दिवस असे कि (भाग १)

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 2:14 pm

भारतात आल्यावर अनेक मंगल कार्यक्रमांना जायची वेळ आली.अशा प्रसंगी सहभागी व्हायला मला देखील मनापासून आवडत.त्यातून मंगल कार्य कुणा घरच्याच जवळच्या नातेवाईकाच असेल तर मग बघायलाच नको.अगदी हक्काने जाण होत.यावेळी देखील असच अगदी जवळच मंगल कार्य होत.माझ्या बहिणीच्या मुलाची मुंज.नात्याने चुलत असली तरीही मनाने सख्खी बहिण असल्याने घरचंच कार्य होत.शिवाय सुट्टी देखील पुरेशी होती मग काय चांगला ८ दिवस मुक्काम ठोकला ताईकडे.
ताईच घर आहे कोळथरे या गावी.कोळथर हे कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात आणि दापोली तालुक्यात वसलेलं छानस टुमदार गाव आहे.या गावाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे गावाला लाभलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा.कोकणातील बर्याच गावांमध्ये आता रिसोर्ट सुरु झाली आहेत.आणि पर्यटकांचे आकर्षण म्हणून समुद्र किनारे गजबजून जातात.कोळथरे गावाला अजून हा शहरी वारा लागला नाही हे विशेष.त्यामुळेच इथला समुद्र किनारा खूपच स्वच्छ आहे.जवळ जवळ सगळ्या घरांमध्ये नारळी पोफळीची लागवड.त्यामुळे दापोलीहून निघाल्यानंतर गावाच्या जवळपास पोहोचू लागलो कि गावातली हिरवळ नजरेत भरायला सुरवात होते.फेब्रुवारी महिन्यात मी गेले होते.कोकणात उन्हाळा सुरु झाला होता.अशा वेळी शहरात भर दुपारी बाहेर पडावस वाटत नाही किंवा बाहेर नजर गेली तरी भगभगीत वाटत.तो फरक इथे खूपच जाणवला.घराच्या वाटोळी पूर्ण नारळी पोफळीची बाग असल्याने घरात तर थंडपणा होताच पण बाहेर जरी नजर गेली तरी सुखद गारवा नजरेला जाणवायचा.समुद्राच्या लाटांचा आवाज पार्श्व संगीतासारखा सुरु असायचा.सुरवातीला खूप जाणवायचा मग मात्र हळू हळू सवय होत गेली.
गावाची रचना खूपच सुंदर होती.मधून गावाला जोडणारा डांबरी रस्ता आणि त्याच्या दुतर्फा सगळी घर.घरासमोर अंगण.बहुतेक सगळीकडे अंगणावर पत्र्याचा मांडव घातलेला.आणि वर सुपारी वाळत पडलेली .अंगण झाल कि मोठ घर.अगदी पडवी,ओटी,माजघर,स्वयंपाकघर,पाठची पडवी,कोठीची खोली अशा सगळ्या खोल्यांसह.घराच्या पाठी छोटास अंगण आणि सभोवताली नारळी पोफळीची पसरलेली बाग.बागेत पाण्याचा ओघ सुरु.त्यामुळे जमीन कायम ओली आणि म्हणूनच थंड. या बागेला वाडी म्हणतात. आणि हि वाडी पार केली कि निळाशार समुद्र. वाडी संपली कि मध्ये केवड्याच बन लागत. जणू समुद्र आणि वाडी यांच्यातली ती हद्द. ते बन इतक उंच आहे कि पलीकडे समुद्र आहे हे केवळ लाटांच्या आवाजामुळे कळत.
तर अशा या रम्य गावी मी पूर्ण ८ दिवस काढणार म्हणून खुश होते. प्रश्न होता माझा मुलगा कसा राहील. पण त्यालादेखील हे वातावरण खूपच आवडलं आणि तो या गावी खूप छान रमला. इतका कि आपण पण असच आणि इथेच घर बांधूया अस म्हणाला.

मुक्तकआस्वाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 2:22 pm | टवाळ कार्टा

फोटो????

कविता१९७८'s picture

8 Apr 2015 - 2:28 pm | कविता१९७८

मस्त लेखन अन् अनुभव

आपला अनुभव आवडला... असेच लिहत रहा. :)
लेखाच्या शिर्षका वरुन खालचे गाणे आठवले...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

पीसी's picture

8 Apr 2015 - 3:40 pm | पीसी

खुप सुन्दर लेखन.

एक एकटा एकटाच's picture

8 Apr 2015 - 3:59 pm | एक एकटा एकटाच

मस्त

पुढच कधी????

नितिन५८८'s picture

8 Apr 2015 - 5:31 pm | नितिन५८८

मस्त थोडे मोठे मोठे भाग टाका....

खेडूत's picture

8 Apr 2015 - 6:36 pm | खेडूत

कोळथरे हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. बऱ्याच वेळा जाणं झालंय. पुढची ट्रीप कधी याची वाट पहातोय. इथे कोळेश्वर नावाचे स्वयंभू शंकराचे मंदिर आहे.
समुद्रकिनारा अतिशय शांत आहे. पोफळीच्या बागेतून चालत बाहेर येताना एकदम समुद्राचं दर्शन होतं तेव्हा मस्त वाटतं !

इथे जेवायला आघारकर नावाच्या कुटुंबात सोय होत असे. ते अजित आगरकरचे नातलग असल्याचं ऐकलं होतं. कोकणात म्हणे ते आघारकर नांव लावतात.

a

b

पुभाप्र !

ये नाम कहीं सुना सुना लगता हय. श्री ना पेंडशांच्या कोणत्यातरी कादंबरीत की काय?

सौन्दर्य's picture

8 Apr 2015 - 7:28 pm | सौन्दर्य

खूप छान वर्णन. माझा जन्म मुंबईचाच, गाव असे नाहीच, त्यामुळे कधी कधी फार वाईट वाटते.

रामपुरी's picture

8 Apr 2015 - 10:08 pm | रामपुरी

नक्की काय सांगायचं आहे?

रामपुरी's picture

8 Apr 2015 - 10:08 pm | रामपुरी

नक्की काय सांगायचं आहे?

रामपुरी's picture

8 Apr 2015 - 10:11 pm | रामपुरी

"भाग १" वाचलंच नाही. त्यामुळं वाटलं मुपि लेख वाट चुकून इकडे आला कि काय.
बघु पुढच्या भागात काही कळतंय का.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2015 - 1:42 am | चौथा कोनाडा

सुरेख लिहिलय ! वाचताना अगदी कोकणात पोहोचल्या सारख वाटले. दळवींच्या कादंबरीतील एखादा परिचछेद वाचतोय असे वाटले.

खेडुत यांची प्रचि देखिल नंबर वन !

खंडेराव's picture

9 Apr 2015 - 10:19 pm | खंडेराव

गाव सुंदर..मनात घर करुन बसलय, पण वेगळ्याच कारणासाठी.

मी आणि एक मित्र एक दिवस रहायला गावात पोहोचलो. रात्री अंधार होता, भुक लागलेली. ज्या घरी रहाणार होतो तिथे जाउन हात पाय धुतले आणि जेवायला बसलो. ताटात अर्धी पोळी आणि वाटीभर भाजी. शेवटी १० वेळा मागुन, अर्ध्या अर्ध्या घेऊन ५ पोळ्या खाल्ल्या. सकाळी नाश्ता आणि जेवायलाही हाच प्रकार. तेव्हा अगदी चकित झालो होतो.

सविता००१'s picture

10 Apr 2015 - 2:46 pm | सविता००१

गुहागर सुद्धा असंच सुरेख गाव आहे.