"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे. हा प्रवास एकूण बारा टप्प्यांत होणार आहे आणि त्याला एकूण पाच महिने लागतील असा अंदाज आहे.
पहिला टप्पा : अबू धाबी ते मस्कत : ०९ मार्च २०१५
उड्डाण : संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीतील अल् बतीन विमानतळ; स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ७:१२ ला.
पोहोचले : ओमानामधील मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ; रात्री ८:१३ वाजता.
अंतर : ४०० किलोमीटर.
उड्डाणाची वेळ : १३ तास १ मिनिट.
उड्डाणात विमानाने गाठलेली उच्चतम उंची : ५,७९१ मीटर.
दुसरा टप्पा : मस्कत ते अहमदाबाद.
तिसरा टप्पा : अहमदाबाद ते वाराणसी.
पुढचा प्रवास : वाराणसी - मंडाले (ब्रम्हदेश) - चोंगचिंग (चीन) - नानजिंग (चीन) - हवाई (यु एस ए) - फिनिक्स अॅरिझोना (यु एस ए) - मध्य यु एस ए - न्यू यॉर्क (यु एस ए) - युरोप / उत्तर आफ्रिका - अबू धाबी.
खालील चित्रे सोलार इंपल्सच्या अधिकृत संस्थळावरून घेतली आहेत...
या प्रवासाचे धावती माहिती येथे मिळेल.
.
.
.
==================================================================
संबद्धित माहिती :
* या वैमानिक जोडगोळीने १९९९ मध्ये "ब्रीटिलंग ऑर्बायटर ३" नावाच्या आकाशप्लवाच्या (balloon) साहाय्याने १९ दिवसांत न थांबता पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विक्रम केला आहे.
* सोलार इंपल्स १ ने ७-८ जुलै २०१० ला केवळ सौरऊर्जा वापरून स्वबळावर उडून करून दिवस-रात्र सतत २६ तास उडण्याचा विक्रम केला आहे. त्यातले ९ तास रात्रीचे होते.
* सोलार इंपल्स १ ने केवळ सौरऊर्जा वापरून सतत ३६ तास उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.
==================================================================
प्रतिक्रिया
10 Mar 2015 - 1:13 am | स्रुजा
छान माहिती दिलीत. मागच्या आठवड्यात पहिल्यांदा वाचली बातमी पण एवढा मोठा पल्ला गाठणार आहे हे त्यात नव्हतं.
पंख एवढे मोठे का आहेत? का तेच सोलार पॅनेल आहेत? शेपटीच्या मागे पण दिसतंय पॅनेल सारखं काही तरी. तुम्ही दिलेली लिंक घरी जाऊन बघते.
10 Mar 2015 - 1:20 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
पंख जेवढे जास्त मोठे तेवढे त्यांची सौरउर्जा मिळविण्याची क्षमता वाढते. केवळ पंखच नाहीत तर विमानाच्या सर्व वरच्या पृष्ठभागावर सोलर पॅनेल्स आहेत.
10 Mar 2015 - 1:15 am | प्रभाकर पेठकर
होय. आजच संध्याकाळी हे विमान मस्कत विमानतळावर उतरले. अनेकांनी हा अविस्मरणिय सोहळा याची देही याची डोळा पाहिला. दुर्दैवाने मी विमानतळावर जाऊ शकलो नाही. असो.
अबुधाबी ते मस्कत १३ तास म्हणजे बराच जास्त काळ आहे. रस्त्याने कार प्रवासही ह्याच्या अर्ध्यावेळात होईल. इतका वेळ का लागावा कळत नाही.
10 Mar 2015 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
सद्याचे सौरउर्जा मिळविण्याचे तंत्र आणि या विमानाचे हलके वजन यांचा विचार करता या विमानाचा वेग नेहमीच्या विमानांपेक्षा कमी असणे सहाजिक आहे. तसे बघितले तर हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेतच आहे. पण असले प्रयोग त्या तंत्रज्ञानाच्या प्रगतितील मैलाचे दगड आहेत.
