मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी -

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी सोडणार ना रंगविल्याविण नटखट ग गिरीधारी .. 'नको' 'नको' तू म्हणुन सारशिल, दूर दूर ग त्याला 'हो' 'हो' म्हणतच, पुढे पुढे तो धरील पिचकारीला खट्याळ किती तो तुजला ठाऊक आहे ना गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. रंगबिरंगी इंद्रधनूतील सप्तरंग आणील रंगवून तुज सर्वांगाला खुषीत तो येईल काही न घडल्यासम.. पावा तो वाजवील गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. एकटीच तू दिसता येथे, गोपिकाही जमतील मोहित करील बासरीवाला, सर्व फेर धरतील समोर असुनी, नसेल कोठे, अद्वैतच गिरीधारी पळ पळ राधे, आला कान्हा घेऊन ग पिचकारी .. .

वाचने 1749 वाचनखूण प्रतिक्रिया 6

मनीषा Wed, 03/04/2015 - 22:10
बाकी सगळं ठीक आहे. पण राधेला सारखं पळायला सांगता आहात ते कसं तरीच वाटतय. तिला काय मॅरेथॉन मधे भाग घ्यायचा आहे का?

विदेश गुरुवार, 03/05/2015 - 13:20
प्राची- प्रतिसादासाठी आभार. मनीषा- राधाकृष्ण-लीला सगळ्या पळापळी लपाछपीत असणार ! प्रतिसादासाठी आभार.