माजा बा
लेखनप्रकार
मी चवतीत होतो.
स़काली उटलो. अंगोल धवली. च्या न बटर खाल्ला.
पलत शालन गेलो. उशीर झाल्ता. मास्तरनी झनकन कानाखाली पेटवली. पाच मिन्टं अन्दार. कायव दिसना.
कसातरी बाकड्याव बसलो. हजेरी चाल्लीवती.
"मिथुन भोइर~~~ " मास्तर वरडलं
माज्या बा ला मिथुन लै आवराचा. माजी आय सांगाची क जवा जवा मिथुनचा पिच्चर थेटरान लागाचा तवा बा कामाव जयचाच नई.
आक्का दिस थेटरान परून असाचा.
"आत्ताच आयलो न" मी
"हं दिसतय मना."
"पुस्तकं कारा साल्याव" हजेरी झल्याव मास्तर परत वराडलं
"भोईराच्या उट न कालचा धरा वाचुन दाकीव. "
माजे पोटान गोला उटला. चवतीत होतू तरी वाचाय जमत न्हवतं. मी उबाच.
"काल कुट श्यान खाया गेलवतास रं भाड्या" मास्तर
"बा संग गेलतू चिंबोरी पकराला."
"बा ला बलीव उदया नायतं सालंन येवाचा नाय क समजला ?"
घरी आलू.
सन्द्याकाली बा अल्याव आय म्हनली "मास्तरनी मिथन्याला झोरला आज. अब्यास करना म्हुन. तुमासनी बलीवलं हाय"
बाच डोस्क सटाकलं.
" माजे पोराला झोरला ? माजे पोराला झोरला ? क केलाय क त्यान ? क र मिथन्या ?"
"ग्रिवपाट नाय केलावता." मी लराय लागलो.
"आवरावरशी झोरला क ? बाला तू लरू नको. चीप रव चीप रव. उद्या बगून झेव."
मी बा च्या कुशीत झोपून गेलो.
सकाली मी न बा शालंत.
"क झाला ?" बा शांत.
"काश्या तुजा मिथन्या अब्यास करना बग" मास्तर
"मग " बा शांतच.
"अरे मग कय मग ? तेला चिंबोरी पकराला न्हेउ नको . अब्यास कदी करील त्यो ?"
"तेजायला मग खावाचा क ? तुजी हारां ?" बा सटाकला.
"असा क बोलतस काश्या ? मिथन्याजे चांगल्यासटी सांगतय."
"अब्यास करून डंपरवरतीच बसाचा हाय नं. आवरा करुन ठेवलाय त्याजेसाटी. तु सांगाची गरज नाय. "
"अरे अब्यास करा नको ? तेला वाचाय सुदीक येत नाय"
"म्हुन त्याला झोरलास ? म्हुन त्याला झोरलास ? आज तुजे रेमन की रे भायर काडतो क नाय बग. मिथन्या बांबू आन लवकर. बा चितालला.
...
...
...
त्या दिशी पयल्यांदा मास्तरला बा चे पाया परताना बगीतला.
वाचन
7666
प्रतिक्रिया
0