सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे. हा प्रवास एकूण बारा टप्प्यांत होणार आहे आणि त्याला एकूण पाच महिने लागतील असा अंदाज आहे.
पहिला टप्पा : अबू धाबी ते मस्कत : ०९ मार्च २०१५
उड्डाण : संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीतील अल् बतीन विमानतळ; स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ७:१२ ला.
पोहोचले : ओमानामधील मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ; रात्री ८:१३ वाजता.
अंतर : ४०० किलोमीटर.
उड्डाणाची वेळ : १३ तास १ मिनिट.
उड्डाणात विमानाने गाठलेली उच्चतम उंची : ५,७९१ मीटर.
दुसरा टप्पा : मस्कत ते अहमदाबाद.
तिसरा टप्पा : अहमदाबाद ते वाराणसी.
पुढचा प्रवास : वाराणसी - मंडाले (ब्रम्हदेश) - चोंगचिंग (चीन) - नानजिंग (चीन) - हवाई (यु एस ए) - फिनिक्स अॅरिझोना (यु एस ए) - मध्य यु एस ए - न्यू यॉर्क (यु एस ए) - युरोप / उत्तर आफ्रिका - अबू धाबी.
खालील चित्रे सोलार इंपल्सच्या अधिकृत संस्थळावरून घेतली आहेत...
या प्रवासाचे धावती माहिती येथे मिळेल.
.
.
.
==================================================================
.
.
==================================================================
संबद्धित माहिती :
* या वैमानिक जोडगोळीने १९९९ मध्ये "ब्रीटिलंग ऑर्बायटर ३" नावाच्या आकाशप्लवाच्या (balloon) साहाय्याने १९ दिवसांत न थांबता पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विक्रम केला आहे.
* सोलार इंपल्स १ ने ७-८ जुलै २०१० ला केवळ सौरऊर्जा वापरून स्वबळावर उडून करून दिवस-रात्र सतत २६ तास उडण्याचा विक्रम केला आहे. त्यातले ९ तास रात्रीचे होते.
* सोलार इंपल्स १ ने केवळ सौरऊर्जा वापरून सतत ३६ तास उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.
==================================================================
वाचन
23370
प्रतिक्रिया
0