10 Mar 2015 - 7:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
10 Mar 2015 - 1:18 am | श्रीरंग_जोशी
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास सौरौर्जेच्या वापरामधील तो मैलाचा दगड ठरेल.
या विमानाच्या प्रवासाचा पुढचा टप्पा भारतात असल्याने आनंद वाटत आहे.
10 Mar 2015 - 1:29 am | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद ! सहमत.
10 Mar 2015 - 1:31 am | डॉ सुहास म्हात्रे
प्रवासाच्या मार्गाचा नकाशा...
(जालावरून साभार)
10 Mar 2015 - 1:37 am | विकास
रोचक आहे. फक्त आणिबाणीकरता कोणतेही इंधन नसणे जरा रिस्की प्रकार वाटला. विशेष करून ते विमान जेंव्हा प्रशांत आणि अॅटलांटीक महासागरावरून प्रवास करेल तेंव्हा!
10 Mar 2015 - 2:09 am | सांगलीचा भडंग
वा भारता मधील टप्पे पाहून आनंद झाला.सोलर पोवर बहुतेक पुढच्या काळातील महत्वाचा उर्जा स्त्रोत असेल
10 Mar 2015 - 3:17 am | स्पंदना
ऐकल होतं बातमीत, अन वाट पहात होते जास्तीच्या माहितेची. ;)
10 Mar 2015 - 6:50 am | गवि
एअरबस ३४० इतके लांब पंख, १६०० - २००० किलोच्या मधलं वजन आणि या सर्वात एकच सीट, तीही पायलटची..
७० किलोमीटर प्रतितासाचा मॅक्झिमम क्रूझिंग स्पीड..बाकी वाढीव वेग मिळालाच तर वातकृपेवर अवलंबून. समोरुन प्रचंड वारा असेल तर जागच्याजागी जॉगिंगचा प्रकार.
सर्विस सीलींग सत्तावीस हजार फुटांहून जास्त, पण केबिन प्रेशराईज्ड नाही, त्यामुळे मनुष्य श्वास घेईल इतपत आल्टिट्यूडच शक्य (१०-१२ हजार फूट). अन्यथा ऑक्सिजन सिलिंडर नाकात लावून घेऊन जायला हवे.
त्यामुळे साध्या प्रवासालाही अनेक दिवस.. पृथ्वीप्रदक्षिणेला तर महिने..
हे सर्व जेट आणि फॉसिल फ्युएलवर चालणार्या विमानांशी तुलनाही करु नये इतकं अव्यवहार्य वाटेल, सध्या मेणबत्यांच्या ज्योतीवर बॉयलर चालवण्याचा प्रकार आहे असं वाटेल.
पण ही सुरुवात आहे. त्यामुळे कौतुकास्पदच.
मुख्य ब्रेकथ्रू या सौर ऊर्जेच्या क्षेत्रात हवा आहे तो कमी क्षेत्रफळावर जास्त ऊर्जा कॅप्चर करण्याचा.
24 Jun 2016 - 7:19 am | nanaba
Apali zad karatat baghata has pralay..
Max utilization of energy without creating any garbage and creating useful stuff in d process..
10 Mar 2015 - 7:35 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ग्रीन फ्लाईटच्या ह्या उपक्रमास अनेक शुभेच्छा!!!!!!
10 Mar 2015 - 7:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
@इए काका @गवि,
विमानाविषयी जास्त तांत्रिकी माहिती जमली तर लिहाल का?
10 Mar 2015 - 7:41 am | स्रुजा
+ १. असेच म्हणते.
ए काका, पंखांच्या खुलाशाबद्दल धन्यवाद. अजून पण लिहा प्लीझ. गवि तुमच्याकडून पण अजून जाणून घ्यायला आवडेल.
10 Mar 2015 - 7:58 am | अत्रुप्त आत्मा
+3
मुख्यत: स्पीड इतका कमी असलेल्या विमानाचे उड्डाण कसे काय शक्य होते? की तेव्हढ्या पुरते पर्यायी इंधन वापरतात?
