(पेताडांच्या मेळ्यामध्ये !)

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in जे न देखे रवी...
13 Aug 2008 - 9:41 pm

पेताडांच्या मेळ्यामध्ये
आम्ही माळकरी साधे
तुम्हा रूचतील का हो
माझे शेंगदाणे खाणे

तुम्ही प्याल विलायती
आम्ही कोकचे घुटके
का हो तर्र मेळ्यात या
तुम्ही बोलता बोबडे

जन्म उजेडात गेला
अमुचे चंद्राशी वाकडे
जरा जमजून घ्यावे
दात अजूनि दुधाचे

जरा सरावुद्या हात,
'नीट' मिळू दे पेय
मग सांगू अमुची व्यथा
तुम्हालाही असंबद्ध !!!
-------------------------
विडंबनासाठी प्रेरणा :
अंकुश चव्हाण यांनी पोस्टलेली कविता
http://www.misalpav.com/node/3028

आणि बिनडोक बनीने पोस्टलेली कविता
http://www.misalpav.com/node/3029
------------------------
www.atakmatak.blogspot.com

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

अनिता's picture

13 Aug 2008 - 10:01 pm | अनिता

आवडल विडबन..

शितल's picture

13 Aug 2008 - 10:30 pm | शितल

तुम्ही प्याल विलायती
आम्ही कोकचे घुटके
का हो तर्र मेळ्यात या
तुम्ही बोलता बोबडे

हे तर मस्तच...
:)

हर्षद आनंदी's picture

14 Aug 2008 - 8:53 am | हर्षद आनंदी

शेंगदाणे जास्त खाल्लेतर पित्त भडकते आणी चुकुन स्वतःचे वाभाडे निघाले तज चित्तही खवळते
अश्या विडंबना नंतर हा धोका अंमळ जास्तच!!
तेव्हा जरा जपून

{इकडे आले की दारुच्या अड्ड्यावर आल्या सारखे वाटते}
हं.... हा अनुभव बोलतोय , आपले तिथेही वास्तव्य , आवागमन असते हे वाचुन आनंद झाला

|| निर्लज्जम् सदा सुखी ||

प्रकाश घाटपांडे's picture

14 Aug 2008 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

http://akbrahms.blogspot.com/2008/07/blog-post_25.html पहा काय युवराज म्हन्तात!
प्रकाश घाटपांडे

पद्मश्री चित्रे's picture

14 Aug 2008 - 2:38 pm | पद्मश्री चित्रे

:)