हवं तरी काय!

राशी's picture
राशी in जे न देखे रवी...
24 Feb 2015 - 11:48 pm

काय पाहिजे सुचत नाही..
सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही..
जिवनातले काही अटळ पैलु
का टळत नाही?

ईच्छा असते तसं घडत नाही
स्वप्नात घड्ते पण...
पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही?

ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?

म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????

कविता

प्रतिक्रिया

म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही..
नाही सोडत तर...
हवा तेव्हा का मिळत नाही?????: मस्तच!

शब्दानुज's picture

25 Feb 2015 - 9:29 am | शब्दानुज

किती अपेक्ष्ा ठेवता इच्छा असुद्या अपेक्ष्ा नको

अपेक्षा नाहित पण काही सुप्त व्यथा आहेत ज्या फार क्षणिक आहेत. ज्या कधीनाकधी प्रत्येकाने अनुभवल्या असतील.

ज्योति अळवणी's picture

25 Feb 2015 - 9:45 am | ज्योति अळवणी

छान आहे कविता. पण थोड़ी अधूरी वाटली

आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.

यसवायजी's picture

28 Feb 2015 - 4:36 pm | यसवायजी

ज्याच्या कडुन हवे असते..
त्याच्या कडे मागता येत नाही..
>>
हेच चुकतं तुम्हा बायकांचं. एकदा मागुन तर बघा, मिळेल मिळेल. :))))

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2015 - 6:10 pm | टवाळ कार्टा

त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै?
याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका

@ त्याच्या कडे मागता येत नाही..
मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >>

पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे?
'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)

टवाळ कार्टा's picture

28 Feb 2015 - 6:29 pm | टवाळ कार्टा

"," ने कै फायदा होतो नै ;)

काही लोकांना दुर्लक्ष करण्याची कला मिसळ्पाव वर अवगत होइल असे वाटते आहे.

चेतन677's picture

28 Feb 2015 - 8:31 pm | चेतन677

लई भारी आहे कविता..