10 Mar 2015 - 8:47 am | श्रीरंग_जोशी
या विमानाची क्षमता समजुन घेताना दुसर्या एखाद्या भरपूर वापरल्या जाणार्या विमानाबरोबर तुलनात्मक आकडेवारी मांडाविशी वाटली. दोन्ही आकडेवार्या विकीवरून साभार.
Cessna 152
Solar Impulse 2
Crew 1 pilot + 1 passanger 1+1
Length 24 ft 73.5 ft
Wingspan 33 ft 236 ft
Height 8 ft 6 in 20.9 ft
Wing area 160 ft² 269.5 m2
Empty weight 490 kg Loaded weight: 2,300 kg
Max. takeoff weight757 kg 2,000 kg
Maximum speed 110 knots (204 km/h) 77 kts (140 km/h)
Cruise speed 107 knots (198 km/h) 90 km/h
Takeoff speed35 kmph
Range 477 mi (414 nm, 768 km)
Service ceiling 14,700 ft (4,480 m) 27,900 ft ( 8,500 m)
10 Mar 2015 - 9:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सर्व्हिस सिलिंग काय प्रकार आहे?
10 Mar 2015 - 9:15 am | श्रीरंग_जोशी
आदर्श परिस्थितीमध्ये ज्या कमाल उंचीवरून विमान उड्डाण करू शकते ती उंची (असा माझा समज आहे) .
Service ceiling. The maximum density altitude where the best rate-of-climb airspeed will produce a 100-feet-per-minute climb at maximum weight while in a clean configuration with maximum continuous power.
विकी दुवा
10 Mar 2015 - 9:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
वोक्के!!! पहातो नंतर.
10 Mar 2015 - 9:47 am | श्रीरंग_जोशी
या विषयावर चर्चा करताना अनेक तांत्रिक गोष्टींना सामोरे जावे लागते ज्या समजून घेण्यास क्लिष्ट असू शकतात.
गवि यांचे या विषयावरील लेखन या ठिकाणी उत्तम मार्गदर्शक ठरू शकते.
खालील प्रतिसादात ते सर्व दुवे एकत्र देण्याचा प्रयत्न केला होता.
10 Mar 2015 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
दुसरा टप्पा : १० मार्च २०१५ :
सोलर इंपल्सने सकाळी ६:३५ ला मस्कतहून भरारी घेतली आणि अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रिय विमानतळच्या दिशेन मार्गक्रमण सुरू केले. या १४६५ किमीटर अंतराच्या टप्प्यामध्ये बरट्रांड पिकार्ड वैमानिकाची भूमिका बजावित आहे.
10 Mar 2015 - 10:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोलर इंपल्स २ भारताच्या वायूहद्दीत पोहोचले आहे आणि थोड्याच वेळात अहमदाबादला उतरणार आहे. ठरलेल्या वेळेपेक्षा (रात्री १०:३० वाजता) थोडा उशीर झाला आहे. पण अश्या प्रकल्पात हे नविन नाही. थोड्याच वेळात हे अव्दितिय विमान प्रथमच भारताच्या भूमीला स्पर्श करेल. आदित्य बिर्ला गृप या प्रकल्पाचा भारतिय यजमान आहे.
खालील दुव्यावर धावते समालोचन पाहता येईल...
15 Mar 2015 - 1:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
१. भारतातील तंत्रज्ञ आणि कंपन्याचा सोलार इंपल्स २ च्या बांधणीत महत्वाचा हातभार लागला आहे.
२. विमानोड्डाण चालू असताना वैमानिकाला उत्तम शारिरीक आणि मानसिक अवस्थेत ठेवण्यासाठी योगाचे सहाय्य घेतले जात आहे. त्याबद्दल खालील व्हिडिओ क्लिपमध्ये माहिती आहे...
.
Deep relaxation with portable Shirodhara prepares the mind for alertness and concentration #RTW http://t.co/za5cgGV14Z
15 Mar 2015 - 3:52 pm | नगरीनिरंजन
किती छान!
