सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे. हा प्रवास एकूण बारा टप्प्यांत होणार आहे आणि त्याला एकूण पाच महिने लागतील असा अंदाज आहे.
पहिला टप्पा : अबू धाबी ते मस्कत : ०९ मार्च २०१५
उड्डाण : संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीतील अल् बतीन विमानतळ; स्थानिक वेळेप्रमाणे सकाळी ७:१२ ला.
पोहोचले : ओमानामधील मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ; रात्री ८:१३ वाजता.
अंतर : ४०० किलोमीटर.
उड्डाणाची वेळ : १३ तास १ मिनिट.
उड्डाणात विमानाने गाठलेली उच्चतम उंची : ५,७९१ मीटर.
दुसरा टप्पा : मस्कत ते अहमदाबाद.
तिसरा टप्पा : अहमदाबाद ते वाराणसी.
पुढचा प्रवास : वाराणसी - मंडाले (ब्रम्हदेश) - चोंगचिंग (चीन) - नानजिंग (चीन) - हवाई (यु एस ए) - फिनिक्स अॅरिझोना (यु एस ए) - मध्य यु एस ए - न्यू यॉर्क (यु एस ए) - युरोप / उत्तर आफ्रिका - अबू धाबी.
खालील चित्रे सोलार इंपल्सच्या अधिकृत संस्थळावरून घेतली आहेत...
या प्रवासाचे धावती माहिती येथे मिळेल.
.
.
.
==================================================================
.
.
==================================================================
संबद्धित माहिती :
* या वैमानिक जोडगोळीने १९९९ मध्ये "ब्रीटिलंग ऑर्बायटर ३" नावाच्या आकाशप्लवाच्या (balloon) साहाय्याने १९ दिवसांत न थांबता पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विक्रम केला आहे.
* सोलार इंपल्स १ ने ७-८ जुलै २०१० ला केवळ सौरऊर्जा वापरून स्वबळावर उडून करून दिवस-रात्र सतत २६ तास उडण्याचा विक्रम केला आहे. त्यातले ९ तास रात्रीचे होते.
* सोलार इंपल्स १ ने केवळ सौरऊर्जा वापरून सतत ३६ तास उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.
==================================================================
वाचने
23370
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
छान माहिती दिलीत. मागच्या
In reply to छान माहिती दिलीत. मागच्या by स्रुजा
धन्यवाद !
होय. आजच संध्याकाळी हे विमान
In reply to होय. आजच संध्याकाळी हे विमान by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
सहमत.
क्रांतिकारी प्रकल्प
In reply to क्रांतिकारी प्रकल्प by श्रीरंग_जोशी
धन्यवाद ! सहमत.
प्रवासाच्या मार्गाचा नकाशा...
मस्तच!
.
ऐकल होतं बातमीत, अन वाट पहात
एअरबस ३४० इतके लांब पंख, १६००
In reply to एअरबस ३४० इतके लांब पंख, १६०० by गवि
Energy
ग्रीन फ्लाईटच्या ह्या
@इए काका @गवि,
In reply to @इए काका @गवि, by कॅप्टन जॅक स्पॅरो
+ १. असेच म्हणते.
In reply to + १. असेच म्हणते. by स्रुजा
+3
तुलनात्मक स्पेक्स
In reply to तुलनात्मक स्पेक्स by श्रीरंग_जोशी
सर्व्हिस सिलिंग काय प्रकार
In reply to सर्व्हिस सिलिंग काय प्रकार by कॅप्टन जॅक स्पॅरो
कमाल उंची
In reply to कमाल उंची by श्रीरंग_जोशी
वोक्के!!! पहातो नंतर.
गविंचे या विषयासंबंधीत लेख
दुसरा टप्पा : १० मार्च २०१५ :
सोलर इंपल्स २ भारताच्या
सोलार इंपल्स २ आणि भारत...
किती छान!
महत्वाचा टप्पा
In reply to महत्वाचा टप्पा by श्रीरंग_जोशी
उत्सुकता आहेच. सोलर इम्पल्सला
सोलार इंपल्स २ च्या ताज्या
जपानहून उडाले
उड्डाणाची १२ तास ३६ मिनिटे (साधारण १०%) पूर्ण...
अर्धे अंतर संपले
आता पासून काही मिनिटात सोलार
यशस्वी
आता थेट एप्रिल २०१६
पुन्हा सुरु
उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण
In reply to उड्डाणाचा ९वा टप्पा पूर्ण by डॉ सुहास म्हात्रे
सोइई२ चा या उड्डाणचा मार्ग...
सोलार इंपल्स२ अमेरिकन पूर्व
जबरदस्त लेख आणि प्रतिसाद !!!!!!!!!
व्व्वा! मस्त .....
अटलांटिक महासागर पार करून
अटलांटिक महासागर पार करून सोलार इंपल्स२ युरोपच्या भूमीवर पोहोचले !
२० जूनला अमेरिकेच्या पूर्व किनारा वेळेप्रमाणे पहाटे २:३० ला निघालेले सोलार इंपल्स२ ७१ तास व ८ मिनिटांचे उड्डाण करून स्पेनमधिक सेविल येथे २३ तारखेला पहाटे ५:३८ (UTC/GMT) वाजता उतरले. पात्रुला अगिला (Patrulla Águila) या हवाई कसरती करणार्या स्पॅनिश विमानांच्या ताफ्याने त्याचे जंगी स्वागत केले...UTC वेळेप्रमाणे ११ जुलैला
विश्वविक्रम पुरा होण्यासाठीची
विश्वविक्रम पुरा होण्यासाठीची शेवटची भरारी
सोलार इंपल्स२ अबु धाबी (यु ए ई) या गंतव्याला पोचण्यासाठी कैरो (इजिप्त) येथून २३ जुलै २०१६ रोजी UTC (Universal Time Coordinated, पूर्वीची ग्रिनिच वेळ) प्रमाणे रात्री ११ वाजरा शेवटची भरारी घेणार आहे. हा ४८ तासांचा टप्पा पार केल्यावर सोलार इंपल्स२ ने स्वच्छ इंधनाच्या इतिहासात एक मैलाचा दगड रोवलेला असेल.वा वा वा वा ....
.
सोलार इंपल्स२ ने कैरो येथून शेवटच्या टप्प्याची भरारी घेतली आहे... आता ते अबू धाबीला उतरून आपला विक्रम कधी पुरा करतेय याची वाट पाहिली जात आहे.
.ब्रेकिंग न्युज !!!
ब्रेकिंग न्युज !!!
.सोलार इंपल्स२ ने केवळ सौरउर्जा वापरून ४०,००० किलोमीटर लांबीची जगप्रदक्षिणा पूरी करून एक जागतिक विक्रमच नव्हे तर अपारंपारिक उर्जेच्या वापरासंबंधी एक मैलाचा रोवला आहे.
.प्रकल्पात सहभागी झालेल्या .......