स्मशान शांततेची शिकवण

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जे न देखे रवी...
20 Mar 2015 - 9:54 am

अरे, वर्गात कितीरेही गडबड
सगळे शांत बसा बघू
प्रश्न विचारु नका
उत्तरे शोधू नका
चर्चा करु नका
सगळे पास होणार आहात तुम्ही
आपो‌आप परिक्षेशिवाय
पुढच्या वर्गात जाणार आहात

काय म्हणता?
विचार स्वातंत्र्य
उच्चार स्वातंत्र्य
ढोल ताशे
किती गोंगाट करताय तुम्ही
एका गोळीने बंद करता येतात
सारे शब्द
हो, आणि आजकाल पिस्तुलांनाही बसवले असतात सायलेन्सर
एका सेकंदात सारे खल्लास
सगळी भाषणे बंद
मोर्चे बंद
सभा बंद
चर्चा बंद
संघटन बंद
शूऽऽऽ शांतता
चौकशी चालू आहे

काय म्हणता?
सरकार तपास करेल
कोर्ट न्याय करेल
होतर,
तुम्ही शांत राहा
चौकशी चालू आहे

काय म्हणता?
ही तर माफियांची भाषा झाली
वाह राव
आज कळते काय तुम्हाला
राज्य तर आमचेच होते
आजही आमचेच आहे
उद्याही आमचेच असेल
सत्ता आमची, पोलीस आमचे, कोर्टही आमचेच

आम्हाला माहित आहे
बुळचट मध्यमवर्गीय तुम्ही
तुमच्या बुडाखाली जळाले
तरि तुम्ही लढणार नाही

एखादा गांधीबाबा,
एखादा दाभोलकर,
एखादा पानसरे,
अशी बेण
अनेक दशकांत
एखादीच उगवायची
ती उपटून टाकली
की सार कस शांत, शांत, शांत

तर म्हणा मुलांनो एक स्वरात
ॐ शांती, शांती, शांती

- देवदत्त परुळेकर

सांत्वनाकवितामुक्तकसमाज

प्रतिक्रिया

एस's picture

23 Mar 2015 - 11:57 am | एस

या कवितेवर मिपाच्या वर्गात स्मशानशांतता आहे ह्यातच सगळं आलं!

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2015 - 12:00 pm | पिवळा डांबिस

सुरेख कविता!

प्रचेतस's picture

23 Mar 2015 - 12:51 pm | प्रचेतस

हेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Mar 2015 - 12:52 pm | अत्रुप्त आत्मा

छान

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2015 - 7:46 pm | प्रकाश घाटपांडे

ॐ शांती, शांती, शांती

ओम शांती ओम शांती शांती ओम!

संयमित शब्दांत तरीही अत्यंत बोचरा उपहास, कविता आवडलीच!

श्रीरंग_जोशी's picture

23 Mar 2015 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी

बहुगुणी यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियेशी सहमत.