जगलोवाचलो तर अजून २०-३० वर्षांनी आपण सोलर विमानातून प्रवास करणार म्हणजे!
13 Jun 2015 - 2:05 am | श्रीरंग_जोशी
शक्यतो मी जुने धागे वर आणत नाहे पण आज अपवाद करत आहे.
या प्रकल्पातला सर्वाधिक महत्वाचा टप्पा म्हणजे आशियातून पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांवर सोलार इंपल्स २ या विमानाद्वारे पोचणे. चीनमधून निघालेली सलग पाच दिवसांची ही फ्लाइट खराब वातावरणामुळे १ जुन रोजी जपानमध्ये उतरवावी लागली.
आता सलग चार दिवसांचा प्रवास आहे. खराब वातावरण किंवा यांत्रिक बिघाड झाल्यास पॅराशुटने सुटका करून घेतल्यावर छोट्याशा राफ्टच्या सहाय्याने (मदत पोचेपर्यंत) समुद्रात तरंगत राहायचे आहे.
हा टप्पा यशस्वी झाल्यास सोलार प्लेनने सर्वाधिक लांबच्या फ्लाइटच्या प्रवासाचा विक्रम तर होईलच तसेच आजवरचे सर्वाधिक काळ चालणारी फ्लाइट म्हणून इतिहासात नोंद होईल.
André Borschberg व Bertrand Piccard या पायलट द्वयीला व सोलार इंपल्स २ च्या चमूला मन:पूर्वक शुभेच्छा!!
या संदर्भातली बातमी: Solar Impulse to fly world's longest solo flight from Japan to Hawaii
जपानमधील विमानतळावरच्या हॅन्गरमधले सोलार इंपल्स २ विमान
फोटो जालावरून साभार.
13 Jun 2015 - 10:04 am | एस
उत्सुकता आहेच. सोलर इम्पल्सला मनःपूर्वक शुभेच्छा!
13 Jun 2015 - 11:28 am | डॉ सुहास म्हात्रे
सोलार इंपल्स २ च्या ताज्या बातम्या आणि अनेक व्हिडिओ-क्लिप्ससह असलेली इतर माहिती या अधिकृत संस्थळावर पाहू शकाल.
29 Jun 2015 - 9:43 am | श्रीरंग_जोशी
हवामान सोयीचे नसल्याने जवळपास चार आठवड्यांपासून जपानमधील नागोया विमानतळावर सोलार इंपल्स २ थांबले होते. अखेर आज त्याने उड्डाण केले आहे.
बातमी: Solar Impulse begins second bid to cross Pacific Ocean.
फोटो सौजन्य - बीबीसी.
दोन्ही वैमानिक व या प्रकल्पाच्या चमूला शुभेच्छा!!
29 Jun 2015 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
नागोया (जपान) ते हवाई उड्डाणाची १२ तास ३६ मिनिटे (१०%) पूर्ण...
1 Jul 2015 - 11:45 pm | श्रीरंग_जोशी
या टप्प्यातले अर्धे अंतर संपले आहे.
सोलार विमानाद्वारे आजवरच्या सर्वाधिक लांबीच्या (वेळ व अंतर दोन्ही) उड्डाणाचा विक्रम झाला आहे.
संबंधीत बातम्या:
वैमानिक Andre Borschberg योग करताना (फोटो जालावरून साभार).
3 Jul 2015 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता पासून काही मिनिटात सोलार इंपल्स २ हवाई बेटावर उतरेल.
हा आतापर्यंतच्या खनिज तेल विरहित आणि केवळ सौर्यउर्जेवर चालवलेल्या विमानाचा जागतीक विक्रम आहे.
TIME OF DEPARTURE : 28/06/2015 18:03 UTC
FLIGHT TIME : 4d 21h 31m 31s
DISTANCE : 8246 km (99 %)
ALTITUDE : 1580 ft (482 m)
BATTERIES CHARGE : 30% (discharging)
ENERGY NEUTRAL IN : 2h 03m
GROUND SPEED : 21.2 KTS (39 km/h)
3 Jul 2015 - 11:19 pm | श्रीरंग_जोशी
या मोहिमेचा सर्वाधिक आव्हानात्मक टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.
