पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
4 Mar 2015 - 10:00 pm

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी
सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी ..

'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला
'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला
खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील
रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल
काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..

एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील
मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील
समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी ..
.

काहीच्या काही कविताशांतरसकवितामौजमजा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

4 Mar 2015 - 10:02 pm | प्राची अश्विनी

आवडली.

मनीषा's picture

4 Mar 2015 - 10:10 pm | मनीषा

बाकी सगळं ठीक आहे.
पण राधेला सारखं पळायला सांगता आहात ते कसं तरीच वाटतय.
तिला काय मॅरेथॉन मधे भाग घ्यायचा आहे का?

सांजसंध्या's picture

7 Mar 2015 - 12:32 pm | सांजसंध्या

सहमत.
प्रत्येक ओळी मधे "ग" सुद्धा खटकतो.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा आहेतच. लय सांभाळा.

विदेश's picture

5 Mar 2015 - 1:20 pm | विदेश

प्राची-
प्रतिसादासाठी आभार.
मनीषा-
राधाकृष्ण-लीला सगळ्या पळापळी लपाछपीत असणार ! प्रतिसादासाठी आभार.

पाषाणभेद's picture

7 Mar 2015 - 8:22 am | पाषाणभेद

समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी
एकदम छान.
बाकी पावा पिचकारी रंग सारे काही आले.

विदेश's picture

7 Mar 2015 - 6:52 pm | विदेश

सांजसंध्या,
पाषाणभेद -
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार !