मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

माजा बा

Primary tabs

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
16 Aug 2008 - 5:18 pm

मी चवतीत होतो.
स़काली उटलो. अंगोल धवली. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन गेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायव दिसना.
कसातरी बाकड्याव बसलो. हजेरी चाल्लीवती.
"मिथुन भोइर~~~ " मास्तर वरडलं
माज्या बा ला मिथुन लै आवराचा. माजी आय सांगाची क जवा जवा मिथुनचा पिच्चर थेटरान लागाचा तवा बा कामाव जयचाच नई.
आक्का दिस थेटरान परून असाचा.
"आत्ताच आयलो न" मी
"हं दिसतय मना."
"पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
"भोईराच्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटला. चवतीत होतू तरी वाचाय जमत न्हवतं. मी उबाच.
"काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर
"बा संग गेलतू चिंबोरी पकराला."
"बा ला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय क समजला ?"
घरी आलू.
सन्द्याकाली बा अल्याव आय म्हनली "मास्तरनी मिथन्याला झोरला आज. अब्यास करना म्हुन. तुमासनी बलीवलं हाय"
बाच डोस्क सटाकलं.
" माजे पोराला झोरला ? माजे पोराला झोरला ? क केलाय क त्यान ? क र मिथन्या ?"
"ग्रिवपाट नाय केलावता." मी लराय लागलो.
"आवरावरशी झोरला क ? बाला तू लरू नको. चीप रव चीप रव. उद्या बगून झेव."
मी बा च्या कुशीत झोपून गेलो.

सकाली मी न बा शालंत.

"क झाला ?" बा शांत.

"काश्या तुजा मिथन्या अब्यास करना बग" मास्तर

"मग " बा शांतच.

"अरे मग कय मग ? तेला चिंबोरी पकराला न्हेउ नको . अब्यास कदी करील त्यो ?"

"तेजायला मग खावाचा क ? तुजी हारां ?" बा सटाकला.

"असा क बोलतस काश्या ? मिथन्याजे चांगल्यासटी सांगतय."

"अब्यास करून डंपरवरतीच बसाचा हाय नं. आवरा करुन ठेवलाय त्याजेसाटी. तु सांगाची गरज नाय. "

"अरे अब्यास करा नको ? तेला वाचाय सुदीक येत नाय"

"म्हुन त्याला झोरलास ? म्हुन त्याला झोरलास ? आज तुजे रेमन की रे भायर काडतो क नाय बग. मिथन्या बांबू आन लवकर. बा चितालला.
...
...
...
त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला.

कथालेख

प्रतिक्रिया

रामदास's picture

16 Aug 2008 - 6:58 pm | रामदास

एव्हढं कळलं.आता पाडा कुठला ते सांगा.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Aug 2008 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते

छान आहे...

त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला.
म्हंजे, अजून पन मारलाय मास्तरला... ??? त्ये पन येऊ द्या ना...

बिपिन.

टारझन's picture

16 Aug 2008 - 8:25 pm | टारझन

बाला ... क झाक लिवलय रं ... मी एकलाच हासतवथो =))

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पिवळा डांबिस's picture

16 Aug 2008 - 10:05 pm | पिवळा डांबिस

इचिभनं, बाल्या!
कं लिवलाय, कं लिवलाय!!!!!

आरं ग्रिवपाट करून कुनाचा भलां जालावतां?
बरां झाला तुझ्या बानं मास्तराला झोरला....

आता चिच्चा पारायला यितू का?:)

-पिवला म्हात्रे

भडकमकर मास्तर's picture

17 Aug 2008 - 12:05 am | भडकमकर मास्तर

ह्ये बेष्ट आहे...
...चालूद्यात... शेवट जरा अजून सविस्तर येउद्यात..
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्राजु's picture

17 Aug 2008 - 6:08 am | प्राजु

आणि थोडं नाही.. पण जे समजलं ते खूप आवडलं. भाषा थोडी वेगळ्या वळणाची आहे. हळू हळू समजायला लागेल. पण पुढचा भाग लिहा लवकर.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

17 Aug 2008 - 8:18 am | विसोबा खेचर

रे बाला,

मस्त लिल्लं हाय ते तू! कंचा आगरी तू? दिव्याचा क?

चल खारीवर जाऊया क खाडीतल्या कोलंब्या पकराला? टप टप उडतात बग! :)

असो,

आगरी बोलीभाषेतला मस्त लेख रे! :)

तात्या.

मदनबाण's picture

17 Aug 2008 - 8:35 am | मदनबाण

कारं बाल्या कय मस्त लिवतोस तु,,,याचा दुसरा भाग पटलन लिव बघ..
समद एकदम डिटल मंदी हव ,,ह्यो ब्रिटीस कंचा नाव तुझा,,बाल्याच लई झ्याक वाटरं बघ..

(आगरी दोस्त)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

यशोधरा's picture

17 Aug 2008 - 11:23 am | यशोधरा

मना बी लयं आवरला ह्ये लिवलेलां...

धनंजय's picture

18 Aug 2008 - 6:42 am | धनंजय

मजा आली.

विजुभाऊ's picture

29 Dec 2009 - 2:39 pm | विजुभाऊ

जय खारपाडा.
क लिवल र क लिवल.
मास्तराला पोकल बांबुचे फटके परले आन त्यो त्येच्या घरी बी नाय ग्येला

पाषाणभेद's picture

30 Dec 2009 - 9:10 am | पाषाणभेद

आता हातासरशी आमचा बा अन आम्ही लिवून टाका.
------------------------
या वर्षी पण मी एक संकल्प केला होता, दररोज डायरी न लिहीण्याचा. आज त्याची पुर्ती होत आहे.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

विशाल कुलकर्णी's picture

30 Dec 2009 - 10:10 am | विशाल कुलकर्णी

बाला मस्त लिवलस रे !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

कानडाऊ योगेशु's picture

30 Dec 2009 - 1:26 pm | कानडाऊ योगेशु

च्या मारी..पाषाणभेदांचा तो पतंगाच्या मांज्यावरील लेख आणि त्यावरील उद्बोधक प्रतिसाद वाचुन पंगत च्या ठिकाणी पतंग दिसले आणि इथे माजा च्या ठिकाणी मांजा दिसले...
लिखाण आवडले..बोले तो एकदम मिथुन काशिनाथ भोईर स्टाईल.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2018 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुझ्या लेखनाची वाट पाहतोय. ये लवकर खुप मिस करतोय.
आज तुझी आठवण आली ये रे मिपावर लेखन करायला.

-दिलीप बिरुटे

श्वेता२४'s picture

30 Aug 2018 - 5:51 pm | श्वेता२४

आगरी भाषेचा टोन छान जमून आलाय. आवडलं

शित्रेउमेश's picture

31 Aug 2018 - 10:38 am | शित्रेउमेश

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र लय बेक्कार..... मास्तर लाच झोरला???
बाबो....