संबंधीत बातम्या:
पायलटद्वयीचा फोटो बीबीसीवरून साभार.
16 Jul 2015 - 4:14 am | श्रीरंग_जोशी
जपान ते हवाई या प्रवासादरम्यान ओव्हरहिटींगमुळे सोलार इंपल्स २ च्या बॅटरीजचे नुकसान झाले आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत अधिक सुर्यप्रकाशाचा काळ संपून जाईल. त्यामुळे पुढचा टप्पा आता थेट एप्रिल २०१६ मध्ये सुरु होईल.
बातमी: Battery damage grounds Solar Impulse 2 until 2016
22 Apr 2016 - 12:27 am | श्रीरंग_जोशी
मोठ्या खंडानंतर ही मोहिम पुन्हा सुरु झाली आहे. हवाई बेटांवरील एका विमानतळावरून सोलार इंपल्स २ विमानाने उड्डाण केले आहे व ते सॅन फ्रॅन्सिस्को येथे उतरणार आहे (लाइव्ह स्ट्रीम).
संबंधीत बातमी: Solar Impulse sets off for California after long lay-off
24 Apr 2016 - 12:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण करून सोलार इंपल्स २ अमेरिका खंडात दाखल !
हवाई बेटावरून उडाल्यानंतर ६२ तासांचा प्रवास करून सोइं२ काही मिनिटांपूर्वी भारतिय प्रमाणवेळेप्रमाणे दुपारी १२:१५ ला अमेरिकेतील माऊंटन व्ह्यु, कॅलिफोर्निया येथे सुखरूपपणे उतरले !
या थांब्यानंतरचा त्याचा प्रवास फिनिक्स (अॅरिझोना, युएसए) येथे होईल.
24 Apr 2016 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
रियल टाईम व्हिडिओ स्ट्रिमिंग...
.
सोइई२ च्या उड्डाणाच्या या ९व्या टप्प्याचा मार्ग...
.
सोइं२ सान फ्रन्सिस्कोच्या गोल्डन गेट पूलावरून भरारी घेताना...
.
11 Jun 2016 - 7:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
सोलार इंपल्स२ अमेरिकन पूर्व किनार्याच्या वेळेप्रमाणे ११ तारखेच्या पहाटे न्युयॉर्कच्या जॉन एफ केनेडी आंतरराष्ट्रिय विमानतळावर उतरले. उतरण्याअगोदर त्याने स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्यावरून (स्टॅच्यु ऑफ लिबर्टी) भरारी घेतली.
अश्या तर्हेने सोलार इंपल्स२ने अमेरिकेच्या भूमीची फेरी संपवली आहे. आता पुढच्या खडतर टप्प्यात त्याला एकाच भरारीत अटलांटिक महासागर पार करून युरोपच्या भूमीवर पोहोचायचे आहे.
12 Jun 2016 - 2:31 pm | मारवा
अत्यंत अनोखा विषय आणि जबरदस्त माहीतीपुर्ण प्रतिसाद.
धन्यवाद या लेखासाठी
खुप आवडला.
18 Jun 2016 - 9:04 am | सुधीर कांदळकर
नवी प्रकाशचित्रे सुंदरच.
23 Jun 2016 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
अटलांटिक महासागर पार करून सोलार इंपल्स२ युरोपच्या भूमीवर पोहोचले !
२० जूनला अमेरिकेच्या पूर्व किनारा वेळेप्रमाणे पहाटे २:३० ला निघालेले सोलार इंपल्स२ ७१ तास व ८ मिनिटांचे उड्डाण करून स्पेनमधिक सेविल येथे २३ तारखेला पहाटे ५:३८ (UTC/GMT) वाजता उतरले.
