमात दाखवतात तसा . आणि सिनेमात दाखवतात तशाच लाटा देखील त्या खडकांवर आपटत होत्या . तिथपर्यंत जाऊन आम्ही परत फिरलो . एक गोष्ट मी जाणीवपूर्वक केली ती म्हणजे चालायला जाताना मी चप्पल काढून ठेवल्या . वाळूचा मऊसर पण थोडासा गरम उबदार स्पर्श पायाला हवाहवासा वाटत होता . मधेच चालताना किनार्यावर आलेले शंख शिंपले आपल्या टोकदारपणा ची जाणीव पायांना करून देत होते . पण तितक्याच सहज ते वाळूत रुतत देखील होते . आम्ही मस्त चालून परत ईशान आणि काका बसलेले त्या जागी आलो . तोपर्यंत सूर्य बराच खाली आला होता . ईशान ने तोपर्यंत वाळूत अनेक प्रकराची अक्षरे काढली होती . सूर्य , हसरा चेहरा अस कायकाय काढून ठेवलं होत . मी आल्यावर उत्साहाने मला दाखवलन .
आता वेळ होती ती समुद्राच्या पाण्याला स्पर्श करण्याची . मी ईशान ला हात धरून पाण्यात नेले . आधी तो जेमतेम पाऊल बुडेल एवढ्या पाण्यात आला . लाट आली तेव्हा मजा वाटली पण लाट परत जाताना पायाखालची वाळू सरकायला लागली तसा तो घाबरायला लागला . हात घट्ट धरून ठेवलन . मी त्याला जरावेळ तसाच उभा केला आणि मग त्याला त्या सरकत्या वाळूवर उभे झाली रहायची सवय झाली . आणि त्यातली मजा तो अनुभवू लागला .
एकीकडे सूर्य अस्ताला जायला सुरवात झाली . सुर्यच बिंब जे आम्ही समुद्रावर आलो असताना तेजाने तळपत होत तेच आता लालबुंद रंगात आमच्या समोर आल होत . निसर्गाची कितीतरी रूप आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी बघतो . हा देखील त्यातलाच एक चमत्कार . त्या लालबुंद पण पूर्ण सूर्याकडे टक लावून मी बघत होते . हळूहळू सुर्य समुद्राच्या पाण्यात विसर्जित होत होता . केव्हाही सूर्यास्त बघताना मला कायम "मावळत्या दिनकरा "हि कविता आठवते . आणि नेहमीच माझे हातसूर्याकडे पाहून जोडले जातात . यावेळीही तसाच झाल . सूर्य उगवतीचा असो कि मावळतीचामी नेहमीच त्याला नमस्कार करते . सूर्यास्त पाहून काहीजणांना निराशा वाटते . पण का कुणास ठावूक मला असे कधीच वाटले नाही . कारण जेव्हा सूर्य अस्तास जातो त्याच वेळी त्याच पश्चिमेकडे एक छोटासा तारा लुकलुकत असतो . सुरवातीला तो अतिशय अंधुक असतो पण जसजसा सूर्य अस्ताला जाऊन पूर्ण अंधार होतो तसतसा तो तारा अधिकच ठळक होत जातो . आणि जसा मावळतीचा सुर्व मनात घर करतो तसाच हा तेजस्वी तारा आपल्या मनात त्याच वेगळ स्थान निर्माण करतो . सूर्य मावळला म्हणजे सगळे संपले असे नाही . जे तारे सूर्याच्या तेजामुळे दिसत नाहीत तेच रात्री झळाळून उठतात . त्यावेळी आकाशाची शोभा ते वाढवतात . दिवसा दिसत नसलेले हे तारे रात्री दिशादर्शक म्हणून उपयोगी येतात . माणसाचं देखील असच आहे ना ? प्रत्येक माणसात काहीतरी गुण , वैशिट्य असत . त्यामुळे तो इतर लोकांपेक्षा वेगळा असतो . प्रसिद्धीच झगमगाट नसला म्हणून त्या माणसाचे गुण कमी नाही होत . तो देखील कुणाच्या न कुणाच्या मदतीला उपयोगी पडतोच .
सूर्यास्त झाला नि आम्ही परत घराकडे निघालो . जाताना सूर्याला उद्या भेटायला नक्की येऊ आणि उगवती प्रमाणेच अस्ताचे सौदर्य बघू असे वचन मात्र दिले .

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

रुपी's picture

9 Apr 2015 - 11:25 pm | रुपी

छान!

प्रियाजी's picture

10 Apr 2015 - 2:26 pm | प्रियाजी

समुद्रावरचा अनुभव अगदी सही. आमची पण अशीच फजिती झाली होती. वाळूत पाय पोळून शहाणपण शिकलो होतो. बाकी लिखाणाची स्टाईल एकदम मस्त.

इडली डोसा's picture

10 Apr 2015 - 11:41 pm | इडली डोसा

"प्रत्येक माणसात काहीतरी गुण , वैशिट्य असत . त्यामुळे तो इतर लोकांपेक्षा वेगळा असतो . प्रसिद्धीच झगमगाट नसला म्हणून त्या माणसाचे गुण कमी नाही होत . तो देखील कुणाच्या न कुणाच्या मदतीला उपयोगी पडतोच .".. छान लिहिलयं.