पात्रुला अगिला (Patrulla Águila) या हवाई कसरती करणार्या स्पॅनिश विमानांच्या ताफ्याने त्याचे जंगी स्वागत केले...
चार्ल्स लिंडबर्ग याने १९२७ साली खनिज तेलावर चालणार्या विमानाने एका भरारीत अटलांटिक महासागर (न्युयॉर्क ते पॅरिस) सर्वप्रथम ओलांडला होता. आता बरट्रांड पिकार्ड याने तेच काम खनिज तेलाचा एकही थेंब न वापरता केवळ सौरशक्तीवर साध्य केले आहे !
या उड्डाणाने सोलार इंपल्स२ ने पृथ्वीप्रक्षिणेतील ९०% हिस्सा पुरा केला आहे ! जेथून सुरुवात केली त्या अबू धाबीला पोहोचण्यासाठी आता केवळ तीन उड्डाणे बाकी राहिली आहेत. आता थोडी विश्रांती घेऊन पुढचे उड्डाण इजिप्त अथवा ग्रीसच्या दिशेने होईल.
10 Jul 2016 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
UTC (Universal Time Coordinated, पूर्वीची ग्रिनिच वेळ) प्रमाणे ११ जुलैला पहाटे ४:३० वाजता सोलार इंपल्स२ त्याच्या पृथ्वीप्रदक्षिणेची शेवटून दुसरी भरारी स्पेनमधिल सविल् (Seville) येथून घेणार आहे. या फेरीत हे विमान भूमध्य समुद्र ओलांडून इजिप्तमधिल कैरो येथे पोहोचेल.
त्यानंतर कैरो ते अबू धाबी हा शेवटचा आणि तुलनेने सोपा टप्पा बाकी असेल. त्या शेवटच्या टप्प्याच्या पूर्ततेनंतर "पृथ्वीवरच्या कोणत्याच इंधनाची मदत न घेता केवळ सौरउर्जेवर केलेल्या पृथ्वीप्रदक्षिणेचा हा एकमेवाद्वितिय विक्रम पुरा होईल !
या भरारीसाठी आंद्रे बोर्शबर्गला अनेकानेक शुभेच्छा !
23 Jul 2016 - 12:35 am | डॉ सुहास म्हात्रे
विश्वविक्रम पुरा होण्यासाठीची शेवटची भरारी
सोलार इंपल्स२ अबु धाबी (यु ए ई) या गंतव्याला पोचण्यासाठी कैरो (इजिप्त) येथून २३ जुलै २०१६ रोजी UTC (Universal Time Coordinated, पूर्वीची ग्रिनिच वेळ) प्रमाणे रात्री ११ वाजरा शेवटची भरारी घेणार आहे.
हा ४८ तासांचा टप्पा पार केल्यावर सोलार इंपल्स२ ने स्वच्छ इंधनाच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवलेला असेल.
24 Jul 2016 - 7:37 am | सुधीर कांदळकर
सोलर इम्पल्सला या टप्प्यासाठी शुभेच्छा. अपडेट करिता धन्यवाद.
24 Jul 2016 - 7:52 am | डॉ सुहास म्हात्रे
.
सोलार इंपल्स२ ने कैरो येथून शेवटच्या टप्प्याची भरारी घेतली आहे... आता ते अबू धाबीला उतरून आपला विक्रम कधी पुरा करतेय याची वाट पाहिली जात आहे.
.
26 Jul 2016 - 8:52 am | डॉ सुहास म्हात्रे
.
ब्रेकिंग न्युज !!!
.
सोलार इंपल्स२ ने केवळ सौरउर्जा वापरून ४०,००० किलोमीटर लांबीची जगप्रदक्षिणा पूरी करून एक जागतिक विक्रमच नव्हे तर अपारंपारिक उर्जेच्या वापरासंबंधी एक मैलाचा रोवला आहे.
.
26 Jul 2016 - 9:44 am | सुधीर कांदळकर
सर्व सदस्यांचे अभिनंदन आणि तुम्हाला नित्य अद्यतनाबद्दल धन्यवाद.